शोध (एक रहस्य कथा )- भाग ४

आधीच्या भागाची लिंक- शोध (एक रहस्य कथा )- भाग ३

त्या पर्स मधील काही वस्तू तिच्याजवळ होत्या . असे पुरावे स्वतःजवळ ठेऊन घेणे गुन्हा ठरला असता .नंतर पोलिसात जमा करावे लागणार होते.

पण तिला बऱ्याच गोष्टी कळल्या …

रंजना शेळके , 28 वर्षे , आणि शाळेत शिक्षिका . ही शाळा आभाच्या आईच्या घराजवळच … मोबाईल फोन नव्हता …कदाचित पप्पूने विकला असेल ..  तिचं डोकं जड झालं होतं .

तिला भूक लागली होती .घरी जाऊन जेवावे म्हणून ती वर गेली .

ती जेवत असतांनाच नीताचा फोन आला …..

तिने सांगितले…..सगळा अभ्यास करून झाल्यावर तिचा निष्कर्ष होता की , मूळ फोटोत स्मिता बरोबर सतीशच होता …

……म्हणजे सतीशला ते फोटो आपलेच आहेत हे शंभर टक्के माहिती होते ….मग सतिशनीच तर ..हे  नसेल केले ! ..OMG !!!!!

हे आता नवीनच काहीतरी …बापरे !

सतिशनीच स्वतः च्या बायकोचे फोटो पेस्ट केले , ते खोटे पत्र लॉकर मध्ये ठेवले…..का ? त्याने असे का केले असेल?

तिने तिच्या जिम इन्स्ट्रक्टर ला फोन केला ….स्मिता पडली त्याच दिवशी सकाळी सतीश जिम ला गेला होता . बायकोच्या मृत्यूची खबर ऐकून कोण तासाभरात जिम ला जाईल ?

म्हणजे ते दोन पत्र पण त्यानी सकाळीच लिहिले ? जिमच्या लॉकर मध्ये ठेवले …..का? ती पुरती हादरून गेली होती.

दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आभा निवांत उठली .रुक्मिणीने चहा करून आणला . चहा पिता पिता तिच्या डोक्यात काकूंचे  म्हणजे स्मिताच्या आईचे वाक्य आले …ती म्हणाली होती ,

..मी स्मिताला फोन केला ,पण आजूबाजूला खूप आवाज होता …..

कुठून जात असेल स्मिता की इतका आवाज यावा .  प्रिंटिंग प्रेस ? …बांधकाम ?…yesss . रस्त्यात मोठं बांधकाम सुरू आहे ,आपण काल बघितलं . तिथेच काहीतरी घडले असणार .

आभा स्मिताच्या बिल्डिंग मध्ये शिरली . सतीश चा माग काढायचा होता . स्मिताच्या समोरच्या फ्लॅट मध्ये एक आजी आजोबा राहात होते .आभा पण दोन तीनदा गेली होती त्यांच्याकडे. तिने बेल वाजवली . दार आजींनी उघडलं .

” आज रविवार ,सुट्टीचा  बरा वेळ काढला ,..”

” हो आजी , मुद्दामच आलेय . स्मिता गेली त्यादिवशी बुधवारी तुम्ही इथेच होता ? ”

” हो .इथेच होतो . आंम्ही फार कमी बाहेर जातो .”

” रात्री स्मिता बाहेर पडली तेंव्हा तुम्ही तिला बघितलं का ? ”

” रात्री नाही काही , ती सकाळी दहा च्या आसपास बाहेर पडली . माझ्याकडे चाव्या ठेवल्या . कामवाली संगीता आली तर द्यायला सांगून ती आई कडे गेली . थोडी वैतागलेली होती ”

” का ?”   …,

” अग , जिवलग मैत्रिणी ना तुम्ही ? बोलली नाही तुला ? केवढं भांडण झालं दोघांचं ”

” का s य ? भांडण ?”

” हो इथं सगळं ऐकू येत होतं इतकं जोरात .!  सतीश ने त्याच्या फर्म चा खूप मोठया किमतीचा इन्शुरन्स काढला .स्मिता ला न विचारता .तिचे म्हणणे की आधी  त्या दोघांचा काढायला हवं होता . …सगळं स्पष्ट ऐकू येत आम्हाला . सुरुवात इन्शुरन्स वरून झाली , मग एकाला एक वाद वाढत गेला , कुठले कुठले विषय निघत गेले आणि तो वाद  विकोपाला गेला . अशात ही तिसरी वेळ भांडणाची .”

