रिले कथा- भेट- भाग २

भेट…… (दुसरी)

त्याला मेसेज केला पण ते पिंपळ पान तिला अस्वस्थ करत होतं. त्याला मेसेज पोहोचला का ते कळत नव्हतं…मोबाईल फ्लाईट मोडवर गेल्यामुळे पुढचा मेसेज आलाच नाही. लांब श्वास घेत तिने मोबाईल बाजुला ठेवला…

तसाही तिचा मेसेज त्याच्यापर्यंत हवा तेव्हा पोहोचलाच नव्हता…

…………………………………………………….

“वाह…क्या बात है…”सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवत दाद दिल्यावर तल्लीन झालेली ती एकदम भानावर आली. त्याची ही कविता पण काळजात रुतणारी…

तो स्पर्श तो सुगंध

पहिल्या सरींचा

तो हवाहवासा मृदगंध…

सोबतीला तु अन

तुझ्या सहवासाचा

मनमुराद आनंद…

नंदन कविता वाचत होता…तिला वाटत होते की तो एक एक शब्द तिच्याचसाठी गुंफत आहे. कविता वाचुन संपली तशी ती भानावर आली. त्याच्या डायरीतुन अलगत पडलेले पिंपळाचे पान वहीत ठेवत रोज एकदा नव्याने ती नोंदत होती. आजही त्याला पहाताच ते पिंपळपान डोळ्यासमोर तरळुन गेलं.

………………………………

“मँम डु यु वाँट काँफी?”एअर होस्टेसने दोनदा विचारले. स्वत:च्याच विचारात तिला काही ऐकु आले नाही.

मिलिंदने हात लावुन सांगितले,”तुला काँफी हवी आहे का विचारतेय”

तिने पटकन बाजुला तिला पहात,” साँरी, नो…”म्हणले.

“काय झालं…अस्वस्थ आहेस?” मिलिंदने विचारताच तिने नकार देत मान हलवली. तो फक्त हसला.

“खरं बोलता आलं असतं तर…कितीसं बरं झालं असतं…”ती स्वत:शीच वदली.

………………………………

“स्वत:शीच काय बडबडतेस…मला सांग…”त्याचा हट्ट….आपल्याला आलेले हसु…त्यामुळे त्याची झालेली चिडचिड…

“मी म्हणत होते की तु कविता कोणासाठी करतोस?” तिने हसत विचारले.

“ते पिंपळाच पान वेचणारया एका वेडीसाठी…”तो तिच्याकडे पहात म्हणाला.

आपली चोरी पकडली गेली ते समजुन गालावर चढलेली लाली सगळं बोलुन गेली. कधी शब्दांची गरजच पडली नाही. आजही ते आठवुन तिच्या चेहरयावर हसु उमटलं.

………………………………

“अडगळीत पडलेल्या पानावरची धुळ काढताना हळुच फुंकर मारावी व वारयाने ते पानच अलगद उडुन जावे…”भारतात लँन्ड झाल्यावर फोन स्विच आँन केल्यावर तिच्या मेसेजला त्याचा रिप्लाय आला होता.

“तुझी सवय बदलली नाही अजुनही…” म्हणत ती स्वत:शीच हसली.

बाजुला सगळीकडे नव्याने पहाताना बरेच बदल दिसत होते. आपल्यासारखं बरंच काही बदललं आज तो फिल नक्की येत होता. कधीतरी शांत असणारा काँलेजचा परिसर आज गर्दिने गजबजला होता. नव्याने आलेयं हया शहरात असं तिला वाटत होते.

तेवढ्यात तो नेहमीचा कट्टा समोरुन गेला. तिला एकदम ओळखीने खुणावुन गेला. तिने पटकन गाडी थांबवली व त्याला नजरकैद करायचा प्रयत्न केला.

“इथुन काही घ्यायचंय का?” मिलिंदने विचारले.

तशी ती कट्टयाकडे पहात भावुकपणे उत्तरली,”हो.. काही जुना हिशोब चुकता करायचा आहे…येईन सावकाशीने…”

त्याने ड्राईव्हरला खुण केली, गाडी मार्गी लागली.

———

त्याचा मेसेज,”आज भेटुयात…काँफी, तु अन मी… ”

तीच ओढ, तोच आवेग, तीच आतुरता आहे शिल्लक आपल्यात. तिच्यात असेल?

