“प्यासा सावन” क्षण सौख्याचे- (लेखन- महेश काळे)

     “विक्रम, साल्या तू तर इतकी वर्षं बाहेर होतास, यु एस मध्ये. भरपूर पैसा कमावला असशील. यु एस म्हणजे फुल टू फ्रीडम ना?सॉलिड मजा मारली असशील. वन नाईट स्टँड सारख्या गोष्टी तर किरकोळ असतील ना तिकडं. क्यू मेरे दोस्त बदन की प्यास तो जरूर बुझायी होगी. जरा आम्हाला पण सांगा तिकडच्या किस चे किस्से.”

   “अम्या, खरं सांगू का मजा आहे रे तिकडे नो डाउट. पण सगळ्याचा अतिरेक आहे रे तिकडे. तो स्वैराचार,त्या पार्ट्या,ते लाऊड म्युझिक नको नको व्हायचं सगळं. सुरुवातीला छान वाटतं सगळं. चान्स आला होता बरं का एकदा वन नाईट स्टँडचा. पण का कुणास ठाऊक माझं मन धजावलं नाही.”

” क्या यार थोडा बहुत एक्सपिरिअन्स तो मंगता है ना बॉस.” “कशाला पाहिजे एक्सपिरिअन्स च्या मारी अगोदरच्या पिढीत  कुठे होते असले प्रकार ?”

     “रोमान्स-प्रणय ह्या गोष्टी हळूहळू खुलायला हव्यात. एकेक पाकळी उमलल्यासारख्या. त्यात उत्सुकता हवी. थोडा धीरही हवा. तर मग उत्कटता येते प्रणयात.”

“तू काय बोलतोयस तुझं तुलाच माहिती. आपला एकच फंडाय, मिळाला चान्स तर मजा करुन घ्यायची”.

   अम्या, बरं ऐक, मागच्याच आठवड्यात एक स्थळ बघितलंय, इकडं आल्यावर. जाम आवडली ती आपल्याला. साडीत काय भारी दिसत होती सांगू

  मग पुढं काय? होकार कळवला का?

प्रश्नच नाही बॉस.

नाव काय ?

आश्लेषा.

    दोन्हीकडची पसंतापसंती झाली. थाटात लग्न पार पडलं. लग्नाच्या दिवशी रात्री नाही म्हटलं तरी आश्लेषा थोडी बावरलेलीच. बघण्याच्या कार्यक्रमानंतर तसं महिनाभरातच लग्न पार पडलेलं. स्वभाव दोघांनाही आवडलेला एकमेकांचा .पण थोडीशी धास्ती असतेच की दोघांच्याही मनात. महिनाभरातली घाई,धावपळ आणि आजचा हा लग्नाचा गडबडीचा दिवस त्यामुळे ती जाम दमलेलीच. आजच्या रात्रीचं थोडं टेन्शनच आलेलं तिला. विक्रम रूममध्ये आला. बेडवर येताच त्यानं तिचा हात हातात घेतला. तिला हायसं वाटलं. त्यानं तिचं डोकं त्याच्या छातीपाशी घेतलं. ती रिलॅक्स झाली .त्यानं शांतपणे तिला सांगितलं,” मला समजतंय आश्लेषा, खूप दमली असशील ना आज तू.

असा घाईघाईत मधुचंद्र साजरा नाही करायचा आपल्याला”

आशु लाजून  चुर्र झाली.

    आश्लेषालाही खूप छान वाटलं असा समजूतदार, हळवा, आपल्या मनातलं जाणणारा नवरा मिळाल्यानं.

 ती सुखावली. असंही काही मैत्रिणींनी त्यांचे किस्से सांगून जरा घाबरवलेलंच तिला. पण विक्रमच्या या प्रेमळ वागण्याने तिच्या मनावरचं सर्व दडपण दूर झालं. शेवटी नातं खुलायचं असेल तर दोघांनी एकमेकांना समजून घेणं आलंच.

   दोन तीन दिवसात इतर छोटे मोठे कार्यक्रम पार पडले. पाहुण्यांच्या वर्दळीमुळे टेक्स्ट मेसेजेस द्वारेच दोघांचं बोलणं चालू होतं कारण नातेवाईकांची ती लाडिक चेष्टा, त्यांचं ते चिडवणं त्यामुळे आश्लेषा लाजून जायची. विक्रमला तिचं हे लाजणं जाम आवडलेलं. तिच्या लाजण्यात, तिच्या इश्श्य मध्ये एक वेगळीच नजाकत होती.

  आणि आज ती रात्र जवळ आलेली ,ज्या क्षणांची ते दोघे आतुरतेने वाट पाहत होते. खरंतर आज सकाळीच त्यानं तिला बाल्कनीत जवळ बोलवून गिफ्ट दिलेलं.

   आशुनं गिफ्टचा बॉक्स खोलायला सुरूवात केली.

“अं हं ! आत्ता नाही एकटी असताना खोल तो बॉक्स”. विक्रम म्हणाला.

आशु उत्सुकतेनं धावत पळत रूमकडे आली आणि तिनं बॉक्स खोलला.

 बॉक्स मध्ये मस्त येलो कलरची साडी,नथ, छानसे इअर रिंग्स, आकर्षक नेकलेस आणि आणखीन काही दागिने होते. तिनं ती साडी  खांद्यावर लपेटून घेतली आणि स्वतःशीस हसली. आजच्या रात्रीची तिची ओढ आणखीनच वाढली.

