गैरसमज…
डोळ्यांनी दिसतं ते आणि तेच खरं असेलच असं नाही…
मी डोंबिवलीला एका क्लासमधे FY-SY च्या मुलांना शिकवत असे…
आजोळ मुलुंडला असल्यामुळे बऱ्याचदा मुलुंडला जाणं होत असे…
असंच एकदा मी मुलुंडला गेले होते…
आणि डोंबिवलीला संध्याकाळी पाचाचं लेक्चर होतं…
त्या अंदाजाने मी निघाले मुलुंडहून…
ट्रेनने डोंबिवलीला आले…
प्लॅटफॉर्मवर उतरले…
आणि ब्रिज चढायला सुरवात केली…
वरती आल्यावर लेडीज टीसी दिसल्या…
मी आपलं पर्समधून तिकीट काढलं त्यांना दाखवायला…
जरा पुढे गेले आणि त्यांचा चेहरा निट बघितला…
ओळखीच्या वाटल्या…
त्यांनासुद्धा मी ओळखीची वाटले…
जवळ आल्यावर त्या मला म्हणाल्या..अगं किती मोठी झालीस तू…
एवढीशी बघितली होती तुला…
आमची सोनू आणि तू दहावीपर्यंत अगदी एका बाकावर बसायच्यात…
सोनू..मेरी बचपन की सहेली…
तिची आई आहे…
मग बाकी सगळी विचारपूस सुरू झाली…
तर त्या म्हणाल्या..चल आपण चहा पिऊ…
कित्ती दिवसांनी भेटलीस…
चहा प्यायल्याशिवाय मी तुला सोडणार नाही…
त्या माझा हात धरून मला नेत होत्या आणि मी नको नको म्हणत होते…
मला लेक्चरला उशीर होईल..आपण नंतर कधीतरी चहा पिऊ..असं मी त्यांना म्हणत होते…
पण त्या ऐकतच नव्हत्या…
मला हाताला धरून खेचत होत्या…
हे दृश्य जणू मी अपराधी असल्यासारखंच…
झाला गोंधळ…
माझ्या चार-पाच स्टुडंट्सनी हा सगळा प्रकार बघितला…
आणि नको तो समज करून घेतला…
क्लासमध्ये जाऊन बोंब ठोकली की..मॅडमजवळ बहुतेक तिकीट नाहीये…
त्यांना टीसीने पकडलय…
आज मॅडमना यायला उशीर होईल…
मी चहा नको म्हणाले आणि कसंबसं त्या टीसी मॅडमने ऐकलं…
आणि मी पाच मिनिटं उशिरा का होईना..पोचले क्लासला…
मी गेले तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या…
आणि चेहऱ्यावर अनेक प्रश्न पडलेले…
मॅडम तुम्ही तिकीट विसरलात?
मग फाईन भरलात का?
काय झालं नक्की? सांगा ना…
मला हसावं की रडावं हेच समजेना…
चार-पाच वर्षे शिकवत्ये क्लासला पण प्रसंग आल्यावर एकतर्फी प्रेमासारखं…
झाला प्रकार नाईलाजाने सांगावाच लागला…
शेवटी प्रश्न माझ्या इम्प्रेशनचा आणि स्टेटसचा होता…
मी सांगितलेलं मुलांना पटलं आणि गटलंसुद्धा…
माझ्या चेहऱ्यावर सुटकेचा आनंद…
आता मी डबलश्रीमंत…
माझं इम्प्रेशन आणि स्टेटस दोन्ही डबल झालेलं………….
Image by Gerd Altmann from Pixabay
- देवदूत…डॉक्टर आणि ड्रायव्हर - September 18, 2021
- रक्षाबंधन… - August 23, 2021
- एक ओळख..अशीही… - August 20, 2021
Bhari
Thank you 👍
👌👌
Thank you 👍