बाई माणूस…

‘ब्राईट ईन्डिया साॅफ्टसोल्यूशन्स प्राईव्हेट लिमिटेड’.
येस्स…
मी इथेच काम करतो.
अॅन्ड ,
आय अॅम प्राऊड आॅफ ईट.
फायनल ईयरला, कॅम्पसमधनं सिलेक्ट झालो.
आता दोन वर्ष होत आलीयेत.
खरंच..
कळलंच नाही, कधी दोन वर्ष संपलीयेत ती.
आय.टी. ईन्डस्ट्रीत राहून सुद्धा, ही कंपनी टोटली वेगळीये.
नो पाॅलीटीक्स.
हेल्दी वर्क कल्चर.
डेडलाईन्सचा अतिरेक नाही.
कामाची कदर करणारी लोकं.
चांगलं काम केलं की, पटाटा मिळणारी ईन्क्रीमेंटस्.
बाॅस…
बाॅस वाटलाच नाही कधी.
जस्ट लाईक एल्डर ब्रदर.
चांगलं काम करवून घेणारा.
चुकलात , धडपडलात, तरी पाठीशी ऊभा राहणारा.
सांभाळून घेणारा.
स्वतःहून काही चांगल्या टिप्स देणारा.
पुढं कसं जायचं ?
हार्ड वर्क पेक्षा, स्मार्ट वर्क कसं करायचं ?
हातचं न राखता सांगायचा.
एखादवेळी रात्र, कंपनीत काढायची वेळ आलीच तर ,
आमच्या जोडीला तोही थांबायचा.
प्रोजेक्ट सक्सेसफुली रन झाला की ,
सेलीब्रेशन.
मनापासून.
कुठंतरी महाबळेश्वर, नाहीतर लोणावळा खंडाळा.
टाॅपक्लास रिसाॅर्टमधे.
सॅटरडे सन्डे.
दोन दिवस फूल टू एन्जाॅय.
पार्टीत आमच्याबरोबर धमाल नाचायचा सुद्धा.
कूऽऽल.
मन्डेपासून नव्या दमानं आम्ही, नवा प्रोजेक्ट सुरू करायचो.
आमच्या ग्रुपमधे आम्ही चार पोरं आणि दोन पोरी.
सगळी बॅचलर्स गँग.
रूमवर टाईमपास करण्यापेक्षा, आॅफीस बरं.
आम्ही जास्तीजास्त वेळ आॅफीसमधेच पडीक असायचो.
खूप शिकायला मिळालं.
खरं सांगू ?
मेसपेक्षा, कंपनीचं कॅन्टीन बरं वाटायचं.
आठवड्यातून तीनदा तरी ,
रात्रीचं जेवण कंपनी कॅन्टीनमधेच व्हायचं.
पोरींचं तसं नसायचं.
सातच्या ठोक्याला त्या पळायच्या.
काहीही असो.
आमचं वर्कोहोलीक असणं.
बाॅसचं सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं.
त्याचा टॅलेन्ट, आमचं हार्डवर्क.
प्रोजेक्ट डेडलाईनच्या आतच, कम्प्लीट व्हायचा.
कंपनी खूष होती आमच्या टीमवर्कवर.
अचानकच.
मन्डे ईव्हीनींग.
बाॅस म्हणाला , आज रात्री सगळे माझ्या घरी डिनरला या.
गेलो.
ग्रुपमधल्या पोरीही होत्या.
बाॅसची बाॅस.
त्याची बायको.
तीनं, आमच्या गँगला मनापासून एन्टरटेन केलं.
जेवण छानच.
गप्पा मारल्या.
ती..
बाॅसनं ओळख करून दिली.
“म्रिनाल.
माय कझिन.
आय. बी. एम.
यू.ऐस. ला असते.
पण कंटाळलीय तिकडे.
लवकरच परत येईल इकडे.”
आम्ही पहातच राहिलो.
वेड्यासारखं…
नो डावूट.
ती फेअर होतीच.
पण तिचं स्माईल.
जबरा.
आमच्या गँगमधल्या पोरांचे, ईसीजी काढावे लागले असते.
धकधक..
तीनं हात पुढं केला.
प्रत्येकाचा हात हातात घेवून ,शेक हॅन्ड केलं तीनं.
तीचा स्पर्श झाला अन्…
11 के. व्ही.चा शाॅक बसला.
कुछ कुछ…
बहोत कुछ होने लगा.
ती प्रत्येकाशी बोलली.
नेटिव्ह टाऊन , काॅलेज , हाॅबीज , गर्लफ्रेन्ड , बाॅयफ्रेन्ड , फ्युचर प्लॅन्स…
सबकुछ.
आम्ही हिप्नोटाॅईज्ड झालेलो.
सब कुछ ऊगल दिया.
रात्रीचे अकरा वाजत आलेले.
आमच्या गँगमधल्या पोरी अस्वस्थ.
आम्ही..
आम्हाला वाटत होतं , ये मुलाकात खतमही ना हो.
एकदम बाॅसने बाॅम्ब फेका.
