आज जाने कि जिद ना करो… 4
भाग ३ ची लिंक- आज जाने कि जिद ना करो… 3
आज जाने कि जिद ना करो… 4
मनू आणि मिहीर एका कॅफे मधे आले… कॉफी ऑर्डर करून आजुबाजुला पाहू लागले… मिऱ्या… अरे असं इल लीगल काम कसं करणार… एकतर मला नुकतच वर्क परमिट मिळालंय आणि तू तर डेप्युटेशन वर आला आहेस… अरे कळलं कुणाला… तर.. हकलून देतील..
शांत हो… किती हायपर होतियेस…. हाहाहा
अरे हसतोयस काय?
अगं.. बघ ना तू किती काँट्रास वागतीयेस..
मी… मी काय वागले रे…
मनू.. तू लोकांना हायपर होऊ नये म्हणून ट्रीटमेंट देणार आणि तूच हायपर झालीस तर तुझा कडलर कोण होणार?? हां.. मला आवडेल… मनूच्या दोन्ही गालावरच्या खळ्या उमलल्या… हाहा हा खरंच कि…
हसत मनु म्हणाली… चालेल हो.. सर..
बर पण आता मुद्द्याचं बोलुयात का? असं म्हणत तिन नरेश ला फोन केला…
छ्या… काय रे हा… फोन ऑफ करून कुठे गायब झालाय .. मनु वैतागली..
मिहीरनी त्याच्या assistant ला फोन केला.. तर कळलं तो 2 दिवसांसाठी US ला गेलाय…
आता रे… काय सांगायचं त्या डॉ रमण ला?
हे बघ.. तू वैतागू नकोस… आणि तसही तुला हा क्लायंट ट्रीट करता येईल… मिहीर शांतपणे कॉफ़ी पीत म्हणाला…
कसं?? ?
अगं प्रत्येक थेरपीला, औषधाला ट्रायल असतेच ना..?
हो.. मनू… विचारात पडली…
बस्स… त्याच गोष्टीचा फायदा घ्यायचा…
सापडलो जरी.. तरी हा ट्रायल आहे हे असंच सांगायचं… आणि हो ही केस… म्हणजे डॉ रमण ची केस… आपण फ्री करूयात… म्हणजे बिझनेस नाही केला फक्त मदत केली असच दिसेल ना… मिहीर ची कल्पना उत्तम होती..
कारण जोवर नरेश काही गाईड करत नाही तोवर बिझनेस करणं धोक्याचं होत…
******************************
डॉ रमण आज लवकर परत आले… रेवा ला आवडतं ते सगळं कूक ला रेडी ठेवायला सांगितलं… आणि रेवा ला मेसेज केला… i m not feeling well..pls come soon..
रेवाचे जरी मतभेद होते वडिलांशी तरी तिचा जीव होता बापावर… ती ही लवकर पोचली… गार्डन मधे मस्त बार्बीक्यू चा सुगंध दरवळत होता… बाकी सगळं डिनर टेबल वर मांडून ठेवलं होत… ती जवळ आली… डॅड काय झालय तुला….? आणि बर नाहीये तर हे काय करतोयस?. सॉरी रेवा… मी खोटं बोललो… पण मला एक खूप महत्वाची गोष्ट तुला सांगायचीये… माहित नाही तुला कितपत आवडेल?
गेले काही दिवस मी खूप एकटा पडलोय.. तुझी मॉम गेली त्या नंतर मी ons (one night stand ) केले ट्राय… पण मग नाही रमलं मन.. आता एक वेगळीच थेरपिस्ट मला भेटलीये… पण मला तुझ्याशी शेअर करावसं वाटतंय…
इतका वेळ गप्प असलेली रेवा.. त्याच्या जवळ आली… डॅड दुसरं लग्न करतोयस का? अरे नाही बेटा… अजिबात नाही… मी म्हणालो ना एक थेरपी घेणार आहे… पण त्या सेशन ला तू बरोबर असलीस तर मला आवडेल…
नक्की काय आहे हे? सांग ना… रेवा विचारात पडली
रेवा… मी फक्त आज भेटलोय त्या थेरपिस्ट ला… मला ही नक्की काय करणार आहेत नाही माहित… रेवा नी त्याला थोपटलं आणि ती डिनर टेबलवर येऊन बसली… ओक्के डॅड… येईन मी…
******************************
मनवा नी डॉ रमण ला कॉल केला… वेळ ठरली दुसऱ्या दिवशी दुपारची..
