रिले कथा- तुम जो मिल गये हो… भाग ४
दिवस ४० पासून पुढे
एकीकडे दाराची बेल आणि एकीकडे फोनची रिंग. फोन राजनचा. इतके दिवस ज्याचीशी बोलायला आतुर होते त्याचा. फोन घेतला तर बोलाव लागेल आणि आशिष आत आल्यावर बोलता येणार नाही. फोन घेतला नाही आणि दार उघडल तर परत कधी राजन शी बोलता येईल हे माहित नाहीये. मला काय कराव सुचत नव्हत. दोन्ही आवाज जोरात येत होते. काय झाल माहित नाही. पण मी फोन सायलेंट केला आणि जाऊन दार उघडलं. दारात आशिष होता. हातात सामानाच्या जड पिशव्या. लिफ्ट बंद होती म्हणून चार माजले चढून आला होता. घामाघूम झाला होता. मी पुढे होऊन त्याच्या हातातल्या bags घेतल्या. आशिष आत येऊन सोफ्यावर बसला. मी म्हणाले-
मी- नेमकी लिफ्ट बंद झाली का?
आशिष- हो. पण एका अर्थाने चांगल आहे. व्यायाम झाला.
मी- घरी योगा करतोस तो पुरेसा नाहीये का की हा जबरदस्तीचा व्यायाम आवडतोय तुला?
आशिष- व्यायाम व्यायाम असतो. ते सोड. ती निळी पिशवी आण इथे.
मी- का?
आशिष- आण तर.
मी ती पिशवी त्याला आणून दिली.
आशिष- त्यात ती फाईल आहे ती काढ.
मी- काय आहे त्यात?
मी ती फाईल बाहेर काढली.
आशिष- उघड आणि बघ.
मी फाईल बघू लागले. आशिष बोलू लागला-
आशिष- हे बघ ह्यात माझी सर्व बँक डीटेल्स आहेत. आजच माझ्या सर्व बँक खात्यात तुझं नाव add केलय. Lock down सुरु व्हायच्या आधी फॉर्म भरले होते आठवतात का?
मला खर तर तेव्हाच काहीच आठवत नाहीये. मी त्यावेळी पूर्णपणे राजनच्या आठवणीत असे. आशिष सांगेल त्यावर सह्या केल्या होत्या. तसही माझ अस काही नव्हतंच जे आशिष सह्या करून हिरावून घेऊ शकत होता. इथे आशिष बोलत होता.
आशिष- ही फाईल जपून ठेव. ह्यात माझ्या लाईफ इंश्युरंस पोलिसी मध्ये तुझ नोमिनेशन केल्याचे पेपर्स पण आहेत.
मी- अरे पण….
आशिष- पण काय? आता तू माझी अर्धांगिनी आहेस मग माझ्या सगळ्यावर तुझा अर्धा हक्क नाहीये का? आणि उद्या घरातून बाहेर पडल्यावर मला काही झाल ह्या करोनामुळे तर माझ्या इंश्युरंस चे पैसे तुला मिळतील. आणि आज मुद्दाम हे करायचं कारण म्हणजे आज आपल्या लग्नाचा तारखेने वाढदिवस आहे. आज आपल्या लग्नाला आठ महिने पूर्ण झालेत.
हे माझ्या लक्षातच आल नव्हत. आशिष उठला आणि त्याने त्या पिशवीतून पानात बांधलेला एक गजरा बाहेर काढला आणि माझ्या ओंजळीत देत म्हणाला-
आशिष- दागिन्यांची दुकान बंद आहेत अजूनही. एक गजरावाली दिसली म्हणून हेच गिफ्ट आणू शकलो लग्नाच्या वाढदिवसाच. घे.
