नाॅनलिव्हींग लिव्ह ईन
गरज..
गरज तर होतीच.
तडजोड ?
तडजोड बिलकूल नको होती.
आम्हाला दोघांनाही.
गरज शरीराची..?
ती तर होतीच होती.
फायनान्शियली सुद्धा परवडायचं.
ती आयटीवाली.
आणि मी सुद्धा.
ती दिसायला एकदम सेक्सी.
हाॅट…
मुड मुड के ना देख मुड मुड के…
मुड मुड के बघावंच लागायचं तिच्याकडे..
ती दिसली की,
मूड बन जाता था..
तिला हे सगळं समजायचं.
आवडायचं सुद्धा.
मैत्रीत सुद्धा पार्शियालिटी करायची ती.
मैत्रिणींपेक्षा मित्रच जास्त.
काही अगदी जवळचे..
हा कितवा ?
आठवावं लागायचं तिला.
कोण काय म्हणेल ?
माय फूट…
दुनिया से ऊसे कोई लेना देना नही था…
ती फटकळ.
तेवढीच केअरींग.
फ ची भाषा तोंडात बसलेली.
तरीही..
गरज पडली तर पैशाची मदत..
करायचीच.
आणखीन काय लागेल ते..
सब कुछ.
अगदी जान भी हाजीर है टाईप वाली.
कुठल्याही मदतीचा हिशोब न ठेवणारी.
अगदी मोकळी ढाकळी.
घडाघडा बोलणारी.
हात धुवून करियरच्या मागे लागलेली.
रात दिन एक करणारी.
वर्कोहोलीक.
आणि अल्कोहोलीक सुद्धा
रोज नाही काय…
कधीतरी मस्त मूड आला की..
ती म्हणायची,
रोज प्यायली की दारूची किंमत कमी होते.
मला महागाची दारू लागते.
सुट्टा मारणारी.
बिनधास्त…
तरीही एकटी.
गर्दीत हरवलेली.
समजायचं तिला.
पिपल यूज हर..
तिलाही ते यूज्ड टू झालेलं.
मग एकटीच..
तंद्री लावून बसायची.
मै और मेरी तनहाई..
तसा मी तिच्यापासून चार हात लांबच..
कीप सेफ डिस्टन्स..
नगरसारख्या छोट्या गावाहून आलेला मी.
हे असलं कल्चर मला झेपणेबल नव्हतंच…
नेमकं एका प्रोजेक्टवर मी आणि ती.
हमसफर व्हावं लागलंच.
रात और दिन, दिन और रात…
ये बेचारा, काम के बोज का मारा..
ती तशी मला दोन वर्ष सिनीयर..
खूप मदत व्हायची.
एकमेकांना खूप सांभाळून घेतलं आम्ही.
खूप शिकायला मिळालं.
दोघांनाही..
परफेक्ट ट्यूनींग जमलं.
वेव्हलेन्ग्थ मॅच झाली.
रेझोनन्स…
हेच वाईट.
सवयीचं झालं की आयुष्याकडनं अपेक्षा वाढतात.
आमचं टीमवर्क भारी जमलं.
डेडलाईनच्या आधी प्रोजेक्ट कम्प्लीटेड.
बाॅस खुष..
म्हणाला..
“जाव छुट्टी लेव, ऐश करो..
अपना गेस्ट हाऊस है, महाबळेश्वर में.
मै गाडी अरेंज कर देता हूँ..
एन्जाॅय..”
प्रोजेक्टमधले ऊरलेली दोघं.
गावाकडे पळाली.
ती खेचून घेऊन गेली मला महाबळेश्वरला.
तिथलं ते गेस्टहाऊस.
स्वीमींग पूल.
जलपरी झालेली ती.
डोळ्याचं पारणं फिटलं.
हिरवा निसर्ग…
गेस्ट हाऊसचं छोटंसं टेरेस.