    आश्लेषानं, विक्रमनं गिफ्ट दिलेली साडी रात्री परिधान केली. आणि साजशृंगार करून तिनं बेडरूमचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. बेडवरही वेगवेगळ्या फुलांचा सडा पडला होता. त्यांच्या त्या मिश्र सुगंधाने खोली दरवळली होती. मेणबत्तीच्या त्या इवल्याश्या प्रकाशात त्या गहिऱ्या रात्रीची स्वप्ने हरखून गेली होती. अगदी नसानसात रोमॅन्टिसिझम भिनावा तसं त्या खोलीतील वातावरणही उत्तेजित झालं होतं.

   आश्लेषानं आत येताच विक्रम जागेवरून उठला. तो तिला नखशिखांत न्याहाळू लागला. मेणबत्त्यांच्या त्या मिणमिणत्या प्रकाशात तिची ती सतेज कांती आणखीनच खुलून दिसत होती. त्याला जसं पाहिजे अगदी तशीच ती तयार होऊन आली होती. अगदी खजुराहोतल्या एखाद्या लोभस, कामुक आणि मादक शिल्पासारखी. कितीही पाहिलं तरी समाधान न होणारी. अगदी जन्मभर पाहत राहावी अशी. तिच्या त्या अतीवसुंदर, आकर्षक कायेचा अंगावरच्या दागिन्यांनाही जणू हेवा वाटत होता. विक्रमने अलगदपणे तिचे ते लांब काळेभोर केस मोकळे केले आणि मागूनच तिच्या कमरेभोवती विळखा घातला. दोघंही एकमेकांच्या स्पर्शाने रोमांचित झाले,उत्तेजित झाले. त्याने तिचे केस हळुवारपणे तिच्या खांद्यावर पुढे घेतले. तिची मान थोडीशी मागे घेऊन तिच्या ओठांचे चुंबन घेतले. दोघांचीही अवस्था अगदी “कांटा लगा… हाय लगा” अशी झाली.

   साडीतून तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं होतं. तिच्या त्या नाजूक, मनमोहक कायेला एक प्रकारची उभारी आलेली. तिच्या मेहंदीचा तो रंग एका वेगळ्याच रंगात रंगून गेलेला. तिच्या हातांचा कोमल स्पर्श, तिच्या बांगड्यांची किणकिण, तिची उघडी कंबर. श्वासागणिक वरखाली होणारे तिचे उरोज. सगळं सगळं अगदी कातिलाना इश्क सारखं भासत होतं त्याला.

     दोघंही एकमेकांचया मिठीत विरघळून गेलेले. तिचीही अवस्था वेगळी नव्हती. अगदी स्वप्नातला राजकुमारच मिळालेला तिला. त्याच्या पुरुषी देहाने, अनामिक स्पर्शाने ती अंग अंग मोहरून गेली होती. सगळं कसं जादूमय वाटत होतं तिला. एका नाजूकशा कळीचं एका सुंदर फुलात रूपांतर होत होतं. दोघंही एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव करत होते. मध्येच त्याने तिच्या मानेचा,कानांचा हलकासा चावाही घेतला आणि तिनेही मग “आह, विक्रम” असं म्हणत त्या बेधुंदीला प्रतिसाद दिला. त्यामुळे विक्रम आणखी चेतावला.

    दोघंही आता वेगळ्याच विश्वात गेलेले. त्या विश्वात फक्त ते दोघेच होते. फक्त दोघे. दोघेही आता आतुर झालेले, मिलनाच्या त्या भावोत्कट क्षणासाठी. त्याने तिचे इअर रिंग्स काढले. नाकातील नथही काढली. नेकलेस उतरवला आणि तिचा पदर खांद्यावरून हलकेच बाजूला सारू लागला. दोघेही आता एकरूप होणार होते. दोघांनाही एकमेकांच्या डोळ्यातले भाव दिसत होते,कळत होते….अवीट सुखाचे, अधीर मिलनाचे. दोघांचेही मन एकमेकांना साद घालत होते.

       “तुझ्या मिठीत शिरता

        भान कसले जगाचे

        मिळूनी दोघांनी घ्यावे

        ओंजळीत क्षण सौख्याचे”.

© महेश काळे

Image by kalhh from Pixabay 

Mahesh Kale

Mahesh Kale

नाव - महेश काळे शिक्षण - डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग, ऍडव्हान्स डिप्लोमा इन जर्मन लँग्वेज मॅक्सम्युलर मधून जर्मन लँग्वेज B2 लेव्हल सध्या "सँडविक एशिया लिमिटेड" पुणे येथे नोकरीस लेखनाची, कविता करण्याची आवड कलेच्या विविध प्रांतात संचार करायला आवडते.

3 thoughts on ““प्यासा सावन” क्षण सौख्याचे- (लेखन- महेश काळे)

  • August 16, 2020 at 7:15 am
    Permalink

    महेश, छान लिहिलं आहे. वर्णन ही उत्कृष्ट केलं आहे. स्पष्ट सांगतो रागावू नका, तुम्ही लेख लिहिताय तेंव्हा भाषेकडे लक्ष द्या. उदाहरण द्यायचे तर, खोलणें असा शब्द नाहीये, उघडणे असा शब्द आहे. एखाद्या माणसाने टाय सूट घालावा व त्याला ठिगळ असावं असं वाटलं, किंवा खाताना मधेच खडा आला तर कसं वाटेल तस वाटत.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!