हाय वे…
बरसो रे मेघा मेघा
बरसो रे मेघा बरसो..
तुझ्या गोड गळ्यातून हे गाणं इतकं गोड वाटत होतं.. कि रेहमान नी तुला ऐकताच sign केलं असतं..
त्यानं दिलखुलास दाद दिली..
तिनं ही हसून हो क्का..बर्रर्रर्र म्हणत ती स्वीकारली..
चल.. आता जाऊयात का घरी?
10वाजून गेले..
थांब ना.. प्लीज.. 5 मिनिट..
नाही पुरत तुला.. तिनं कचकन डोळा मारला आणि त्याची धडकन वाढली..
आधीच कॅम्पातल्या ‘प्रेम्स ‘ मधे lovely डिनर डेट झाली होती आणि पार्किंग मधे हि शुकशुकाट होता..
एका नाजूक क्षणी तो अधिकच जवळ आला. हातातली डबल फिल्टर ice burst चा orange mint मिक्स फ्लेवर अलगद तिच्या टेस्टबड्स वर उतरला.. काही क्षण ते सुगंधी श्वासचषक एकमेकांवर आदळले अन नव्या स्पर्श मेहफिलीची नांदी झाली..
अचानक फोन वाजला आणि त्या क्षणी ती भानावर आली
चल.. लवकर.. माझी pg आंटी…आता नाही गेले तर ती घरी फोन करेल..
त्यानी ही बाईक बाहेर काढली .. आणि तिला मागे बसवून बुंगाट पळवली..
गुलाबी थंडीतल्या रात्री गर्लफ्रेंड ला सोडायला जाणाऱ्या हिरो चा चेहरा बघण्यासारखा असतो..
ती ही घट्ट मिठी मारून बसली होती… मागून हळूच काना पाशी कुजबुजली.. आता नाही वाजत थंडी
त्यानं गाडीचा वेग कमी केला.. आणि झटकन मागे वळून तिला kiss केलं…काही क्षण त्याची नजर रस्त्यावरून हटली…
आता मला पण नाही वाजत आहे.. म्हणत जोरात हसला आणि तिने लटक्या रागानं पाठीत हलकासा गुद्दा मारला .
आता तिचं घर समोर दिसू लागलं… थोडी लांब थांबली गाडी.. पण त्याच्या नजरेच्या टप्प्यात ती राहिलं इतकीच..
ती उतरली आणि bye गुड नाईट.. स्लीप टाइट म्हणत निघाली तसं पुन्हा तिचा हात धरून थांबवलं… ती हि जवळ आली… काही कळायच्या आत गुड नाईट kissi आता त्याच्या ओठांवर विसावली…. आणि ती लाजत हसत घराच्या दिशेनी पळाली…
ती आत पोचली.. बेडरूम चा दिवा लागला.. आणि msg आला… पोचले रे … आता तू पोचलास की msg टाक.. वाट बघतीये… 😘😘
गालावर हसू उमटलं आणि गाडी पुन्हा त्याच्या घराकडें वळली..
पोचलो गं.. msg टाकून तो बेडवर आडवा झाला …तिनं हि मेसेज वाचला आणि दोघांच्या हि मनात विचार चमकून गेला तो bike kiss करताना काहीतरी वेगळंच जाणवलं होतं……
काही महिन्यांपूर्वी त्याचं हायवे ला एक भयानक अपघात झाला होता एक कपल चा… पण त्या नंतर कधीच अपघात घडला नाही त्या हायवे वर… कारणं या जोडीनं.. असा गाडीवर रोमान्स करणाऱ्या कपल ची जवाबदारी घेतली होती ..
हायवेच्या पिंपळावर पुन्हा दोघ येऊन बसली .. आणि एकमेकांना बिलगून पुढच्या जोडीची वाट पाहू लागली…
पुन्हा एक अधुरी कहानी पूर्ण करायला…
Image by Henryk Niestrój from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
good one
मस्त.
Thank u mam😍
Thank u sir😍
Story Nice
Oh my goodness. Chan
Thank u 😍