प्यासा सावन… 

रात्रीचा पहिला प्रहर उलटला..
‘अखंड सावधान’ ही प्रहर वेळा बदलणारी साद आली .. राणी महाल अद्याप दिव्यांनी उजळलेला..
एव्हाना समया शांत करायची वेळ ही उलटून गेलेली..
मुख्य दासी विपाक्षी  राणीमहालाच्या प्रवेश द्वारा पाशी आली .. आत येण्याची अनुमती मागितली . पण प्रवेश नाकारला गेला…
तीव्र क्रोधाग्नि मस्तकात प्रगटला..
का? इतकी वर्ष मी महाराजांची सेवा केली.. प्रसंगी त्यांचे अंगवस्त्र ही झाले… आणि मला प्रवेश नाकारला? .. केवळ त्या नव्या राणीपायी… मला असह्य होतंय हे..
हा वृथा विलाप करीत ती तिच्या सदनिकेकडे परतली .. तिचं मनं तिच्याशीच संवाद साधू लागलं ..
कोण आहेस तू?  केवळ एक दासी… प्रमुख दासी , पण कुठली  अंत:पुरातली कि शयनकक्षातली?
आणि आलेली स्त्री ही आता महाराणी आहे… तिच्यापासूनच कुल विस्तार होणार…
तिची ही उद्विग्नता मनात खोलवर सलू लागली .
आणि एका विलापक्षणी जसं मनं सुहृद आठवणीं मधे रंगू लागलं तेव्हा आयुष्यातली ती रात्र आठवली..
नकळत ती राणीमहाला कडे पाहू लागली…
इश्श्य … काय धुंद रजनी होती ती..
  भव्य राजमहाल… उंच, गोपुरी घुमटाचा, स्थापत्याचा उत्तम नमुना…
महालाच्या आतला तो महाराजांचा शयनकक्ष.. कोरीव नक्षीकामाने साकारलेला मंचक,  दर्पण..अन स्नानकुंड. विविध सुंगधी द्रव्यांच्या अत्तर कुपिका, चंदन लेप..
त्याने मुग्ध झालेली मी..
हे आठवून ती मनोमन लाजली.. अन पायाचा  उजवा  अंगठा डाव्या अंगठ्यावर ठेवून घासू लागली..
तिला महाराजांनी प्रथम पाहिले ते.. त्यांच्या स्नानगृहात..
हजारो कारंज्यांची षट्कोनात केलेली रचना अन त्या मध्ये निर्माण केलेले शयनकुंड…
एकेक काठावर तासलेले दगड..
सम शीतोष्ण पाण्याची रचना अन महाराजांना स्नान घालणाऱ्या दोन दासी..
आज मात्र प्रवेश केवळ एकाच दासीला मिळाला आणि तो ही आपल्याला..
खरतंर महाराजांच्या मनात मीच ठसले होते..
आहेच मी रुपगर्विता…
माझ्या कृष्णकुंतलांना मिळालेली लाटांची वळणे,
कामोत्सुक काया, श्वेत वर्ण, आरक्त अधर, मदनाचे शर तोलणारे तीक्ष्ण नेत्र, एखाद्या शिल्पकाराने अत्यंत अलवारपणे कोरलेले कमनीय, सिंहकटी, गोपुडी उरोज  अन पुष्ट नितम्ब  .
महाराजांनी मला एकक्षण आपादमस्तक न्याहाळले अन आज्ञा दिली…
स्नानकुंडात ये..
मी त्या ओलसर पायऱ्या हळुवार उतरले..
माझी कंचुकी अन उपवस्त्रा पर्यंत पाणी आले..
महाराज जसजसे जवळ येऊ लागले तसतशी त्या पाण्यातूनच एक विद्द्युल्लता माझ्या रोमारोमात जाणवू लागली..
एकेक क्षण मला कामातुर करू लागला..
कोणत्याही असूर्यस्पर्श्या स्त्री ची हीच मनोकामना असते कि तिला पुरुषसुख देणारा एखादा बलवान रसिक अन चतुर पुरुष असावा ..
माझ्या अन महाराजांच्यात आता केवळ एका श्वासाइतके अंतर उरले होते..
त्यांचे उष्ण श्वास माझ्या भाळ, कर्णफुले, मान इतका  प्रवास करून माझ्या अधरांवर विसावले..
माझे दशनबीजसम अधर त्यांच्या रसनापूर्तीच्या आवेगांना  थोपवू शकले नाहीत.. माझे दोन्ही कर त्याच्या अनावृत्त देहावरून अखंड फिरू लागले…
त्या कमरेपासून वर असलेल्या मला त्यांनी एका पायरीपाशी नेले..
आता त्यांच्या  पुष्ट मांड्यावर मला बसवून घेतले..
माझी पाठ, त्यावर कंचुकीच्या रुळणाऱ्या वस्त्र बंधिका त्यांनी त्यांच्या तीक्ष्ण दातांनी ओढल्या, माझ्या वर होणारे हे असंख्य स्पर्शदंश मला  मीलनाचा आनंद देत होते .
एका बेसावध क्षणी मला त्यानी बलाने वळवून घेतले आणि माझ्या अधरांपासून त्या रक्तजिव्हेने स्पर्श भाले माझ्या अनावृत मधुघटांना स्पर्शून गेले  … अन त्यांची तृष्णा शमवली
ती आसक्ती पूर्णत्वाला नेऊन एका क्षणी मात्र ते माझ्यापासून विलग झाले… एकांत आज्ञा देऊन त्या शयनमंचकावर निजले…
मी अंगवस्त्र परिधान करून महालाच्या बाहेर आले… आणि ती कुजबुज कानी आली…
महाराजांचे पुरुषत्व स्वप्नदोषाने ग्रासित आहे..
तथ्य मिथ्या यात न पडता मला मात्र तो सहवास हवाहवासा वाटू लागला…
आणि आज… मी अशी निखाऱ्यासम कामाग्नी मधे जळत असताना त्यांनी महाराणी ला जवळ केलं?
ती संतापाने बाहेर आली आणि अचानक तिला एक बलवान पुरुष मागे खेचू लागला.. काही कळायच्या आत ती  तिच्या मंचकापर्यंत आली…
तिला जवळ ओढणाऱ्या पहारेकऱ्या कडे तिने एकवार पाहीले..
तिच्या नजरेनंच त्याला पुरुषसुखाची संमती दिली.. आणि तो तिच्या वलयांकित प्रदेशाला जिंकून घेऊ लागला  ..
तिच्या असंख्य अस्फुट चित्कारांनी आणि त्याच्या स्पर्श समाधानी स्वरांनी तिचा कक्ष दुमदुमला ..
एका असीम स्पर्शसुखाच्या विहारानंतर ते दोन हंस पुन्हा एकत्र आले पुन्हा कधीच विलग न होण्यासाठी….
*********
आज ती तिच्या फ्रेंच विन्डो पाशी बसून हे प्रेमकाव्य पूर्ण करत होती… आणि बाहेर कोसळणारा श्रावण तिच्या मनी
मात्र अतृप्त होता
अन अचानक सूर ऐकू आले बाहो में चले आओ…
सारेगम कारवाँ… तिच्या साठी एकसे एक सदा बहार गाण्यांचा खजिना उलगडत होता.
Image by kalhh from Pixabay 

