Forgotten

राजेंद्र आजही गप्प उभा होता. वसुधा जशी घरी आली तशी त्याच्यावर ओरडत होती. तिच्या तोफगोळ्यांना त्याला तोंड देणे अवघड झाले होते. झाले असे होते की दोघेजण आज राजूच्या आग्रहाखातर म्हणून शॉपिंगला गेले होते. वसुधाला मॉलच्या गेटवर सोडून तो गाडी पार्क करायला गेला तो परत आलाच नाही.
तो येईल म्हणून मग वसुधा त्याची वाट पहात राहिली. मग त्याला त्याच्या ओळखीचे कोणी भेटले असेल म्हणून मग आत मधे जावून कपडे पहात राहिली. तीचे कपडे सिलेक्ट करून झाले तरी तो आला नाही म्हणून ती कंटाळून गेली. शेवटी त्याला फोन केला तर फोन लागेना. काय झाले आहे हे कळत नव्हते म्हणून मग सगळा प्लॅन कॅन्सल केला आणि टॅक्सी पकडून घर गाठले. पुर्वी तो सोबत असल्यावर कधी पर्स घ्यायची नाही. पण आजकाल ती घेते.
का कुणास ठाउक पण एक अनामिक भिती वाटत राहते तीला. आज घरी आल्यावर तीने त्याला जाब विचारला
वसुधा – अरे आपण शॉपिंग ला गेलो होतो ना?
राजेंद्र – कधी?
वसुधा – अरे कधी काय? मघाशी… तासाभरापुर्वी तूच मागे लागला होतास. चल बाहेर जावू. आणि विसरलास?
राजेंद्र – अगं नक्की काय झाले ते आठवत नाही पण मी मॉलच्या एक्झीट गेटवर बराचवेळ तुझी वाट पाहत थांबलो होतो. तू आलीच नाहीस. मला वाटले तू घरी गेली असशील म्हणून मग मी घरी आलो.
वसुधा – अरे एक्झीट गेटवर काय करत होतास तू? आपण शॉपिंगला गेलो होतो ना? तू गाडी पार्क करुन वरती मॉलमध्ये येणार होतास.
राजेंद्र – हो का?
वसुधा – हो का? काय अरे. असा का वागतोयस तू? नक्की काय झाले आहे? काही टेन्शन आहे का? काही प्रॉब्लेम आहे का काही?
राजेंद्र – नाही. मला काहीच प्रॉब्लेम नाही.
वसुधा – अरे मग असा का वागतो आहेस? परवा पण चिन्मयला सांगितलेस की तू त्याला कॉलेजमधून Pick करशील. तो वाट पहात राहिला. अन तू गेलाच नाहीस.
राजेंद्र – कामाच्या गडबडीत विसरलो गं
वसुधा – तू हल्ली बर्‍याचदा असे करतो आहेस.
राजेंद्र देशपांडे हा एका मल्टीनॅशनल कंपनीमधे सीईओ आहे. उंचापूरा, मध्यम बांध्याचा, गोल चेहर्‍याचा हा पहिल्या भेटीत समोरच्यावर आगदी सहज छाप पाडणारा. त्यात आपल्या घार्‍या डोळ्यांनी तो पाहू लागला की समोरच्याची दांडी गुल होत असे. वसुधा म्हणजे त्याची बायको. शीडशीडीत बांध्याची, दुधी रंगाची, नाकी डोळी एवढी सुंदर की आता पंचेचाळीस वर्षे वय आहे हे सांगून सुद्धा कोणाला पटत नसे. त्यात तीचा आफाट ड्रेसिंग सेन्स, सहज वावर आणि स्पष्ट आणि सहज बोलण्याने ती समोरच्याला गप्प करुन टाकत असे. तीची बरीचशी कामं ही तिच्या नजरेनेच होत असत.
याच नजरेचा २७ वर्षांपूर्वी शिकार होवून राजेंद्रने तीला लग्नाची मागणी घातली होती. आगदी तिचं १८ पूर्ण झाले होते आणि राजेंद्रनं नुकतंच २२ वं पुर्ण केलं होतं. राजेंद्र सुखवस्तू कुटुंबातील होता आणि वसुधाला देखील तो आवडल्याने वसुधाच्या बाबांनी लगेच त्यांचे लग्न लावून दिले.
लग्नानंतर लगेच दोन वर्षांत चिन्मय झाला आणि मग त्यानंतर वसुधाने बॅन्केत नोकरी पकडली. आज ती स्वतः एका मल्टीनॅशनल बॅन्केत अंधेरीसारख्या ठिकाणी ब्रॅंच मॅनेजर आहे.
अंधेरीतच त्यांनी आधीच जागा घेऊन ठेवली असल्याने मोठा असा बंगला होता. एकुलता एक मुलगा चिन्मय इंजिनिअरिंगच्या शेवटच्या सेमीस्टरला आहे.
कालच्या राजेंद्रच्या तीला विसरुन येण्याच्या गोष्टीवरुन वसुधा अजूनही नाराज होती. तो तीला सॉरी म्हणून आज लवकर अॉफिसला निघाला होता. आज त्याचे सिंगापूर अॉफिसचे लोक येणार असल्याने तो बिझी असणार होता. उगाच त्याला कामात डिस्टर्ब नको म्हणून वसुधाने त्याला माफ करुन हसुन गुड बाय विश केलं आणि तीही तयारीला लागली.