ग्लास रिचवणारे आम्ही दोघं.
धुंद अॅटमाॅस्फीयर..
प्रेमाच्या गप्पा ?
बिलकूल नाही..
गप्पांना विषय नव्हता.
ती नव्याने भेटत होती.
तीचं अफाट वाचन.
तिला कळलेले ओशो.
तीचं आयुष्य.
तिचं निरपेक्ष जगणं.
तिचं मैत्रीविश्व.
तिच्या टर्म्स अॅन्ड कन्डीशन्स क्लिअर होत्या.
आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तिला हवी होती.
प्रत्येक गोष्टीची चव तिला चाखून बघायची होती..
मैत्री,सक्सेस,थ्रील,प्रेम,वासना,सेक्स..
सब कुछ.
तरीही कशातही गुंतून पडायचं नव्हतं.
यूज अॅन्ड थ्रो..
पुढचा ग्लास भरता भरता ती एकदम म्हणाली..
“तुझी कंपनी आवडतेय मला.
आत्तापर्यंत मला कुणी ईतका अपील नव्हता झाला..
आज माझ्याच रूममधे रहा..”
शबाब आणि शराब.
तिच्या नजरेत आव्हान होतं.
संस्काराची रद्दी कवचकुंडलं मी दारूत बुडवली.
ईस रात की सुबह नही..
सारी हदे पार हो गई.
हे एक बरं असतं..
दहा वेळा पाप केलं की पापीपणा कमी होतं.
पापाची पुण्याई वाढते..
अधून मधून तिच्या फ्लॅटवर येणं जाणं सुरू झालं..
घरी कळलं असावं बहुतेक.
खूप आकांडतांडव झालं.
‘तू आम्हाला मेलास..’
ब्ला ब्ला..
मी बधलो नाही.
एवढा निर्लज्जपणा तिच्याकडनंच शिकलो होतो मी..
का कुणास ठावूक ?
मी तिच्यात गुंतत चाललेलो.
एक दिवस तिला विचारलंच..
“असं किती दिवस चालणार ?”
‘ जोवर एकमेकांचा कंटाळा येत नाही तोवर..’
सीधी बात नो बकवास.
‘येण्याजाण्याचा त्रास होत असेल तर, इथं येऊन रहा..
नाहीतर मी तुझ्या फ्लॅटवर येते.
ऊगाच दोन दोन रेंट कशायला भरायची..
जोवर आपली कंपनी एकमेकांना आवडत्येय तोवर मजेत राहू.
नंतरचं नंतर बघू.
अट एकच..
कुठलीही चौकट नको.
कुठलाही क्वश्चनमार्क नको.
प्रश्न विचारायचे नाहीत.
ऊत्तराची वाट बघायची नाही.
आजाद पंछी.
मनमौजी..
आयुष्य आपल्या टर्मवर जगायचं.
दोघांची ईच्छा असेल तरच तसं जवळ
यायचं..
कुणीही एखादा नाही म्हणलं तर,
दूरी बरकरार..
लग्नाच्या नात्यातलं अपेक्षांचं ओझं घेऊन जगायचं नाहीये मला..
बघ..
तुला पटत असेल तर सांग.
विचार कर..
छोड्डो यार..
एक पेग टकीला भर.
मस्त मूड आलाय..’
मी विचार केलाच नाही..
दुसर्या दिवशी चंबू गबाळं ऊचलून तिच्याघरी..
बारा वर्ष..
बारा वर्ष आम्ही आयुष्य भरभरून जगलो..
अगदी लवबर्डस् सारखे..
एक दिवस..
घरी आलो तर..
ती आधीच आली होती..
बहुतेक हाफ डे.
अजूनही कुणी तरी..
सहज तिच्या बेडरूममधे डोकावलो.
कुणाल..
तिचा ×
माझ्या आधीपासूनचा तिचा जवळचा मित्र.
कुणाल आणि ती..