मार डाला.
” फ्रेन्डस् , आय अॅम रिझायनिंग.
शिफ्टींग टू सिंगापोर.
फ्राॅम टूमारो , आय विल नाॅट बी देअर ,अराऊंड यूवर डेस्क.
बेस्ट लक फाॅर युवर फ्यूचर.
स्टे ट्यून्ड गाईज.”
आम्ही बैलासारख्या माना डोलावल्या.
बुरा लगा.
मनापासून वाईट वाटलं.
आम्ही थोडं ईमोशनल झालेलो.
बाॅसला हातात हात घेवून, बेस्ट विशेस दिल्या.
निघालो.
खाली आलो.
म्रिनाल तिच्या गाडीपाशी.
पोरींना ती ड्राॅप करणार होती.
एकदम माझ्याकडे वळून म्हणाली.
” तू त्याच एरियात राहतोस ना.
चल ,तुला ड्राॅप करते.”
मी टुणकन ऊडी मारून तिच्या गाडीत.
ड्रायव्हींग सीटशेजारी.
तीची मरून होंडा सिटी.
कारमधला अफलातून फ्रेग्रन्स.
तीचं असणं.
मोतीदार दात दाखवत , हसून बोलणं.
बॅग्राॅऊंडला जगजीतसिंगाचं गजल गाणं..
अहाहा…
साला ,
माझं घर फार पटकन् आलं.
मी तिला बाय केलं.
ईन्फानाईट टाईम्स, तिच्या पाठमोर्या गाडीकडे बघत बसलो.
नेक्स्ट माॅर्नींग.
बाॅस की बिदाई.
आँखो में आंसू.
व्हेरी नेक्स्ट माॅर्नींग.
नये बाॅस की मुँहदिखाई.
अर्थक्वेक झालेला.
म्रिनाल ईज आवर न्यू बाॅस.
पुन्हा आँखों में आंसू.
खुशी के आंसू.
सरप्राईज के आंसू.
सगळ्या पोरांचा देवावरचा विश्वास एकदम वाढला.
भगवान , तेरी लीला अगाध है !
आणि म्रिनाल भी.
मुद्दामहून बाॅसच्या घरच्या पार्टीला येणं.
स्वतःची ओळख लपवणं.
आमची कुंडली काढून घेणं..
येस बाॅस..
मान गये.
हल्ली आम्ही जरा ब्युटी काॅन्शस झालेलो.
भांगाच्या रेघा काढणं वाढलं.
हजामाचं बिल वाढत गेलं.
जीन्स पिदाडणं कमी झालेलं.
फाॅर्मल्समधे वावरणं वाढलं.
काहीही असो..
आमच्या आॅफीसचा स्वर्ग झालेला.
तरीही.
म्रिनालचं वेगळेपण जाणवायचं.
पहिल्या दिवशीच तीनं सांगितलं.
” काॅल मी म्रिनाल.
जस्ट म्रिनाल.”
ती प्रचंड हुशार.
तितकीच मेहनती.
सतत नवीन काहीतरी शिकायच्या मागे.
तीचं नाॅलेज नेहमी अपटू डेट असायचं.
आमच्याबरोबरही ती ते शेअर करायची.
हळूहळू आम्हालाही ती सवय लागली.
शक्यतो कुणी ओव्हरटाईम करावा, असं तिला वाटत नसे.
एरवीचा टाईमपास बंद झाला.
सहा वाजेपर्यंत आमचं काम आवरायचं.
अर्थात पहिल्या बाॅसईतकीच ती हेल्पींग नेचरवाली.
व्यवस्थित गाईड करायची.
छोटी छोटी टारगेटस् ठेवायची.
डे टू डे टार्गेट.
आम्ही ते कम्प्लीट करायच्या मागे लागायचो.
प्रोजेक्टचा लोड जाणवायचाच नाही.
बाकीचंही ती भरपूर वाचायची.
एखादं चांगलं बेस्टसेलर रेफर करायची.
आम्ही वाचायचो.
फ्रेश वाटायचं.
ती स्वतः खूप हेल्थ काॅन्शस होती.
जिम करायची.
भरपूर वाॅक घ्यायची.
गिटार वाजवायची.
स्वतःला फ्रेश ठेवायची.
आम्ही काय ?
काॅपी पेस्ट करायला टपलेलोच.
जागरणं कमी झाली.
अचरट चरबट खाणं कमी झालं.
जिम सुरू झाली.
आम्हीही हेल्थ काॅन्शस झालो.
आॅफिसमधल्या स्मोकींग झोनच्या वार्या कमी झाल्या.
ओव्हरआॅल ,
हळूहळू अॅज अ पर्सन आम्ही डेव्हलप होत गेलो.
म्रिनाॅल वाॅज स्ट्राँग मॅग्नेटिक फिल्ड.
आणि …
आॅल वुई वेअर अन्डर ईन्फ्ल्युएन्स आॅफ ईट.
ती सुंदर होतीच.
अजून सुंदर वाटायला लागली.
