अश्रुफुले (प्रकरण २ रे ) – अभिजित इनामदार
दोन वर्षांपूर्वी जेव्हा कॉलेज संपले तेव्हा अवीने पुण्यातच जॉब मिळवला अन पुण्यातच राहिला तर मृणालने GRE देण्याचा निर्णय घेतला. तिचे वडील म्हणजे प्रतापराव सरदेशमुख हे नागपूरच्या सत्र न्यायालयातील मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत. गेली दोन वर्षे ते नागपूरला आहेत. शिक्षणामुळे मृणाल पुण्यात राहिली असल्यामुळे आता कॉलेज संपल्यावर तिने काही काळ का होईना आपल्याजवळ राहावे असे त्यांना वाटते. आता कॉलेज संपले होते त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला घरी नागपूरला बोलावून घेतले.
मृणाल त्यांचं एकुलता एक आपत्य त्यामुळे तिच्याकडून काही अपेक्षा ठेवणं काही गैर नव्हतं. तिने देखील आपल्यासारखे न्यायदानाच्या क्षेत्रात यावे असे त्यांना वाटत होते. पण तिचा कल त्या क्षेत्राकडे नाही हे पाहून त्यांनी तिला हवे ते क्षेत्र निवडण्याची मुभा दिली. जे करशील ते मात्र बेस्ट कर. तुझ्या क्षेत्रात उच्च पातळीवर पोहोच अन त्यात काम कर असा त्यांनी तिला सल्ला दिला होता.
मृणालही वडिलांप्रमाणेच बुद्धीने तल्लख, हुशार अन एकपाठी आहे. दिसायलाही एकदम सुंदर… दुधी गोरा वर्ण, गोल चेहरा, रेखीव नाक, कोरीव भुवया अन त्याखालचे पिंगट पण बोलके डोळे आणि फिकट गुलाबी ओठांच्या खाली उजव्या बाजूला असणारा तीळ तर तिच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकतो. त्यातून तिची हेअर स्टाइल म्हणजे बॉब केलेले केस, ती बोलताना मानेवरून असे पटकन पुढे चेहऱ्यावर येतात, मानेला झटका देऊन ती ते परत मागे सारते. तिचं वागणंही एकदम सालस… पण स्पष्टवक्तेपणा हा वडिलांकडून आलेला गुण ती अंगी बाळगून आहे. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की हट्टाला पेटून त्या गोष्टीच्या मागे लागते अन मिळवते सुद्धा.
तर अशी ही मृणाल…. सध्या नागपुरात आहे. अविला ती आवडते पण त्याला हे नक्की माहित नाहीये की तिच्या मनात त्याच्या बद्दल काय भावना आहेत ते. बऱ्याच दिवसात दोघांची प्रत्यक्षात भेट झाली नाहीये. बाकी फोन कॉलवर, चाट वर त्यांचं बोलणं होत होतंच. पण यशने आज अचानक तिची आठवण करून देऊन त्याला जरा आश्चर्यचकित केले होते. त्यामुळेच की काय पण अविच चेहरा ही खुलला होता. अचानक त्याला त्यांची पहिली भेट आठवली.
