पत्र क्रमांक 5

प्रिय रशम्या,

रशम्या मेरी जान कशी आहेस? आपण बोलतोच तसे रोज फोनवर पण हे असं एकमेकांना पत्रं लिहायची हे जे काही ठरवलंय आपण ते भन्नाट आहे.

तर मला इथे बंगलोरला जॉईन होऊन आठवडा होत आलाय. नवीन बॉस आत्ता तरी बरा वाटतोय इथे हे लिहिताना तुझं नेहमीच्या पठडीतील एक वाक्य आठवलं ‘बरा वाटणारा बॉस कधी बाराचा निघेल सांगता येत नाही’..
हेहे असो पण एम एच 12 ला तर मी मागे टाकून आलेय☺☺ मला पुण्याची खूप आठवण येते. घडोघडी पुण आठवतं .माहीत नाही लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात कसे राहतात? इथे बंगलोरमध्ये मिसळ मिळत नाही गं. मिसळ म्हंटल की ‘अबे कुठल्या प्रदेशातून आलीय ही?’ असे हावभाव असतात इथल्या लोकांच्या चेहऱ्यावर. नाही म्हणायला गोलीचा वडापाव मिळतो..पण त्यात मजा नाही गं. अगं काल ऑफिसमध्ये पाणीपुरी खाल्ली तर त्यात बटाट्या ऐवजी गाजर किसून घातलं होतं..इइsssss ..मलाच किळस आली माझी.

असो पण पुण्याच्या/ महाराष्ट्राच्या पदार्थांपेक्षा माणसांना खूप मिस करते मी..हो बाई तुला पण..पण पुण सोडणं गरजेचं होतं ना गं. यह जवानी है दिवानी मधला डायलॉग आठवला
‘कही पहुचने के लिये कही से निकलना बहुत जरुरी होता है’. पिक्चरवरून आठवलं मी काल रात्री लॅपटॉपवर ‘2 स्टेटस’ पाहिला.

तुला माहितीचे की 2 स्टेटस माझ्या सर्वांत आवडीच्या सिनेमापैकी एक. फार सुंदर सिनेमा आहे. सर्वात जास्त काय आवडतं या सिनेमातील माहितीये? आलीया? नाही..नायक नायिकेच एकमेकांवर असलेलं प्रेम ? नाही..तर नायिकेन लग्न करणं नाकारणं ..तिच्या आईवडिलांचा अपमान केला गेला म्हणून..तिच्या आईबाबांचा सेल्फ एस्टीम आणि सेल्फ रिस्पेक्ट जपणं. फार फार आवडतो तो सिन मला जेव्हा आलिया अर्जुन कपूरला म्हणते “बात सिर्फ कम्युनिटीज की नाही है….” आणि त्याला सूनवून निघून जाते.

मिहिरच्या बाबतीत मी हे केलं नसतं तर
‘मी माझ्या आईवडिलांचा अपमान सहन केला.त्यांच्यासाठी काहीच नाही केलं’ हे गिल्ट फीलिंग मला जन्मभर छळत राहील असतं.. हो नं?

तुझीच
गार्गी

Image by Ralf Kunze from Pixabay 

Bhagyashree Bhosekar

Bhagyashree Bhosekar

मुळची महाराष्टात जन्म घेऊन इथेच वाढलेली भाग्यश्री सध्या बंगलोर मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते आणि विविध माध्यमात लिखाण पण करते. मराठी लेखनामुळे तिची मराठी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. लिखाणातून तिचा मराठी भाषेशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न असतो. भाग्यश्रीला लघु कथा, दीर्घकथा लिहायला विशेष आवडतात. आत्तापर्यंत तिने दोन shortfilms साठी पटकथा लिहिली आहे. शिवाय 2017 साली तिचं बॉम्बे बिट्स नावाचं मराठी पुस्तक प्रकाशित झालं आहे. याव्यतिरिक्त अवांतर वाचन हा तिचा छंद आहे.

6 thoughts on “पत्र क्रमांक 5

  • August 1, 2019 at 8:28 am
    Permalink

    खुप छान लिहीत आहात

    Reply
    • September 17, 2019 at 3:09 am
      Permalink

      आपल्या प्रतिक्रयेसाठी खूप खूप आभार

      Reply
  • August 5, 2019 at 5:04 am
    Permalink

    खरंं आहे.पत्रमैत्री खूप काही शिकवून जाते.

    Reply
    • September 17, 2019 at 3:10 am
      Permalink

      नक्कीच… हल्ली हे लोप पावत चालले आहे पण आपणच प्रयत्न करून ते पुन्हा अनुभवू शकतो

      Reply
  • August 12, 2019 at 12:47 pm
    Permalink

    मस्त … नवी पिढी समजूतदारही आहेच

    Reply
    • September 17, 2019 at 3:10 am
      Permalink

      अश्या प्रतिक्रिया पाहिलं की खूप छान वाटतं

      Reply

Leave a Reply to kanchan.deshmukh Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!