ब्ल्यू बेरी चीज केक
तिने घड्याळाकडे पाहिलं.आत्ताशी रात्रीचे अकरा वाजत होते , आज दोन आश्चर्ये घडली होती, एक म्हणजे अगदी उद्यावर वाढदिवस आला असूनही तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला ती एकटीच होती आणि दोन म्हणजे स्वतःच्या वाढदिवसासाठी तिने ब्ल्यू बेरी चीज केक न बनवता चक्क दुसरा केक बनवायला घेतला होता.तिने एकवार ओव्हनकडे नजर टाकली, अजून 35 मिनिटे बाकी होती बेकिंगची.असो.तिने आता 115व्यांदा फोनचा स्क्रीन अनलॉक करून पाहिला, कुणाचाच मेसेज नाही!!! तिने एकदा मनाला विचारल “कोणाचाच मेसेज आला नाही म्हणून राग येतोय की समीरचा मेसेज आला नाही म्हणून राग येतोय तुला मनवा?” मग उत्तर आलं, “yes, it is only with Sameer”. मग मोबाईल सोफ्यावर आपटून तिने टिव्ही लावला. भराभर चॅनल सर्फिंगला लागली, मग कुठेतरी ‘before sunrise’ लागला होता, ती चॅनल चेंज करूच शकली नाही.तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटल आणि मनात विचार उमटले
“आज काय पुरी कायनात मला समीरची आठवण करून देण्याच्या मागे लागली आहे का?” आणि तिने आता सोफ्यावर पाय पसरले.
मनवा आणि समीर टींडरवर भेटलेले.मग काही काळानंतर प्रत्यक्ष भेटले, मग एकदोन कॉमन फ्रेंडसच्या हाऊस पार्टीमध्ये, मग एकदा एका ट्रेकला सोबत होते.तिला तो ट्रेक आठवला, ट्रेकच्या पहिल्या दिवशी, बेस कॅम्पला पोचल्यावर, सगळ्यांना जाम भूक लागलेली मग जेवणं झाली आणि कॅम्प फायरचा प्रोग्राम.थोड्या वेळानंतर सगळी पांगली.सगळच पहा कस जमून आलेलं, दोनो दिल जवा, समा भी जवा अर्थातच या दोघांना झोप येईना मग समीर म्हणाला माझ्या मोबाईलवर एक सुंदर फिल्म सिरीज डाऊन लोडेड आहे ती पाहूया, तेव्हा समीरच्या टेंटमध्ये बसून पहिल्यांदा तिने before sunrise’ पाहिला आणि ती प्रेमातच पडली त्या अख्या सिरिजच्या आणि समीर तिच्या.दुसऱ्या दिवशी उठल्यावर तिला समीर कुठे दिसेना, शोधाशोध केल्यावर समीर दिसला म्हणे
“काल तुला impress करायच्या नादात before sunrise’ लावला खरा पण बॅटरी संपली ना राव. बॅटरी बँकच शोधत होतो”
“आणि तू मला impress का करू पाहतोयस?”
मग समीरने अतिशय फिल्मी पद्धतीने before sunrise’ चाच dialogue टाकला-
“Isn’t everything we do in life, is a way to be loved a little more” मनवा यावर हसली गोडशी.
ट्रेकनंतरही ते बऱ्याचदा भेटले आणि मग त्यांनी एका घरात मुव्ह करून लिव्ह इन मध्ये राहायचा निर्णय घेतला.मग नवीन घर लावणे ही एक आनंदाची प्रोसेस होती.सकाळच्या चहापासून रात्रीच्या वॉक पर्यंत सगळ एकत्र छान सुरू असायचं. तिचं बेकिंग त्याचं वाचन, तिचं बॅडमिंटन त्याचं बागकाम, तिचं पसारा आवरण त्याचं पसारा घालण, तिचा व्यायाम त्याच क्रिकेट बघण सगळ कसं अगदी ठरल्यासारख सुरू असायचं.यातलं बेकिंग त्यातही ब्ल्यू बेरी चीज केक बनवणं तिचं सर्वात आवडत तर त्याचं क्रिकेट.ती दोघंही छोटे छोटे आनंद सेलिब्रेट करायची. समीरला ब्ल्यू बेरी चीज केक फक्त मनवामुळे आवडायला लागला. असं कायकाय तिलाही त्याच्यामुळे आवडायला लागलं.थोडक्यात त्यांनी एकमेकांना एकमेकांसकट स्वीकारलं होत.
दोघांनाही फिल्मस बघण्याची कॉमन आवड.तिच्यासाठी तो confession of shopoholic person बघायचा तर त्याच्यासाठी ती अंदाज अपना अपना. तिच्यासाठी तो बर्फी बघायचा तर त्याच्यासाठी ती the prestige. ह्या सगळ्या फिल्मस त्यांनी किमान 101 वेळा एकमेकांसोबत बघितल्या होत्या. काही ठरलेल्या गोष्टी तर एकमेकांशिवाय ते कधीच करायचे नाहीत.ते एकमेकांच्या जगण्याचा भाग झाले होते. एकाशिवाय दुसरा अपूर्ण होता.
आत्ता तिला before sunrise’ मधील एक सिन बघितल्यावर तर समीरची कचकचून आठवण आली.ती स्वतःशीच पुन्हा एकदा हसली.तिने एकदा त्याला विचारल होत
“मस्त वाटणं, ही भावना कशाशी रिलेट करशील तू?”