मी त्या बकुळीच्या गजर्याचा वास घेतला. खूप प्रसन्न वाटलं. अगदी आशिषचा चेहरा पाहिल्यावर वाटत असे तस. आशिषचा चेहरा पाहून मला प्रसन्न वाटतं? कधीपासून? मी माझ्याच विचारांनी चकित झाले. इतक्यात परत फोन वाजला. फोनवर राजश्री अस नाव दिसलं. मी राजनचा नंबर राजश्री म्हणून सेव्ह केला होता. आशिष ने माझा फोन उचलला. नाव पाहिलं आणि फोन मला देत म्हणाला-
आशिष- राजश्रीचा फोन आहे. तू बोल मी आज anniversary special शिरा करतो.
आशिष आत गेला. मी हळूच हेलो म्हणाले.
राजन- अग काय? किती फोन केले मी? घेत का नाहीयेस?
मी- जरा कामात होते.
राजन- अस काय काम की माझा फोन पण घेतला नाहीस?
मी- म…मी जरा आशिष शी बोलत होते.
राजन- त्या चुत्याशी काय बोलायचं? जबरदस्तीने गळ्यात बांधला आहे ना तुझ्या? मग फाट्यावर मार. हे असे नोकरीवाले पुचाट लोक असेच असतात.
मला राजन ने आशिषला अस काही म्हणण का कुणास ठावूक खटकल.
मी- प्लीज. तू असलं काही बोलू नको. मी नंतर करू का फोन?
आशिष आतच होता. त्याला ऐकू जाईल अशी भीती मला होती.
राजन- अरे वा. मी इतक्या दिवसांनी फोन केला तर नंतर बोलू का? माझी काही किंमत नाहीये का?
मी- (वैतागून) मी नंतर करते फोन.
राजन- नाही. फोन कट नको करु. मी काय रस्त्यावर पडलेला वाटलो का तुला?
इतक्यात आशिष बाहेर आला आणि मला म्हणाला-
आशिष- ए ऐक ना. रवा भाजून घेतल्यावर पाणी घालायचं ना? रवा खरपूस व्हायला हवा ना?
मी- (घाबरून) हम्म…हो…
आशिष- thanks.
आशिष आत परत गेला. राजन फोनवर म्हणाला-
राजन- तुझा नवरा घरात स्वयंपाक करतो? (जोरात हसला) कसला चम्या शोधला आहे यार आई बाबांनी तुझ्यासाठी.
मी- (आता चिडून) बाय….
राजन- बर ऐक ना. माझ्या मित्राची cab आहे. lock down संपला की मी पाठवतो तुला पिकप करायला. त्या चम्याच्या घरातून मिळेल ते घेऊन निघ. Cab च ठरलं की तुला कळवतो.
मी काहीच बोलले नाही.
राजन- बर ऐक ना. मला पाच हजार ट्रान्स्फर कर लगेच. जाम कडकी आहे.
मी काही न बोलता फोन कट केला.
त्या रात्री मी मध्ये मोबाईल वर सिनेमा बघत बेडवर पडले होते. शेजारी आशिष ने दिलेला गजरा होता. बकुळीचा वास रूम मध्ये पसरला होता. आशिष आला. माझ्या शेजारी पडला. तो पण त्याच्या फोन मधले मेसेज बघत होता. सकाळच्या कॉल नंतर राजन ने मला पैसे ट्रान्स्फर करायचे अनेक मेसेज केले होते. मला त्याला पैसे पाठवायची इच्छा होत नव्हती. अस काय झाल होत गेल्या काही दिवसात? माझ मलाच कळत नव्हत. काय झाल माहित नाही. मी फोन बंद केला आणि आशिषच्या अंगावर हात टाकून डोळे मिटले. खूप शांत वाटलं. लगेच झोप लागली. आशिष माझ्या डोक्यावर हात फिरवत होता.