12 thoughts on “प्यासा सावन… 

  • August 21, 2020 at 5:43 pm
    Permalink

    लेखणी जबरदस्त

    Reply
    • August 21, 2020 at 6:09 pm
      Permalink

      Thank you 😍😍😍🌹🌹

      Reply
  • August 21, 2020 at 8:19 pm
    Permalink

    छान वर्णन केले आहे … उत्तम दर्जा ठेवला आहे लिहताना….👍👍

    Reply
    • August 21, 2020 at 9:29 pm
      Permalink

      क्या बात है, *स्रीच्या मनातील भावना किती सुंदरपणे व्यक्त केल्यात*

      महाराजां, सुध्दा मनातून त्या *दासी* कडे बघून तसचं काहीस वाटलं असावं.

      *स्री-पुरूष* मिलन *एक सुंदर क्षण* असे *रोमांच देणारे क्षण सदैव हृदयात घर करून राहतात* ❤️❤️

      Reply
      • August 22, 2020 at 2:19 am
        Permalink

        खूप खूप आभार 😍😍😍🍫🍫🍫

        Reply
        • August 27, 2020 at 2:59 pm
          Permalink

          प्रथमच वाचल. एक वेगळच विश्व आणि अनुभव वाचनाचा

          Reply
    • August 22, 2020 at 2:19 am
      Permalink

      Thank u soo much😍😍

      Reply
  • August 26, 2020 at 7:34 am
    Permalink

    It is really awesome
    I already read it
    we must understand the feelings and reality

    Reply
      • October 5, 2020 at 3:39 pm
        Permalink

        वा ! आकर्षक लेखन.

        Reply
  • August 31, 2020 at 6:29 pm
    Permalink

    खुप सुंदर मस्तच लिहीता तुम्ही लेखीका

    Reply
  • October 5, 2020 at 3:39 pm
    Permalink

    वा ! आकर्षक लेखन.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!