किसका रस्ता देखें?..
बाहेर कितीही उकाडा असला असला, तरी एखाद्या परग्रहावर असल्याप्रमाणे, ते ब्रॅन्डेड कॉफी शॉप कायमच सुगंधित प्रसन्नतेची थंडगार शांतता मिरवत तयार असायचं. ‘मग आजचा दिवस तरी त्याला का अपवाद असावा?’ स्वतःसमोरच्या एव्हाना गार पडलेल्या कॕपेचिनोच्या कपाशी खेळत वरूण स्वतःशीच विचार करत होता.
कॉफी शॉपचा हा जरासा दुर्लक्षित कोपरा, त्याचा आवडता होता. एकमेकांपासून अंतर राखलेली फक्त तीन टेबलं तिथे होती. त्यातल्याच एका टेबलावर बसून गेला पाऊण तास, तो मिनिताची वाट पाहत होता. तसं तिची वाट पाहणं त्याच्या अंगवळणी पडलं होतं, पण आज सुद्धा?? कधी नव्हे तो जरासा इरिटेट झाला. तिला सतरा मेसेजेस पाठवून झाले होते (जे अर्थातच अनरीड होते). FB वर यथेच्छ टाइमपास करून झाला, वॉट्सऍपवर खेळून झालं अगदी कॅन्डीक्रशची एक लेव्हलही सोडवून झाली, पण वाट पाहणं काही सरत नव्हतं.
साहजिकपणे त्याची नजर अधूनमधून तिच्यावर पडत होती. वरूणसाठी ती अनोळखी होतीही आणि नव्हतीही. म्हणजे त्याला तिचं नाव गाव काऽही माहीत नव्हतं, पण त्याने तिला अनेकदा पाहिलं होतंच. त्याच कॉफी शॉपमधे, त्याच खुर्चीवर, अगदी त्याच्यासारखीच, तिच्या त्याची वाट पाहताना ! शेलाटी, रेखीव भुवयांची, जराशी सावळीच पण डोळ्यांमधून बुद्धीचं तेज डोकावणारी, ती ! स्वतःशीच कसलासा विचार करून आणि होतं नव्हतं ते सगळं धाडस गोळा करून वरूण सरळ तिच्या टेबलाशी जाऊन उभा राहिला.
___________
एकेकाळी हे असं वाट पाहणं वृंदाला खरंतर रोमॅन्टिक वगैरे वाटायचं. तसं ते आत्ताही वाटलं असतं, जर एकदातरी मितुलने तिची वाट पाहिली असती तर. हल्ली मात्र तिला स्वतःच्याच रोमॕन्टिकपणाच्या जाळ्यात अडकल्यासारखं वाटायचं. ‘हो म्हणजे ती भावना म्युच्युअल असायला हवी ना. इथे मात्र मीच..’ वृंदा विचार करायची. ‘किमान आज तरी त्याने वेळेवर यायला हवं होतं.’
समोरच्या टेबलावरला मजनू (हे आपलं तिनेच त्याला मनातल्या मनात ठेवलेलं नाव हं.) आज जरा जास्तच रेस्टलेस वाटत होता. नॉर्मली तो नेहमी शांत असायचा, अगदी तासन् तास वाट पाहतानाही ! तसा होता तो स्मार्ट. गोरेटला, रुंद खांद्यांचा, आणि नितळ नजरेचा. पण हीच नजर, त्याची ती हिरॉइन समोर आली, की अगदी कोकरू होऊन जायची. ‘बिच्चारा’ ती नेहमी मनात म्हणायची. अचानक मजनू उठला आणि चक्क तिच्या टेबलासमोर येऊन उभा राहिला !
“हाय, आपण एकमेकांना ओळखत नाही, हे मात्र ओळखून आहोत. साधारण रुटीन बघता आपल्या दोघांना अजून दीड-दोन तास तरी वाट पहावी लागणार आहे. मग असं एकएकटं वाट पाहत बसायच्याऐवजी, एकमेकांच्या कंपनीत बसलं तर कदाचित वेळ लवकर सरकेल. बाय द वे, मी वरूण.” मजनू, आपलं, वरूण हात पुढे करत म्हणाला. वृंदा चांगले १५-२० सेकंद त्याच्याकडे पाहतच राहिली. हे तिच्या कुठल्याही कल्पनेपलीकडचं होतं. पण त्याचे डोळे अगदी प्रांजळ होते. ती हलकेच स्वतःशीच हसली, तिची नजर झुकली पण कसलासा निर्धार करून तिने वर पाहिलं.