– – – . – – – . – – –
पहिली भेट:
त्याला आजूनही तो दिवस आठवत होता. जेव्हा त्याची तिच्याशी ओळख झाली होती. कॉलेजच्या सेन्ट्रल क्यांटीन मध्ये अवि बसला होता. नेहमीप्रमाणेच त्याचं कॉफी अन वाचन सुरु होतं. तेवढ्यात क्यांटीन मध्ये एकच गलका झाला. कोणीतरी दोन मुली क्यांटीनमध्ये येताना दिसत होत्या त्यामुळेच मुलांनी दंगा सुरु केला होता. त्या जसजशा पुढे सरकत होत्या तसतसा मुलांचा आवाज कमी होत गेला. अवि पाहत होता. त्या दोघींमधील एका मुलीला त्याने पाहिल्याचे आठवत होते. अरे हो ही ऋतुजा. बायोमेडिकल डीपार्टमेंटची… हिनेच तर त्यांच्या डीपार्टमेंटच्या फंक्शन मधील ड्रामा स्पर्धेसाठी स्क्रिप्ट मागितले होते. पण तिच्या सोबत असणारी मुलगी कोण आहे? तिला पाहिल्याच आठवत नाही. पण काय सुंदर आहे ही… असा विचार करतच अवि तिच्याकडे एकटक बघत राहिला. तसे ह्याआधी सुंदर मुली पाहिल्या नव्हत्या असे थोडीच होते पण काय कोण जाणे त्याला ही एकदम वेगळीच जाणवली. त्यांच्याकडे पाहण्यात तो एवढा दंग होता की त्या कधी त्याच्या पुढ्यात येउन उभ्या राहिल्या ते कळलेच नाही.
ऋतुजाच्या हाय अविनाश अशा हाकेने तो एकदम भानावर आला.
स्वतःला सावरून तो एकदम म्हणाला – Hi… How are you?
त्याच्या चेहऱ्यावरचा तो गोंधळलेला भाव अन तो अविर्भाव पाहून रुतुजाची मैत्रीण गालातल्या गालात हसली. ते पाहून तर अवि पुरताच खलास झाला.
अवि – अरे बसा ना तुम्ही. काय घेणार…? कॉफी?
त्या दोघींनी मन डोलावली म्हणून मग त्याने कॉफीची ऑर्डर दिली
अवि – बोल काय म्हणतेस? ऋतुजाला त्याने विचारले
ऋतुजा – अरे तुझे आभार मानायला आलीय.
अवि – आभार… कशासाठी?
ऋतुजा – अरे तू लिहून दिलेल्या स्क्रिप्टसाठी. त्यामुळेच आमचा कार्यक्रम छान झाला.
अवि – त्यात काय एवढं?
ऋतुजा – तरीही थ्यांक्स
अवि – अगं बास तो तुझा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम
ऋतुजा – बर बाबा… पण हिला तुला भेटायचं होतं. एवढी छान स्क्रिप्ट लिहिणारा कोण मुलगा आहे त्याला भेटायचं होतं तिला.
तिची ती मैत्रीण लाजली अन – अन चलं तुझं आपलं काहीतरीच… असं काहीसं पुटपुटली.
ऋतुजा – बर… ही माझी मैत्रीण मृणाल… मृणाल सरदेशमुख. हिनेच सायलीचा रोल केला होता, तू लिहिलेल्या स्क्रिप्टमध्ये.
अवि – अच्छा
मृणाल – खरच थ्यांक यु सो मच. खूप छान स्क्रिप्ट दिलीत तुम्ही
अवि – अरे हो… ठीक आहे त्यात काय एवढं. मला आहो जाहो करण्या एवढा मोठा कुणी नाही बरे
मृणाल – ठीक आहे. पण तो रोल तू इतका छान लिहिलास की त्यामुळेच आम्हाला बक्षीस मिळाले.
अवि – काय ग ऋतुजा… बक्षिसाच काही बोलली नाहीस. मला पार्टी द्यावी लागेल म्हणून काय?
तिघेही खळखळून हसले. कॉफी आली. कॉफी घेत घेत
ऋतुजा – अरे नाही… खरे तर आमच्या सगळ्या टीमच आज संध्याकाळी गेट टुगेदर आहे त्यासाठीच तुला सांगायला आलोय.
अवि – अगं तुम्ही म्हणालात त्यातच आलं सगळं. पण मी काय करणार येउन? अन मी धड ओळखतपण नाही तुझ्या फ्रेंड्सना.
मृणाल – भेटल्याशिवाय ओळखी होतील का?
ऋतुजा – Point आहे बरं हिच्या बोलण्यात…
अवि – बर मी प्रयत्न करेन नक्की… कधी अन कोठे ते सांगा
ऋतुजा – प्रयत्न वगैरे काही नाही. तू येतोयस हे नक्की.
