सोबत
आशाचा कॉल.. आणि तो ही लॉक डाउन मधे?
गायत्रीनं कॉल घेतला… बोल गं… काय झालं.. सगळं ठीक आहे ना…
आशा.. काय सांगू ताई.. आणि ती रडायलाच लागली..
गायत्री. अगं बोल तरी… काय झालंय… रडू नको..
शांत हो… बोल बाळा..
आशा.. ताई… माझा नवरा गेला..
गायत्री… काय?.. कसं झालं… आणि तू कुठे आहेस?
आशा.. मी इथे पुण्यातच आहे.. कोरोनानी नाई ताई… हार्ट अटॅक नी गेला हो…
माझा नवरा…. आशाच्या रडण्यान काळीज पिळवटून निघालं…
आशा…. ही गायत्री कडे कामाला यायची… चुणचुणीत, बोलकी, ठेंगणी, तीन पोरांची आई असूनही शिडशिडीत… कदाचित कामाचा राडा खूपच ओढल्याने..
घरी नवरा, सासू, आणि 3 पोरं… दोन मुली आणि एक मुलगा..
तर आता लोकडाऊन मधे गायत्री बाहेर गावी अडकली होती… अर्थात तिचं सगळं कुटुंबच… कुटुंब म्हणजे… ती आणि तिचा मुलगा… एकल पालकत्व…
तर मदतीसाठी आशा नी फोन केला.. तिच्या बँक अकॉउंट ला पैसे पाठवले… पण खरी गरज होती आधाराची…आशाचे नातलग ही येऊ शकत नव्हते… आणि तिची हक्काची मालकीण ही…
आशा ला ती बाहेर गावी असल्याच सांगितल्यामुळे ती अधिकच रडायला लागली… इकडे गायत्रीला ही चैन पडेना… तिने तात्काळ पास साठी अर्ज केला.. आशा कडून तिच्या नवऱ्याचं मृत्यू दाखला आणि मेडिकल रिपोर्ट मागवले..
आणि मग सुरु झाला एक प्रवास…
आधी तिचा अर्ज फेटाळला… मग पुन्हा अर्ज… मग जिल्हाधिकारी ऑफिसात खेटे मारले.. शेवटी त्यांना समजावून सांगितलं…
जरी ती माझी मोलकरीण असली तरी माझा ती आधार आहे… माझी सोबत आहे..
आणि माणुसकीच्या नात्यानं आजवर कित्येकदा तिने मला साथ दिलीये… मला जाऊद्या… ही विनंती करताना गायत्री ने हात जोडले… डोळ्यातलं पाणी आणि जोडलेले पाणि ह्याच्या समोर अधिकाऱ्याचा नाईलाज झाला… मनातला सच्चा भाव जिंकला…
ती घरी पोचली आशा ला फोन लावला… मुलाची सोय आईकडे लावून… आशा बरोबर lic, बँक पोस्ट ऑफिस जिथे जिथे त्याची खाती बचत होती ती, तिथे तिला घेऊन गेली… मिळालेली मिळकत तिच्या नावावर बँकेत जमा झाली… मग तिचे आईवडील सासू ह्यांना समोर बसवून वर्षभराने तिचं लग्न लावून द्या म्हणून समजावलं..
काही महिने असेच गेले… आशा आता सावरली होती…
मधल्या काळात गायत्री आणि तिचा नवरा अबीर ह्यांच्यातला वाद वाढत होता.. त्याच बेताल वागणं, आरवला त्यांच्या मुलाला वेळ नं देणं, लॉकडाऊन आधी पासूनच घर सोडून वेगळं राहणं, पैशाचे गैर व्यवहार करून कर्ज बाजारी होणं… सगळंच इतकं वेदनादायक होतं की ती आता वेगळं होण्याचा विचार करू लागली… तो तर आधी पासूनच जबाबदारी टाळणारा होता… त्याला आयत कारण मिळाल… कोर्टात केस उभी राहिली… आणि… त्यात ही काही महिने गेले…
गायत्रीच्या घटस्फोटाची आज शेवटची तारीख होती.. सह्या झाल्या… ती कोर्टाच्या बाहेर आली… तो समोरून जाई पर्यंत ती निवांत हसत खेळत नॉर्मल होती… तो गाडी काढून वळला तशी ती पार्किंग मधल्या कट्ट्यावर जाऊन बसली… अन न बोलता अश्रूंना वाट मोकळी करून दिली… केवळ त्याच्या आततायी स्वभावामुळेच हे नातं तुटल होतं.
थोड्या वेळानी आशा घरी पोचली तेव्हा गायत्री नुकतीच आत येऊन बसलेली दिसली..
तिच्या पाठोपाठ तो आत आला… गायत्रीला वाटलं… काही सामान न्यायचं असेल…
पण तो थेट गायत्री च्या पायापाशी येऊन बसला…
अबीर… उठ… पायाशी काय बसतोयस..
गायत्री…. मी चुकलो… मला माफ कर…
इतकी वर्ष मी बेफिकीर वागलो.. तुझी आपल्या आरव ची पर्वा केली नाही… तरी ही तू धीराची… न बोलता हा संसार एकटीने पेललास..
माझाच हट्ट म्हणून घटस्फोट ही झाला…
पण आज आशा नं माझे डोळे उघडले…
ती कोर्टाबाहेर आली होती… मला थांबवून तिच्या घरी तिच्या वस्तीत नेल..
तिचा उघड्यावर पडलेला संसार, ती केविलवाणी पिल्लं आणि त्या भकास डोळ्यांच्या माऊलीला पाहून इतकंच विचारलं… साहेब.. आमच्या ताई इतक्या वाईट आहेत का.? . त्यांना, पोटच्या पोराला सोडून तुम्ही खरच सुखात राहाल का? आज जोर आहे तोवर मजा माराल… पण जर माझ्या नवऱ्याच्या जागी मी गेले असते तर हे सगळे कसे जगले असते? आज बाप नाई, मला नवरा नाई.. हिला मुलगा नाई… आम्ही गरीब अडाणी आहोत.. पण समाजात वावरताना हक्काची सोबत लागते, भले पांगळा आंधळा असू दे, नको कमवू दे, पण घराला घर बनवायला जशी बाई लागते तसं ते घर टिकवायला बाप्या बी लागतोच… पोरांचा, म्हाताऱ्या आई बापाचा आणि त्या बायकोचा तो भक्कम आधार असतो… सोबत असते…
जवानीचे चार दिवस जातील पण नंतर ताईच आठवतील…
नका सुखासुखी संसार मोडू…
माझा मोडलेला संसार बगा…
मला नव्यानं मांडावा लागेलं.. पण घरातल्या पुरुषाशिवाय तो अधूराच असेल..
गायत्री मी खरंच वचन देतो… हे वर्षंभर माझी वागणूक बघ.. आणि मगच तुला नाही पटल तर आपण वेगळे होऊ… पण एक संधी दे… तुझी गमावलेली सोबत परत मिळवण्याची….
आशा नी तिच्या लाडक्या ताईचा हात तिच्या नवऱ्याच्या हातात दिला… आणि भरल्या डोळ्यांनी निरोप घेतला…
समाप्त
Image by Alexandra Haynak from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Nice
chhan
Thank you sir 🌹🌹
Cgan
छान. डोळ्यातले पाणी आणि जोडलेले पाणि… छानच
Thank u ♥️♥️♥️🍫🍫🍫