डोळे- साधना गोखले
त्या एकाकी अंधा-या रस्त्यावरून तो जिवाच्या आकांताने पळत होता.कुणाला तरी ओरडून बोलवावेसे वाटत होते.पण तोंडातून आवाज फुटत नव्हता.ते विखारी लाल डोळे आपला पाठलाग करतायत या जाणिवेने त्याच्या जिवाचा थरकाप झाला होता.पळून पळून पायातली शक्ति संपली तसे तो एका झाडाखाली थांबला.घामेजलेला चेहरा पुसून त्याने समोर पाहिले आणि काळ्या बुरख्यातली एक आकृती उभी होती तिला चेह-याच्या जागी फक्त एक हिरवा डोळा होता.आणि पापण्यांच्या जागी लपलपणा-या लाल पिवळ्या ज्वाला….. त्या अमानवी आकृतीने कधीच त्याच्या मनाचा ताबा घेतला होता आणि तो त्या डोळ्याच्या विवरात खोल खोल आत चालला होता.
……………………………
अचानक त्याला बर्फासारखा थंडगार स्पर्श जाणवला.आणि त्याने जमिनीला हात टेकवून उठायचा प्रयत्न केला तेव्हा हात कोपरापर्यंत आत धसला गेला आणि तो मनोमन शहारला.आता शरीराला चटके बसत होते.त्याने जोर लावून हात बाहेर काढायचा प्रयत्न केला तेव्हा अचानक चेह-याला झटका बसला आणि आपला दुसरा हात आपल्याच डोळ्यात गेल्याची भयानक जाणीव त्याचे काळीज पोखरून गेली.
पण…..पण मग आपल्याला वेदना जाणवली कशी नाही?उलट रक्त बघून बरे वाटले….याचा अर्थ काय?
विचार करून मेंदू थकला तेव्हा त्याने झोपायचा प्रयत्न केला आणि त्याला दुसरा धक्का बसला.त्याचे दोन्ही डोळे जाग्यावर होते.आणि एक काळे मांजर आपल्या एकाच डोळ्याने त्याच्याकडे खुनशी नजरेने बघत होते.
विचारांनी थकल्यामुळे ग्लानी येऊन त्याने डोळे मिटले.मांजर त्याच्या छातीवर बसल्याचे त्याला कळलेही नाही.
अचानक मंद सुगंधाची झुळूक आली आणि पैंजणांच्या आवाजाने त्याची झोप चाळवली. बांगड्यांचाकिणकिणाट….पैंजणांचा आवाज….किणकिणाट….आवाज…..आवाज….किणकिणाट…….त्याला सहन होईना.बंद करा बंद करा हे सगळे….माझ्या श्वासातून आत जाणारा आणि कानाचा पडदा फाडणारा हा बांगड्यांचा आवाज नका करू.
ही अर्पिता जिवन्त कशी?आणि तिच्या डोळ्यातून अश्रू का येतायत?मी तर हिला…..कधीच…..
ए पुढे येऊ नकोस.मी तुला घाबरत नाही.तू आता जिवन्त नाहीस.आणि तुझे डोळेही नाहीत.मला भास झाला.
.
भास्कर गुणाजी फडतरे……खटवाडीतला एक होनहार तरूण…शिक्षण फारसे नसले तरी शेतकामामधे तरबेज होता.आपण बरं आपलं काम बरं ही वृत्ती असल्याने सगळ्यांनाच तो आवडायचा.पण त्याची आई महा कजाग बाई होती.तिने काहीही सांगितले तरी भास्कर त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवायचा.तिचे सगळे ऐकायचा.
त्याने अविरत कष्ट करून शिवार हिरवाईने नटवलं होतं.मुलगा गुणी आहे.आता वेळेवर त्याचे दोनाचे चार हात करून द्यावेत या विचाराने वडिलांनी त्याच्यासाठी मुली बघायला सुरवात केली होती.अनेक मुली पाहिल्यावर त्याच्या आईने भरपूर श्रीमंत आणि हुंडा देऊ शकणा-या बाजी पाटलाची लेक अर्पिताशी त्याचा विवाह करून दिला.