मृणाल – अन कुठे ते तुला मेसेज करतो आम्ही… तुझं नंबर दे बरे
अवीने शहाण्या बाळासारखा नंबर दिला. अन त्या दोघी बाहेर पडल्या. पाच मिनिटात त्याला एका अननोन नंबरवरून मेसेज आला “Hi this is my number… please save it… Mrunal :)”
ठरलेल्या वेळी अवि इथे पोहचला होता. मृणालच आता त्याच्या सगळ्या फ्रेंड्सना तिचा खूप जुना मित्र असावा अशी ओळख करून देत होती. ऋतुजा फक्त तिच्याकडे बघून हसत होती. गप्पा गोष्टी, खाणं पिणं चालू होतं. मृणाल अन अवि आता एका साईडला बसून बोलत होते. दुसऱ्याच भेटीत त्यांनी एकमेकांना आपल्या बद्दल अन घरच्या परिस्थिती बद्दल सांगून टाकले. बराच वेळानी सगळे निघाले म्हणून… त्या दोघांना निघावं लागलं होतं.
पहिल्या भेटीत त्यांनी एकमेकांचे नंबर्स शेअर केले, दुसर्या भेटीत एकमेकांना आपल्याबद्दल सांगून टाकले अन निघताना लवकरच भेटण्याचं आश्वासन घेऊन निघाले.
अविला ती पहिल्याच भेटीत आवडून गेली होती. पण तिलाही असेच काही वाटते काय, माझ्या बद्दल… असा विचार त्याच्या मनात येउन गेला. पण लगेच दुसरे मन म्हणाले कंट्रोल यार… दोनदाच भेटलायस तिला. तसे काही नसेलही तिच्या मनात. असा विचार करून मग स्वतःच स्वतःच्या विचारांवर हसला अन आपल्या रूम कडे जाऊ लागला.
अभिजीत अशोक इनामदार
On Thu, Feb 13, 2020, 2:20 PM Abhijeet Inamdar <inamdar.abhijeet@gmail.com> wrote:
अश्रुफुले (प्रकरण १ ले )अविनाश देसाई..!! कम्प्युटर इंजीनिअरिंग केलेला, साधा सरळ असा तरुण आहे. दिसायला एकदम सेक्सी वगैरे नसला तरी उठावदार असं त्याचं व्यक्तिमत्व नक्कीच आहे. ६ फुट उंच, गव्हाळ रंग, उभट चेहरेपट्टी, लांबसडक नाक, काळेभोर पाणीदार डोळे, केसांचा मधून झुपकेदार भांग पडणारा असा हा तडफदार तरुण चार चौघात सहज आपलं लक्ष वेधून घेतो. मुख्य म्हणजे कोणत्याही वेळेला इतरांच्या मदतीला धाऊन जाणारा असा हा तरुण आहे. म्हणूनच त्याचा मित्र परिवारही मोठा आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये तो कार्यरत आहे. त्याला रक्ताचं असं कोणी नाही. त्याने जोडलेली माणसं हीच त्याची जवळची माणसं. त्या सगळ्यांमध्ये यश हा त्याचा आगदी खास मित्र. तो त्याच्याच कंपनीमध्ये कार्यरत आहे. तो ही याच्या सारखाच इंजिनिअर आहे. शिवाय ते दोघे रूममेट्स देखील आहेत. ते त्यांच्या कॉलेजच्या दिवसंपासुनाचे मित्र आणि रुममेट आहेत. त्यामुळे एकमेकांना चांगलेच ओळखून आहेत.