त्या दोघांनी काही गोष्टी मार्केट मधून खरेदी केल्या आणि त्याच्याच एका गेस्ट रूम ला थेरपी रूम मधे बदललं…
सगळ्यात आधी एक मॉनिटर मिहीर च्या बेडरूम मधे फिट केला… मग त्या थेरपी रूम मधले कर्टन बदलले.. फ्लॉवर अरेंजमेंट केली… आणि फ्लोअर वर चक्क गुबगुबीत गाद्या घातल्या… एका बाजूला सोफा होता… खिडकी ची व्हिजन in side out.. म्हणजे आतून फक्त बाहेरच दिसेल अशी केली… अत्यंत cozy रूम रेडी झाली…
……..
दुसऱ्या दिवशी पहाटे मनू मेडिटेशन ला बसली… मग योगा… आणि वॉक ला जाऊन आली..
मग तिन तिच्या थेरपीच्या पोझेस निश्चित केल्या… आणि नियमावली… उदा.. क्लायंट चे डोके मांडीवर असताना तिच्या आणि त्याच्या मधे एक सॉफ्ट pillow असेल.. शक्यतो क्लायंट चे डोळे मिटलेले असावे… कारण मूळ कामुक भावना ह्या आधी नजरेतून एक्सचेंज होतात..
दोघांची मिठीची पोझिशन ही कशी असावी.. या बद्दल तिचे काही आराखडे तिच्या डोक्यात तयार होते…
ती अशी कामात गढलेली बघून क्षणभर मिहीर तिला पाहतच राहिला… मग तिचा फोन वाजला नी तो भानावर आला… डॉ रमण निघाले होते घरून…
वेळेच्या आधीच येत होते…
त्यानं विचारलं ही… इतकी काय घाई आहे ह्याला… तेव्हा तीच शांतपणे म्हणाली… अ पेशंट इज ऑल्वेज इंपेशन्ट… आणि गोड़ हसली…
रमण आणि रेवा दोघेही हॉल मध्ये आले… मिहीर ठरल्याप्रमाणे बेडरूम मध्ये होता… रेवाला मग मनूनी सगळी थेरपी समजावून सांगितली… आधी तिचा विरोध होता.. पण मग ती ही तयार झाली… तिच्या डॅड आधी तिन ती थेरपी घ्यावी हा आग्रह तिन मान्य केला…
आणि दोघी… त्या थेरपी रूम मधे आल्या… कॅमेऱ्यात रेवा ला पाहून मिहीर उडालाच… ही… इथे? पण रमण म्हणाला कि त्यालाच गरज आहे… ही आहे मग काय टेन्शन घ्यायचं… बघुयात तरी.. मनवा कशी ट्रीटमेंट देतीये ते…
मनुनी आधी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मग हलकेच तिचे गाल.. खांदे आणि पाठीवरून हात फिरवला… हे सगळं इतकं आश्वासक होत कि रेवा नी तिला एखाद्या लहानमुली सारखी मिठीच मारली.. आणि ती रडू लागली… तिला शांत करत, जवळ घेत थोपटू लागली… काही वेळातच रेवा ला शांत झोप लागली… आणि मनवा उठून बाहेर आली.. अंदाजे तासाभराने ती जागी झाली आणि तो वर पुन्हा मनु नी तिला हसून जवळ घेतलं… रेवाला खूपच शांत वाटत होत… तिन फक्त मनूचे हात हातात घेतले.. किस केल हातांना… आणि ती आणि रमण निघून गेले…
मिहीर ही मनु च्या जवळ आला… मनु आज मला कळतंय कि इतकं साचलेलं दुःख दुसऱ्याच्या मनातून बाहेर काढायला कडलर किती आवश्यक आहे…
मनूनी दुसऱ्या हिप्नोसिसची आधीच अपॉइंटमेंट घेतली होती… तासाभरात ती ही नॉर्मल होऊन परत आली..
मिहीर आणि मनु चा कालचा व्हिडिओ हवाई च्या मेअर नी पहिला… आणि मेयर ऑफिस मधे तिला बोलावल..
या गोष्टीनी त्या दोघांना मात्र घामच फुटला…
बापरे… हा बिझनेस सुरु होण्याआधीच बंद पडणार कि काय?..
#मनवा च्या विरोधात काय कारवाई होणार? रेवा ला या थेरपींन कितपत बर वाटलं असेल? मिहीर आणि मनवा आता कशी हाताळतील ही परिस्थिती?….
क्रमश:
Image by David Bruyland from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Pingback: आज जाने कि जिद ना करो… 3 – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Interesting
Thank u😍
Pingback: आज जाने कि जिद ना करो… 5 – LekhakOnline – Excellent Marathi Articles