सोलो ट्रीप – भाग ६

दोघांचेही ओठ एकमेकांच्या इतके जवळ होते पण दोघांनीही स्वतः ला रोखून ठेवले होते..

दोघांच्या डोळ्यांनी जणू एकमेकांच्या नजरेला कैद केले होते.. कोणाचीही क्षणभरही नजर हटत होती , ना पापणी लवत होती.. प्रद्युम्न ने अनया च्या कमरेला मिठी मारून तिला अजून जवळ ओढले.. आता तर दोघांना एकमेकांचा चेहराही दिसत नव्हता.. अनया ने डोळे गच्च मिटून घेतले.. प्रद्युम्न ने उजवा हात तिच्या गालावर ठेवला आणि तिच्या ओठांवरून हळुवार अंगठा फिरवला..

तो तिला किस करणार इतक्यात त्याचा फोन वाजला आणि त्यांची तंद्री भंगली.. दोघंही पटकन दूर झाले, आणि जाऊन प्रद्युम्न ने त्याचा फोन घेतला. इकडे अनया चे अवसानच गळाले होते.. “melting in someones arm” .. म्हणजे हेच असेल बहुतेक .. ती स्वतः शीच बोलली!” त्यातून तिला शॅम्पेन चढू लागली होती. तिने पहिले हि पाठमोरा प्रद्युम्न समोरच फोन वर बोलतोय, ती तशीच उठली, तडक त्याच्याजवळ गेली आणि त्याला मागून मिठी मारली! प्रद्युम्न ने मान वळवून मागे पाहिले, आणि हसून तिच्या हातांवर हात ठेवला..

फोनवर बोलून झाल्यावर तो तिच्याकडे वळत म्हणाला “सॉरी फोन आला मधेच” आणि तिचे हात हातात घेतले. “but it was “the moment”..” -प्रद्युम्न. “for me too”-अनया.

खूप रात्र झाली होती म्हणून दोघेही खाली गेले. आज मात्र दोघेही वेगवेगळ्या रूम मध्ये झोपले. झोप मात्र कोणालाच येत नव्हती! शेवटी पहाटे २-३ ला उठून अनया गॅलरी मधल्या पायरीवर जाऊन बसली. “झोपली नाहीस?” प्रद्युम्नच्या आवाजाने तिने मागे वळून बघितले. स्किन फिट टी-शर्ट मध्ये तो अमेझिंग दिसत होता. तिला त्याचे आकर्षण होतेच पण आज त्याच्याबद्दल शारीरिक आकर्षण तीव्रतेने जाणवत होते.. ती त्याला न्याहाळू लागली.. त्याची बिअर्ड .. खळी .. फिजिक.. मस्तच होता तो! हसला कि अजूनच गोड दिसायचा! “काय होतंय अनया… ” अनया दुसरीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करू लागली…. गॅलरीतून अथांग समुद्र दिसत होता..

प्रद्युम्न येऊन तिच्या मागच्या पायरीवर बसला आणि तिच्या खांद्यावर त्याने मान ठेवली. तिचे दोनही हात हातात घेऊन तिला मिठी मारली.
त्याच्या श्वासांचा स्पर्श तिला जाणवत होता म्हणून तिची चलबीचल सुरु झाली.. इकडे प्रद्युम्न हि तिच्या साईसारख्या मऊ स्पर्शाने मोहरून गेला होता. तिच्या कुरळ्या केसांचा मोहक गंध येत होता. अचानक त्याने तिचे केस एका बाजूला केले, इतक्यात त्याला तिच्या मानेवर काढलेला दुसरा टॅटू दिसला. “अग किती टॅटू काढले आहेस तू एकूण?”-प्रद्युम्न. “३”-अनया. “तिसरा कुठाय?”-प्रद्युम्न. “हे दोन दिसले ना? तिसराही दिसेल मग!” डोळे मिचकावत अनया म्हणाली! सुंदर कमळाचा टॅटू होता तो. त्याने हलकेच आपले ओठ त्या टॅटू वर टेकवले, आणि पुन्हा एकदा अनया च्या अंगावर सरसरून काटा आला… मग त्याने तिच्या उजवीकडे मानेवर आपले ओठ टेकवले आणि तिच्या खांद्यावर आपली मान टेकवून तो बसून राहिला..

