पत्र क्रमांक 6
प्रिय इडली वडा इडली वडा सांबाssssर,
ए जाडेsssss कशी आहेस?आणि काय गं सारखी खा खा करते…तिथे पण भसम्याने पाठ नाही सोडली तुझी!!!
तुला आठवण येते म्हणे माझी…मलाही येते तुझी ..पण छानही वाटतं की तुझ्या प्रगतीसाठी तिकडे गेली आहेस. उगाच चेहरा लांब करून, सुतकी भाव चेहऱ्यावर ठेवून एखाद्याची आठवण काढत बसायला मला नाही आवडत.
तू तुझ्या कामाबद्दल बोल..नवीन मित्रमैत्रिणी मिळाले की नाही? तू परवा म्हंटली होतीस की कोणीतरी नवीन रूम पार्टनर येणार होती आता तुझ्या घरात? आली का? बंगलोर आणि पुण्यामध्ये कल्चरल फरक तर असणारच पण हवामानातही फरक आहे का? विकेन्ड्सला
काय टाईमपास करतेस?
तू गेली आणि राव आयुष्य आंबट/ पांचट/ बोअरिंग झालंय माझं..आता बावधनच्या सिसिडीला कोण येणार माझ्यासोबत?संतोष ए1चं चॉकलेट सँडविच खायला तू नाहीस इथं… एक बरं झालं पण ते दर महिन्याला एफसी रोडला जाऊन पाय आणि खिसा तुटेपर्यंत शॉपिंग करायचीस ना ते संपलं एकदाच. च्या आयला 15 टॉप्स ट्राय करायचीस आणि एखादा घ्यायचीस त्यातला वरतून माझ्यावरही जबरदस्ती खरेदीची. तेव्हा तुला बोलले नाही पण आता सांगते कारण आता तू मला मारू शकत नाहीस म्हणून की जेव्हा जेव्हा तू एफसीला घेऊन जायचीस भयंकर मानसिक अत्याचार व्हायचा माझ्यावर…हेहे.
आता एक फुकटचा सल्ला जो मी तुला पूर्वीही खूप वेळा दिलाय. ते 2 स्टेटस पाहुन स्वतःच्या आयुष्याची तुलना त्या सिनेमासोबत करणं बंद कर तुला त्रास होऊ नये म्हणून बोलतेय. एक सांगू? त्या दिवशी आपण ऍमानोराला फिरायला गेलो होतो तेव्हा मिहीर आणि त्याची आई आपल्यासमोर आले अचानक..तेव्हा तू ज्या पद्धतीने ग्रेसफुली आणि त्यांना खिजगणतीतही न धरता त्यांच्यासमोरून निघून गेलीस नं… खूप छान वाटलं…वाटलं की तू सामना करू शकतेस आता अशा गोष्टींचा..आणि हे काय!! आज मी तुझं पत्र पाहिलं तर पुन्हा तुझ्या मनात कुठेतरी ती जखम आहेच…गार your mom & dad proud of you…मिहिरच्या आईने तुझ्या आईबाबांचा अपमान केल्यावर ज्या हिमतीने तू तो इश्यू हँडल केलास त्यानंतर तुझे पालकच काय पण मला, अम्याला , गौतीला सगळ्यांना खूप अभिमान वाटतो तुझा.
पण आता त्या चिरकूट बाईला आणि त्या मूर्ख मिहिरला डोक्यातून काढून टाक. बहुत लंबी कटी है उन दोनो की… सोडून दे त्यांना
तू तुझ्या करिअरवर लक्ष केंद्रित कर. बाकी मी सांगितलेलं तू ऐकतेसच हे माहितेय मला
तुम्हारी,
रशम्या
Image by Ralf Kunze from Pixabay
- सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर - February 23, 2020
- तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत- भाग्यश्री भोसेकर - February 20, 2020
- गोष्टी लेखकांच्या –गौरी शिंदे - November 13, 2019