राऽऽऽज

तो तसाच  होता…. तापट…. आदळआपट करणारा… खुनशी… खत्रूड..क्रूरसिंह….
.. हल्ली  हल्ली  त्याचा विक्षिप्तपणा फारच वाढलेला. सावधान ईन्डिया , क्राईम पेट्रोल… दस्तक…. त्याच्या क्रूरतेला पेट्रोल पुरवत .
 रोज तिथला, एक तरी मुडदा पाडल्याशिवाय… तो जेवत नसे. सबक एक को … सींख हम सब को… हे ऐकलं की मगच त्याला शांत झोप लागे.
हे होणारच होतं … कधीन् कधी…. बहुधा आजच… त्यानं विराट दाढी वाढवलेली…. डोळ्यात खून ऊतरनेवाला लूक आलेला…. पुण्यात नवा जक्कल जन्माला आला होता बहुतेक. ….
आजचा मौका चांगला… आईतात्या रत्नांग्रीस…
…..कुठे तरी बाहेर…. नको…. घरच्या  घरी… डन.
त्यानं एक नवीन सुरी आणलेली…. चकचकीत. … धारदार…. काम झालं की गायब करायची….
रात्र झाली….. त्याची बिल्डींग ढाराढूर…. पहाटे चार…. असल्या कामासाठी  स्टॅन्डर्ड  टाईम.
त्याची पहिलीच वेळ…. कितीही झाला तरी माणूस होता तो…
त्याच्या घराण्यात मागच्या नव्व्याण्णव पिढ्यात असलं पाप कुणी केलं नव्हतं….
क्षणभर त्याचा हात थरथरला…. क्षणभरच. …पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यात  आख्खा  तालिबान अवतरला….
सबजेक्ट…. हो सबजेक्टला त्यानं बाहेर काढला…..
शिजवला…. आदिम काळातले ते क्रूकर्मी नरभक्षी…. त्यांना सुद्धा लाज वाटली असती….
तो सगळ्याच्या पलिकडे पोचलेला….. सुरीने सबजेक्टचे छोटे छोटे तुकडे केले….. वर मीठ पेरले….. मिटक्या मारीत खावून सबजेक्टला  संपवला…. माणूस नव्हे  सैतान….सर्रकन  काटा येतो अंगावर. … पण तो कूल…
थंड डोक्यानं त्यानं सुरी धूतली…. सबूत मिटा दिया…. ऊरलेले अवशेष  एका पाॅलीथीन बॅगमध्ये  भरले…. नाक्यावरच्या  कचराकुंडीकडे तो जड पावलं टाकू लागला….
ईकडे बघ…. तिकडे बघ….. हळूच त्यानं बॅग कचराकुंडीत टाकली….
तेवढ्यात…. साला कुत्ता…. कमीना…. बर्वे काकूंचा टाॅमी त्यांच्या हाताला हिसका मारून कचराकुंडीकडे सुसाटला…
तो टरकला… कही राऽऽज खुल…. पर नही… कुठून तरी म्युन्सीपाल्टीची गाडी आली…. सबजेक्टच्या कचर्याला घेवून गेली….
राऽऽज कचरापेटीत कायमचा दफ्न हुवा….
तो विलक्षण अपराधी  फील करत होता…. घरी कळतं तर ?
….पण त्याला चटक लागली  होतो…. हो हे व्हेजच आहे…. त्यानं मनाला सहज समजावलं…. भावना मारून टाकल्या…
आईतात्या  यायला अजून  एक दिवस आहे….
….और एक मौका…. पुन्हा  सबजेक्ट…. प्रोटीन असतं त्यात…
……. आज पहाटे फ्राय करू….. बाॅईल्ड नको… त्यानं गेमप्लॅन ठरवला…
….. अंडे का फंडा !
Image by Aryok Mateus from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

3 thoughts on “राऽऽऽज

  • December 9, 2019 at 6:00 am
    Permalink

    बापरे किती घाबरले मी सुुरूवातीला

    Reply
  • May 1, 2020 at 6:56 pm
    Permalink

    Ha ha ha mast…..suspense mast create kelay

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!