उडाण- भाग 3 

आधीच्या भागाची लिंक– उडाण- भाग 2 
उडाण- भाग3 
चीफ फ्लाइंग इन्स्ट्रक्टर स्टॅलिन जोसेफ च्या हातून माही ला  CPL
(commercial pailot लायसन्स ) आणि  PPL (  प्रायव्हेट पायलट लायसेन्स)मिळाले होते , जे तिला एअर फोर्स मध्ये निवड होण्याला खूप कामात येणार होते . आता लक्ष होते ,एअर फोर्स ….
  इंडियन एअर फोर्स ची मेडिकल टेस्ट पास करून तिला होस्पेट ला ट्रेनिंग ला जायचं होतं ..हे ट्रेनिंग तीन स्टेजेस मध्ये होणार होतं .प्रत्येक स्टेज सहा महिन्यांची ..
      आज फ्लाय जेट ट्रेनिंग सेंटर आणि  एअर सर्विसेस ची क्लब पार्टी होती ..कंपनी चे डिरेक्टर पण खास आले होते ..
  माही लाल गाऊन आणि डायमंड नेकलेस घालून तयार होती …..शैली सोबत ती तिथे पोहोचली …एका पेक्षा एक हँडसम तरुण ऑफिसर ,पायलट तिथे होते ..माही ची अस्वस्थ नजर सगळीकडे फिरत होती …तिला असीम दिसला नाही ..किती दिवस झाले , फोन नाही ,भेट नाही ..आता माहीत नाही किती काळ लागेल सगळ्या ट्रेनिंग टेस्ट पूर्ण करायला …तिची तगमग होत होती …
..कोपऱ्यात उभे राहून असीम तिच्या कडे मिश्किल पणे बघत होता…तिची जेव्हा त्याच्याशी नजरा नजर झाली तेव्हा ती एकदम कावरी बावरी झाली …असीम हसू लागला ..
      ती हॉल च्या मागच्या बाजूला सरकली …असीम तिच्या दिशेने येतोय म्हटल्यावर तिने  पटकन हाक मारली
” जेकब सर ” आणि खोडकर नजरेने त्याच्या कडे बघतीलं …तो मागे सरकला आणि  थांब तुला दाखवतो अशी खूण केली ..
    शेवटी किचनच्या मागच्या पॅसेज मध्ये ती हात धुवायला गेली , आणि तो तिच्या एकदम मागे येऊन थांबला …ती वळली ,आणि एकदम पाय अडकून तोल जाणार की असीम ने तिला पकडले …’आता कशी पकडली ‘ असे त्याने भुवई वर करून विचारले …
तिला राहावलेच नाही अन तिने त्याला मिठी मारली …दोघं ही निशब्द तसेच एकमेकांना धरून होते…पुन्हा कधी भेट होणार ह्या काळजी ने त्याने पकड अजूनच घट्ट केली…
********  “फ्लाईंग ऑफिसर माही दत्ता !! ” विंग कमांडर ने खड्या आवाजात पुकारले
ताठ मानेने आणि अभिमानाने माही मार्च करत ती एअर व्हाईस मार्शल च्या समोर जाऊन थांबली .शेजारी ग्रुप कमांडर उभे होते ..,…..तिला आज नंतर
‘ ऑफीशियली फ्लाईग ऑफिसर’ म्हणून जबाबदारी पार पाडायची होती …..सगळे क्राफ्टस उडवायचे  होते…….अगदी हेलिकॉप्टर आणि फायटर प्लेन सुध्दा ! !!
********* माही दत्ता आता फर्स्ट फ्लाइंग ऑफिसर म्हणून छान रुळली होती .  Independencs day ला झालेल्या IAF च्या चित्तथरारक प्रदर्शनात तिने लीड केलं होतं . PM नि ह्या ग्रुप ची तारीफ केली होती,प्रत्यक्ष माही जवळ ….तिला अतिशय अभिमान होता आपल्या  troop चा .
तिच्या आई वडिलांना सुध्दा तिचा प्रचंड अभीमान होता.
      माही आणि असीम च्या भेटी होत होत्या …तो कधी तिच्या स्टेशन ची फ्लाईट मुद्दाम घेत असे , कधी ती दिल्ली बेस ला भेटत असे… ..दोघांनाही अनिवार ओढ असे भेटण्याची..
