फॅक्टरी डेटा रीसेट…
मागे एका पोस्टमध्ये म्हटल्या प्रमाणे माझा फोन लॉलीपॉप नामक ऑपरेटिंग सिस्टीम उपग्रेड केल्याने आजारी पडला होता. माझ गुगल सिंक गेल्याने त्यांनी पाठवालेला पॅच पण रन करता येत नव्हता. अनेक आर एंड डी करून एकच निष्कर्ष निघाला. फॅक्टरी डेटा रिसेट! मी अनेक दिवस तयार नव्हतो. कारण कॉन्टेक्ट्स, फोटो, व्हिडिओ, ऑडियो हे सर्व उडणार होत. माझा आजारी फोन लॅपटॉपवर देखील डिटेक्ट होत नसल्याने गेल्या तीन महिन्यातील सर्व डेटा डिलीट होणार हे नक्की होते! त्याचा बॅकअप अशक्य होता! पण फोनची ब्याटरी लवकर संपणे, फोन गरम होणे, एस एम एस न चालणे, अनेक एप्स न चालणे असल्या अनेक रोगांनी त्रस्त झालेल्या माझ्या फोनमुळे मी पण frustrate झालो होतो. Choices were भूत काळातील डेटा सांभाळणे किंवा भविष्य सुकर बनवणे!
मग काल धीर केला. गूगलच्या कस्टमर सर्विसला फोन केला. तिथल्या चुणचुणित मुलाने फोन उचलला. मी सर्व कथा कथन केली…ह्या ओपन हार्ट ऐवजी तो एखादी गोळी सुचवून रोग घालवेल ह्या वेड्या आशेने! पण त्याने तोच एक उपाय असल्याचे सांगितले. मग मी तयारी केली. शेवटचा प्रश्न एकच “हे केल्यावर माझा फोन “स्मार्ट” नाही राहिला तरी माझी तयारी आहे. पण निदान कॉल यावे जावे इतपत तरी राहील ना?” तो हसला आणि म्हणाला “Sir your phone will remain smart and perform like a champ! आम्ही हे रीसेट रेग्युलर करतो. त्याने नको असलेल्या अनेक गोष्टी डिलीट होतात आणि फोन त्याच्या मूळ स्वरूपात येऊन उत्तम चालू लागतो” मी ओके म्हटले. त्याने मला वॉक थ्रू देत फोन रीसेट केला! मी धन्यवाद म्हटले..
तेव्हापासून माझा फोन उत्तम चालतो आहे. बॅटरी, स्पीड सर्व सुपर…अगदी दोन वर्षांपूर्वी नवीन होता तेव्हा सारख! आज अचानक जाणवल की तो मुलगा काल बोलता बोलता एक छान आयुष्याच तत्वज्ञान सांगून गेला!
आयुष्यात सुद्धा आपण अनेक लोक, त्रास, चिंता, अपेक्षा, स्पर्धा ह्या आणि असल्या अनेक गोष्टींचा बराचसा गरज नसलेला किंवा कालबाह्य झालेला डेटा मनात आणि डोक्यात साठवून ठेवतो. त्याचा आपल्या विचारांवर थोडाफार पगडा किंवा अंमल असतो. त्याचा आपल्या वागणुकीवर परिणाम होत असतो. मग वैयक्तिक आणि व्यावसायिक परफॉर्मन्स अफेक्ट होतो. मन भूतकाळात अडकते आणि वर्तमानातले निर्णय घेते…त्यामुळे भविष्य अफेक्ट होते!
त्या ऐवजी निरुपयोगी जुने लोक, विचार, आठवणी, दुःख इ. डिलीट केले, नवीन जीवनशैली आणि विचारांनी स्वत:ला अपग्रेड केले तर वर्तमानात परफॉर्मेंस चांगला होईल आणि भविष्य उजळ असेल….कालच्या चांगल्या कृतीने आज माझ्या फोनचे आहे तसे!
आता मी ठरवले आहे…दर महिन्यात निदान एकदा तरी मन आणि मेंदुचे फॅक्टरी डेटा रीसेट करायचे! नको असलेले, संपलेले सर्व डिलीट करायचे….आपल्याला देवाने निर्माण करताना त्याच्या फॅक्टरीमध्ये केलेल्या ओरिजनल सेटिंगवर जायचे…आपल्यातला खरा मी शोधायचे….आयुष्यातील स्थित्यंतरांना, बदलांना आपलेसे करत उगाच जमा झालेले जुने डिलीट करायचे…
Image by Jan Vašek from Pixabay
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023