दोघांच्या विचारात अन विचारसरणीत तर कमालीचा फरक आहे. त्यांचं सहजा सहजी असं पटकन कोणत्याही गोष्टीवर एकमत होत नाही. अवि एकदम भावनिक, समोरच्याला काय वाटेल ह्याचा विचार करणारा तर यश प्रॅक्टिकल अॅप्रोच ठेवणारा. कुठल्याही बाबतीत उगाच फाफटपसारा त्याला आवडत नाही. त्याला त्याचं फ्रीडम महत्वाचं वाटत. तो पटकन स्वतःला कोणत्याही बंधनात अडकवून घेत नाही. कुठलीही गोष्ट म्हणजे आगदी स्वतः बद्दलचीही तो आगदी त्रयस्थ होऊन पाहू शकतो अन त्याच्या लेखी त्यामुळेच तो खूप सुखी आहे. अवीच्या दृष्टीने तो स्वतः सुखी आहे. तो भावनिक आहे, इतरांचा विचार करणारा आहे, इतरांना सोबत घेऊन पुढे जाण्यात त्याला आनंद वाटतो अन तो तसे करतोही. पण इतक्या दिवसांचा सहवास म्हणा किंवा अजून काही म्हणा पण दोघांच्या विचारांचा त्यांच्या एकमेकांच्याही नकळत थोडाफार फरक पडला होता. यश कधीमधी भावनिक होत असतो तर अवि प्रॅक्टिकल. पण दोघे मान्य करत नाहीत हा वेगळा मुद्धा.नुकत्याच रचलेल्या कवितेच्या ओळी गुणगुणत अवि बेडवर पडला होता:तिचं लाजून हसणंकाळजावर जसा वारती करितसे एकवारआणि मग वारंवारतिच्या पायीचं पैंजणवाजतसे छनछनभुलवित जातसेदेहभान तनमनतेवढ्यात यश – अव्या मित्रा काहीतरी ऐकव ना… नवीन कविता वगैरेअवि – मग इतका वेळ काय ऐकत होतास?यश – अरे मी कुठे काय ऐकतोय… कामात होतो… तू काय बडबडत होतास त्याकडे लक्ष नव्हते माझे.अवि – छान छान… आणि काय आज चक्क चक्क घरी येउन पण काम सुरु आहे तुझे? काय रे बाबा बॉस काही बोलला का तुला?यश – छे रे… उद्या जरा लवकर कलती मारणार आहे ऑफिस मधून. म्हणून मग काम संपवून टाकलं.अवि – मग… उद्या लवकर सटकून काय प्ल्यान काय? डेट का?अवीच्या प्रश्नाबरोबर त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. एक डोळा हलकेच लववून मानेनेच तो हो म्हणालाअवि – अरे आता कोण नवीनयश – आहे ती… शलाका म्हणून. ते छोड ना यार तू ऐकवतोयस ना काहीतरी…अवि हसला अन पुन्हा कविता गुणगुणू लागलातिच्या नजरेचे तीरजाती काळजाच्या पारवेदना सुखावितह्रिदयाच्या आरपार…यश – वा अवि वा… क्या बात हैअवि –तिचं रुपडं साजिरंन भासे मज चंद्रापरीचंद्रामाजी असे डागती तर मोहक सुंदरीयश – काय साहेब… प्रेमा बिमात पडलाय काय कोणाच्या?अवि – छे रे… ही आपली अशीच केलेली कविता आहेयश – एक विचारू का रे..अवि – मला काही विचारायला परवानगी? हे म्हणजे आजी म्या ब्रह्म पहिले असे झाले यश… बोल काय विचारायचययश – अरे तुझी ती जुनी फ्रेंड काय म्हणते रे? काय बर नाव तिचं? मृणाल… हां…मृणालअवि – तिचं काय मधेच आता? ती कुठून आठवली एकदम तुला?यश – तसं काही खास कारण नाही… पण बर्याच दिवसात काही बोलला नाहीस तिच्याबद्दल अन शिवाय आज काय एकदम कविता वगैरे… म्हणून विचारलं रेअवि नुसताच हसला… नाही म्हटलं तरी आता त्याला मृणालची आठवण होतच होती….क्रमश:Image by Pete Linforth from Pixabay
Latest posts by Abhijit Inamdar (see all)
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021