ती आणि तो….

तो- हाय
ती- हम्म
तो- अजून ऑफिस?
ती- नाही. निघाले. तू?
तो- नाही अजून खूप काम आहे.
ती- अच्छा. म्हणजे सगळी टीम थांबली आहे का?
तो- नाही. फक्त मी आणि श्रिया.
ती- श्रिया म्हणजे तीच ना गेल्या वीकेंडला तुमच्या ऑफ साईट मध्ये दारू पिऊन तुझ्या अंगावर पडत नाचत होती? मी फोटो आणि व्हिडीओ पाहिले तिनेच अपलोड केलेले तुला टॅग करून.
तो- तू तेच लक्षात ठेव फक्त.
ती- ते मी विसरणार तरी नक्की नाही.
तो- आता बास ना तो विषय.
ती- तू पण खुश होतास एकदम.
तो- काहीही काय?
ती- काहीही नाही, खुश!
तो- मी का खुश असेन?
ती- नैसर्गिक आहे ते.
तो- wtf?
ती- ते f वगैरे तुम्हाला माहित दोघांना.
तो- बरी आहेस ना तू?
ती- हो मी बरी आहे. ती मात्र काय म्हणतोस तू तशी हॉट, कडक, टकाटक वगैरे वाटत असेल आता.
तो- बास ना आता.
ती- अरे वा मला भेटायचा कंटाळा आला होता हे माहीत होतं. आता बोलायचाही कंटाळा आला वाटत. बरं. सॉरी. फोन ठेवते.
तो- मी अस म्हणालो का?
ती- अनेक गोष्टी न बोलता कळतात मला.
तो- काय कळतात? सांग? सांगच आता.
ती- हेच की मी आता नकोशी झाले आहे. आता काय बाबा सेक्सी श्रिया शेजारी. ऑफिसात कोण नाही. मज्जा आहे. चालू द्या.
तो- तू थोडी वेडी आहेस का? इथे सीसी टीव्ही कॅमेरा असतात ऑफिसात आणि लक्ख उजेड असतो.
ती- अच्छा हे पण बघून ठेवलंय तर.
तो- काय?
ती- हेच की ऑफिस मध्ये एकांत नाही मिळणार.
तो- आता बास मला काम करायचं आहे.
ती- बरं बाय. सॉरी त्रास दिला उगाच तुला.
तो- पण नीट नाही बोलणार ना?
ती- काय बोलू?
तो- म्हण की आय लव्ह यु.
ती- मी नाही म्हणणार.
तो- का?
ती- इच्छा नाहीये.
तो- मग ठीक आहे. प्रेम आहे ना? ते महत्वाचं. बर मी म्हणू?
ती- काय?
तो- तेच.
ती- हम्म
तो- आय लव्ह यु! आता म्हण ना तू पण प्लीज..
ती-……..
तो- हॅलो. आहेस की गेलीस?
ती-….आहे.
तो- काय झालं?
ती- काही नाही.
तो- मग बोल ना?
ती- काय?
तो- बर मी म्हणतो तू रिपीट कर ओके?
ती- हम्म…ओके.
तो- आय
ती-…..आय
तो- जोरात बोल ना.
ती- जोरातच बोलते आहे.
तो- ओके. परत एकदा…आय
ती-……आय
तो- लव्ह
ती-……
तो- काय झालं? बोल ना.
ती- मला लाज वाटते.
तो- श्रिया येईल हां इतक्यात!
ती- (घाईघाईने) आय लव्ह यु आदि!
तो- काय? ऐकू नाही आलं. जोरात बोल.
ती- आय लव्ह यु! खूप खूप जास्त!
तो- बरं मग आजचा डिनर फिक्स ना?
ती- हम्म
तो- मी शार्प 10 ला खाली येऊन फोन करतो. तयार राहा. …हाय श्रिया…
ती- आली ती?
तो- हो जस्ट
ती- मग तिलाच ने ना डिनरला. मी कशाला हवी आता?
तो- तस काहीच नाहीये. यु नो दॅट.
ती- तुला हसायला येतय? मी इथे इतकी त्रासात आहे आणि तू हसतो आहेस?
तो- बाय. सी यु ऍट 10.
ती- अच्छा ती जवळ येऊन उभी आहे म्हणून हसत हसत इंग्लिश फडतो आहेस होय? आता आलं लक्षात!
तो- हाऊ स्वीट. ठेऊ आता?
ती- तुला हवं ते कर. आजचा प्लान कॅन्सल!

ती फोन कट करते. तो हसून काम सुरू करतो. पाच मिनिटांनी तिचा मेसेज येतो-

ती- आय ऍम सॉरी! मी दहा वाजता वाट बघते आहे. लवकर ये.
तो- ओके.

तो हसून फोन ठेवतो. काम सुरू करतो. सगळा स्ट्रेस एका क्षणात नाहीसा होतो. कारण त्याला तिच्या लोभस, निष्पाप चेहर्याबरोबरच आजची रंगत जाणारी रात्र नजरेसमोर दिसत असते!- मंदार जोग

Image by TeroVesalainen from Pixabay 

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

4 thoughts on “ती आणि तो….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!