अनायानेही त्याचे हात आपल्याभोवती वेढून घेत त्याच्या खांद्यावर डोके टेकवले. “पुढे काय प्रद्युम्न? आपण फारच घाई करतोय का? मी एका गोष्टीचा विचार करेपर्यंत आपण पुढे गेलेलो असतो!” अनया म्हणाली.. “तू अजून खूप लहान आहेस अनू. तुझं बरोबर आहे, कि हे सगळं खूपच अनपेक्षितपणे आणि लवकर होतंय, पण मला माझ्या भावनांची क्लीअरिटी आहे, जी तुला अजून यावी असेल मला वाटते-नाहीये असे अजिबात नाही. तुझ्यासाठी हा कदाचित पहिला अनुभव असेल.. पण तू हवा तेवढा वेळ घे, पण योग्य निर्णय घे. फँटसी मध्ये खूप छान वाटतं गं, आपलं एखाद्या हिरो शी लग्न झालं तर काय वगरे,पण प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा असतो. आता कुठे मी सेट झालोय. कोणत्याही रिलेशनशिप ची सुरुवातीची फेज खूपच सुंदर आणि हवीहवीशी असते, पण खरा कस लागतो तो 7 year itch मध्ये. असं म्हणतात कि कोणतेही नाते, ७ वर्षांनी तुम्हाला नकोसे होते.. त्यातून तुम्ही तरलात तर ठीके.. तू सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर, तुझ्या आई बाबांशी बोल आणि मगच पुढचा निर्णय घे. मला घाई नाही. लग्न हि खूप मोठी गोष्ट आहे.. ”

अनया त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐकत होती. तिला एकदम भरून आले कि हा इतका सिरियसली सगळ्याचा विचार करतोय.. तिने त्याचा हात हातात घेतला आणि हातावर किस केले. प्रद्युम्न ने पुन्हा एकदा तिला घट्ट मिठीत घेतले.. आणि पुन्हा एकदा तिच्या कानापाशी मानेवर आपले ओठ टेकवले. “असं वाटतंय हि वेळ इथेच थांबून राहावी.. आणि आपणही… नको ती मुंबई, नको तो जॉब.. इथेच राहायच छान!” अनया स्वप्नात हरवून गेली.. “हम्म.. असं नसतं ग वेडाबाई .. चल झोपूया, खूप उशीर झालाय.. ”
दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांना ढगांच्या गडगडाटानेच जाग आली. वातावरण कुंद झाले होते.. अनया ने दोघांसाठी कॉफी केली इतक्यात मुसळधार पाऊस सुरु झाला. कॉफी तशीच ठेवून ती भिजायला गेली. पाऊसवेडी होती अनया ! पावसात ती मनसोक्त भिजत होती आणि प्रद्युम्न कॉफी पीत पीत तिला बघत होता. इतक्यात ती प्रद्युम्न ला म्हणाली, “बीच वर जाऊया?” प्रद्युम्न ने हसून मान डोलावली.. दोघेही बीच वर गेले , दोघेही भर पावसात समुद्रात भिजण्याची मजा घेत होते. खूप वेळ समुद्रात खेळून झाल्यावर दोघे रेतीवर जाऊन बसले. अनया तर रेतीवरच झोपून गेली.

“किती भिजणार अजून? आजारी पडशील परत ” प्रद्युम्न म्हणाला.. “काहीतरी राहिलंय प्रद्युम्न..” अनया म्हणाली. “काय?” प्रद्युम्न ने विचारले. अनया उठली आणि त्याच्याजवळ गेली. त्याच्या मानेवर हात ठेवत तिने त्याला पुढे ओढले आणि त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले.. “हे राहिलं होतं .. ” अनया म्हणाली आणि उठून कॉटेज कडे जाऊ लागली.. प्रद्युम्न साठी हा सुखद धक्का होता.. तोही उठून कॉटेज कडे गेला..

दोघेही चेंज करून बाहेर आले तसे प्रद्युम्न ने अनया चा हात हातात घेतला आणि म्हणाला .. “न बोलताच खूप काही बोलून गेलीस अनु..” “थोडेच दिवस राहिलेत, त्यातला क्षण नि क्षण मला तुझ्यासोबत जगायचाय .. नंतर तू कधी भेटशील काय माहित .. तुझ्यापासून दूर होण्याची कल्पना नाही सहन होतेय मला.. ” अनया त्याला घट्ट बिलगत म्हणाली.. “मलाही .. ” म्हणत प्रद्युम्न ने आवेशाने तिला जवळ ओढले आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवत त्याने आपली मिठी अजून घट्ट केली..

बाहेर मुसळधार पाऊस सुरु होता आणि आत भावना ओथंबून जात होत्या.. दोघांच्याही!

क्रमशः

Image by Free-Photos from Pixabay 

Pooja Pathak
Latest posts by Pooja Pathak (see all)

Pooja Pathak

कम्प्युटर इंजिनियर, सध्या ह्युमन रिसोर्स विभागात कार्यरत. वाचनाची आणि लिखाणाची प्रचंड आवड. इतरही बरेच छंद - गायन, चित्रकला, मिमिक्री, स्केचिंग. क्रिएटिव्हिटी ला वाव असणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. पेनपूजा हे स्वतः साजे लिखाण असणारे फेसबुक पेज Oct 2018 पासून चालवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!