अर्पिता सुंदर आणि नाजूक होती.शेतीच्या कामात भास्करला मदत करायची.
सगळ्यात सुंदर होते तिचे डोळे….त्या डोळ्यांमधे प्रेमभाव एकवटलेला होता.
तिच्या डोळ्यांचे होणारे कौतुक बघून भास्करची आई चडफडायची.तिला नाही नाही ते बोलायची.
अशातच तो प्रसंग घडला आणि या सगळ्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली.भास्करची बहीण तिच्या बाळाला घेऊन माहेरी आली होती.अर्पिता एकदा त्याला खेळवता खेळवता म्हणाली…”याची प्रकृती किती छान आहे…कुठला म्हणून आजार नाही.आणि कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ पडावी तसे त्याच रात्री बाळ तापाने फणफणले.अर्पिताची नजर वाईट तिच्यामुळेच हे संकट ओढवले यावर मायलेकींचे शिक्कामोर्तब झाले.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यानंतरही असे दोन तीन प्रसंग घडले आणि अर्पिताच्या छळात भर पडली.आता अशी वाईट नजरेच्या सुनेचा बंदोबस्त कसा करावा या चिंतेने भास्करच्या आईची झोप उडाली.
भास्करने आईची समजूत काढायचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.बहिणीने एक उपाय सुचवला….आई वहिनीचे डोळेच नष्ट केले तर हा प्रश्नच उरणार नाही.बायकोच्या हातचे कळसुत्री बाहुले असलेले हतबल वडील देवळात जाऊन बसले.आणि आईने फर्मान सोडले….”भास्कर….जा अर्पिताला घेऊन ये.त्या स्वरांनी संमोहित झालेला भास्कर अर्पिताला घेऊन आला.
चुलीतले कोळसे धडाडून पेटले होते.आईने लोखंडी कांब त्यामधे धरली होती.भितीने थरथरणा-या अर्पिताचे दोन्ही हात बांधण्यात आले आणि भास्करने ती लोखंडी कांब अर्पिताच्या डोळ्यात ……
आई ग….तिच्या आर्त किंकाळ्या वातावरणात घुमल्या.हे दृष्य सहन न होऊन भास्कर बेशुध्द झाला.
………………………….. बांगड्यांचा आवाज आणखी मोठा होत गेला.पैंजणांची रूणझुण कानावर येतच होती.त्याचा जीव भितीने गोठून गेला.पुढे पुढे येणा-या एका डोळ्यंच्या जागी नुसत्या खाचा असणा-या त्या सांगाड्याला कसे रोखावे त्याला कळेना.
इतक्यात अहो….मी आलेय.या मंजूळ आवाजातल्या हाकेने तो भानावर आला.समोर पाहून त्याची बोबडी वळली कारण तो आवाज
त्या सांगाड्यातूनच येत होता.
हा अर्पिताचाच आवाज….
पण ती तर कधीच ……
संपली असेच वाटतेय ना….हीहीहीहीहीही…..अकस्मात् त्या मंजूळ आवाजाचे हिडीस अमानवी हास्यात रूपांतर झाले होते.अचानक त्या सांगाड्याच्या कपाऴाच्या जागी एक डोळा दिसू लागला मोठा…मोठा आणखी मोठा…पापण्यांच्या जागी लपलपत्या अग्निज्वाला असणारा….त्या डोळ्याकडे बघता बघता भास्करचे अस्तित्व मिटून गेले.एका डोळ्याचे ते काळे मांजर तिथेच बसून होते.
रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या अर्पिताला तसेच टाकून हे त्रिकूट पुढे काय करायचे याचा विचार करू लागले.भास्करच्या पोलीसात असलेल्या मामाने घटनेला अपघाताचे रूप देऊन प्रकरण तात्पुरते मिटवले.आणि भास्करला काही दिवस कुठेतरी जायचा सल्ला दिला.तेव्हापासून भास्कर असा दिशाहीन झाल्यासारखा भटकत होता.अगदी भणंग भिका-यासारखी अवस्था झाली होती त्याची…..
………………………………काळ्या मांजराने बाहेरचा कानोसा घेतला.आणि एका डोळ्याने भास्करकडे बघून म्याँव…..म्याँव करू लागले.
