बहावा (रंग पिवळा)-

आसाममधील होजाई गावात त्या छोट्याश्या टुमदार घरात आज लगबग सुरू होती. सगळीकडे दिव्यांच्या माळा झगमगत होत्या. बागेतल्या सर्व कुंड्या निगुतीने एका कडेला लावून ठेवल्या गेल्या होत्या. त्या कुंड्यांच्या जागी आता शेजारच्या बिस्वनाथकडून आणल गेलेलं छोटेखानी टेबल मांडल गेलं होत. त्यावर पाण्याच्या बाटल्या, ग्लास, डिशेस हे सारं मांडल जात होत. अत्तर, फुलांच्या माळा यांचा मंद दरवळ वातावरणात भरून राहीला होता.
आतल्या खोलीत मेघाताई आवरत होत्या, त्यांनी आसामची स्पेशालिटी मुगा सिल्क साडी नेसली होती. गळ्यात एकच मोठं मंगळसूत्र त्यालाच साजेस कानातल आणि मोठी टिकली. बास..त्यांनी परत एकदा आरशात स्वतःला पाहिलं आणि हलकेच हसल्या इतक्यात मागून प्रल्हाद राव आले आणि त्यांनी मेघा ताईंच्या केसात गजरा माळला आणि दोघेही आरशात एकमेकांच रूप न्याहाळत हसले.
“काय बघताय?” मेघाताईंनी प्रल्हादरावाना विचारले
“परिपक्व झालेल्या आपल्या दोघांना” त्यांच्या या उत्तरावर संसाराची 35 वर्ष दोघांच्याही डोळ्यासमोरून सरकली.
प्रल्हाद व मेघा यांना दोन मुलं, मुलांची लग्न होऊन त्यांनी आता संसार थाटला होता. प्रल्हाद यांची सरकारी नोकरी त्यामुळे बिऱ्हाड पाठीवर घेऊन दर तीन वर्षांनी वेगवेगळ्या राज्यात फिरणं व्हायचं. मेघा ताईंनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून पदवी घेतली पण लग्नानंतर प्रल्हादरावांच्या आईने ‘ फक्त संसार करायचा, छंद बिंद नाही ‘  अशी जणू धमकीच दिली या दोघांना. प्रल्हाद रावांची आई मोठी खाष्ट बाई.घरातील वारा सुद्धा आपल्या मर्जीनुसार वाहिला पाहिजे अशी जरब असायची त्यांची. मत मांडण्यापेक्षा लादण्यावर त्यांचा खूप भर असायचा,घरातील पळी जरी इकडची तिकडे झाली तरी त्या आकांडतांडव करायच्या. सासूबाईंची मर्जी जपत मेघाताईंनी जमेल तितका स्वतःचा छंद जोपासला. प्रल्हादरावांची आई जाईपर्यंत ताठ होती. यथावकाश मुलं मोठी झाली. प्रल्हाद राव आणि मेघा ताई या दोघांनीही ठरवल होत मुलांची लग्न झाली की आपण खऱ्या अर्थाने निवृत्त व्हायचं, एकमेकांना एकमेकांसाठी वेळ द्यायचा. मुलांची लग्न झाली आणि घर नवीन सूनांवर सोपवताना मेघा ताई म्हणाल्या
“घराला, तुमच्या संसाराला जपा. तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुमच्यासाठी आम्ही आहोतच पण तूर्तास आम्हाला एकमेकांची जास्त गरज आहे. सणवार कराच अशी बंधन मी घालणार नाही, वाटल तर करा नाही केलत तरी कसलाही राग नाही. नात्यांचं असं आहे की ती बांधून घेण्यापेक्षा स्वातंत्र्य दिल्याने, मोकळीक दिल्याने जास्त खुलतात. आम्ही खुशाली कळ्वत राहूच. छान आनंदाने संसार करा”
आणि मग प्रल्हाद राव आणि मेघा ताई देशभर एका संस्थेच्या मदतीने समाजसेवा करीत फिरू लागले. कुठे 2 महिने मुक्काम असायचा कुठे 3 महिने. याच काळात मेघा ताई स्वतःच्या चित्रांचे प्रदर्शन भरवू लागल्या. मुख्य म्हणजे या सेकण्ड इनिंगच्या काळात या दोघांचाही संसार खऱ्या अर्थाने फुलला. इतक्या वर्षात अपुऱ्या राहिलेल्या सर्व इच्छा त्यांनी पूर्ण केल्या. हातात हात घेऊन मन मानेल तशी भटकंती केली. कुठे शांतता अनुभवली तर कुठे इतक्या वर्षांच्या मनातल्या
अशांततेला वाचा फुटली.कुठे मनातले राग लोभ बाहेर पडले तर कुठे प्रेमाच्या नजरेने क्षण एकमेकांच्या डोळ्यात विसावले.
इथे आसाम मध्ये येऊन त्यांना नुकतेच 4 महिने झाले होते. शेजारी पाजारी 3-4 कुटुंब, काही समवयस्क असा गोतावळा प्रल्हाद आणि मेघा यांनी जमवला होता आणि आज या दोघांच्या लग्नाचा 35 वा वाढदिवस. आत्ता या क्षणी पुरेपूर जगत असताना प्रल्हादराव मेघा ताईंना हलकेच कवेत घेणार इतक्यात
“बोरमा बोरमा” अशी हाक ऐकू आली.शेजारच्या बिस्वनाथची बायको मेघाताईंना हाक मारून बाहेर यायला सांगत होती. तस आतल्या खोलीतला पडदा बाजूला सारला गेला आणि प्रल्हादराव व मेघाताई दोघेही हसत बाहेर पडले.बाहेर आले,जमलेल्या गोतावळ्यावर एकवार नजर फिरवली आणि तोच सरप्राइज मिळालं. दोन्ही मुलं आणि सूना लग्नाच्या वाढदिवसाच्या मोठा केक घेऊन हजर होती.
त्या संध्याकाळी बहावाच्या फुलांचा मंद पिवळा प्रकाश नात्यांच्या रूपाने सगळीकडे पसरला होता .नवरा बायको, मुलगा सून, सासू सासरे अशी सगळी नाती बहावासारखी डेरेदार फुलली होती.
लेखिका- भाग्यश्री भोसेकर बीडकर
Image by SUMITKUMAR SAHARE from Pixabay