_________
’हातभर फाटणे’ म्हणजे काय? याचा वरूण स्वानुभव घेत होता. पण आता पाऊल उचललं होतं, तर माघार घेणं शक्य नव्हतं. “हाय, मी वृंदा. प्लिज हॅव अ सीट.” त्याच्याशी शेकहॅन्ड करत ती म्हणाली. सुटकेचा निश्वास टाकत वरूण खुर्चीत जवळजवळ कोसळलाच. “वेल धिस इज ऑकवर्ड. पण आज एकट्याने वाट पाहत बसणं मला अगदी शक्यच नव्हतं.” वरूण म्हणाला. “का आज काही स्पेशल आहे का?” तिने विचारलं. “हो आज माझा वाढदिवस आहे.” जरासा ओशाळत वरूण म्हणाला. “वॉव ! माझाही !!” वृंदा म्हणाली.
वाढदिवस असूनही ज्या व्यक्तीला आपण स्पेशल मानतो, तिने आपल्याला इतका वेळ ताटकळत ठेवण्यामागची वेदना, त्या दोघांशिवाय इतर कुणाला जास्त समजली असती? ‘समान शिले व्यसनेशू सख्यम्’ म्हणतात, त्यात ‘वेदनेशू सख्यम्’ शामिल करायला काही हरकत नसावी. “हॅप्पी बर्थडे !” दोघे एकदमच म्हणाले आणि किंचित हसले. मात्र एकाच परिस्थितीत अडकलेल्या दोन माणसांमध्ये सहज तयार होणारा मोकळेपणा मात्र त्या क्षणापासून दोघांमधे निर्माण झाला.
“मी मिनिताला दोष देत नाहीये. आय अंडरस्टँड. पण आम्ही नेहमीच ठरवून भेटतो, शॉर्ट नोटीसवर नाही. तरी…” “मिनिता कोण? तुमची मॉडेल?” वरूणला मधेच तोडत वृंदाने विचारलं. “मॉडेल? नाही स्ट्रगलिंग ऍक्ट्रेस. हो तीच. पण तुम्ही मॉडेल का म्हणालात?” वृंदा स्वतःशीच खुदूखुदू हसली (आणि तसं करताना अगदी गोड दिसली). “ती माझी एक सवय आहे. वागण्यानुसार अनोळखी माणसांना नावं ठेवायची. सो..” “अच्छा, म्हणजे तुमचंही (‘ही’ वर अनावश्यक जोर का बरं पडला?) आमच्याकडे लक्ष होतं तर. मग मला काय नाव ठेवलंय?” वरूणने विचारलं आणि काही कळायच्या आतच वृंदाच्या तोंडून उत्तर घरंगळलं, “मजनू..!!”
_____________
‘शिट !!!! How did I say that?’ वृंदाने जीभ चावली. पण एक क्षण अवाक् झाल्यानंतर वरूण चक्क हसत सुटला आणि वृंदाचा जीव भांड्यात पडला. हसताना वरूण एकदम क्यूट दिसतोय, तिच्या मनात आलं. तसंही स्वतःवर हसू शकणारा पुरूष दुर्मिळच! “How funny ! मी तुझ्या त्याला हिरो म्हणायचो आणि तूला लैला.” वरूण बोलून गेला आणि तात्काळ त्यातला घोटाळा लक्षात येऊन गप्प झाला. “मॉडेल आणि मजनू” तर “हिरो आणि लैला”. स्वतःला कळत नसलं, तरी प्रेमात खरंच कोण बुडालय, हे परक्याच्या सहज लक्षात येतं, हे अचानक दोघांनाही जाणवून गेलं.
“सॉरी. कॉफी घेणार परत? तूला काय आणू?” वरूणने विचारलं. “लाटे” वृंदा म्हणाली आणि वरूण कॉफी आणायला गेला. अचानक डोळ्यापुढे झळाळलेल्या सत्यामुळे खरंतर दोघेही अस्वस्थ झाले होते. “Was it SO obvious for everyone to see, except me” हा प्रश्न दोघांना एकाचवेळी सतावत होता? मग आपल्या कसं लक्षात आलं नाही? आपण इतके आंधळे कसे झालो होतो? हो, ते केलेल्या फोनला कट करणं, मेसेजेसना खूप वेळ रिप्लाय न देणं, हल्ली हल्ली तुटक बोलणं, हे सगळं आतापर्यंत जाणवायला हवं होतं खरंतर पण नाही जाणवलं. की जाणवूनही मुद्दाम दुर्लक्षित केलं आपण कसल्याशा भ्रामक विश्वासात राहून? दोघांच्या मनात एकच गिरमीट गरगरत होतं. कॉफी घेऊन वरूण परत आला.