वाटायचं की , आपण स्वतःला तिच्यासारखं डेव्हलप करायला हवं.
म्रिनाल वाॅज नो मोअर अ ब्युटी क्वीन.
बट नाऊ शी हॅज बिकम आयडाॅल.
आणि आम्ही सगळे तिला काॅपी करत होतो.
तरीही छान वाटत होतं.
प्रोजेक्ट संपत आलेला.
यू. ऐस. चा क्लायंट.
दिवाळी दोन दिवसावर.
म्रिनालनं त्याला ठणकावून सांगितलं.
“दिवाळीत जमणार नाही.
तुम्ही ख्रिसमसला काम करता का ?
हे तसंच आहे.”
काही क्वेरीज होत्या.
आज रात्री थांबावंच लागणार.
म्रिनाल म्हणाली ,
“सगळे नकोत ,कुणीतरी दोघं थांबा.”
 मी आणि गार्गी तयार झालो.
संध्याकाळी सहाला बाकीची लोकं गेली.
हॅपी दिवाली.
आमची नाईट शिफ्ट सुरू.
रात्रीचे दोन वाजत आलेले.
मी म्रिनाल आणि गार्गी .
तिकडे तो राॅबर्ट.
चुन चुन के प्रत्येक क्वेरीचा फडशा पाडला.
टेस्टेड ओके.
मिशन कम्प्लीटेड.
जरा रिलॅक्सलो.
तेवढ्यात म्रिनाल, आमच्या दोघांसाठी स्वतः काॅफी घेवून आली.
खूपच छान वाटलं.
आमच्या दोघांच्या पाठीवर थोपटलं.
” वेल डन.
नाऊ ईटस् रिअली अ हॅपी दिवाली”
खरं तर खूप भूक लागलेली.
असं वाटेपर्यंत ,म्रिनालनं तिच्या टिफीनमधली सॅन्डविचेस काढली.
और मोतीचूर का लड्डू भी.
मजा आली.
आम्ही तिघं निघालो.
खाली आलो तर, म्रिनालचा नवरा त्याची कार घेवून आलेला.
त्याच्याशी ओळख करून दिली.
तिच्यासारखाच.
हुशार , हॅन्डसम.
बिलकुल फॅक्टर जे नाही वाटलं.
शी रिअली डिझर्व्हस् ईट.
त्याच्या गाडीतून मी  रूमपर्यंत.
रूमवर पोचलो.
रूमपार्टनरनं विचारलं.
” साल्या , तुझं कामात लक्ष कसं लागलं ?
एवढ्या सुंदर दोन पोरी शेजारी होत्या.
मी पागल झालो असतो.”
मला त्याच्या पागलपणाची कीव वाटली.
खरंच..
कामात इतकं हरवलेलो.
त्यांचं बाईपण कधीच विसरलेलो.
म्रिनाल दोन एक वर्ष आमच्या इथे होती.
आता बरीच वर्ष बंगलोरला.
गार्गी.
माय कलीग अॅन्ड नाऊ माय वाईफ.
आम्हाला नेहमी म्रिनालची आठवण येते.
आज जे काही थोडं फार अचिव केलंय,
क्रेडिट गोज टू म्रिनाल.
आजही कुठली यंग चार्मींग लेडी दिसली की,
काय वाटतं सांगू ?
ही म्रिनालसारखी हुशार असेल.
ती भरपूर वाचत असेल.
नाहीतर गिटार वाजवत असेल.
ओव्हरऑल , तिच्या सुंदर दिसण्यापेक्षाही ,
ती खरंच जास्त सुंदर असेल.
माझी नजर सुधारलीय.
सुंदर बाईमाणूस दिसली की ,
हल्ली माझं, त्यातल्या माणसाकडे जास्त लक्ष जातं.
त्या स्वच्छ नजरेला, बाईपणाचा मोतीबिंदू होत नाही.
परवा एकदम म्रिनालची आठवण झाली.
आठ मार्च होता.
फोन केला.
आम्ही दोघंही बोललो.
” हॅपी वुमन्स डे , म्रिनाल.”
ती तिकडून हसली.
“वीई शुड सेलीब्रेट ह्युमन्स डे.
देन विमन्स डे विल बी सेलीब्रेडेड एव्हरी डे !”
काय बोलणार ?
” ओके म्रिनाल , हॅपी ह्युमन्स डे ! “
Image by Engin_Akyurt from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

2 thoughts on “बाई माणूस…

  • April 21, 2020 at 1:33 pm
    Permalink

    मस्त नेहमी सारखं

    Reply
  • May 16, 2020 at 3:49 pm
    Permalink

    छान सुरेख

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!