”   हो ?  बरं ,  नंतर ती चिडून आईकडे गेली मग वापस किती वा ता आली ,?”

” कुठे ग, बीचारीची गेल्याचीच बातमी आली ”

” नाही आजी , रात्री होती न ती घरात ?”

” नाही ग , मी सतीश ला रात्री 11 ला बाहेर जाताना पाहिलं . तो गेल्या बरोबर मी तिला बोलवायला बेल दाबली .मला उत्सुकता होती न , का भांडले ,  म्हणून . पण कितीवेळ झाला तरी दारच उघडले नाही . मग मी तिला कॉल केला ..माझ्या लेकी सारखीच ग ती …..(आजी रडायला लागल्या) ….पण फोन ही उचलला नाही . ..आणि …बघ …गेलीच …”

” तुम्हाला पोलिसांनी हे विचारले नाही ? ”

” कुठे कांय ,उलट मीच सांगायला गेले तर  पो .स्टेशन वर येऊन बोला म्हणे ”

तिला पुन्हा एकदा इ . राव चा प्रचंड राग आला . हा ऑफिसर ह्या केस कडे लक्ष्य का देत नाहीये? सतीश आपल्याशी खोटं बोलला .

म्हणजे सतीश ह्यात involved आहे …पण मग …ती पर्स ? ही रंजना कोण ? तिच्या बॅग मध्ये एक पाकिटात त्या वस्तू होत्या …आय कार्ड …किल्ल्या …एक laundry पावती …काय काय ..

तिने  सरळ रिक्षा पकडली . तिच्या आईच्या घराजवळ च्या पोलीस स्टेशन मध्ये गेली .

तिच्या नाशिबाने इन्स्पेक्टर देव तिथे होते .

” हॅलो सर , मी निताची मैत्रीण ..ते ..”

” ओह ,येस येस आलं लक्षात .काय झालं त्या केस चं ? ”

” सर ,तुम्ही लक्ष घातलं तर लगेच होईल  सगळं लवकर ”

” मॅडम मी  असं नाही करू शकत . पण मी  ‘ऑफ द रेकॉर्ड’  तुम्हाला मदत करेन , मी तर आधीच सांगितले तुम्हाला ..’

” सर , ह्या भागातल्या कुणा महिलेची  missing तक्रार आलीये का ?”

” का ? तुमचा काय इंटरेस्ट ? ”

तिने पर्स आणि त्यातील तिच्या जवळच्या वस्तू दाखवल्या ..आणि पप्पू शी झालेला संवाद सांगितला …

” हे जमा करा आमच्या कडे ..ए दिघे , तो परवाचा तो  मिसिंग चा रिपोर्ट आण बरं …… …..

मिसिंग ची तक्रार..हो , आहे न , …ओहहह शीट !!! तिच्या s s तर !!! ओ मॅडम , पुरावे डिस्टर्ब केले म्हणून चार्ज करू शकतो आम्ही तुम्हाला …..ह्याच बाईचा missing रिपोर्ट आहे ना … रंजना शेळके चा !!!”

आभा खूप अस्वस्थ झाली होती .

” थांबा  मॅडम मी राव ला बोलतो ..”

” सर ,प्लिज .  प्लिज  नका बोलू ..मी वेड लागल्यासारखी माहिती काढत फिरतीये . माझी मदत करा . इं . राव ला ह्यात घेऊ नका . आधीच माझा पाठलाग होतोय ..”

” what ?? मग तुम्हाला सोबत कॉन्स्टेबल देतो , ”

” नाही नाही सर , मग तर माझे फिरणे अजूनच अवघड होईल . लगेच लक्षात येईल सर ..”

इन्स्पेक्टर देव चे बिलकुल समाधान झाले नव्हते, पण ती तिथून निघाली .

क्रमश:

पुढील भागाची लिंक-  शोध (एक रहस्य कथा )- भाग ५

Image by Gerd Altmann from Pixabay 

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

3 thoughts on “शोध (एक रहस्य कथा )- भाग ४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!