16 thoughts on “बहावा (रंग पिवळा)-

  • October 3, 2019 at 1:45 am
    Permalink

    छान आहे कथा. मला पण आसामला जायचंय.😔
    असं म्हणतात बहावा पूर्ण फुलला की बरोबर एक महिन्याने पाऊस पडतो.

    Reply
    • November 1, 2019 at 7:04 pm
      Permalink

      सुंदर कथा

      Reply
  • October 3, 2019 at 3:12 am
    Permalink

    I got mail that I successfully registered this , but can’t see the free content yet

    Reply
    • October 7, 2019 at 6:04 am
      Permalink

      खूप खूप आभार

      Reply
    • October 7, 2019 at 6:05 am
      Permalink

      मनापासून आभार

      Reply
  • October 3, 2019 at 6:24 am
    Permalink

    सुंदर… प्रत्येक पात्र अगदी बहाव्यातील प्रत्येक फुलासारखे खुलविलेत. अशा भरगच्च बहाव्याचा सहवास भरगच्च प्रसन्न
    आणि भर कडाक्या चे उन देखील सुसह्य करणारा…!!!

    Reply
    • October 7, 2019 at 6:04 am
      Permalink

      आणि तुमची सुंदर कमेंट…धन्यवाद🙂

      Reply
  • November 1, 2019 at 7:05 pm
    Permalink

    सुंदर कथा

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!