साधारण १० वाजता वसुधा बॅन्केत एका महत्त्वाच्या क्लायंट समोर असताना राजेंद्रच्या पीए चा म्हणजेच अश्विनीचे फोनवर फोन येत होते. तिने I will call you back चा अॉटो रिप्लाय दिला. पण तरीही ती फोनवर करत राहिली म्हणजे काहीतरी अर्जंट काम असणार. तीने क्लायंटला थांबायला सांगून फोन घेतला
वसुधा – बोल अश्विनी
अश्विनी – मॅडम so sorry to disturb you, पण तसे अर्जंट काम आहे म्हणून फोन करावा लागला.
वसुधा – ते कळलंच मला. पण पटकन बोल माझी एक महत्त्वाची मिटिंग सुरू आहे.
अश्विनी – मॅडम सर कुठे आहेत?
वसुधा – कुठे म्हणजे? अगं आज तुमची महत्वाची मिटिंग आहे म्हणून तो लवकर गेला अॉफिस ला
अश्विनी – पण सर आलेच नाहीत अजून. म्हणून त्यांना फोन केला ते फोन उचलत नाहीत. घरी केला तर घरी कोणी उचलत नाही म्हणून तुम्हाला केला.
वसुधा – अगं घरी आता कोणी असणार? चिन्मय कॉलेजला गेला असणार. पण राजेंद्र कुठे गेला?
अश्विनी – तेच तर मी विचारते आहे.
वसुधा – अरे बाप रे. तो काही कुठल्या प्रॉब्लेम मधे तर नाही ना?
अश्विनी – मॅम तुम्ही काळजी करु नका. मी दोघांना पाठवले होते घरी चेक करायला. कळेलच लवकर. मी कळवते. You don’t worry. Ok?
आता नक्की काय झाले आहे हे कळायला हवे म्हणून वसुधाने मीटिंग तिच्या कलीगला कंटीन्यू करायला सांगून बाहेर पडली. तोच अंधेरी स्टेशन पोलीसांचा फोन आला. राजेंद्र तिथे आहे .  तिला ताबडतोब यायला सांगितले होते. तसाच फोन त्याच्या अॉफिसमधेही गेला होता. सगळे तिकडे पोहचल्यार कळले. राजेंद्र सिग्नलला कारमधे डोके धरून बसून होता. शेवटी पोलिसांनी त्याला स्टेशनला आणून बोलायचा प्रयत्न केला. त्याचे डोके दुखत असल्याचे आणि चक्कर करत असल्याचे सांगितले. म्हणून मग पोलीसांनी त्याच्या घरी आणि अॉफिस मधे कळवले.
सध्याचे राजेंद्रचे वागणे बघता वसुधाला रिस्क घ्यायची नव्हती. तिने ताबडतोब त्याला हॉस्पिटलला घेऊन गेली. बर्‍याच टेस्ट झाल्या. त्याच्या हल्लीच्या विसरण्याच्या सवयींबद्दल देखील वसुधाने आवर्जून सांगितले. ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल होते. बाकीचे रिपोर्ट्स एक दोन दिवसात येणार होते. राजेंद्र आता जरा नॉर्मल वाटत होता. वसुधा आणि राजेंद्र घरी आले. तिने त्याला थोडे खायला देवून, गोळ्या दिल्या आणि झोपवले.
आता पुढे काय वाढून ठेवले आहे याचा ती विचार करत होती. दोन दिवसात सगळे रिपोर्ट्स आले. रिपोर्ट्स आणायला ती एकटीच गेली.
डॉक्टर – हे बघा बाकी सगळे स्कॅन आणि रिपोर्ट्स छान आहेत
वसुधा – बाकी सगळे? म्हणजे कुठला तरी एक रिपोर्ट नॉर्मल नाही?
डॉक्टर – You got me right. हे बघा मी काही तुम्हाला अंधारात ठेवू इच्छित नाही.
वसुधा – माझेही तेच म्हणणे आहे. काय प्रोब्लेम आहे? काय झालंय त्याला?
डॉक्टर – मी स्पष्टच सांगतो. त्यांना डिमेंशीया आहे. लास्ट स्टेज.
वसुधा – काय? कसे शक्य आहे? तो तर आत्ता पण्णाशीत आहे.
डॉक्टर – हो पण ही फॅक्ट आहे. तो आता हळूहळू सगळे विसरत जाईल. आगदी आज काय जेवलो, नाश्ता केला का? काय खाल्लं? इनफॅक्ट काही काळाने तो तुम्हाला देखील विसरेल.
वसुधा – पण त्यावर काही उपचार? काही तरी असेलच ना?
डॉक्टर – दुर्दैवाने काही उपचार नाही.
वसुधा – म्हणजे त्याचं आयुष्य असं कोरं होत जाणार आणि आपण फक्त बघत रहायचं?
डॉक्टर – हो. दुसरे आपल्या हातात नाही.
