उडाण- भाग 4
…….अतिशय रुबाबात
बोइंग 777- SR ने आकाशात झेप घेतली . ते एक लांब पल्ल्याचे ट्विनजेट
होते. 9420 नोटिकल माईल (17445 km) अंतर कापण्याची क्षमता असणारं .. ..त्याला प्रत्येक गियर ला सहा लँडिंग व्हील्स आणि समोर दोन असे चौदा चाकं असल्याने एकदम अलगद लँडिंग होत असे …..शिवाय त्याला दोन इंजिन्स होते .
( Now a days new AIR BUS has four engines )
अंगद सिंग याला फ्लाईंग चा भरपूर अनुभव होता . आधी एअर फोर्स मध्ये काम करून आता दोन वर्षांपासून इंडिअन एअरलाईन मध्ये आला होता , त्यामुळे एकदम मिलिटरी बाणा होता .
एखादी गोष्ट शिस्तीत तशी म्हणजे तशीच करायची असा काहिसा अट्टाहास ….
…असीम आधीपासूनच कमर्शियल पायलट होता . कधी कधी मेंदू पेक्षा हृदयाचं ऐकणारा ..
आज क्रू मेम्बर्स पण खूप उत्साहात होते ..एका मोठ्या विक्रमाचा आपणही हिस्सा बनणार म्हणून जोश ही होता . विनी , सिया ,राकेश , झुबेर आणि रंजन असा अगदी तरुण स्टाफ होता.
सीट बेल्ट काढून प्रवासी रिलॅक्स झाले….विमान स्थिर झाले होते ….होस्टेस नि सगळ्यांना वेलकम ड्रिंक दिले …..सगळं नीट चाललं होतं .
श्री व श्रीमती बिना मल्होत्रा , mr. चॅपेल , डॉ. सतीश रायसोनी , श्री . आकीब खान , निवांत पेंगत होते .
सारा आपल्या पाच वर्षांच्या बंटी बरोबर प्रवास करत होती…त्याला फक्त चॉकलेट्स मध्ये इंटरेस्ट होता आणि तो हा प्रवास मस्त एन्जॉय करत होता…असे दोनशे जण मागे क्लास वन मध्ये होते ..
समोर बिझनेस क्लास मध्ये साठ प्रवासी होते …आपापले लॅपटॉप उधडून त्यांनी काम सुरू केले , कुणी बिझनेस मॅगझीन चाळत होते …….प्रवासाच्या सुरुवातीची लगबग संपवून होस्टेस आणि पर्सर थोडे निवांत झाले …
एअर इंडियाच्या कंट्रोल रुम मधे कॅप्टन संघवी घड्याळा कडे बघत होते ..ते ATCSCC (air traffic control stationarycommand center ) चे इनचार्ज होते ,.त्यांनी ATC VH बँड वरून रेडिओ संदेश ऑन केला …..
” हॅलो कॅप्टन ” ATC चीफ कॅप्टन संघवी बोलत होते … .” एवरीथिंग ok ? “
” कॅप्टन असीम सर !! Ok ..ओव्हर ..”
” सर ,पाकिस्तान क्रॉस केलंय आता इराण वरून फ्लाय करतोय , दोन्ही देशांनी आम्हाला आधीच ग्रीन सिग्नल दिले होते ..ओव्हर “
” ऑल द बेस्ट जंटलमन “
मागे सगळे प्रवासी डुलक्या घेत होते . सिया आणि राकेश फूड पार्सल मोजून व्हेज ,नॉनव्हेज वेगवेगळे करत होते …
अचानक विमानाला हादरे बसायला लागले ..कॅप्टन ( आधी तो कमांडर होता) अंगद नि ताबडतोब सीट बेल्ट बांधण्याचा संकेत दिला …
राकेश घाईघाईत गेला आणि त्याने वॉशरुम कडे जाणाऱ्या प्रवाशांना बसून घ्यायला सांगितले ….
प्रवाशांमध्ये गोंधळ माजला ..
……विनी ने सगळ्यांना शांत केले …हा एवढा पॅच गेला की शांत होईल म्हणाली ……पण तसे झाले नाही ..विमानाला जास्त हादरे बसायला लागले …खूप जोराचे वादळ सुटले होते ..अजून तर त्यांनी इराण पण ओलांडले नव्हते …
पुन्हा रेडीओ संदेश ..
” कॅप्टन , बॅड न्युज ..अचानक खराब हवामानाचा रिपोर्ट आला आहे …बोलता बोलता ..संदेश ..तुटला..
” हॅलो …सर.. सर .. बोइंग777SR .. …
…कॅप्टन असीम ऑन बोर्ड ….ATC ? ” संदेश जात नव्हता.
फ्लाईट डेक चे पॅनल उंची ,वेग ,हवेचा दाब नीट दाखवत होते …..पण वेदर नीट नसल्याने त्यांना नेविगेशन डिस्प्ले वर विसंबून दिशा ठरवावी लागत होती ….
…..आशा विमानात “”क्रू अलर्ट सिस्टीम”” असते …त्या पॅनल वर फ्युएल तापमान नेहमीच्या सरासरी पेक्षा जास्त दाखवत होतं …..ही एक काळजीची बाब होती !!!
कमांडर अंगद म्हणाला , लवकर इराण स्टेशन ला इमर्जन्सी सिग्नल पाठव . ते कळवतीलच ……इंडियन ATC ला .
