आज_जाने_कि_जिद_ना_करो….12
आधीच्या भागाची लिंक- आज_जाने_कि_जिद_ना_करो…..11
आज_जाने_कि_जिद_ना_करो….12
वक्त कि कैद में… जिंदगी हैं मगर…
चंद घडियां.. यही हैं. जों आज़ाद हैं…
इनको खोकर कहीं..
जानेजा… उम्रभर… ना..तरसते रहों…
जाने कि जिद ना करों …
वाळूच घड्याळ…. किती खरंय… आपल्या आयुष्यात ह्या ओळीं प्रमाणेच घटना घडतायत…
नील ला प्रथम भेटलो.. आणि तो आवडला… अचानक त्यानं कडलींग साठी विचारलं… आपण प्रामाणिक होतो… पण काहीं क्षण आपण ही वाहवत गेलोच कि…… तो उठून गेला… आपण आतून तुटलो… का? कशासाठी? काय शोधतोय आपण त्याच्यात?… काल तो अचानक आला… आणि कांहीं क्षण ह्या गाण्याप्रमाणे तो ही मनसोक्त जगला…. त्याचं काहीच चुकलं नाही… केवळ तो थोडा ऍग्रेसिव्ह झाला म्हणून राग येतोय… पण छे… राग नाही आला. उलट त्याला शांत करायला ही थेरपीच उपयोगी पडली..
तिचं हे आरशात पाहून स्वगत चालू असतानाच दाराची बेल वाजली.. आत्ता कोण? अरे बापरे… दहा वाजले कि…
तो अरहं आला कि काय?… अजून तसेच आहोत आपण.. शॉवर गाऊन मधे…. आणि हा मिऱ्या ही निघून गेलाय… पुन्हा बेल…
मनु जरा चिडलीच…. अरे हो रे बाबा…. थांब कि…
म्हणतं.. एकी कडे शॉर्ट्स चढवल्या… दुसरीकडे सॅंडो अडकवत ती दार उघडायला गेली… तिचे ओले केस… त्यातून तिच्या चेहेऱ्या वर आलेले थेंब… गुलाबी ओठ आणि ते मोहक सौष्ठव…
या ही परिस्थितीत तिनं हसूनच स्वागत केलं… आणि त्याला पटकन चेंज करून येते… असं म्हणत वळली… पण हा ही… नको.. आहात तशा छान दिसताय म्हणाला… ती वळली आणि कॅमेरा सरसावून बसलेला तो… एक कॅन्डीड टिपून मोकळा झाला…
आं… अरे पण… लगेच फोटो… थांब तरी… आले मी आवरून… म्हणत ती आत गेली…. मस्त लॉन्ग फ्रॉक घालून आली… गुलबक्षी आणि पिवळ्या रंगाची नाजूक नक्षी होती त्यावर… तिनं केस ओलेच होते म्हणून मोकळे सोडले होते… कानात.. गळ्यात रुबी चे टॉप्स आणि पेंडंट… हातात तिचं फेव्हरेट स्वरोस्की च डायमंड वॉच…
ती समोर बसली…. तिचं बसताना… त्याच्या समोर काही कुकीज आणि कॉफी ठेवली…
मग तिनं बोलायला सुरुवात केली… बोला नेमका कशासाठी माझा इंटरव्यू हवाय?…
अरहं नी तिला सांगितलं… कि तो UK.. USA च्या पेज 3 च्या मासिक आणि पेपर साठी लिहितो आणि आता BBC जॉईन केलंय…आता सध्या तो रातोरात सेलेब्रिटी होणाऱ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतो….
अरहं आज फिकट पिवळ्या रंगाचा टी शर्ट आणि डार्क ब्लु डेनिम घालून आला होता… कानात महागडे हेडफोन्स… हातात लेन्स वाला कॅमेरा..
त्यानं विचारायला सुरुवात केली…
तुमच पूर्ण नाव… मनवा…
नो सरनेम?
नो..
कांही कारण?
खाजगी आहे…
ओक्के… तुमच शिक्षण… सायकॉलॉजि…
ही नवीन थेरपी कशी सुचली? अरहं नी विषयाला हात घातला…
“वेल..
एशियन देशात… कडलींग हे खूप नॉर्मल आहे..
पण इथे माणसाला स्वतः साठी ही वेळ नसतो… मग एक प्रकारची स्पर्शाची भूक असते आणि ती जर भागली तर त्याची एन्झायटी.. चिडचिड.. राग कमी करू शकते.. डिप्रेशन मधून बाहेर यायला…. मदत करू शकते… म्हणून… ”
काही स्पेसिफिक गोष्टी कराव्या लागल्या का? हे शिकायला … अरहं.. तिला एकटक पाहात होता…
मनू अत्यंत प्रोफेशनली हे प्रश्न हाताळत होती…
“नाही… शिकावं लागत नाही… पण मनावरचा संयम महत्वाचा… जसं तुम्ही तुमच्या मुलांना… पेटस ना.. जवळ घेताना एका शांत मनस्थितीत असता… प्रेम व्यक्त करता.. तसच पण थोडं संयमित स्वरूपाच..”
ह्या थेरपीचे कॉपी राइट्स उद्या कुणी व्हेंचर मधे मागितले तर तुम्ही तयार आहात? अरहं नी थेट एखाद्या बिझनेस मन सारखा प्रश्न विचारला….