****** असीम ला एक खास मीटिंग साठी बोलावण्यात आले होते …एअर इंडिया एक नवीन रेकॉर्ड करण्याचे प्लॅन करत होती ..त्यांना हे रेकॉर्ड करायला को पायलट आमचा घ्यावा अशी विनंती फ्लाय जेट नि केली होती….
प्लॅन असा होता…(ही ऐतिहासिक घटना ,म्हणजे रेकोर्ड खरे आहे , आजही भारताच्या नावावर .. आहे दिल्ली -संफ्रान्सिस्को  ह्या  सर्वात लांब प्रवासाचे .बाकी जोड माझ्या कथेची)
प्लान प्रमाणे …विमान दिल्ली वरुन निघून नॉर्थ अमेरिकन Barro (point Barro) हा सलग प्रवास करणार 16300 किलोमीटर चा …..तेही प्रवासी घेऊन !!!
(  सत्य ::भारता आधी हे रेकॉर्ड Emirates च्या दुबई-ओकलंड प्रवासाचे होते ……ते मोडून इंडियन एअर लाईन ने आपल्या नावावर केले )
ह्या धाडसी सफरी साठी असीम ची निवड झाली होती…..सोबत होता एअर इंडियाचा विंग कमांडर अंगद सिंग!!!
ही बातमी माहीला कळाल्या बरोबर माहीने त्याचे अभिनंदन केले…ती मुद्दाम  दिल्लीला जाऊन त्याला निरोप देणार होती ….
*****अंगद आणि असीम चे खास ट्रेनिंग पूर्ण झाले ..त्यांच्या खाण्या पिण्याची विशेष काळजी घेतल्या गेली…त्या प्रवासा साठी प्रवाशांना
वयोमर्यादा साठ होती…विमानाची संपुर्ण तपासणी केल्या गेली….खास टेक्निकल टीम ने ती जबाबदारी घेली होती ..
……पोर्ट वर प्रचंड गर्दी…मीडिया …कॅमेरे…प्रवासी ..नातेवाईक ….मोठ्ठी जत्राच जणू . दोन्ही पायलट आणि crew मेम्बर्स ना पुष्पहार  घालून टाळ्यांनी स्वागत केल्या गेलं …
  रिया पण आली होती …कितीतरी  टू अँड फ्रो प्रवास तिने असीम बरोबर केले होते …तिचा असीम  वर जीव होता ..
……माही डोळ्यात प्राण आणून असीम कडे बघत होती …..चेहेरा करारी होता..अखेर ती एअर फोर्स ऑफिसर होती!!!
  असीम तिच्या जवळ आला …हे s ऑफिसर!! हम चलते है ..तिने पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला …तूच सांगितले होतेस न ,  “सोल्जर कधीच चलतेहै नाही म्हणत , जित के आते है असच म्हणतात .”
” हो, मी काय युध्दावर थोडीच जातोय ,”
” आपल्या देशासाठी रेकॉर्ड करतोयस न….मग !! ते आपल्या साठी युद्धच आहे .”
” तू असशील न कायम माझ्या सोबत .रेडिओ communication करूच न आपण …बाय ..”
” आम्ही IAF वाले बाय नसतो म्हणत ..मिलते है … म्हणतो “
” असं ? “म्हणून त्याने तिला जवळ ओढले आणि कानात म्हणाला ,  मी उडत असतांना मला ऐकायच आहे ..तुझ्या कडून..”
” काय ?”
” ते तुला समजलय ऑफिसर !!!! ” लगेच वळून तो एअर बेस कडे निघाला …
रिया आणि माही हात हलवत होत्या .
रिया म्हणाली , ” माही माझं मन नेहेमीच असीम कडे ओढ घेत होतं , पण काही गोष्टी घडाव्या लागतात ,घडवून आणता येत नाहीत .ऑल द बेस्ट माही !! “
माही नि विनयानी फक्त स्मित केले ….
असीम आणि अंगद कॉकपिट मध्ये तयार होते ,
विमानाचे  इंजिन सुरू झाले , आणि
विमानाने रुबाबात आकाशात झेप घेतली .
Image by PublicDomainPictures from Pixabay 
Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

6 thoughts on “उडाण- भाग 3 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!