आज_जाने_कि_जिद_ना_करो…. 10
आधीच्या भागाची लिंक- आज_जाने_कि_जिद_ना_करो…. 9
आज_जाने_कि_जिद_ना_करो…. 10
मिहीर आवरून बाहेर पडला.. पण डोक्यातून मनू चा विचार जात नव्हता… त्यानं कॉल केला..
तिनं फोन उचलताच पटकन म्हणाला… आज माझ्याकडून डिनर डेट..सॉरी म्हणायचंय.. जरा बेटर वे … ती हसली… मग म्हणाली… हो हो.. चालेल..तुझं काम संपवून ये लवकर… आता मी घरी पोचतीये…
अगं ऐक… एक कुरियर आलंय तुझं…
काय आहे? मनु नी उत्सुकतेनं विचारलं..
मी नाही पाकीट फोडलं…. तूच बघ..
अरे.. बघायचंस कि… या वाक्यान मात्र त्याचा जीव नकळत सुखावला…. तिनं जणु तिच्या पर्सनल स्पेस मधे एन्ट्री दिल्याचा फील आला..
मुद्दाम थट्टेचा सूर लावत म्हणाला… नको… परत मॅडम चिडल्या तर??
हो का?… बर… चल ठेवते फोन… पोचलीये मी घरी म्हणत तिनं कट केला…
काय आलंय?? म्हणत ती दार उघडून आत आली.. सोफ्यावर बसत तिनं पाकीट फोडलं…
एकूण तीन पत्र आणि काही फॉर्म्स… बरोबर एक बॉक्स… गिफ्ट रॅप केलेला…
आलंय कुठून…?
डॉ त्रिवर.. चेअरमन ऑफ वर्ल्ड सायकॉलॉजिस्टस असोसिएशन.. USA…
… OMG..
काय पाठवलं आहे…
तिनं पहिलं पत्र उघडलं ..
डिअर मिस मनवा..
मी नुकताच तुमचा वायरल व्हिडीओ पाहिला… अ न्यू थेरपी.. कडलींग… न्यू इनोव्हेटिव्ह ऑपशन…
पण नियमानुसार कोणतीही थेरपी अमलात आणताना तिला जर व्यवसाय म्हणून करायचा असेल तर त्या बद्दल एक थेअरी जर्नल सबमिट करावं लागत…
तुम्ही वकिलामार्फत आमच्याकडे लायसन ची परवानगी घेतलेली आहेतच ह्या नव्या उपचार पद्धती साठी.. पण आता काही ऑफिशिअल फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करून पाठवा…
खाली लफ्फेदार सही होती…
मनु खुष होती… पण हे आता सगळं लिहून कळवायचं… बापरे टेन्शनच आलंय… म्हणत तिनं दुसरं पाकीट फोडलं.. हे डॉ त्रिवर च पर्सनल पत्र होत… पण यात त्यांनी तिला इतर सायकॉलॉजिस्ट आणि US मधल्या काही नाराज असलेल्या सायकॉलॉजिस्टस चा फीडबॅक दिला होता… अर्थात काही नवं आलं कि जसं कौतुक तशी टीका ही आलीच….
आता मात्र तिनं बाकीचे फॉर्म्स चाळले.. बापरे.. बरच लीगल भाषेत होत… तिनं नरेश ला फोन केला पण त्याचा बिझी लागला…
पण ह्या सगळ्यात ते तिसरं पाकीटचुकून फॉर्म्स मध्ये मिक्स झालं आणि ते सगळं तिनं पुन्हा त्या पाकिटात ठेवून दिलं…आता तिनं गिफ्ट बॉक्स उघडला… त्यात एक अँटिक वेळ दाखवणार वाळूच घड्याळ होत….