“रोज सकाळी पोट व्यवस्थित साफ होणं” मनवाने चेहऱ्यावर त्रासिक भाव दिले आणि तो खदाखदा हसत म्हणाला
“मला माहितीये की नेहमी नेहमी मला गुलाबी बोलायला जमणार नाही हे तुला माहीत असत…”
“अच्छा, आणखी काय माहितीये तुला माझ्याबद्दल?” मनवाने विचारल
“हेच की,कधी वेळ आली तर तुझ्यातल्या मला धरून ठेवणार नाहीस तू …मोकळ सोडशील” यावर मनवा कसनुस हसली होती.
आणि पुढे झालं पण तसच…समीरला न्यूझीलंड मधून ऑफर आली, ह्या संधीसाठी त्याने बरेच कष्ट घेतले होते आणि मनवाच्या कामाच्या संधी सगळ्या भारतातच होत्या.शिवाय भारत सोडून इतर कुठे जायची तिला कधीच इच्छा नव्हती. मुख्य म्हणजे लग्न न झाल्यामुळे दोघांनी एकमेकांसोबत राहीलच पाहिजे असा दोघांचाही आग्रह नव्हता.
“बघ हा फायदा असतो लिव्ह इनचा” दोघंही एकमेकांना एअरपोर्टवर सी ऑफ करताना उत्तरली.अगदी लव्ह आज कल सारखी सिच्युएशन.
मग सुरू झालं long distance relationship
पर्व. दिवस , महिने सरत होते ती दोघं आपापल्या कामात बुडून जावू लागली.आता संभाषणात छोटी छोटी खोटी डोकावूं लागली.ती दोघं एकमेकांना प्रचंड मिस करू लागली.सोप नसतंच मुळी अशा आठवणी, अख्खीच्या अख्खी माणसं विसरण.एकदा त्या दोघांनी PS I love you एकत्र पहायचा ठरवला. मनवा भारतातून आणि समीर न्यूझीलंड मधून. पिएस बघताना दोघंही खूप रडली.मग त्यांनी ठरवल आपल्याला हे long distance जमणार नाही, त्यापेक्षा एकमेकांशी काही काळ बोलायलाच नको.या गोष्टीला आता 3 महिने होत आले होते.
टsssssssन इतक्यात ओवन वाजला आणि मानवाच्या विचारांची तंद्री पुन्हा भंगली. केक बेक झाला होता, तो केक काढताना आपण गाठलेली तिशी, एकीकडे घरून लग्नासाठी जोरदार होणारी मागणी तर दुसरीकडे समीरला विसरता न येणं, ही रात्रीची शांतता आणि त्याहीपेक्षा अंगावर येणार एकटेपण दाटून येऊन मनेवा रडायला लागली.तिला तिचंच रडण भेसूर, भयानक वाटू लागलं.
इतक्यात फोन वाजला.फोन घ्यायला ती बाहेर धावली डोळ्यात असणाऱ्या पाण्यामुळे नक्की कोणाचा व्हिडिओ कॉल येतो आहे हे तिला दिसल नाही पण नंतर दिसल.समीरचा होता.बरोबर 12 ची वेळ त्याने साधली होती.सहज विश करायला फोन केला असेल या विचाराने डोळे पुसत तो फोन उचलला तर तिकडे समीरच्या डोळ्यात पाणी, तो कसबसा म्हणाला-
“Happy Birthday Manva”
तिनेही कसबस thanks म्हणल. मग मात्र दोघांना पुन्हा आवरलं नाही.
“नाही जगू शकत तुझ्याशिवाय” तो म्हणाला
“आज चक्क गुलाबी बोलतोयस” ती म्हणाली
“मी भारतात येतोय, कायमसाठी, तुझ्याजवळ, मला हवी आहेस तू, कायमसाठी”
“आता बाकी तू ‘ये जवानी’ मधल्या बनी सारखं वागतोयस!!!” तिने त्याच्या बोलण्याला अजूनही सिरीयसली घेतल नव्हत.
“तुला खरं वाटत नाही का? थांब मी तुझ्यासाठी काही बनवल आहे” अस म्हणून तो फोन घेऊन त्याच्या किचनमध्ये गेला आणि ओवनमधून चक्क ब्ल्यू बेरी चीज केक दाखवला. आता बाकी मनवा आनंदाने वेडी व्हायची बाकी होती.तो केक बाहेर काढून त्याने पुन्हा तिला विश केलं नि त्या दोघांनी तो केक online कापत मानवाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं.
तुम्ही अजून इथेच आहात!!! सेलिब्रेशन झालं,ब्ल्यू बेरी चीज केकचा दरवळ न्यूझीलंडपासून भारतापर्यंतच्या मनात पसरला .मग समीर भारतात आला….
.
.
.
.
.
.
पुढचं माहीतच आहे की तुम्हाला.Enjoy your blue berry cheese cake🍰🍰
Image by andreas N from Pixabay
- सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर - February 23, 2020
- तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत- भाग्यश्री भोसेकर - February 20, 2020
- गोष्टी लेखकांच्या –गौरी शिंदे - November 13, 2019
MAST
छान
हे फार फार खास आहे. म्हणून मला सगळ्यात जास्त हाच दरवळ आवडतो. 💙💙