“प्यासा सावन” मोडलेला श्रावणी सोमवार- (लेखन- पूजा पाठक)

पाऊस नुसता कोसळतोय. ही  तिसरी कॉफी आहे माझी. कॉफीनेही न उतरणारी हि जहरी ग्लानी .. म्हणूनच मी काल सोबत यायला नको म्हणत होते!

खरंतर वेगळं राहायचा निर्णय आपण नीट समजून उमजून घेतलेला. पण सोनूच्या गॅदरिंग च निमित्त झालं एकत्र यायला. त्यातून तिने तिथेच तुझ्याकडे राहण्याचा हट्ट धरला आणि मग तिचं सामान न्यायला आणि मला सोडायला तू घरी आलास. आईंसोबत सोनू झोपलीही होती तेव्हा.

जेव्हा तुझ्याकडून निघताना आपण गाडीत बसलो तेव्हाच असं वाटत होतं उतरून पळत सुटावं. आपल्याला सगळं माहित असत. आपण सगळ्यांना ओळखत असतो. कधी काय होईल , कोण कसं वागेल, सगळं च. पण मान्य करत नाही.

तसंच झालं काल.

गाडीत बसल्यावर तुझा परफ्युम अगदी स्ट्रॉन्गली जाणवला. उगाच. मग माझ्या बिल्डिंग च्या पार्किंग पासून घरी येईपर्यंत आलेल्या जोरदार सरीने आपल्याला भिजवून टाकलं. खरंतर कुठेतरी आडोसा घेणं आपल्याला सहज शक्य होतं पण नाही! आपल्याला तो घ्यायचाच नव्हता.

पाऊस  .. आणि त्यात भिजलेली , अंगाला चिकटलेली साडी. त्या क्षणी खरंतर किंचित ऑकवर्ड वाटत होतं. होतं ना असं .. एकमेकांच्या शरीराची सवय सुटल्यावर. आणि तेव्हा तर नक्कीच जेव्हा एकमेकांच्या सगळ्या सवयी, नजरा , आणि लकबी तुमच्या ओळखीच्या असतात.

घरी आलो आणि लाईट गेले. आता माझाच संयम सुटायला लागला होता खरंतर. पण तू बधला नव्हतास हे विशेष ! एखाद्या सज्जन माणसासारखा माझ्यापासून दूर उभा राहत इकडे तिकडे बघत बसला होतास. कसं सांगणार होते मी तुला कि बघ माझ्याकडे .. आधी बघत होतास तसं .. तेच हवय मला पण सांगता येत नाहीये .. आयुष्यात बऱ्याच गोष्टी सांगता येत नाहीत ना, अगदी तसंच ..

 असं म्हणतात कि फार फार मनापासून बोललेली किंवा चिंतलेली गोष्ट खरी होते .. तुझं अचानक च लक्ष गेलं माझ्याकडे. हो, अचानक होतं ते. तुझ्या डोळ्यात दिसलं ते मला. माझ्या डोळ्यातलं आव्हान तुला समजलं पण तू तसाच उभा होतास काठाशी.. तोल राखून ..

मला एकदम आठवलं .. आपण एकदा फिरायला गेलो होतो टेकडी वर. गम्मत म्हणजे तेव्हा तू मला नुकतंच किस करायला शिकवलं होतंस. मला गप्पी मासा म्हणायचास तू. but you were amazing kisser ! एकदा असंच एका झाडाखाली बसलेलो असताना मला म्हणाला होतास तू .. “अजिबात बधणार नाहीये मी .. अजिबात किस करणार नाहीये तुला .. हि जागा योग्य नाही यासाठी .. अजून कितीही तहानलेल्या नजरेने बघितलंस तरीही .. “

सोनू च सामान काढताना मी उगाच वेळकाढूपणा करत होते. आणि मग उगाच कपाटाच्या वरच्या कप्प्यातून हेच दे तेच दे असं काहीतरी करत मी उगाच स्टूल वर चढले. मला माहित होतं मी स्टूल वर चढले कि तू जवळ येणार च. उगाच पडले वगैरे तर ? आणि तू आलास च.

जेव्हा मी खाली उतरत होते ना .. तुझ्या हातांचा बांध केला होतास तू माझ्याभोवती .. मला थोडाही स्पर्श न करता .. आणि मग मात्र मला सगळं च अनावर झालं..

माझा एकच थरथरता स्पर्श .. तुझ्या चेहऱ्याला झालेला .. सगळी तपश्चर्या तोडायला तो पुरे होता ..

त्यानंतर चे काही तास .. मला खरंच काही आठवत नाही ..

तुला आठवतंय ? आपण अनाहत बघितला तेव्हा तुला आवडला होता आणि मला मात्र फारच विचित्र वाटलं होतं. काल मला शिलवती खरोखर समजली!

 सकाळी नेहमीप्रमाणे आवरून तू घरी गेलास आणि मला आपल्यातलं एक वेगळं च नातं समजलं.

We are so bloody sexually compatible!

इतकं कि या सुंदर वळणावर कोणालाही काहीही गिरवू देणं आपल्या दोघांनाही कधीच शक्य होणार नाही. कधीच नाही.

आणि हो .. हा  उपास मोडलेला श्रावणी सोमवार माझ्या कायम लक्षात राहील !

©पूजा खाडे पाठक

Image by kalhh from Pixabay 

Pooja Pathak
Latest posts by Pooja Pathak (see all)

Pooja Pathak

कम्प्युटर इंजिनियर, सध्या ह्युमन रिसोर्स विभागात कार्यरत. वाचनाची आणि लिखाणाची प्रचंड आवड. इतरही बरेच छंद - गायन, चित्रकला, मिमिक्री, स्केचिंग. क्रिएटिव्हिटी ला वाव असणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. पेनपूजा हे स्वतः साजे लिखाण असणारे फेसबुक पेज Oct 2018 पासून चालवत आहे.

10 thoughts on ““प्यासा सावन” मोडलेला श्रावणी सोमवार- (लेखन- पूजा पाठक)

  • August 15, 2020 at 3:57 am
    Permalink

    लै भारी पूजा👌 असं लिहायला skill लागतं.😊

    Reply
    • August 15, 2020 at 10:33 am
      Permalink

      Awsomm पूजा जी… what a stunning pendown… a big fat fan 👌👌👌

      Reply
  • August 15, 2020 at 8:37 am
    Permalink

    अफलातून

    Reply
  • August 15, 2020 at 10:00 am
    Permalink

    Kammal lihilay…shevatche vakya tar khup kahi sangun jatau, janeev deun jatay.

    Reply
  • August 26, 2020 at 4:20 pm
    Permalink

    Mast 👍🏻👍🏻

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!