अतर्क्य  (भाग5/7)

सलोनी.
वय वर्ष 24
मनसुखलालची सुविद्य पत्नी.
चांगली शिकलेली.
डबल ग्रॅज्युएट.
तसं मनसुखलाल आणि तिच्या वयात नऊ वर्षांचं अंतर.
आणि त्यांच्या स्वभावात जमीन अस्मानाचं .
सलोनी मोकळ्या स्वभावाची.
मनात ते ओठात.
तर मनसुख,घुम्या.
आतल्या आत  कुढत  बसणारा.
तसं मनसुखलालचं बायकोवर मनापासून प्रेम होतं.
पण त्याचं लग्न लागलेलं त्याच्या धंद्याशी.
त्यामुळे सलोनीला देण्यासाठी मनसुखके पास सब कुछ था…
सिवा टाईम के….
त्याही विषयी सलोनीची तक्रार नव्हती.
बिझिनेसवाल्यांची अवस्था ती समजू शकत होती.
जो काही वेळ मिळे तो ती मनसुखबरोबर आनंदात घालवीत होती.
प्रश्न  होता ,ऊरलेल्या वेळेचं काय करायचं ?हा ….
घरात ईन मीन तीन माणसं.
त्यांचं खाण पिणं एवढं कितीसं असणार ?
मनसुख आणि  जगनशेट  एकदा दुकानी गेले की थेट  संध्याकाळी  घरी .
मग सलोनी एकटीच घरी.
लग्नाला आत्ता कुठे दोन वर्षे  झालेली.
अजून दोघांचे तीन न झाल्यामुळे  रितेपण.
मनाचं आणि  वेळेचंही.
सलोनीनं रिकामा वेळ सत्कारणी लावायचं ठरवलं.
तिला महिलांसाठी एक बुटिक सुरू करायचं होतं.
“Her…..” अशा नावानं.
Only for ladies.
बायकापोरींसाठी ….
बाईनं चालवलेलं.
स्टाफ सुद्धा  सगळा मुलींचाच.
गावातल्या तमाम स्त्री वर्गाला, दोन घटका बंधनांचं घुंगट झुगारून नव्या जगाची कास धरता येईल अशी जागा.
मनसुखलाही या कल्पनेतलं व्यापारी  मूल्य जाणवलं होतं.
भारी कन्सेप्ट.
दौडेगी.
मनसुखची ना नव्हती.
त्यानं रविवार  पेठेत एक जागाही बघितली  होती.
प्रश्न होता बाबूजींचा.
जगनसेटचा.
त्यांना हे पचनी पडणं अवघड.
तशी सलोनी बाबूंजीपुढे अगदी घुंघटमध्येच असायची.
पण आता तिला हे जोखड फेकून द्यावसं वाटू लागलं.
मोकळा श्वास….
मिळतच नव्हता.
नुसता बुरसटलेला कार्बन डाय आॅक्साईड.
सलोनीनं बाबुजींपौढे भीत भीत हा विषय  काढला.
बाबूजी आगबबूले हो गये.
त्यांच्या घराण्यात बायका घुंगट सोडून घराबाहेर  कधी पडल्याच नव्हत्या.
त्यांनी साफ नाही म्हणलं.
तरीही….
तरीही सलोनी मागे हटायला तयार नव्हती.
जागा फायनल झाली.
माल भरला.
स्टाफ रेडी.
पाडव्याला ऊद्घाटन.
बाबूजींना आदल्या  दिवशी  सांगायचं.
त्यांच्या  हस्तेच फीत कापायची.
वो ना कह न पायेंगे….
शायद.
त्या दिवशी रात्री. ……..
ती निमंत्रण  पत्रिका घेवून बाबूजींच्या खोलीत गेलेली.
बहुतेक  कडाक्याचं भांडण.
धुसमुसती सलोनी.
पिवळा  फास्फरसच जणू…
क्या हुवा ?
तिच्या हातावरच्या त्या पुसट खुणा.
कही….
सलोनीनेही बाबूजी को धक्का देकर…..
खोलीत ती निमंत्रण  पत्रिका  साक्षीदार होतीच.
 रहने दो.
जल्दी  क्या है ?
आत्ता तर  कुठे फाईल ओपन झालीय.
तपास चालू आहे.
  (क्रमश:)
Image by Gerd Altmann from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

One thought on “अतर्क्य  (भाग5/7)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!