तीला गम्मत वाटली …ते गिफ्ट पाहून…
पण पुढे काय वाढून ठेवलंय याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती…
******************************
नील च्या एका पाठोपाठ मीटिंग चालू होत्या… त्यानं एक छोटासा ब्रेक मिळताच फोन चेक केला. का कुणास ठाऊक.. राहून राहून त्याला मनु चा कॉल किंवा मेसेज आलेला असेल. . असं वाटून गेलं…
मग तोच मेसेज टाइप करणार इतक्यात सेक्रेटरी बोलवायला आला… म्हणून मग तो टाइप केलेला मेसेज तसाच draft मधे save झाला…
आज हवाई ला ऍडिशनल ग्रांट मिळवण्यात तो यशस्वी झाला होता… बरेच दिवस तो या ग्रांट ची वाट पाहात होता… यामुळेच हवाई ला अजून मजबूत करता येणार होत इंटरनॅशनल मार्केट मधे…
आजच्या मीटिंग संपवून तो हॉटेल रूम मधे आला… आणि चेंज करून बाथ टब मधे जाऊन बसला… एका नामांकित सप्ततारांकित हॉटेलच्या बाथ टब मधे उंची वाईन चा आस्वाद घेत असताना… त्यानं डोळे मिटले… उगाचच त्याच मन.. उडून त्याच्या हवाई मधल्या घरात आलं… स्लो मो मधे हलणारे पडदे… त्याचा राऊंड बेड आणि त्यावर दिसली… ती अप्सरा… तिच्या मांडीवर डोकं ठेवून त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं… एक फ्लॅश… आणि मनूचा चेहरा डोळ्यासमोरून तरळून गेला…
आणि…. गोड आवाज कानी आला
सर तुमच्यासाठी काही आणू? त्यानं झटकन डोळे उघडले .. आणि समोर एक अतिशय सुरेख अटेंडन्ट त्याची अदबीनं विचारत होती…
नितळ गोरी, रेखीव चेहऱ्याची… अत्यंत सुडौल बांधा… टपोरे पिंगट डोळे आणि हाय लाईट केलेले ब्राऊन गोल्डन केस.. त्या डार्क ब्लु बिझनेस वन पीस मधे ती अधिकच मादक दिसत होती..
तिच्या नजरेतला भाव मात्र काही वेगळाच होता… याच्या मुरलेल्या नजरेतून तो सुटला नाही…
नो मॅडम… thank u…
काही लागलं तर सांगा मी बाहेरच आहे.. म्हणत तिनं दार बंद करून घेतलं…
तो थोडा वेळ तसाच रिलॅक्स झाला आणि बाहेर आला… आता मात्र ती ललना… त्याच्या बेड च्या बाजूला असलेल्या सोफ्यावर बसलेली होती…
तो येताच ती उठून उभी राहिली… काही हवयं सर?
तो तिचा अंदाज घेऊ लागला… एखादा स्त्री लंपट असता तर त्यानं संधिसाधू पणा केला असता पण नील मेयर होता… त्याला पक्क ठाऊक होत… अशा बिझनेस ट्रिप वरची एक चूक त्याच्या करिअर साठी धोकादायक आहे… त्यान सेक्रेटरी ला बोलावलं… आणि तिला बाहेर पाठवलं…. बाकीच्या मीटिंगच शेड्युल विचारलं… आता बाकी काहीच तितकं महत्वाच नाहीये असं कळताच त्यानं हवाई ला परत निघायचं ठरवलं…
मनानं तो केव्हाच हवाई ला पोचला होता…
******************************
अरहम….. मनूला भेटून बाहेर पडला आणि सरळ त्याच्या हॉटेल रूम मधे आला… त्याच्या कडे भरपूर गॅजेट्स होती.. आणि आजची मीटिंग तो आता स्क्रीन वर पाहू लागला… होय…कारण त्यानं मनुची आजची मीटिंग छुप्या कॅमेऱ्यानी रेकॉर्ड केली होती…
ती आतापर्यंत त्याच्या साठी एक केस होती… पण आता तिला सतत रिवाइंड करत पाहता पाहता तो तिच्यात गुंतू लागला… त्यानं परत तिला कॉल केला… पलीकडून तिचा मधाळ आवाज.. बोल अरहम…
अरहम : हॅलो मॅडम… जर वेळ असेल तर परत आपण आज संध्याकाळी भेटुयात का?