भेटीचा काही दुवा शिल्लक असेल का आता…

एफसी रोड गजबजलेला…वैशालीत नेहमीसारखी गर्दी…सापडेल का तिला आता हे नव्याने…मोबाईल चारचारदा चेक केला पण अजुन काही मेसेज दिसत नाहीये.

“बदलला नाहीस…वेळेपुर्वी आला आहेस नेहमीसारखा…”ती हसत त्याच्यासमोर अवतरली.

“तु पण कुठे सुधरलीस…नेहमीप्रमाणे उशीराच आलीस…”तो हसत म्हणाला. ती फक्त हसली.

“पण न येता आयुष्यभर वाट पहायला लावण्यापेक्षा उशीर परवडला…”हे बोलताना तिच्या डोळ्यात पहात तो म्हणाला.

तिने खाली मान घातली.

तो विषय बदलत,”काँफी अन मी, हे समीकरण तसंच आहे…तु जात येत आहेस…कधी कधीची सोबतीण…”

“हो…कायमची होता होता राहिले…ठरवुन टाकलं होत की आज नाही गेले तर कधीच शक्य होणार नाही. बँग पँक केली, घड्याळ घालताना डँडनी बसल्या जागेवरुन विचारले,”आता कुठे?” तीच पोलिसी नजर…

मी शांतपणे उत्तरले,”परिक्षा संपली…आता सगळे आपापल्या गावी जाणार…मैत्रिणी भेटतोय…”

त्यांना पटलं नसावं. तुझा विचार करत असावे. मी दुर्लक्ष करुन निघणार तेवढ्यात तुझा फोन खणखणला. नेमका त्यांनीच घेतला. तुला नको नको तो बोलले व मला आत नेऊन गादीवर टाकलं.

“पुन्हा भेटलीस तर याद राख…तिथेच गोळ्या घालेन…” तो पोलीसी खाक्या दाखवत दार ओढुन डँड निघुन गेले. मम्मा घाबरली बिचारी. डोळ्यातुन गंगा वहाण्याशिवाय काहीही हातात नव्हते. मम्माशी हट्ट केला,”एकदा शेवटचं भेटते ग…मग तुम्ही म्हणालं तसे वागेन…प्लीज…प्लीज…”

तिने तोंड फिरवत डोळ्यातले पाणी पुसले.

त्राण संपले, आपला शेवट दिसला…

मम्माच्या बीपीच्या गोळ्या खाल्ल्या…तुझ्या आठवणीत जग सोडल्याचा आनंद मिळाला…

दिसत होतास फक्त तुच…तुझा गरम श्वास, ओठांवर ओठ टेकत कवेत घेतलंस…माझी मी नाही राहिले…

“डाँक्टर काहीही करा पण वाचवा माझ्या मुलीला…”मम्मा अगतिकपणे म्हणत होती.

“घाबरण्यासारखं काही नाहीये… होईल बरी दोन दिवसात…ट्रिटमेंट सुरु आहे…”डाँक्टर म्हणत होते.

काहीच झालं नाही…वाचले होते…मनाने संपले तरी शरीराने नकार दिला…” हे सांगताना आत्ताही ती तशीच संपलेली दिसत होती.

तिला गच्च मिठीत घ्यावं वाटत होतं पण आता कुठलाच अधिकार शिल्लक नव्हता. तो अगतिक…

………………………………

“सर काँफी…”वेटरने कप पुढे सरकवला.

“मँडम काँफी…”म्हणत दुसरा कप तिच्या पुढ्यात ठेवला.

त्यानेच कप ठरवले कुणाला कुठले द्यायचे. ती स्वत:शीच हसली.

“असंच सहजपणे त्यांनी मिलिंदसमोर मला उभं केलं…त्यांनीच ठरवलं माझं आयुष्य..”ती कपकडे पहात म्हणाली.

तो फक्त हलकेच हसला.

विषय बदलत,”अजुनही काँफी तशीच आहे ना ?”त्याने विचारले.

“तुझ्यासारखी कडक…”तिचं नेहमीच वाक्य. दोघेही हसली.

“काँफी घेताना माझी आठवण काढतोस कधी?”तिने हातातल्या कपाशी चाळा करत विचारले.

त्याने मानेने नकार दिला. त्याच्या नकाराने फितुर डोळ्यांना दाटुन आलं.

“काँफी घेताना त्रास होतो आठवणींचा…म्हणुन काँफी पिणे सोडुन दिलं…”तो म्हणाला.

तिने फक्त मान हलवली.

“पण त्याचा फायदा झाला नाही…काय काय सोडणार ना? सगळ्यात तु होतीस…”हे बोलताना त्याने तिची नजर टाळली.