“सॉरी मी तसं बोलायला नको होतं.” वरूण म्हणाला. “ऍक्च्युअली, अगदी बरं झालं तू हे बोललास ते. कधीकधी ज्या गोष्टी स्वतःला दिसत नाहीत, किंवा पाहायच्या नसतात म्हणूया, त्या एखादी अनोळखी व्यक्ती सहज दाखवून जाते. आता नजर साफ झाल्यावर अशा अनेक गोष्टी आठवत आहेत की ज्या मी पाहूनही न पाहिल्यासारख्या केल्या होत्या. मी ज्याला थट्टा समजत होते, ते बहुतेक मुद्दामहून दिलेले क्यू होते, हे आता माझ्या लक्षात येतंय. मला इतका वेळ वाट पाहायला लावणं, हे चुकून किंवा कामाच्या प्रेशरमुळे होत नव्हतं, तर ते सिग्नल्स होते, हे आता कळतंय. आय वॉज सो व्हेरी ब्लाईंड !!” वृंदा मनात साचलेलं सगळं बडबडत सुटली.
___________
‘वृंदा म्हणत्ये ते खरं असेल? मिनिताचं हे वागणं जणू काही मला झटकून टाकण्याकरता असेल? म्हणजे मी इतका मंद झालो होतो, की हे मला साधं जाणवूही नये? What I have never sacrifised is my Self Esteem ! पण इतकं नाजूक आणि महत्वाचं नातं जिच्याशी जोडायचं होतं, तिच्याकडून मिळणारे हे संकेतच जर मी ओळखू शकलो नसेन तर ते नातं मुळातच किती कमकुवत पायावर उभं राहिलेलं होतं. मग हा लळालोंबा सांभाळत बसण्यात वृंदा म्हणत्ये तसा काहीच अर्थ नाहीये.
नजरेवरून एखादं सावट हटल्यासारखं वरूणने मोकळेपणी वृंदाकडे पाहिलं. आजवर कधीही दिसली नव्हती इतकी वृंदा रसरशीत दिसत होती, जणू आतून कसल्याशा निर्धाराने ती उजळून निघाली होती. नकळत दोघांनी एकमेकांच्या नजरेत खोलवर पाहिलं. प्रत्यक्ष कुणी बोललं नाही, तरी नजरेतूनच दोघांनी एकमेकांचे आभार मानले. खूप दिवसांनी मोकळा श्वास घेतल्या सारखा वृंदाने एक दिर्घ श्वास घेतला आणि ती वरूणकडे थेट पाहत म्हणाली, “स्वतःच्या वाढदिवसालाच स्वतःला हे कळण्या इतका उत्तम योग अजून कुठला असणार? मी आजंच मितुलला हे कळवून टाकणार आहे. Let him be a free bird on the auspicious day of my birthday !”
वरूणचा चेहरा भूत पाहिल्यासारखा झाला. त्याच्याकडे पाहून वृंदाने काळजीने विचारलं, “You OK? अरे नको त्या नात्यांची रद्दी उगाच साठवत बसण्यात काय अर्थ आहे? बरं झालं आपल्याला आधीच कळलं…” वरूणने वृंदाला हातानेच थांबवलं. कडवट हसून तो तिच्या पलीकडे पाहत म्हणाला, ” खरंच बरं झालं. त्यांच्याकडून हा प्रकार ऐकण्यापेक्षा आपलं आपल्यालाच कळलं हे नशीबच. पण आता तू पाहणार आहेस त्या गोष्टीची कल्पना, तुझ्या डोक्यातही आली नसेल. Just turn around and see !!!”
___________________
वृंदा गर्र्कन मागे वळली. कॉफी शॉपच्या दारातून एकमेकांच्या कमरेत हात घालून ती देखणी, चमकती, झळाळती जोडी येत होती. मितुल आणि मिनिता !!!!! शॉपमधल्या अनेकांच्या नजरा त्यांनी खेचून घेतल्या होत्या. हेवा, असूया, मत्सर, अनेक भावना त्या नजरांमधे होत्या. का कुणास ठाऊक? पण वृंदाला त्यांच्याकडे पाहून अजिबात काही वाटेच ना. जणू काही तिच्यासाठी ते दोघे अस्तित्वातच नव्हते.
“डार्लिंग, धिस जस्ट हॅपन्ड ! तुला सांगतो मी मिनूला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा I couldn’t just take my eyes off her and I didn’t !! त्या दिवशी तुला काहीतरी कारण सांगून सटकलो आणि तिला फॉलो केलं. तिची सगळी माहिती काढली आणि आय स्टॉक्ड हर लिटरली. आय वॉज कम्प्लिटली हेड ओव्हर हिल्स फॉर हर. I took her as a challange,आणि तुला माहित्ये मला चॅलेंजेस हरायला आवडत नाहीत. या वेळेसही मी हरलो नाही !!” मितुल सांगत होता.