डोके बधीर होवून वसुधा घरी आली. आता काय आणि कसे करायचे याचा ती विचार करत बसली. चिन्मय आणि ती दोन दिवस भरपुर रडले. दोन दिवसांनी तीने काही तरी ठरवले. चिन्मयला आता कॅम्पसमधे चांगला जॉब मिळाला होता. त्यात राजेंद्र आणि वसुधाची सेव्हिंग्ज भरपूर होती. त्यामुळे आर्थिक प्रश्न नव्हता.
आता जवळपास दोन वर्षे झाली होती. वसुधाने नोकरी सोडली. शक्य होईल तेवढी चिन्मय सुद्धा राजेंद्रला सांभाळायला मदत करत होता. पण आता एकटी वसुधा त्याला सांभाळू शकत नव्हती म्हणून मग तिने त्याला हॉस्पिटलाईज केला. आता तो त्याची सर्व ओळख विसरला. पण रोज सकाळी ९ चा नाष्टा आणि संध्याकाळी ५ चा चहा घ्यायला ती हॉस्पिटल मधे राजेंद्रकडे जात असे. या दोन वर्षांत ती एकदम थकून गेली पण तीने हिम्मत सोडली नव्हती. कधीतरी तो तीला ओळख दाखवेल या आशेवर ती एक एक दिवस पुढे ढकलत होती.
असेच काही महिने गेले आणि चिन्मयने त्याच्या कंपनीमधे एक मुलगी आवडली म्हणून सांगितले. तशी ती दोन तीनदा घरी येवून गेली होती. वसुधाला देखील ती पसंत होती. तिचे आई वडील दिल्लीला होते. लवकरच लग्नाच्या बोलणीसाठी येणार होते.
येत्या रविवारी ते सकाळी येणार होते. शनिवारी चिन्मय वसुधाला म्हणाला
चिन्मय – आई उद्या सकाळी ९.३० पर्यंत सायली आणि तिचे आई वडील येणार आहेत आपल्याकडे ब्रेकफास्टला.
वसुधा – अरे थोडे लेट यायला सांग. मी हॉस्पिटलला असेन ना.
चिन्मय – उद्या जावू नको ना आई प्लीज. संध्याकाळी जातेसच ना तू. तिच्या बाबांना परत दुपारी एक काम आहे.
वसुधा – हे बघ मी या दोन वेळा कायम पाळणार आणि हे तुला माहीत आहे ना. आणि तिच्या बाबांना सांग सांग तसे. किंवा त्यांना त्यांचे काम करुन मग या म्हणावं लंच करु हवे तर सोबत.
चिन्मय – अगं त्यांचे प्लॅनिंग झाले आहे.
वसुधा जरा चिडलीच – म्हणजे त्यांनी त्यांचे प्लॅनिंग केले आहे म्हणून मी माझे प्लॅनिंग चेंज करायचे?
चिन्मय – अगं पण त्यांना महत्त्वाची कामं आहेत.
वसुधा – म्हणजे माझे काम, माझ्या भावना महत्वाच्या नाहीत?
चिन्मय – तसे नव्हे… पण बाबा आता ओळखत पण नाही आपल्याला. एक दिवस नाही गेलीस तरी तो चिडणार नाहीये.
वसुधा – तो चिडणार नाही हे माहीती आहे पण मीच माझ्यावर चिडेन.
चिन्मय – अगं पण हा हट्ट का?
वसुधा – कारण मी त्याच्यासोबत २५ वर्षे संसार केला आहे. त्याने माझ्या बाबांना म्हणजे तुझ्या आजोबांना मला आगदी सुखात ठेवण्याचे, माझ्या प्रत्येक गोष्टीत साथ देण्याचे दिलेले प्रॉमीस तो या आजाराने ग्रस्त होण्यापर्यंत पाळत आला होता. थोडेथोडके वेळ नाही, तर सतत २५ वर्षे. माझ्यासाठी काय काय नाही केले? भरपुर प्रेम, माया, मला हवं ते दिलं. त्याच्या आयुष्यातील खुप चांगला वेळ दिला. ज्या माणसाने माझ्यासाठी एवढे केले त्याला मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवसातील काही वेळ पण द्यायचा नाही का?
चिन्मय – हो मान्य आहे आई. I respect your emotions. But you know what, he has forgotten you and me as well.
वसुधा – तो त्याच्या चॉईसने नाही विसरलाय आपल्याला. पण आपण त्याला विसरायचे की नाही हे आपल्या हातात आहे बाळा. मी रोज त्याला माझ्या हाताने नाष्टा वाढते उद्या जर मी नाही त्याला नाष्टा वाढायला गेले तरी त्याला काहीच फरक पडणार नाही पण मला खुप फरक पडेल. एक लक्षात ठेव त्याने आपल्याला भरभरून प्रेम दिले आहे. आता आपली वेळ आहे आणि अजून एक Though he has forgotten who I am but I haven’t and I will never forget who he is. And he will never be forgotten by me.
Image by Gordon Johnson from Pixabay 
Abhijit Inamdar

