ऑन एअर लव्ह स्टोरी- भाग ३- मानसी जोशी
“तुम्ही स्वतःला उगाचच अंडरएस्टीमेट का करताय? सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं, मनाचं सौंदर्य हेच खरं सौंदर्य असलं काही तात्विक मी बोलणार नाही. पण एक मात्र नक्की सौंदर्य आपल्या हातात असतं. घरी गेल्यानंतर गुगलवर सोनाक्षी सिन्हा, भूमी पेडणेकर, काजोल, स्मिता पाटील यांचे जुने फोटो शोधा, म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटेल.” शेखर.
“तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे?” पूनम.
हे बघा राग मानू नका. पण तुम्ही स्वतःला कमी लेखलंत तर दुसरा का तुमचं कौतुक करेल? स्वतःवर प्रेम केलंत, तर दुनिया तुमच्यावर प्रेम करेल ना? तुम्ही फार जाड नाही. थोडा व्यायाम आणि डाएट तुमचं वजन कमी करायला पुरेसा आहे. राहता राहिला प्रश्न तुमच्या डस्की लुकचा, तर एकदा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केलीत की आत्मविश्वासाचं तेज तुमच्या चेहऱ्यावर येईल आणि उरली सुरली कमी भरून काढायला ब्युटी पार्लर्स आणि कॉस्मेटिक कंपन्या मदत करतील. आज व्हॅलेंटाईन डे आहे आजचा मुहूर्त चांगला आहे. आज तुम्ही सर्वात आधी स्वतः समोर स्वतःवरचं प्रेम व्यक्त करा. बघा तुमची दुनिया बदलून जाईल” शेखर.
काही वेळ तसाच निवांत गेला. शेखरला आपण उगाचच एवढं बोललो असं वाटू लागलं. शेवटी न राहवून त्याने विचारलं, “तुम्हाला राग आला का माझ्या बोलण्याचा?”
“नाही, अजिबात नाही. उलट मी तुम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे. तुम्ही आज मला स्वतःवर प्रेम करायला शिकवलंत.” पूनम.
“गुड! म्हणजे आता तुम्ही ओके आहात ना?”
“हो. १००%”.
शेखरने वेटरला खुणेने बिल द्यायला सांगितले आणि टेबलावरचा टिश्यू पेपरवर आपला नंबर लिहून तो पेपर पूनमजवळ दिला आणि म्हणाला कधीही काही वाटलं, तर मला फोन करा.”
वेटरने टेबलवर बिल आणून ठेवले पूनम ते बघणार एवढ्यात शेखर म्हणाला, “आजची ट्रीट माझ्याकडून, तुम्ही स्वतःच्या नजरेत जेव्हा स्वतःला सुंदर दिसाल तेव्हा मी तुमच्याकडून ट्रीट घेईन आणि ती सुद्धा इथे नाही समोरच्या ‘कॅफे रॉयल’मध्ये त्याच टेबलवर जे आज तुमच्यासाठी रिझर्व्ह होणार होतं.”
“डन” आत्मविश्वासाने पूनम म्हणाली.
जुलैचा पहिला आठवडा सुरू झाला होता. जून तसा कोरडाच गेला होता. पण जुलैमध्ये मात्र रिमझीमणारा पाऊस वातावरणात सुखद गारवा घेऊन आला होता. संध्याकाळी शेखर नेहमीप्रमाणे ऑफिसमधून आपल्या घरी जायला निघाला, तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर अनोळखी नंबर वरून फोन आला. कुठल्यातरी क्लाएंटचा फोन असेल असं समजून त्याने तो फोन घेतला.
हॅलो!! मि. शेखर?
हा बोलतोय..
नमस्कार, मी 96.3 रेडिओ चॅनेलवरून आरजे पूनम बोलतेय. आमच्यातर्फे तुमचा नंबरला “कॅफे रॉयल”चे फ्री कुपन देण्यात आलं आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता कॅफे रॉयलच्या टेबल नंबर 26 वर मी तुमची वाट बघतेय. नक्की या गुडबाय.” शेखर काही बोलणार तोपर्यंत फोन कट झाला होता. त्याने त्या नंबरवर कॉल बॅक करून बघितला तर, नंबर स्विच ऑफ येत होता.