अर्पिता…अर्पिता अगं मी तुझा गुन्हेगार आहेत.
बांगड्यांचा आवाज आणखी मोठा होत गेला.पैंजणांची रूणझुण कानावर येतच होती.त्याचा जीव भितीने गोठून गेला.पुढे पुढे येणा-या एका डोळ्यंच्या जागी नुसत्या खाचा असणा-या त्या सांगाड्याला कसे रोखावे त्याला कळेना.
इतक्यात अहो….मी आलेय.या मंजूळ आवाजातल्या हाकेने तो भानावर आला.समोर पाहून त्याची बोबडी वळली कारण तो आवाज
त्या सांगाड्यातूनच येत होता.
हा अर्पिताचाच आवाज….
पण ती तर कधीच ……
संपली असेच वाटतेय ना….हीहीहीहीहीही…..अकस्मात् त्या मंजूळ आवाजाचे हिडीस अमानवी हास्यात रूपांतर झाले होते.अचानक त्या सांगाड्याच्या कपाऴाच्या जागी एक डोळा दिसू लागला मोठा…मोठा आणखी मोठा…पापण्यांच्या जागी लपलपत्या अग्निज्वाला असणारा….त्या डोळ्याकडे बघता बघता भास्करचे अस्तित्व मिटून गेले.एका डोळ्याचे ते काळे मांजर तिथेच बसून होते.
रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या अर्पिताला तसेच टाकून हे त्रिकूट पुढे काय करायचे याचा विचार करू लागले.भास्करच्या पोलीसात असलेल्या मामाने घटनेला अपघाताचे रूप देऊन प्रकरण तात्पुरते मिटवले.आणि भास्करला काही दिवस कुठेतरी जायचा सल्ला दिला.तेव्हापासून भास्कर असा दिशाहीन झाल्यासारखा भटकत होता.अगदी भणंग भिका-यासारखी अवस्था झाली होती त्याची…..
………………………………काळ्या मांजराने बाहेरचा कानोसा घेतला. आणि एका डोळ्याने भास्करकडे बघून म्याँव…..म्याँव करू लागले.
अर्पिता…अर्पिता अगं मी तुझा गुन्हेगार आहे.तुझ्या ज्या डोळ्यांवर नितांत प्रेम केले त्या डोळ्यात….
मी पापी आहे.मी पापी आहे…..
सांगाड्याच्या एकमेव डोळ्यात हिंस्त्र भाव उमटले.पापण्यांच्या ज्वाळा कुणाला तरी गिळंकृत करायला उत्सुक असल्यासारख्या लपलपू लागल्या.पुन्हा बांगड्यांचा आवाज पैंजणांची रूणझूण आवाज…रूणझुण…आवाज….आता… आता भास्करच्या डोळ्यात विखार दिसत होता.त्याने वायुवेगाने सांगाड्याच्या दिशेने झेप घेतली. सोड माझ्या अर्पिताला…सोड तिचे हात.भास्करने जवळची सळई उचलून सांगाड्याच्या डोळ्यात खुपसली.आणि एकदम सगळे वातावरण बदलले.हवेतला गारवा वाढला.घुबडांचे चित्कार ऐकू येऊ लागले.सगळीक़डे अंधार पसरला.सांगाड्याच्या डोळ्यातला अंगार विझला.लपलपत्या ज्वाला शांत झाल्या.
देशमाने….हेच ते पडके घर…काल इथेच भास्कर फडतरेला पाहिले लोकांनी…..नीट चेक करा सगळे….
सर सर इकडे भास्करची बाँडी आहे.
पण एक कळत नाही की भास्करच्या डोळ्यात गरम सळई खुपसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येतेय….पण सर इथे कुठेही आग प्रज्वलित केल्याचे चिन्ह दिसत नाही.मग ही सळई कोणी आणि कशी गरम केली असेल?
(समाप्त)
Image by Pete Linforth from Pixabay
- प्राजक्ताचा दरवळ - September 7, 2023
- सोळा नंबरच्या आजी - February 10, 2022
- पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले - July 7, 2021
👌