उडाण- भाग 5
……बी sप बी sप आवाज करत फ्युएल लिकेज इंडिकेटर ने लाल लाईट दाखवला …..
असीम आणि अंगद नि काळजीने एकमेकांकडे बघितलं …..
******* माही ला असीमचा iमेसेज मिळाला होता . तीने ताबडतोब वर्ल्ड वेदर सेंटर ला कॉन्टॅक्ट केला ……इस्टर्न वे ला वाऱ्याचा वेग ,आणि काही शंका दूर केल्या . असीम ने सांगितल्या प्रमाणे त्यांना हेडविंड चा त्रास होत होता…… वेस्टर्न वे ला वारे समोरून वाहात होते ….प्लेन पश्चिमे कडे जातंय …पृथ्वी पश्चिमे कडून पूर्व दिशेला फिरते ….मग आपण पश्चिमे ऐवजी पूर्वेकडे गेल्यास…….
असिमने खूप डोके लावले होते ……तिला आपला प्लॅन सांगितला होता…आता तिला बाकीचे काम करायचे होते .
***** अचानक असीम म्हणाला ,
” अंगद आपण विमान उलट्या दिशेने फिरवू . “
” व्हॉट ? Have you lost it?”
” नीट ऐक ! माहीने मेसेज केलाय …आपल्याला उलट्या दिशेने म्हणजे इस्टर्न वे ने गेल्यास पूशिंग टेलविंड मिळतोय !!! आपण प्लेन फिरवले तर मागून जबरदस्त वाऱ्याचा वेग आहे ,86 mph चा .ते वारेच आपल्याला मागून ढकलत नेईल . इंजिन आणि वारे मिळून अँप्रोक्स 582 mph च्या स्पीड नि आपण जाऊ शकू …बोल पट्कन !! ” असीम चे डोळे ह्या कल्पनेने चमकत होते ….
अंगद ला त्याची आयडीया भन्नाट वाटली ,पण शेवटी फ्युएल लिकेज चा प्रॉब्लेम होताच ना !!
” असीम ,तुझं म्हणण की आता नॉर्थ अटलांटिक ओशन ऐवजी नॉर्थ पॅसिफिक वरून जायचं !!! Wow !! “”
आला ..आला…आला….कॅप्टन संघवीचा रेडिओ संदेश ..आला…इराण कंट्रोल स्टेशन ने भारताला विमानाशी जोडून दिले होते…..
” बॉईस !! I am proud of you !! You are incredible !! म्हणजे तुम्ही आता रशिया वरून जाणार …मी हाय कमांड शी बोललो ….रशीया , कजाकीस्तान ची वायू हद्द तुम्हाला ओलांडायला परवानगी मिळेल ,चिंता नाही …..पण चुकूनही चायना च्या हद्दीत जाऊ नका ….ते लोकं फार अडेलतट्टू आहेत . ऑल द बेस्ट !! “
विमान पुर्ण वळवून उलट दिशेला निघाले होते …आतला हवेचा दाब ही बऱ्यापैकी नॉर्मल झाला होता .
असीम पुन्हा बाहेर आला .सगळ्यांना म्हणाला,
” हॅलो टू ऑल …ईश्वर कृपेने आपण ह्या अवघड परिस्थिती तुन बाहेर आलो आहोत ,आता सगळ्यांनी सीट बेल्ट सोडायला हरकत नाही …..एंजॉय करा तुमचा प्रवास . तुमच्या सहकार्या बद्दल धन्यवाद “
सगळ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला ..बंटी ने स्वतः चे चॉकलेट असीम ला देऊ केले ………पण असीम काळजीतच होता कारण अजून खुप मोठ्या संकटा चा सामना बाकी होता ….
….दुपारचे जेवण आटोपून प्रवासी पेंगुळले होते . अंगद ही रेस्ट रूम मध्ये थोडी पाठ टेकायला गेला होता .
असीम सारखा फ्युएल डिटेक्टर कडे लक्ष ठेऊन होता ..आता विमानाचा वेग होता..540 mph , उंची 26000 फूट , प्रेशर 12 psi , आणि बापरे ! हे …हे ..काय ?
हा निळा लाईट ….नायट्रोजन गळती ? गॉड !!!! थोड्याश्या ही स्पार्क ने फ्युएल लीक मुळे विमान पेटू शकते , आणी शिवाय नायट्रोजन ही लीक होतोय ….म्हणजे लँडिंग करावे लागले तर तिथेही संकट ……. अरे देवा .!!!!
( विमानाच्या चाकात ट्यूब मध्ये नायट्रोजन असतो . फ्युएल लीक टेस्ट ला नायट्रोजन वापरतात.हा वायू पेट घेत नाही . )
******** माही ने ग्रुप कमांडर ला सगळी परिस्थिती सांगितली ..एअर मार्शल तेजन सिंग नि तातडीची मीटिंग बोलावली होती …….रशियन फोर्स ची परवानगी मिळाली होती . आत्ता
बोइंग 777 पुन्हा उलटे फिरून वापस निघाले होते ….रशीयातील भारतीय
वकीलातीने भराभरा सूत्र हलवले होते .शेवटी सगळ्या गोष्टी प्रोटोकॉल प्रमाणेच व्हायला हव्या .