मनु काही क्षण थांबली .. मग तिला कालच्या पत्राची आठवण आली… डॉ त्रिवर नी तिला आगाऊ सूचना दिली होती …
एखादं बिझनेस डिल आलं तर झटकन नाकारू नको… ओह्ह काल आपण ही ओळ सहज वाचून सोडून दिली… पण आता कळतंय त्या माग काय चाललंय राजकारण…
मनु नी थोडं डिप्लोमॅट उत्तर दिलं…
अजून अशी ऑफर आली नाही.. आणि म्हणून विचार नाही केला…
आता ती अजून सावधपणे प्रश्न ऐकू लागली…
पण तिचा बदललेला चेहरा… अरहं नी बरोबर टिपला…
आता काही फ़ोटोज साठी त्यानी विनंती केली….
तिनं ही फ़ोटोज काढू दिले…
आणि मग तो जायला उठला…
त्यानं सेशन साठी वेळ मागितली आणि तिनं परवा ठरवू म्हणून सांगितलं..
आणि तो निघून गेला …
——————————
तो गेला आणि मनवा नी परत ते पाकीट शोधायला घेतलं… पण न सापडून तिनं मिहीर ला कॉल केला…
तर तो म्हणाला… अगं तूच म्हणालीस ना त्यात लिगल पेपर’स आहेत म्हणून मी ते नरेश कडे दिलंय…
बर बर… म्हणतं तिनं नरेश ला फोन केला…
नरेश नेमका मेयर ऑफिस मधे होता…
तिचा कॉल येताच बाहेर आला… बोल ग…
अरे मिहीर जे पाकीट दिलंय ते पाहिलंस का?
हो अगं.. लेटर्स नाही वाचली पण फॉर्म्स चाळलेत… बोलतो नंतर… मीटिंग चालू होईल… बाय…
म्हणतं कट केला…
काय करावं… असं म्हणतं ती बाहेर गार्डन मधे आली..
******************************
आणि तिचा फोन वाजला… डॉ रमण…
येस डॉक.. बोला..
कशी आहेस मनवा…?
मी मस्त आहे सर… तुम्ही कसे आहात?..
मला थोडं बोलायचं होत… आणि जमलं तर सेशन ही हवय… आज वेळ आहे का?
सॉरी मला माहितीये तु मागच्या वेळी खूपच शॉर्ट नोटीस वर हो म्हणालीस…
Its ok सर..
या तुम्ही… भेटूयात…
Ok अर्ध्या तासात येतो… thank u soo much .. म्हणत त्यानी फोन ठेवला…
मनू पुन्हा जाऊन जीन्स आणि लॉन्ग टॉप घालून तयार झाली… आजचा टॉप डार्क पिंक बेज कलर ची जीन्स होती… टॉप.. कॉलर नेक चा होता..
व्रण लपवायची गरज होती…
डॉक्टर आले… आणि बाहेर सोफ्यावर बसले… बाहेरून आतली थेरपी रूम दिसत होती.. दार अर्धवट उघडं होत… मनू समोर येऊन बसली तरी ते आतच पाहात होते…
काय चाललंय यांच्या मनात? असा विचार करत असतानाच त्यांनी समोर पाहिलं…
ओह सॉरी… मनवा… माझं लक्ष नव्हतं…
हरकत नाही.. सर… बोला…
मी रेवा बद्दल बोलणार आहे..
ओके.
सांगा ..
रेवा आता खूपच जवाबदारीनं वागते.. आणि आमचं रिलेशन ही नॉर्मल झालय… thanks to u…
Thats my job sir… मनु नम्रपणे म्हणाली ..
तसं डॉ नी घड्याळात पाहिलं ..
काय झालं.. उशीर होतोय का तुम्हाला..?
नाही.. म्हणजे.. सेशन झाल्यावर बोलू का मी?
मनु ला ती अधीरता जाणवत होती…
पण तरी ही ती शांत होती…
ओके हरकत नाही… येणाऱ्या प्रत्येकाला कसं शांत करायचं… हेच तर काम होत तिचं ..
ती रेकॉडिंग ऑन करून आत गेली… डॉ मागून आले.. आज दार त्यांनी लावलं..
तिनं त्यांना खुर्ची वर बसवलं… आणि खांदे अलगद दाबू लागली… मग तिनं कपाळावरून मानेपर्यंत अलगद बोटं फ़िरवायला सुरुवात केली… डॉ नी खुर्ची वरच्या हातांची पकड घट्ट केली… आणि मग तिनं हलकेच बोटांमध्ये तिची नाजूक बोटं गुंफली….
आणि ती त्यांच्या डोळयात पाहू लागली…
ती मागे सरकली..
#काय दिसलं तिला डॉ च्या डोळ्यात?
नरेश ते पत्र वाचेल का?
अरहं चा इंटरव्ह्यू प्लॅन यशस्वी झालाय?
क्रमश:
©मानसी
पुढील भागाची लिंक- आज_जाने_कि_जिद_ना_करो….13
mage by David Bruyland from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Pingback: आज_जाने_कि_जिद_ना_करो…..11 – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Khup ch chan chaliy story pratek veli pudhe Kay ha prashn padatoy
Thanks अ tonn😍😍
Pingback: आज_जाने_कि_जिद_ना_करो….13 – LekhakOnline – Excellent Marathi Articles