त्या नंतर राजन ने फोन केले. पण मी त्याचे फोन घेतले नाही. मला ते घ्यावे अस वाटत नव्हत. मला काय होत होत तेच कळत नव्हत. पुढे महिन्याभरात lock down संपला. म्हणजे unlock सुरु झाला. लोक हळू हळू घरातून बाहेर पडू लागले होते. आशिष देखील त्या रात्री थोडा टेन्स होता. उद्यापासून त्याला ऑफिसला जायचं होत. रात्री बेडवर पडल्यावर तो मला म्हणाला-
आशिष- ऐक, उद्यापासून मला ऑफिसला जाव लागणार आहे.
मी-हम्म..काळजी घे.
आशिष- काळजी मला वाटते तुझी. तू कुठेही बाहेर जाऊ नको. जे काही समान हव असेल ते मी ऑफिस मधून येताना आणत जाईन. पण तू बाहेर पडू नको. ओके?
मी- हम्म…
आशिष- काळजी घे स्वतःची. माझ्यासाठी तू सर्वस्व आहेस. तुला काही झाल तर मला जगायची इच्छा राहणार नाही ओके?
आशिष माझ्यावर इतक प्रेम करतो? का? आणि मी? मी पण? …पण राजन? तो उद्या येणार आहे. उद्या आम्ही एकत्र मुंबईला जाणार आहोत. जाताना सगळे दागिने घेऊन जाणार आहे मी आणि आशिषच्या खात्यातले पैसे पण राजांच्या खात्यात टाकणार आहे मी. हे ठरलय. माझ्या मनात हे वादळ सुरु असताना आशिष शांत झोपला देखील.
दुसर्या दिवशी आशिष ऑफिसला गेला. माझ्या मनात चलबिचल सुरु होती. इतक्यात राजनचा फोन आला.
मी- बोल…
राजन- मी आलोय. राजेंद्र नगर मध्ये आहे. टिळकांच्या पुतळ्याजवळ. एका दिग्दर्शकाला भेटणार आहे. ती मिटिंग झाली की निघू. तू निघ आता.
मी- ब…बर….
मी फोन कट केला. दागिन्यांची पिशवी घेतली. मी तयार होऊन बसले होते. राजनच्या फोनची वाट बघत होते. मनात का कुणास ठावून खूप चलबिचल होती. लॉक डाऊन काळात मला कळलेला आशिष आणि लग्न करताना माझ्या गळ्यात बांधला अस समाजात मला वाटत असलेला आशिष दोघे वेगळे होते. मुळात त्याची काय चूक होती ह्यात? माझ आणि राजनच प्रकरण होत तर ते मी घरी सांगायला हव होत. तेव्हाच राजन बरोबर पळून जायला हव होत. पण तेव्हा तर राजन म्हणाला होता की तो सेटल नाहीये. माझी जबादारी घेऊ शकणार नाही. मग ह्या आठ महिन्यात तो सेटल झाला होता? तस असेल तर माझ्याकडे पैसे का मागत होता? मला सगळे दागिने घेऊन ये अस का सांगत होता. आशिषचे पैसे का हवे होते त्याला? कि त्याला पैसेच हवे होते? हा विचार मनात आला आणि मी हादरले.
मग राजन बरोबर व्यतीत केलेले क्षण, त्या रात्री, बेड मध्ये पawesome असलेला राजन आठवू लागले. मग मग परत एकदा बेड मधला राजन आणि बेड मधला आशिष ह्यांची तुलना करून राजनला झुकत माप देऊ लागलं. राजनच देखील माझ्यावर प्रेम आहे हे सांगू लागल. पण प्रेम तर आशिषच देखील होत ना? आणि प्रेम म्हणजे जर समर्पण आहे तर ते आशिष करत होता. राजन नाही. आणि ते देखील आशिष वर मी प्रेम करत नसताना देखील आणि बेड मधलं म्हणाल तर राजनच्या बाबतीत माझ जे समर्पण असे ते आशिषच्या बाबतीत कधीच नव्हत. आशिष बरोबर बेड म्हणजे माझ्यासाठी फक्त एक formality होती बायको म्हणून उरकून टाकायची. मग आशिष बेड मध्ये कमी आहे हे म्हणायचं मला हक्क होता का? आशी जीव ओवाळून टाकत असताना राजन फक्त ओरबाडत होता का? बर राजन तसा नाहीये. पण त्याची परिस्थिती त्याला हे करायला लावते आहे. मग मी त्या परिस्थितीचा हिस्सा बनाव का? राजन की आशिष असं एक विचित्र द्वंद्व माझ्या मनात सुरु असताना अचानक आशिष घरी आला. त्याला आलेला बघून मी प्रचंड घाबरले.
