रात…

आत्ताच कुठल्यातरी लोकल च्यानलवर “रात” पाहिला आणि जुनी आठवण आली….

मी लहान असताना टीव्हीवर हा खेळ सावल्यांचा चित्रपट पाहिला. त्यानंतर आठवडा ते पंधरा दिवस मी आमच्या चाळीतील जरा आड बाजूला असलेल्या अंधाऱ्या सार्वजनिक संडासात रात्रीच्या वेळी जायला घाबरलो होतो. रात्री बरोबर नेलेल्या काचेच्या चिमणीच्या अंधुक उजेडात मला खिडकीवर पडणाऱ्या माझ्याच सावलीत खिडकीचे गज धरून नरसूचे भूत उभे आहे असा भास झाला होता!

तसच मोठ झाल्यावर एक्सल्सियरला रात सिनेमाचा लास्ट शो पाहून मित्राला वाटेत टाटा करून घरी एकट्याने चालत जाऊन, बिल्डिंगच्या पायऱ्या चढून गच्चीत पोहोचून, पांघरुण लपेटून झोपेपर्यन्त अंगावर शहारा होता आणि पल्सरेट वाढला होता! आणि हळूच पांघरूण डोक्यावरून बाजूला करून शेजारी मित्र झोपला आहे ह्याची खात्री करताना त्याच्या जागी रेवतीचा पांढुरका चेहरा दिसला आणि मी दुसऱ्या एका मित्राला उठवला! “भ#@ झेपत नाही तर कशाला हॉरर सिनेमे बघतोस?” असे म्हणून तो झोपी गेला! मी पुढला आठवडा गच्ची सोडून घरी झोपलो होतो!

त्यानंतर अनेक हॉरर सिनेमे पाहिले. कधीच भीती वाटली नाही! पण नरसुचे भूत आणि “तुम ने तुम्हारी दोस्त को मारा?” अस इन्स्पेक्टरने विचारल्यावर झपाटल्या डोळ्यांनी शांतपणे “आप को कैसे मालूम?” अस विचारणारी रेवती इतके खोल रुतले आहेत मनात की आजही अंगावर काटा येतो!

असो…रात्र आहे….रात पाहिला आहे!!! कॉमेंट मध्ये रेवती किंवा नरसू दिसायच्या आधी पांघरूण ओढून गुडुप झोपतो!!! शुभ “रात”…..

Image by Enrique Meseguer from Pixabay 

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!