दुसऱ्या दिवशी बरोबर 6 वाजता शेखर कॅफे रॉयलला पोचला. 26 नंबरच्या टेबलवर पूनम त्याची आधीपासूनच वाट बघत होती. एक क्षण त्याने तिला ओळखलंच नाही. ती चवळीच्या शेंगेसारखी बारीक झाली होती. अॅक्वा ब्ल्यू रंगाचा ईव्हीनिंग गाऊन, केसांचा लेअर कट, हलकासा मेकअप आणि चेहऱ्यावरचा आत्मविश्वास यामुळे ती खूपच आकर्षक दिसत होती. शेखरची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती.
“वेलकम मि. शेखर!” पूनम हसत म्हणाली.
शेखरला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. त्याची अवस्था बघून पुनमला हसायला येत होतं.
“तुम्हाला काय वाटलं? मला काहीच कळणार नाही? तो फोन तुम्हीच केला होता ना? तुमच्याशी बोलत असताना मला सतत असं वाटत होतं की हा आवाज मी कुठेतरी ऐकला आहे. जेव्हा तुम्ही कॅफे रॉयलच्या ट्रीट बद्दल बोललात तेव्हा जाणवलं हा तोच आवाज आहे, ऑन एअर लव्ह स्टोरी वाला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाऊन त्या दिवशीचे रेकॉर्डिंग पुन्हा ऐकले आणि माझी खात्री झाली की ते तुम्हीच होतात. तेव्हाच ठरवलं आता काही बोलायचं नाही. आपलं ठरल्याप्रमाणे डायरेक्ट तुम्हाला कॅफे रॉयलमध्ये याच टेबलवर भेटायचं आणि तुला भेटल्यानंतरच आरजे पूनमचा चेहरा लोकांपर्यंत आणायचा.”
पूनमचं बोलणं ऐकून शेखरला हसायला आलं.
“मग, आता तरी आवडले का मी? तुमची ऑन एअर लव्ह स्टोरीची सुरुवात तुम्ही करणार आहात की नाही?” पूनम.
“मला तर तू आधीपासूनच आवडत होतीस. पण मला आधी तुला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी तुला समीर या नावाने फोन केला. कॅफेमध्ये टेबल बुक केलं नाही. आणि तिथल्या काउंटरवरही कोणी टेबल 26 बद्दल विचारलं तर, बोलण्यात गुंगवून मला खूण करायला सांगितली होती. तुझा रुमाल जाणीवपूर्वक मी दिला नव्हता. तसंही तो नसता पडला तर मिनेक लेडीज रुमाल माझ्याजवळ ठेवला होता. पण तुझं एकदम असं डिस्टर्ब होणं माझ्यासाठी अनपेक्षित होतं. एक क्षण वाटलेलं तुला सगळं सांगून टाकावं. पण नाही आधी मला पूनम कशी आहे ते समजून घ्यायचं होतं. आपलं बोलणं झाल्यानंतर मात्र तुझ्या निरागस स्वभावाच्या प्रेमात पडलो मी. पण तरीही मी वाट बघायची ठरवली कारण तू जोपर्यंत स्वतःवर प्रेम करत नाहीस तोपर्यंत तू कोणावरच प्रेम करणं शक्य नाही, हे मला समजलं होतं.” शेखर.
“लेकिन तुम्हारा इंतजार अब खतम हो गया हैं… मी आज स्वतःवर आणि तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करते.” पूनम.
बोलता बोलता दोघं एकेरीवर कधी आली ते त्यांचं त्यांनाही कळलं नाही.
“हो आता मला अजिबात वेळ दवडायचा नाहीये. पूनम आय लव्ह यु. विल यु मॅरी मी?”
शेखरच्या या प्रश्नावर पूनम लाजली. एक ऑन एअर सुरू झालेली लव्हस्टोरी on earth सुफळ संपूर्ण झाली होती.
समाप्त
Image by Andrzej Rembowski from Pixabay
- माझी होशील का? - October 1, 2021
- काव्यांजली- शेवटचा भाग - February 12, 2021
- काव्यांजली- ४ - February 2, 2021
Zakas..
छानशी, छोटीशी लव्ह स्टोरी. आज सकाळपासूनच जरा वैतागले होते. इथल्या गोष्टी वाचून मूड बदलला!
Chan
मस्त…