****** बोइंग 777 ला दोन इंजिन होते , दोन विंग्स वर …..प्रत्येक इंजिन ला एक फ्युएल टॅंक ……एक फ्युएल टॅंक गळत होता … …असीम ह्यावर विचार करत होता ….तो म्हणाला ,
” आतापर्यंत चाळीस टक्के फ्युएल सांडले असणार ..म्हणजे ह्या वेगाने दोन तासात एक टॅंक अलमोस्ट रिकामा होणार …फक्त एका इंजिन वर क्राफ्ट उडवता येते , पण कमी उंची वर ….आणि मग आपल्याला वेग नाही घेता येणार …”
” पण मग रेकॉर्ड कसे होणार ? नाही असीम , वेग पण जास्त ठेव आणि उंची पण “
” अंगद , रेकॉर्ड तेव्हा होईल न ,जेव्हा आपण जिवंत राहू !!!”
” मी मरणाची भाषा जाणतच नाही !! ते माहीत नाही , बोल सरांशी ,आणि घे 30000 वर !!! “
” विसरू नकोस आपल्या व्यतिरिक्त 265 लोकं आहेत , जे आपल्या स्किल वर विश्वास ठेवून त्यांचा जीव आपल्या ताब्यात देतात !! “
” शंभर टक्के !! पण आपण तो विश्वास कमावलाय आपल्या एक्स्परटाईझ ने !!! “
आणि अचानक फ्लाईट डेक मध्ये सायरन वाजायला लागला …दोघे वाट बघत होते ……झुबेर वेगात आत आला ” कॅप्टन , मी खाली लगेज स्टोअर मध्ये होतो , मीच सायरन ऑन केला …टेल एन्ड कडून धूर दिसतोय !!!!! “
इतरांना न जाणवू देता , अंगद मागे गेला …..थर्मो वॉलव्ह मधून खरच धूर येत होता … त्याने झुबेर ला काहीही न बोलण्याची ताकीद दिली .
दोघे खूप खटपट करत होते , रेडिओ संकेत देण्याचे …पण रेंजच मिळत नव्हती ..आता मात्र बाब गंभीर होती …कांय करावं ?…. विना परवानगी विमान खाली उतरवून पठारावर लँडिंग करावं असे दोघांनाही वाटत होते ..त्यातही खूपच धोका होता … पण खूप जणांचे प्राण पणाला लावण्यापेक्षा लँडिंग करू …काही जीव तरी वाचतील ……शिवाय 777 चा लँडिंग चा इतिहास खूप चांगला होता ….
…….किती जिद्दीने आपण ही मोहीम आखली , परवानगी मिळाली ,प्रवासी तयार झाले ,आणि आता ह्या टप्प्यावर इतके मोठे संकट ?
” ,असीम , असं केलं तर ? आपण नॉर्थ पॅसिफिक वरती गेलो की विमान थोडं खाली उतरवू , प्रवासी पॅराशूट नि उतरतील , स्टाफ ट्रेण्ड आहे , ते सगळ्याना सुरक्षित बाहेर काढतील ,आणि आपण शेवटापर्यंत जाऊ ,मोहीम पूर्ण करू “
” No way !!!! हे मला मुळीच मान्य नाही , खाली लाईफ सेविंग बोट्स कोण ठेवणार ? रशीयन्स ??? बघ नेव्हिगटर
बघ !! आलो आपण रशीया पर्यंत बघ काय स्पीड नि आलो आपण !! “
धूर खूप वाढला आणि तो खिडकीतून दिसायला लागला …डेक वर कुठलेही सिग्नल न देता !!! म्हणजे फक्त इंजिन नाही तर आणखी कुठे आग लागली होती …( फक्त इंजिन ला आग लागली तर विमानाला धोका नसतो )
” आपल्याकडे fire isolation सिस्टीम आहे , मग हे कसं झालं असेल ? ” असीम म्हणाला ..
विमानाच्या वेगामुळे आग पसरायला लागली ..दोघे पायलट्स जीवतोड प्रयत्न करत होते की विमानाची स्वतःची fire fighting प्रणाली वापरून आग आटोक्यात आणावी …….
विनी , सिया प्रवाशांना धीर देत होत्या ..रंजन ,झुबेर पाण्याचे पंप सुरू करायचा प्रयत्न करत होते ……पण आज नशीब साथ देत नव्हते ……
पुन्हा एकच गोंधळ सुरू झाला , कुणी रडतय , कुणी पायलट ला शिव्या घालतय , काहींनी देवाची प्रार्थना सुरू केली …श्री व सौ मल्होत्रानी तर निर्वाणीचे बोलणे सुरू केले …….
आणी ..आणि ..
…………अचानक एक मोठे इंडियन एअरफोर्स चे मालवाहू विमान त्यांच्या दिशेने झेपावले …..त्यात 15 t पाण्याचा साठा होता ….21 आग विरोधी हेलिकॉप्टर वाहून आणतील इतका मोठा साठा !!!! ..
