प्रीवेडिंग….
“हॅलो , शंत्या बोलतोय.
तू , काका , काकू , आजी , आजोबा दुपारी चार वाजता पुण्याहून निघताय.
सात वाजेपर्यंत आवास.
जोगळेकर काॅटेज.
निकी आणि तिचे आई बाबा तिथे पोचलेले असतील.
मी पण पोचतोच.
ओक्के ?
सावकाश गाडी चालव.
चल मग.
हॅप्पीवाला जर्नी.”
निलयनं फोन ठेवला.
शंत्याचं हे असं असतं.
त्याच्याशी फोनवर बोलणं, हे वन वे ट्रॅफिकसारखं.
समोरच्यानं काय बोलायचं , हे त्यानं आधीच ठरवलेलं असतं.
आपण फक्त ,हो ला हो म्हणायचं.
शंतनू.
निलयचा चुलत चुलत भाऊ.
नात्यापेक्षा , मैत्रीचं नातं जास्त जवळचं.
हाडाचा फोटोग्राफर.
कॅमेराचा जादूगार.
समोरच्या चेहर्यावरचा आनंदी मूड, बरोबर चिमटीत पकडणारा.
सबजेक्ट कसाही असू देत.
साधासुधा.
ए फेस ईन क्राऊड.
कितीही साधा असू देत.
त्यानं फोटो काढला की ,तोच माणूस व्हेरी व्हेरी स्पेशल होवून जायचा.
खरं तर तो एकदम प्रोफेशनल.
मुंबईला चांगला जम बसलेला.
कित्येक नट नट्यांना ,यानं आपल्या कॅमेर्यात कैद केलेलं.
त्याची स्वतःची ईव्हेंट मॅनेजमेंट कंपनी.
प्रीवेडिंग शूटींग.
आजकाल काॅमन.
शंत्यासाठी तर फारच काॅमन.
त्याच्यासाठीच तर ही धावपळ.
निलय आय.टी. प्रोफेशनल.
त्याचे बाबा एस. बी. आय. मधून रिटायर्ड.
आई स्कूल टीचर.
पाच वर्ष आहेत रिटायरमेंटला.
कोथरूडला डहाणूकरमधे त्यांचा थ्री बी. एच. के. आहे.
निलय , त्याचे आई बाबा , आजी, आजोबा.
परफेक्ट फॅमिली पिक्चर.
निकिता.
बी. डी. एस.
तिचे बाबा पण डेन्टिस्ट.
शनिपारापाशी खाऊवाल्यांसमोर त्यांची डिस्पेन्सरी.
त्याच बिल्डींगमधे वरती त्यांचा फ्लॅट.
आता हळू हळू प्रॅक्टीस कमी केलेली.
लवकरच निकिताला हॅन्डोव्हर करणार.
निकिताची आई हाऊसवाईफ.
निलय आणि निकीता.
दोघेही एकुलते एक.
100% आरेंज्ड मॅरेज.
दोनही घरं तशी हायर मिडल क्लासवाली.
लग्नाला फक्त महिना राहिलाय.
दोन्ही घरचा ऊत्साह ओसंडून वाहतोय.
कशाला ना नाही.
काही राहिलं तर नाही ना ?
याचंच टेन्शन.
प्रिवेडींगच्या वेळी सुद्धा असंच.
निलयनं शंत्याला विचारलेलं.
“करायचं का प्रिवेडिंग शूट ?”
शंत्यासाठी निलयचं लग्न, ही घरची ईव्हेंट.
सगळी मॅनेजमेंट त्याचीच.
तो सांगेल तसं.
दोन्ही घरं शंतनूला शरण.
थोडक्यात शंतनूचा नारायण झालेला.
अर्थात माॅडर्न नारायण.
” माझं ऐकशील ?.
प्रीवेडींग शूट करूच.
पण जरा हटके.
आत्ता काहीही विचारू नकोस.
शनिवारी संध्याकाळपर्यंत, सगळ्यांनी आवासला पोचा.
जोगळेकर काॅटेजमधे.
तिथं आपल्या पाच रूम्स बुक असतील.
माझी बायको, शेफालीही येईल.
ती ब्युटीशियन आहे.
यू नो दॅट.
ठरलं.
शूट आऊट अॅट आवास.
फ्रायडेला फोन करतो.”
शनिवार संध्याकाळ.
पावणेसात.
निलय अॅन्ड फॅमिली.
त्यांची अर्टिगा, जोगळेकर काॅटेजमधे शिरली.
“शंत्याची सटकलीय.
प्रीवेडिंग शूटला , ग्रुप फोटो कशाला बरोबर हवाय ?
कुठं तरी पुण्याजवळच शूट केलं असतं.
फक्त आम्ही दोघंच.
हा साला हटेलाच राहणार”
पुण्यापासून आवासपर्यंत, हाच विचारी ऊंदीर, निलयचा मेंदू कुरतडत होता.
छोडो यार….
निकी आणि फॅमिली.
शंतनू आणि शेफाली.
एव्हरीबडी वाॅज प्रेझेंट.
सगळी मंडळी पटकन् फ्रेश झाली.
डायनिंग हाॅलमधे पोचली.
मस्त जेवण तयार होतं.
बिरड्याची ऊसळ.
ऊकडीचे मोदक.
वरण भात.
त्यावर साजूक तूपाची धार.
अन् शेवटी सुग्रास सोलकढी.
टम्म पोटं फुगली.