समझा करो यार.
माझ्या सहनशक्तीबाहेरचं..
माझ्यातला पुरूष जागा झालेला..
तिरमिरीत किचनमधे गेलो.
डायनिंगटेबलवरचा तो फ्रूट ट्रे
अॅपलशेजारची सुरी घेतली..
दरवाजाला लाथ घातली.
ती सुरी तिच्या छातीत आरपार..
तो टीनपाट कुणाल..
पाय लावून पळून गेला.
ती..
ती किंचाळली सुद्धा नाही.
किंचाळली ती तिची नजर..
‘काय चुकलं माझं ?
मी तर तुला सगळं आधीच सांगितलं होतं..
तु टिपीकल नवरोबासारखा वागलास..
मेन विल बी मेन..’
तीने डोळे मिटलेच नाहीत..
ती तशीच गेली बहुधा.
मी भानावर आलो..
नायगारासारखा ढसाढसा रडू लागलो.
दिलसे माफी मागितली तिची..
अचानक तिचे ऊघडे डोळे मिटले.
बहुधा माफ केलं असावं तिनं मला.
सगळं संपलंय आत्ता.
तो आमचा फ्लॅट..
एवढ्या पाॅश सोसायटीतला.
रिकामा कसा राहील ?
दोघं जणं राहतात तिथं..
एकदम मेड फाॅर इच आदर.
एकमेकांना फार जपतात.
भांडणतंटा कधीच ऐकू येत नाही..
बिल्डींगवाल्यांकडे लक्ष देऊ नका..
ते वाट्टेल ते बरळतात.
ती दोघं गॅलरीत बसून खिदळतात.
एकमेकांना घास भरवतात..
खूपवेळा दिसतात गॅलरीत..
खिडक्यांतून बाहेर डोकवणार्या हसर्या सावल्या..
काय प्राॅब्लेम आहे ?
प्राॅब्लेम एकच आहे.
ती दोघं जिवंत नाहीयेत..
ती दोघं म्हणजे आम्हीच दोघं.
ती गेली तेव्हाच ठरवलं..
तीला एकटीला मी कधीच सोडणार नाही..
अन् हे घरही..
मीही लगेच सातव्या मजल्यावरनं खाली ऊडी मारली..
तीला गाठलंच..
‘एकदा झालेली चूक पून्हा करणार नाही.
आपण दोघं पुन्हा लिव्ह ईन मधे राहू यात..
मी कधीच नवरोबा होणार नाही.
तू बायको नव्हतीसच कधी.
आपण फक्त लव्हबर्डस होवू यात..’
ती हो म्हणाली एकदाची.
विई लिव्हड हॅपीली फाॅरएव्हर.
अॅट देअर ओन्ली.
नाॅनलिव्हींग लिव्ह ईन..
नाॅन सेन्स बिल्डींगवाल्यांना काय कळणार ?
झपाटलेली जागा आहे म्हणे आमची.
गेली बावीस वर्ष रिकामी आहे.
आता बिल्डींग रिनोव्हेशनला जाणार आहे म्हणे..
जाऊ देत..
नवी बिल्डींग बांधू देत..
आमची जागा आम्ही सोडणार नाही.
ती बघा.
तीही खुदकन् हसली.
कधी कधी बायकोपणा करते ती.
तुम्हाला नाही दिसली..?
कमाल आहे ?
नाॅनलिव्हींग नाॅनसेन्स..
दुसरं काय ?
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
आई शपथ! बेकार आवडली ही कथुली…
BHAAAAAARIIIII
शेवट भारी!!
कथा छान आहेच शेवट एकदम वेगळाच.
Chhan katha.. tumhi ‘Idiot’s hey rangabhumivar sadhya alela natak pahila ka… First half especially.. ..khup relate hoto..konachahai anadar karynyacha hetu nahi..pan samya ahe hey sangayacha hota.. katha chhanch .. vadch nahi