बेधुंदी- पूजा पाठक

तू गेलास आणि दार लावून भिंतीला डोकं टेकवून तशीच उभी राहिले .. किती सहज गेलास तू , मला खरंच वाटलं होतं थांबशील ..

आणि पुढच्याच मिनिटाला बेल वाजली .. आणि धडकीच भरली एकदम .. तूच होतास बाहेर .. मी दार उघडल्यावर आत आलास आणि स्वतः च दार लावूस घेतलंस ..

माझ्या हातापायांना कंप सुटलेला .. तुझ्या डोळ्यात बघायची हिम्मत होत नव्हती .. तरीही पाहिलंच शेवटी .. पुन्हा कैद केलं तुझ्या नजरेनं मला .. तू 2 पावलं पुढे सरकलास आणि मी एक पाऊल मागे .. किती जवळ आला होतास तू माझ्या .. तुझा स्ट्रॉंग परफ्युम .. आणि सिगरेट चा तीव्र गंध ..आणि तुझा हवाहवासा वाटणारा पुरुषी गंध एकमेकांत मिसळून वेडावून टाकत होते .. तुझे उष्ण श्वास माझ्या कपाळाला जाणवत होते .. आणि एकदम माझ्या ओठांवर तू ओठ टेकवलेस .. अगदी हळुवारपणे .. ओठाचं प्रत्येक रंध्र हळुवारपणे स्पर्श होईल असे .. माझ्या मणक्यातून जणू वीज सळसळत गेली .. प्राण ओठांशी आलेला .. मग तू माझ्याकडे पाहिलंस .. तुझ्या चेहऱ्यावरचे ते मादक भाव जाऊन क्षणात डोळ्यात खट्याळपणा तरळला .. आणि तुझ्या ओठांनी पुन्हा माझ्या ओठांचा ताबा घेतला .. तुझ्या ओठांनी माझ्या ओठांना पिळणं .. आणि हलकेच चावा घेणं .. किती थ्रिलिंग होतं ते ! तुझा हात माझ्या कमरेवर .. तुझ्या अंगठ्याने ते कमरेवर नक्षी काढणं .. आणि मध्येच पुढे ओढून मला जवळ कवटाळण … आणि मग तू बेधुंद होत गेलास ..

तुझ्या ओठांचा स्पर्श अगदी मोहरून टाकणारा .. मानेवर ..गळ्यावर .. आणि पाठीवरही .. तू दिलेल्या लाल गुलाबी खुणा .. चेहऱ्यावर नकळत हसू आणणाऱ्या .. पाठीवर हळुवारपणे फिरणारी तुझी लांबसडक बोटे .. नाभिजवळ गोलाकार फिरणारी तुझी तर्जनी .. कमरेवर हलकेच चावायची तुझी सवय आणि ते कानात हळूच फुंकर मारणं ..

आवेगात तुझ्या घामेजल्या रुंद सावळ्या पाठीवर रुतली गेलेली माझी नखं .. अगदी क्षणभर कळवळलेला तू .. त्यानंतर कुठंतरी काहीतरी रिक्त असण्याची जाणीव हळूहळू भरून येणं .. कसलीतरी अनामिक तृप्ती .. आणि त्यानंतर तुला अजूनच वेलीसारखी बिलगलेली मी .. अजून जास्त प्रेमात पडलेली .. तुझ्या छातीवर एक क्युट लव्हबाईट देऊन तुझ्या मानेपाशी नाक घुसळत झोपी गेलेली ..

आत्ता कुठे त्या धुंदीतून, त्या नशेतून बाहेर येतीये मी ..

परत मला त्याच धुंदीत घेऊन जाण्यासाठी तुझी वाट बघतीये ..

येशील ना लवकरच ?

Image by StockSnap from Pixabay 

Pooja Pathak
Latest posts by Pooja Pathak (see all)

Pooja Pathak

कम्प्युटर इंजिनियर, सध्या ह्युमन रिसोर्स विभागात कार्यरत. वाचनाची आणि लिखाणाची प्रचंड आवड. इतरही बरेच छंद - गायन, चित्रकला, मिमिक्री, स्केचिंग. क्रिएटिव्हिटी ला वाव असणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. पेनपूजा हे स्वतः साजे लिखाण असणारे फेसबुक पेज Oct 2018 पासून चालवत आहे.

3 thoughts on “बेधुंदी- पूजा पाठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!