पत्र क्रमांक 5
प्रिय रशम्या,
रशम्या मेरी जान कशी आहेस? आपण बोलतोच तसे रोज फोनवर पण हे असं एकमेकांना पत्रं लिहायची हे जे काही ठरवलंय आपण ते भन्नाट आहे.
तर मला इथे बंगलोरला जॉईन होऊन आठवडा होत आलाय. नवीन बॉस आत्ता तरी बरा वाटतोय इथे हे लिहिताना तुझं नेहमीच्या पठडीतील एक वाक्य आठवलं ‘बरा वाटणारा बॉस कधी बाराचा निघेल सांगता येत नाही’..
हेहे असो पण एम एच 12 ला तर मी मागे टाकून आलेय मला पुण्याची खूप आठवण येते. घडोघडी पुण आठवतं .माहीत नाही लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात कसे राहतात? इथे बंगलोरमध्ये मिसळ मिळत नाही गं. मिसळ म्हंटल की ‘अबे कुठल्या प्रदेशातून आलीय ही?’ असे हावभाव असतात इथल्या लोकांच्या चेहऱ्यावर. नाही म्हणायला गोलीचा वडापाव मिळतो..पण त्यात मजा नाही गं. अगं काल ऑफिसमध्ये पाणीपुरी खाल्ली तर त्यात बटाट्या ऐवजी गाजर किसून घातलं होतं..इइsssss ..मलाच किळस आली माझी.
असो पण पुण्याच्या/ महाराष्ट्राच्या पदार्थांपेक्षा माणसांना खूप मिस करते मी..हो बाई तुला पण..पण पुण सोडणं गरजेचं होतं ना गं. यह जवानी है दिवानी मधला डायलॉग आठवला
‘कही पहुचने के लिये कही से निकलना बहुत जरुरी होता है’. पिक्चरवरून आठवलं मी काल रात्री लॅपटॉपवर ‘2 स्टेटस’ पाहिला.
तुला माहितीचे की 2 स्टेटस माझ्या सर्वांत आवडीच्या सिनेमापैकी एक. फार सुंदर सिनेमा आहे. सर्वात जास्त काय आवडतं या सिनेमातील माहितीये? आलीया? नाही..नायक नायिकेच एकमेकांवर असलेलं प्रेम ? नाही..तर नायिकेन लग्न करणं नाकारणं ..तिच्या आईवडिलांचा अपमान केला गेला म्हणून..तिच्या आईबाबांचा सेल्फ एस्टीम आणि सेल्फ रिस्पेक्ट जपणं. फार फार आवडतो तो सिन मला जेव्हा आलिया अर्जुन कपूरला म्हणते “बात सिर्फ कम्युनिटीज की नाही है….” आणि त्याला सूनवून निघून जाते.
मिहिरच्या बाबतीत मी हे केलं नसतं तर
‘मी माझ्या आईवडिलांचा अपमान सहन केला.त्यांच्यासाठी काहीच नाही केलं’ हे गिल्ट फीलिंग मला जन्मभर छळत राहील असतं.. हो नं?
तुझीच
गार्गी
Image by Ralf Kunze from Pixabay
- सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर - February 23, 2020
- तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत- भाग्यश्री भोसेकर - February 20, 2020
- गोष्टी लेखकांच्या –गौरी शिंदे - November 13, 2019
खुप छान लिहीत आहात
आपल्या प्रतिक्रयेसाठी खूप खूप आभार
खरंं आहे.पत्रमैत्री खूप काही शिकवून जाते.
नक्कीच… हल्ली हे लोप पावत चालले आहे पण आपणच प्रयत्न करून ते पुन्हा अनुभवू शकतो
मस्त … नवी पिढी समजूतदारही आहेच
अश्या प्रतिक्रिया पाहिलं की खूप छान वाटतं