………………………………

“आज बाहेर जाऊन आलीस? काही खास…”मिलिंदने टायची नाँट मोकळी करत विचारले.

तिने काहीच उत्तर दिले नाही. तो नाही चिडणार, तिला माहिती होतं. तो शांतपणे बाथरुममधे गेला. शाँवरचे पाणी उडल्याचा आवाज ऐकुन तिने दार ओढलं व ती किचन मधे आली.

त्याचा शांतपणा तिला ठाऊक होता. तो केस पुसत बाहेर आला. तिने आल्याचा वाफाळलेला चहाचा कप समोर केला.

त्याने गरम गरम चहाचा पहिला घोट घेतला,”मस्तच…तुझ्या हातच्या चहाला कोणी चँलेंज देऊ शकत नाही…”

ती फक्त हसली. कपातुन वाफा निघत होत्या.

“आज नंदनला भेटुन आले…”तिने इतका वेळ दाबुन ठेवलेले सांगुन टाकले.

त्याने अगदी कोरया नजरेने विचारले,”नंदन ?”

लांबसडक मोकळ्या केसांशी चाळा करत ती म्हणाली,”तो माझा क्लासमेट, आपल्याला एअरपोर्टवर भेटलेला…”

त्याला नंदन आठवला. त्याने अच्छा म्हणत न्युजपेपरमधे मान खुपसली.

तिला जरा मोकळं वाटत होतं.

सांगुन टाकलं आजच्या भेटीविषयी…

कुठेतरी गिल्ट होता मनात…पण त्याला फरक पडला नाही.

………………………………

“भेट तुझी न माझी

नव्याने पुन्हा घडली…

न विसरलेल्या क्षणांची

आठवण दाटुन आली…”

त्याचा मेसेज पाँप अप झाला.

तो कट्टा बदलला तरी जुने बंध धरुन होता. काँफीचा कप बदलला तरी सोबतीचा आस्वाद तोच होता.

“मन माझे ओळखावेस

अन गुंफावेस शब्दात…

इतकेच तुझे माझे

नाते बाकी आयुष्यात….”

कितीतरी दिवसांनी चार ओळी लिहुन तिने एक लांब श्वास सोडला. बाहेर आकाशात ढगांची दाटी तिला येणारया वादळाची चाहुल देत होत्या….

– क्रमश:

Image by mohamed Hassan from Pixabay 

rudrawar praajaktaaa

rudrawar praajaktaaa

प्राजक्ता राहुल रुद्रवार उद्योजिक, शिक्षिका, समाजसेविका, ब्लाँगर, कंटेन्ट राईटर...सकारात्मकता व आयुष्य यांची सांगड घालताना लाभलेलं हे हळवं मन जपत मनातले भाव लेखणीच्या साथीने तुमच्यापर्यंत पोहचवावं हाच एक धागा पुरेल आपल्या ओळखीला.

9 thoughts on “रिले कथा- भेट- भाग २

  • June 2, 2020 at 5:25 am
    Permalink

    कथेची कल्पना खूप छान. छोट्या पण अर्थपूर्ण कविता . मेम्बरशीप घेतल्याचे खूप खूप समाधान वाटते.

    Reply
    • June 2, 2020 at 9:47 am
      Permalink

      मन:पुर्वक धन्यवाद…खुप छान वाटलं कमेंट वाचुन…

      Reply
      • June 2, 2020 at 1:45 pm
        Permalink

        हळवी सुरेख कथा …. मस्त 👌👌

        Reply
        • June 2, 2020 at 1:48 pm
          Permalink

          मन:पुर्वक धन्यवाद….

          Reply
        • June 7, 2020 at 5:09 pm
          Permalink

          शैली वेधक आहे. वाचून पूर्ण केल्याशिवाय रहावत नाही.

          Reply
          • June 8, 2020 at 2:59 pm
            Permalink

            Thank you so much

    • June 13, 2020 at 7:36 pm
      Permalink

      गुड एक्सटेंशन … 👌👌👌

      Reply
  • June 2, 2020 at 4:33 pm
    Permalink

    छान आहे कथेची कल्पना …..हलकी फुलकी….परंतु उंबरठा कथेच्या पुढील भागांची उत्सुकता पण वाढली आहे ….कधी येणार पुढील भाग ?

    Reply
    • June 3, 2020 at 6:17 pm
      Permalink

      हो हो….उद्याच येईल उंबरठा भाग ११…मन:पुर्वक धन्यवाद…

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!