सॉरी अरहम… माझी एक मिटिंग आहे… आपण उद्याच भेटूयात… बाय… म्हणून तिनं कट केला…
Ok.. म्हणतं त्यानंही ठेवला..
थोडा नाराज झाला पण तो पुढच्या कामाला लागला
..
झालेल्या मीटिंग ची एक क्लिप बनवून त्यानं पेन ड्राइव्ह मधे save केली आणि इतक्यात त्याचं लाडकं मांजर… गॅलेक्झी तिथं आल….एक पर्शिअन…निळ्या डोळ्यांच… आणि राखाडी रंगाचं होत ते….
.. त्यानं त्याला कुरवाळत त्याचे लाड केले… मग तो काही वेळानं बाहेर पडला…
त्याला एक कॉल आला…
काम कुठवर आलंय?
बॉस… उद्या कामाला सुरुवात होईल…. आज फक्त पहिली मीटिंग झाली…
हे बघ… हवाई त मी तुला मजा मारायला पाठवलेलं नाहीये… मला लवकरात लवकर काम व्हायला हवयं…
येस बॉस म्हणतं त्यानं फोन ठेवला…
त्याचे इमोशन्स आज मिक्स होते….
बॉस नी झापल्याचा राग… आणि मनु भेटल्याचा आनंद.
आजवर इतक्या केस मधे आपली वाहवा झालीये… पण ही केस वेगळी आहे… तिला भेटूनच इतकं बर वाटतंय तर उद्या सेशन घेतलं तर?? तो कल्पनेनंच सुखावला…
अरहम… हा एक प्लॉट केलेला स्पाय कम पापाराझीं होता… अशा कमी वेळात फेमस होणाऱ्या लोकांना भेटायचं… त्यांची काम, कला भेटून रेकॉर्ड करायची आणि त्यांच्या हितशत्रूंना त्या क्लिप.. आणि बाकीची माहिती विकायची.. आणि गरज पडली….. तर त्याचा गेम करायचा…. जेणेकरून तिचं गोष्ट ते कॉपी करून प्लॉट करणारा अधिकाधिक पैसे मिळवू शकेल….
******************************
डॉ रमण घरी आले… रेवा नी आज सुट्टी घेतली होती …
आल्या आल्या त्याच छान स्वागत केल…बऱ्याच वर्षांनी त्याचं नात पुन्हा एकदा छान उमललं होत… बाप लेक खुश होते… डॉ फ्रेश व्हायला आत गेले आणि चुकून त्यांनी ते गिफ्ट ओव्हरकोट मधे ठेवलं होत… जे ओव्हरकोट आत ठेवताना रेवा ला मिळालं…
Wow … डॅड नी गिफ्ट आणलय मला…. म्हणतं तिनं ते उघडलं…. आणि ब्रँडेड वॉच बघून ती जाम खुश झाली .. लगेच घालून बसली …. डॉ फ्रेश होऊन बाहेर आले आणि रेवा गळ्यात पडून thank u thank u म्हणू लागली… त्यांना कळेचना… मग तिनं हात नाचवत ते वॉच दाखवलं आणि डॉ ची ट्यूब पेटली…. मनातल्या मनात… ओह शीट!! म्हणाले… रेवा कडे पाहून ते हसले… आणि त्यांनी रेवाला एक मिठी मारली …
******************************
#कोण आहे अरहम चा बॉस? नीलच्या मनातल मनु ला कळेल? एक पाकीट वाचायचं राहिलंय… नेमकं तेच महत्वाचे होत का? आणि आलेलं घड्याळ नेमकं काय सुचवतय? Gift रेवा साठीच होत का?
क्रमश:
©मानसी
पुढील भागाची लिंक– आज_जाने_कि_जिद_ना_करो…..11
Image by David Bruyland from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Pingback: आज_जाने_कि_जिद_ना_करो…..11 – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: आज_जाने_कि_जिद_ना_करो…..11 – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: आज_जाने_कि_जिद_ना_करो…..11 – LekhakOnline – Excellent Marathi Articles