“शोना, यू वॉज जस्ट नॉट माय टाईप बेबी. इतका कसा रे तू सगळंच समजून घेणारा. जरा देखील पुरुषासारखा वागत नाहीस. It just gets boaring you know. आणि मला बोअरिंग लाईफ अजिबात आवडत नाही. मितू बिहेव्हज द वे आय लाईक. त्याने मला प्रपोज देखील असं डॅशिंगली केलं की I was swept off my feet. मी लगेच होकार दिला त्याला !! प्लिज डोन्ट माईंड हं बच्चा !!” मिनिता लाडेलाडे बोलती झाली.
वरूणचा चेहरा पूर्णपणे भावनाशून्य होता. एखाद्या व्यक्तीला आपण ओळखायला चुकतो, पण देवंच बहुदा तुम्हाला त्या चुकीपासून वाचवतो. ” मिनिता मी नाही चिडलो. खरंच, मनापासून सांगतो. तुमची बातमी, तुम्हाला कल्पना नसेल, पण ते एक Blessing in disguise आहे माझ्यासाठी. तू मोकळी आहेस, तुझं आयुष्य जगायला. ऑल द व्हेरी बेस्ट टू यू.” “क्या बात है वरूण !! या पेक्षा वेगळ्या शब्दात मी माझ्याही भावना व्यक्त करू शकले नसते. मितुल Good bye.” वृंदा म्हणाली.
आणि त्या दोघांकडे पूर्ण दुर्लक्ष करून ती वरूणला म्हणाली, “इतक्या चांगल्या दिवसाचं सेलिब्रेशन दणक्यात व्ह्यायला पाहिजे. Let’s Celebrate !! खर्च आपण दोघे शेअर करू आणि पुढचं सगळं आयुष्य कसं शेअर करायचं याचं प्लॅनिंगही करू !! What say?” वृंदाच्या डोळ्यात खोलवर पाहत वरूण म्हणाला. वृंदाने त्याचे डोळे वाचत, कसल्याशा निर्धाराने म्हटलं, “नक्कीच. आपल्या सहजीवनाच्या गाठी नक्कीच ‘त्याने’ बांधलेल्या आहेत. सेलिब्रेशन तो बनता है !!”
थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत राहिलेल्या मितुल आणि मिनिता कडे संपूर्ण दुर्लक्ष करून वरूण आणि वृंदाने कॉफी शॉपचा दरवाजा उघडून, एकमेकांचा हात हातात धरून पावलं टाकली. दोघांनाही त्यांच्या पाठीवर खिळून राहिलेली मितुल आणि मिनिताची नजर अक्षरशः जाणवत होती. पण दोघांनी एकदाही मागे वळून पाहिलं नाही. इथे मितुल आणि मिनिताचा सगळा मूड नासून गेला.
वरूण आणि वृंदा आलेल्या पहिल्या गल्लीत वळून त्या दोघांच्या दृष्टीआड झाले आणि एकमेकांना टाळ्या देत बेफाम हसत सुटले. हसण्याचा पहिला भर ओसरल्यावर वृंदा म्हणाली, “मी उद्या परत तिथे जाऊन, cctv चं फुटेज पाहायला मागणार आहे. I would love to see the expressions on Mitul’s face. काय भन्नाट यॉर्कर टाकलास तू !! क्षणभर मी देखील बावचळले, पण त्यांची तर नक्कीच दांडी गुल झाली असेल !!”
“बॉस, बदला लेना तो बनता है. आपण इतके उल्लू बनलो, तर त्यांना थोडं उल्लू बनवायलाच हवं.” वरूण बोलून गेला आणि दोघे वास्तवाची जाणीव होऊन स्तब्ध झाले. वरूणच्या डोळ्यात वेदना तरळून गेली. वृंदाने तिचा हात हलकेच त्याच्या हातावर ठेवला.
नको ते विचार झटकून टाकल्यासारखी मान झटकून वरूण म्हणाला, “ते सोड. तुझा नंबर दे मला. मी तुला पिंग करतो.” ” माझा नंबर? तो कशाला बरं?” अगदी मिनिता सारख्या पापण्या खोट्याखोट्या फडफडवत वृंदाने गमतीत विचारलं.
“तुझा नंबर हवाच, कारण मी त्या कॉफी शॉप मधे, एकटा वाट पाहत बसणार नाहिये.” वरूण वृंदाचा हात हातात घेत म्हणाला. भर उन्हाळ्यातही वृंदाला सुखद गारवा जाणवला त्या स्पर्शात.
Latest posts by prashantp (see all)
- मूळ पुरुष- भाग २/२ - March 5, 2020
- मूळ पुरुष- भाग १/२ - March 3, 2020
- करकोचा आणि कादंबरी- प्रशांत पटवर्धन. - February 16, 2020
झकास कथा
मस्त. एकदम वेगळ्या वळणाने गेलेली कथा.
हा हा हा
Halaki fulki mast vatali story
छान