पत्र क्रमांक 15

प्रिय गार्गी,

मूड फारसा बरा नाहीये तरीही अफलातून मूड आहे,असं काहीसं चिवित्र घडतंय मग म्हटलं पत्र लिहून पहावं काही उतारा पडतोय का ते?
तसही बऱ्याच दिवसांत आपला पत्रव्यवहार झालाच नाहीये.

तर आधी पॉझिटिव्ह गोष्टी बोलूयात…माझा मूड अफलातून का आहे?तर तुला माहीत आहेच मी लंडन फिल्म इन्स्टिट्यूटची इन्ट्रन्स एक्साम दिली होती. आज सकाळीच रिझल्ट झळकला..आणि आनंदाची बातमी म्हणजे मी पास झालेय..ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल काही दिवसांत. खुssssssप खुssssश आहे मी. किती वर्षांचं स्वप्न पूर्ण होत आहे. जागेपणी, झोपेत, उठता, बसता पाहिलेलं स्वप्न. आज मे उपर अशी अवस्था आहे माझी. I am gonna fly London soon. मला खात्री आहे की तुला हे वाचल्यावर माझ्यापेक्षा जास्त आनंद होईल.

असं सगळं असताना माझा मूड खराब का आहे? तुला तर माहीत आहेच मी लंडन फिल्म इन्स्टिट्यूटची इन्ट्रन्स एक्साम देतेय हेच घरच्यांना फारस पसंत नव्हतं..कारण काय तर हे क्षेत्र खूप अस्थिर आहे. माझ्या  आई बाबांना मी जगाच्या पाठीवर कुठेही राहिले तरी चालणारे फक्त मी स्थिर क्षेत्रात करिअर करावं अशी त्यांची इच्छा आहे. जमल्यास पुढे मागे घरच्या व्यवसायात लक्ष घालावं हीही इच्छा त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. पण मला नाहीये इंटरेस्ट घरच्या व्यवसायात. ज्यात रस आहे ते करावं न माणसाने?

तर आज रिझल्ट सांगितला सगळे मोजकं हसले, मोजून मापून कॉंग्रेट्स म्हंटले. दादाने मात्र भरभरून पाठिंबा दर्शवला आहे. चल  माझी पॅशन समजायला त्यांना थोडा वेळ लागेल, मी या क्षेत्रात प्रगती करेन तेव्हा कदाचित त्यांचा विरोध मावळेल and it will take some time..I understand that पण तुला माहितीय आज आईशी अतिशय इलॉजीकल कारणावरून वाद झाला म्हणून माझा मूड खराब आहे.

सकाळी सकाळी आईने मूड खराब केला यार. म्हणे “आता लंडनला 2 वर्षांचा कोर्स करण्यापेक्षा लग्नाचा विचार कर”..मी म्हंटल कशासाठी तर म्हणे जोडीदाराची गरज भासते
.तर मी उत्तर दिलं “मी एकटी खूप मजेत आणि सुखात आहे” तर म्हणे “मुलाबाळांचं काय?” तर आईला काहीही लॉजिकल उत्तर देता आलं नाही…उगाच दुनियाभरची बडबड करत बसली होती…तू मला सांग गार.. बायोलॉजीकलीच आई कशाला व्हायला हवंय? उद्या मला वाटलं तर मी मूल दत्तक नाही का घेऊ शकत?…मी दत्तक घेण्याचा विषय काढला आणि आई गप्प झाली. तुला कारण माहितीचे.

मला ना कधी कधी असं वाटतं की पालक मुलांना याकरता वाढवतात का गं की पुढे जाऊन ते बोलून दाखवता येईल? म्हणजे आम्ही तुम्हाला वाढवलं , इतक्या खस्ता खाल्ल्या आणि ही अशी तत्सम वाक्य वापरून इमोशनल ब्लॅकमेल करायचं आणि आपल्याला हवं ते साध्य करवून घ्यायचं. मला  अजून एक वाटतं  …असं इमोशनल ब्लॅकमेल करण्यामध्ये प्रत्येक भारतीय पालकाने पीएचडी केलेली असावी. प्रत्येकजण या विषयात तज्ञ आणि गोल्ड मेडलिस्ट आहे. जोक्स अपार्ट मला आता घरच्यांनी असं ब्लॅकमल करायला सुरुवात केलीय पण मी बधणार नाही हेही त्यांना माहितेय.

असो मी लंडनची बॅग भरायला घेतलीय. हल्ली बऱ्याचदा असं वाटतं की मी या घराचा या फॅमिलीचा पार्ट नाही/नव्हते. माझ्या निर्णयाला विरोध आहे म्हणून नव्हे पण असं इन जनरल. मी आईबाबांना दत्तक गेले..मी त्यांच्या रक्ताचं मूल (दादासारखं) नाही म्हणून का?

तुझ्या उत्तराची मनापासून वाट पाहतेय

तुम्हारी
रश्मी

Image by Ralf Kunze from Pixabay 

Bhagyashree Bhosekar

Bhagyashree Bhosekar

मुळची महाराष्टात जन्म घेऊन इथेच वाढलेली भाग्यश्री सध्या बंगलोर मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते आणि विविध माध्यमात लिखाण पण करते. मराठी लेखनामुळे तिची मराठी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. लिखाणातून तिचा मराठी भाषेशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न असतो. भाग्यश्रीला लघु कथा, दीर्घकथा लिहायला विशेष आवडतात. आत्तापर्यंत तिने दोन shortfilms साठी पटकथा लिहिली आहे. शिवाय 2017 साली तिचं बॉम्बे बिट्स नावाचं मराठी पुस्तक प्रकाशित झालं आहे. याव्यतिरिक्त अवांतर वाचन हा तिचा छंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!