सगळी मंडळी लाॅनवर.
शंत्या बोलू लागला.
“वेलकम टू आवास.
आपण सगळे इथं, प्रिवेडींग शूटसाठी जमलोय.
बर्याच जणांना प्रीवेडींग वेडेपणाच वाटतो.
फालतू खर्च.
पैशांची ऊधळपट्टी.
काही अंशी खरं आहे ते.
तरीही…
ज्याला परवडतंय, तो हा खर्च करतोच.
निलय निकितालाही हे शूट करायचं होतं.
हमने सोचा ,
थोडा अलग अँगलसे शूट करते है.
प्रीवेडिंग शूटचे फोटो बघितलेत का तुम्ही कधी ?
नसतील तर बघा.
माझ्याकडे आहेत.
जगातले सगळ्यात सुंदर फोटो असतात ते.
फोटोतले त्या दोघांचे डोळे बघा.
काय नसतं त्या नजरेत ?
एकमेकांबद्दलचा विश्वास.
ऊद्याची स्वप्नं.
नवीन नात्याची ओढ.
प्रेम , आस , आधार ,भास सबकुछ.
वेगवेगळ्या वाटेवरचे पॅसेंजर्स.
आता एकाच गाडीत बसणारेत.
लाईफटाईमसाठी.
एकमेकांची जागा पकडणं.
जागा अडवणं.
खांद्यावर डोकं टेकवणं.
टोटल हॅपी जर्नीची तयारी..
हे सगळं दिसतं या शूटमधे.
पुन्हा यावेळी दोघं रिलॅक्स असतात.
लग्नाची गडबड , टेन्शन , दमवणूक.
काहीही नसतं.
एकदम फ्रेश.
मस्त फोटो येतात.
एकदम नॅचरल.
मी फोटो काढून रिकामा होतो.
पण त्या दोघांसाठी ते ,लाईफटाईम अॅवाॅर्ड असतं.
ती दोघं मग छानशा फ्रेममधे कैद होतात.
बेडरूमच्या भिंतीवर लटकतात.
तो फोटो बघून त्यांचा रोज…
रोज, रोज, रोझ डे सारखा फ्रेश होवून जातो.
बोले तो हा शूट , बेस्ट रिफ्रेशर असतो.
बेस्ट एनर्जी ड्रिंक फाॅर हॅपी मॅरीड लाईफ.
निलय , निकीता.
रेडी रहो.
ऊद्या सकाळी शेफाली तुम्हा दोघांचा ,लाईट मेक अप करेल.
मग मस्त शूट करू यात.
सागर किनारे , दिल ये पुकारे….
और एक बात.
प्रीवेडींग शूट फक्त नवरानवरीसाठी का ?
घरातल्या बाकीच्यांचं सुद्धा, प्रोमोशन होणार असतं.
तो आनंद , तो ऊत्साह त्यांच्या चेहर्यावर मावत नसतो.
ते पण सगळे हॅन्डसम ,आॅस्सम दिसत असतात.
ऊनका भी प्रीवेडींग होना चाहिये.
दे आॅल सो डिझर्व्ह ईट.
सो निकिताचे आई बाबा.
काका काकू.
आजी आजोबा.
सब लोग कल सुबह तैयार रहो.
सभी कपल्स का शूट किया जायेगा.
शेफाली विल एन्टरटेन देम आॅल्सो.
सो , सी यू टूमारो..
अजून एक..
आज निकीता अॅन्ड तिची अपकमिंग सासू ,
निकिताचे बाबा आणि काका ,
निकिताची आई आणि शेफाली ,
आजी आजोबा
रूम शेअर करतील.
निकिता आणि सासू माँ , तुम्हाला फ्युचर में घर शेअर करायचंय.
शुरू हो जाओ.
एक दूसरे को जानो .
परखो.
दो समधीजी , सगे दोस्त बन जाओ.
आजी आजोबा….
यू आर दी ओन्ली हनीमून कपल टुडे.
ऐन्जाॅय.
निल्या तू माझ्या रूममधे.
ईटस् पार्टी टाईम टुडे.
ओके
जी.एन.”
मिटींग ओव्हर.
सगळे जण शंत्याच्या आयडियेवर खूष.
दुसर्या दिवशीचं शूट भारीच झालं.
सगळीच कपळं ,भारीच दिसत होती.
फर्स्टएव्हर फॅमिली प्रीवेडींग शूट.
कडक.
चाबूक
जाम मजा आली.
एकदम फोटोजेनीक.
जेवणं झाली.
शंत्यानं अजून एक सरप्राईज दिलं.
निलय निकीताचं लग्न इथंच होणारेय.
जोगळेकर काॅटेजमधे.
इथल्या एसी मॅरेज हाॅलमधे.
पूर्ण रिसाॅर्ट वर्हाडी मंडळींसाठी रिझर्व्ह असेल.
नंतर पुण्यात रिसेप्शन.
सब खुष.
दिलखुष.
शूट आऊट अॅट आवास संपलं.
मंडळी पुण्याला गेली.
शंतनू , शेफाली मुंबईला.
तुम्ही पण तारीख लक्षात ठेवा.
निलय निकीताच्या लग्नाला नक्की यायचं हं..
वाटल्यास तुमच्या दोघांचं पोस्टवेडींग शूट करू यात.
आहेर आणायला विसरू नका..
शुभम् भवतु !
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
मस्त.आता कळल ,प्री वेडींग शुट काय!!