********असीम ला बाय करून लगेच पहाटेच माही ग्रुप कमांडर सोबत एअरफोर्स एक्सचेंज प्रोग्रॅम अंतर्गत रशिया ला गेली होती .पूर्ण सतरा जण ज्यात पायलट , टेक्निशियन आणि स्टाफ ची टीम होती ..दोन देशांत असे आदान प्रदान नेहेमीच होत असते , विशेषतः टेक्नॉलॉजी ,आर्म्स आणि फूड सेक्टर मध्ये .
आता काही खास विमानांचे ट्रेनिंग आणि अभ्यास त्यात समाविष्ट होता. स्पेशल फायटर प्लेन , हाय स्पीड सुपर सोनिक विमानाचे ते ट्रेनिंग होते. तोपर्यंत तिचा असिमशी काही संवाद झाला नव्हता …..
**** “इराण नि आपल्याला लँड करण्याचा संदेश पाठवलाय …आपली स्पीड चेक कर .” .असीम म्हणाला .
” हेड विंड ( समोरून येणारे वारे )फारच जोरात आहे . स्पीड ..वाऱ्याची ..किती….15 mph …बापरे !! असीम आपण ह्यामुळे फक्त 482 mph च्या स्पीड ने जात आहोत ……हे वारे आपल्याला त्रास देणार .अशाने आपले रेकॉर्ड वेळेत होणार नाही ”
विमानाला हवा तितका वेग घेता येत नव्हता त्यामुळे अंगद अस्वस्थ झाला होता .
” रेकॉर्ड पेक्षा सगळे सुरक्षित पोहोचणे जास्त गरजेचे आहे ,अंगद . ओह गॉड !! त्यात प्रचंड धुकं !! वायपर्स ऑन कर अंगद !! ….मी पूर्ण थ्रोटल दिलाय …तरी ..नो ..नो ..हे आज ऐकत कस नाहीये ….”
” प्रेशर किती आहे ? “
” 13 psi ..”
” काय करतोस असीम ..pressure कमी कर ……आपण 30000 फूट वर आहोत …कमी कर प्रेशर !! थोडा त्रास होईल …..पण …..स्टेबल ठेव क्राफ्ट “
असीम नि प्रेशर 11 psi केलं …थोड्याच वेळात
मागे आरडा ओरड सुरू झाला होता …बिना मल्होत्रा ,आणि mr. चॅपेल डोकं धरून बसले होते … त्यांना गरगरत होते …रंजन ताबडतोब आला …त्याने डॉ .सतीश यांना विनंती केलीकी कुणाला लागल्यास त्यांनी मदत करावी….डॉ सतीश यांनी वरून आपली व्हॅनिटी काढली …आणि ते मदतीला लागले ..श्री मल्होत्रांना उलट्या सुरू झाल्या …..
ऑक्सिजन मास्क खाली ओढण्यात आले ….काही जणांनी मास्क लावून घेतले ….
अशाच तक्रारी बिझनेस क्लास मधून पण यायला लागल्या ..तिथे विनी आणि झुबेर परिस्थिती सांभाळत होते …..
कॉकपिट मध्ये कॅप्टन्स चिंतेत पडले होते …
” अंगद , काय करायचं ? इराणच्या थ्रू आपल्या टॉवर ला जोडून घेतलंय … संघवी सरांचे म्हणणं की हीच अवस्था अजून तीन तास तरी असेल …”
” We are not going to abort !!!!!”
” मी कुठे म्हणतोय अबोर्ट करायचं …..पण मला वाटतं .की आपण……..” असिमच्या डोक्यात काही आले होते ,तो म्हणाला ,
” तू थोडा वेळ एकटा हँडल करशील का? मी तुझ्या मदतीला रंजन ला पाठवतो ..”
( एरवी लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल ला दोन पेक्षा जास्त पायलट असतात )
असीम बाहेर आला ..त्याने सगळ्यांना दिलासा दिला की ह्या अवस्थेतून आपण लवकर बाहेर येऊ …..पायलट्स वर विश्वास ठेवा …सगळे सीट बेल्ट घट्ट बांधून बसा ..शक्यतो डोळे बंद ठेवा .. हे वादळ लवकरच शमणार आहे ……पण मनातून तो साशंक होता .विमानाला खूप हेलकावे बसत होते ..चीरकण्याचा आवाज त्याची तीव्रता वाढवत होता . लीला शहा चे डोळे लाल झाले होते …डोकं भयंकर जड झालं होतं ..आणखीन एक पन्नाशीचे गृहस्थ होते त्यांचं BP वाढलं आणि त्यांना त्रास होऊ लागला …
मनाशी काही ठरवून
असीम मागे रेस्ट रूम मध्ये गेला ..त्याला माहीला काही गोष्टी कळवायच्या होत्या .. फोन लागणे शक्य नव्हते ,म्हणून त्याने …..
..i मेसेज केला …………….तीचे उत्तर येत होते…..ते सुरू असतानाच ..रंजन घाबरून धावतच तिथे आला ..
” सर , अंगद सरांनी ताबडतोब बोलावलंय “
असीम तडक कॉकपीट मध्ये गेला …
” ओह नो s s ” तो ओरडला .
फ्युएल लिकेज इंडिकेटर …बी sप ..बी sप सिग्नल देत होते …..सेन्सर लाल लाईट फेकत होता …..
क्रमश:
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
बापरे !!भयंकर परिस्थिती ….पुढे काय होणार ?
Exciting
Interesting…. waiting for next
Ohh.. next part pls !
All parts posted
Interesting
Thank you
Exciting
Thank you