त्या विमानाने चार पंपाच्या साहाय्याने पाणी मारायला सुरुवात केली …
……अंगद आणि असीम आश्चर्य करत असतांनाच ते विमान समतल आले ….पायलट होती ,माही दत्ता !!!
इंडियन एअरफोर्स ऑफिसर माही दत्ता !!!!!
बोइंग 777 ची आग काही मिनिटात आटोक्यात आली होती …
त्या विमानात इतकी सुसज्ज यंत्रणा होती , की लगेच वाय फाय रेडिओ कनेकशन मिळाले ….
” हॅलो 777 , धिस इस कॅप्टन माही दत्ता . …डू …यु …गेट मी ?”
” hey ! ऑफिसर !! फायनली …यु आर हिअर !! ” असीम आत्यंतिक आनंदाने ओरडला ..
” रशियाच्या डॉप्लर रडार ने 777 चा धूर डिटेक्ट केला ,आणि काही तासांपूर्वी आपले i मेसेज द्वारा बोलणे झाले होते ….आता त्यानुसार आम्ही ऑन एअर फ्युएलिंग करणार आहोत …..ओव्हर “
” अंगद , आता आपल्याला त्यांच्या सुचने प्रमाणे flight पोसिशन करावी लागणार ” असीम म्हणाला .
” कॅप्टन असीम , लेफ्ट आर्म टॅंक व्हॉल्व्ह ओपन करा , 10 डिग्री उजवीकडे फ्लिप करा ……हा…Correct.!!! आता स्पीड फक्त 340 mph ठेवा ….नो..नो…तुम्ही वर जाताय …
…..50 फूट खाली या ….हा…आता …पुन्हा फ्लिप घ्या …बस !! हीच पोझिशन ,स्पीड लॉक करा ….”
सगळे प्रवासी जीव मुठीत घेऊन हा थरार बघत होते . .
IAF च्या फ्लाईट मधून फ्लेक्सि पाईप बाहेर आला ,त्यांचे निष्णात टेक्निशियन सोबत होते , त्यांनी पाईप बरोबर पोसिशन केला , ओपन व्हॉल्व्ह वर एक कॅप फिट झाली ,आणि काही मिनिटातच फ्युएल टॅंक पुन्हा भरला . त्या पाईप सोबत एक नोझल होते, त्यातून सिलंट बाहेर आले आणि टॅंक वर एक जाड थर लावण्यात आला …….लिकेज सील साठी .
असीम पूर्ण ताकद लावून थ्रोटल , स्पीड कंट्रोल आणि सिस्टिम सांभाळत होता ..अंगद सगळे इंपुट्स देत होता …
पाईप अगदी सराईतपणे पुन्हा वापस ओढून घेण्यात आला ..
” कॅप्टन 777 , फुएलिंग डन !! आम्ही लिकेज सील केले आहे , व्हॉल्व्ह बंद करू शकता .”
अंगद अतिशय एक्साईटेड आवाजात म्हणाला , ” ग्रेट जॉब कॅप्टन !!! We are proud of Indian एअर फोर्स अँड युअर unrivalled ब्रेव्हरी ,we सॅल्युट यु !!!..ओव्हर “
माही ने दीर्घ श्वास घेतला …गेल्या अनेक तासांचे प्रचंड दडपण दूर झाले होते , ती म्हणाली ,
” कॅप्टन अंगद , लिसन ,तुमच्या कडे इअरफोन शाबूत असतील तर कॅप्टन असीम ला द्या प्लिज “
असीम ने इअरफोन कानाला लावले ..त्याच्या डोक्यावरचा ताण मोकळा झाला होता ..त्याची माही आली होती आज देवदूत बनून …त्याने जीवाचे कान केले …
” हाय ..ऑफी……”( त्याचा गळा दाटून आला होता ) ..गालावर अश्रू ओघळायला लागले …तो म्हणाला ,
” say it dear !!!! I am dying to hear !!! “
” वा रे !! तूच म्हणतोस न जंग मर के नही जीके जिती जाती है .हां ? ……
आय लव यु असीम ,आय जस्ट ब्लडी लव यु s s “
” आय टू s लव यु डिअर s ” असीम गहिवरून म्हणाला .
क्षणात एक दिमासखदार वळण घेत माहीचे विमान दूर उडाले ….तीला पुन्हा रशिया बेस कंट्रोल गाठायचे होते …..
बोइंग 777 नि पुन्हा आपला 582 mph चा वेग घेतला , आणि झेप घेऊन निघाले सगळ्या जगाला मागे टाकून एक विस्मयकारक विक्रम सुरक्षित पणे
पूर्ण करायला !!!! ( समाप्त )
© अपर्णा देशपांडे
विमानाच्या तांत्रिक बाबींसाठी काही पुस्तकांचा आधार घेतला आहे.
Image by PublicDomainPictures from Pixabay
Latest posts by Aparna Deshpande (see all)
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
खूपच सुंदर कथा 👌👌
धन्यवाद