मी- तू? तू अचानक आत्ता कसा काय आलास?
आशिष- जरा कणकण आहे आणि घसा पण दुखतोय. चक्कर आल्यासारखं वाटतंय. म्हणून आलो.
हे बोलून आशिष आत जाऊन तापाची गोळी खाऊन झोपला. माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली. कदाचित आशिषला कोरोन बाधा झाली असेल का? ह्या विचाराने मी हादरले आणि फोन वाजला. फोन राजनचा होता. मला कळत नव्हत फोन घ्यावा की न घ्यावा. घेतला तर काय बोलाव. आशिषला ह्या स्थितीत सोडून जाव का? डोक्यात प्रचंड गोंधळ होता.
माझ्या पायाखालून जमीन सरकली होती. काय कराव सुचत नव्हत. अचानक खूप रडू येऊ लागल. गेले तीन महिने माझ्यासाठी खपणारा, माझ्यावर खूप प्रेम करणारा आशिष आठवून खूप गिल्टी वाटू लागल.
मी उठून देवासमोर दिवा लावला आणि आशिष साठी प्रार्थना करू लागले. त्याची टेस्ट negative येऊ दे ह्याची याचना करू लागले. आता राजन सतत फोन करत होता. पण मी देवासमोर होते. मी फोन घेतले नाही. मी कित्येक तास तशीच बसून होते. देवाकडे आशिषच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात पूर्ण हरवून गेले होते. रात्री अकराचा सुमार असेल. माझ्या खांद्यावर एका हाताचा स्पर्श झाला. मी वळून पाहिलं तर आशिष हसत उभा होता.
आशिष- ताप गेलाय माझा आणि तो काढा प्यायल्याने घसाही बरा आहे.
मी अविश्वासाने उभी राहून त्याच्या कपाळाला आणि गळ्याला स्पर्श करून खात्री करून घेतली. ताप नव्हता. काय झाल कुणास ठावूक मी आशिषला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकले. ती रात्र अविस्मरणीय होती. त्या रात्रीचा आशिष awesome पेक्षाही कित्येक पट awesome होता. सकाळी दोघे उशिरा उठलो. आज मला खूप मोकळ आणि पवित्र वाटत होत. आशिष चहा पीत पेपर वाचत होता. अचानक म्हणाला-
आशिष- ए अनिता [परत ताप आल्यासारखं वाटतंय.
हे ऐकून मी घाबरले आणि म्हणाले-
मी- आशिष खरंच का?
आशिष- (हसून) काल रात्रीसारखा जालीम उपाय करणार असशील तर रोज ताप आणेन मी.
मी उठून त्याच्या मांडीवर जाऊन बसले आणि म्हणाले-
मी- काल रात्रीसारखा awesome असणार असशील तर मला साधा ताप काय कोरोन झालेला तू देखील चालशील. आता जे करू ते एकत्रच.
आशिष ने मला त्याच्या मिठीत घेतली. मी सकाळीच सीम कार्ड फेकून दिल्याने माझ्या मानासारखाच हलका झालेला माझा मोबाईल आज शांत होता. रेडीओ वर गाण सुरु होत “तुम जो मिल गये हो, तो ये लागता है, के जहां मिल गया”…
समाप्त
Image by mohamed Hassan from Pixabay
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
👌👌
झकास शेवट
Mastt
Jhakas
मस्तच
वाह