Abhijit Inamdar

लेखक परिचय : नाव- अभिजित अशोक इनामदार. सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी इंजिनिअरिंग केले असून एमबीए इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये केले आहे. नोकरीनिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरून झाल्यानंतर सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा आहे. काही नाट्यप्रयोग तर काही म्युझिकल शोज चे अँकरिंग केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते.

9 thoughts on “Forgotten

  • May 5, 2020 at 1:39 am
    Permalink

    खरंय… त्याला विसरून कसे चालेल?

    Reply
    • June 9, 2020 at 7:25 am
      Permalink

      Exactly. How he can be Forgotten. Thank you for comment!

      Reply
  • May 6, 2020 at 12:09 pm
    Permalink

    Bhavana Ani kartavya……ayushyat far mahatwachya

    Reply
    • June 9, 2020 at 7:26 am
      Permalink

      Kharech donhi mahatvache. Thank you for comment!

      Reply
  • May 17, 2020 at 1:37 am
    Permalink

    कर्तव्य पहिले…

    Reply
  • May 19, 2020 at 10:09 am
    Permalink

    खूप छान

    Reply
  • May 20, 2020 at 2:07 pm
    Permalink

    खूप छान कथा आहे.

    Reply
  • May 29, 2020 at 6:43 pm
    Permalink

    खुप सुंदर कथा

    Reply
  • July 2, 2020 at 5:09 pm
    Permalink

    सुंदर कथा

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!