शोध (एक रहस्य कथा )- भाग ५

आधीच्या भागाची लिंक- शोध (एक रहस्य कथा )- भाग ४

त्या भागातले रस्ते अरुंद …पुन्हा तेच ..एक रिक्षा मागे मागे येत होती.  ती भर भर चालायला लागली तर रिक्षेचा वेग ही वाढला . ..आणि मागून आवाज आला ………

ताई , थांबा …!! मग तर ती धावायलाच लागली . तो ओरडला …मी मदत करतोय तुमची …मला माहितेय..

ती एकदम थांबली ….तो आला ..

” बसा रिक्षात ”

ती बसली .

” तुम्ही  BJ कंपनीत काम करता न ?

हे तुमचं कार्ड आहे ?”  त्याने एक विजीटिंग कार्ड दाखवले .

ते तिचच कार्ड होतं . तिला खूपच आश्चर्य वाटले .

” हे  कार्ड तुमच्याकडे कसं आलं ?”

”  बुधवारी मी ह्याच गल्लीतून चाललो होतो …..दुपारची दोन अडीचच्या सुमारास . मी आरशात बघितले , तर एक बाई धावत होती , आणि तिच्या मागे दोन अरदांड गुंड !! अजिबात ट्राफिक नव्हती ..हलकी भुर् भूर पण होती …मी मुद्दाम रिक्षा हळू केली मॅडम …बाई हुशार असंल मॅडम ,…ती भर्रकन चढली आत … माझ्या रिक्षात आधीच एक मॅडम होत्या …त्या पण म्हणाल्या ..त्या बाईला मदत करूया म्हणून  …

आभा च्या अंगावर काटा आला ते सगळं ऐकून …

त्या बाईंनी घाईत थरथरत्या हाताने हे तुमचं कार्ड माझ्या कडे ….समोर टाकलं ..म्हणाल्या …यांना भेटा आणि सांगा…आणि स्पीड ब्रेकर पाशी गाडी स्लो झाली की दणकून उडीच मारली बाहेर ..ओरडल्या ..

“थँक्स दादा ..पळा …”   मी जीव घेऊन रिक्षा हाणली ताई …पण …पण…( सांगताना त्याने कचकन ब्रेक दाबला )

.”.पण काय दादा ? ”

.”..मागून असा भरधाव ट्रक आला मॅडम , ती स्पीड पाहून मी हे s  लांब उडी घेतली बाहेर ….आणि ट्रक पार रिक्षा चिरडून गेला . ”

त्याला दरदरून घाम फुटला होता …घशाला कोरड पडली होती …

तिला उन्मळून आले ..स्मिता s ..तिने हुंदका दिला ….तिला स्वतः चे ठोके ऐकू यायला लागले ….बोलणं सुचेना ….

” त्या रिक्षातील बाई ..? ”

” …..ट्रक अंगावरून गेल्यावर काय  …माझी रिक्षा पार गेली ,अन बाईचं तर ..”

आभा ला उलटी आल्या सारखं झालं .

ती रिक्षेत मागे मान टाकून हमसाहमशी रडायला लागली ..

” मॅडम , ज्या गेल्या त्या तुमच्या …”

” जिवलग होत्या …दोघीही माझ्या जिवलग होत्या …त्या बाईंचा पाठलाग का करत होते गुंड ? ”

” ते s s नाही माहीत मॅडम .”

” उडी मारून गेल्या त्या बाईचं काय झालं ? ”

” ते बघे बघे पर्यंत इकडे ट्रक नि चिरडले की हो . ती  बँक आहे न , त्या गल्लीत घुसली असल बघा बाई . ”

स्मिता जिवंत आहे ही जाणीव तिला होतच नव्हती इतकं हे सगळं पचनी पडायला अवघड होतं ,.”

” ह्या कार्ड वर तुमचा नंबर आणि एरिया पत्ता आहे .म्हणून तुमच्या मागे आलो होतो , पण तो वॉचमन होता , म्हणून वापस गेलो . ”

तिला आठवले तिच्या मागे रिक्षा आली होती ते .

अचानक काहीतरी आठवून तिने विचारले ,

” पण मग ते मागे येणारे गुंड ? ते कुठे गेले ? ”

” ट्रक नि माझी रिक्षा पार चिरडून टाकली . तिथं रस्त्यावर कुणीच नव्हतं .

मग मागून एक पांढरी कार आली .  बहुतेक त्यात बसून गेले ते गुंड .”

ती विचार करू लागली . मागून पांढरी गाडी ..त्यातच त्यांनी रंजना ची पार चिरडलेली बॉडी नेली असणार . आणि रात्री .. पुलावरून..तिच्या अंगावर शहारा आला .

ती घराजवळ उतरली . रिक्षेवाल्या ला जास्तीचे पैसे दिले …

गेट मधून आत आल्या बरोबर भानू आला …मॅडम , ते इन्स्पेक्टर साहेब येऊन गेले …पप्पूकडून ती एक बॅग घेतली , त्याला एक कानाखाली ठेऊन दिली , आणि तुम्हाला फोन करायचं  सांगितलं बघा .”

तिने ताबडतोब देव सरांना फोन लावला .

” हॅलो सर , आभा बोलतेय . ”

” मॅडम ,  त्या दिवशी इकडे एक भयानक अपघात झाला होता . ट्रकने चिरडलं होतं रिक्षाला .  त्याचा ह्या केसशी काही संबंध आहे का ह्याचा तपास करतोय आम्ही . तुम्हला काहीही समजलं तरी मला कळवा . आणि हो ,

पोस्ट  मार्टम नंतर तुमच्या मैत्रिणीचा डी एन ए राखून ठेवलाय अजून . त्यांच्या घरातून एखादी ..”

” गरज नाही सर , स्मिता , माझी मैत्रिण जिवंत आहे . ‘

”  व्हॉट? मग ती डेड बॉडी ?”

” तुमच्या missing केस ची , रंजना शेळकेची . नाहक जीव गेला सर तिचा ”

”  मग मृत व्यक्ती ची ही ओळख आधी केली गेली नव्हती का ? हा इन्स्पेक्टर राव पोलीस आहे का हजाम साला !! मी येतो तिकडे संध्याकाळी ”

आभा ला कळत नव्हते , की जर ती बॉडी स्मिताची नाही तर  सतीश ला बॉडी दाखवली नव्हती का ? पण ट्रक नि चिरडल्यामुळे समजलेच नसेल .

पण मग  स्मिता कुठाय ? आणि सतीश ? सतीश ने पुढाकार घेऊन पोलिसांच्या मागे लागायचं तर तोच  गायब . ह्या प्रकरणात नेमकं कोण गुंतलंय ? पोलिसांना सतीश चा संशय तर आलाच असणार ..मग त्याला शोधत का नाहीत ते?

कसे बसे जेवण पोटात ढकलून आभा पुन्हा खाली उतरली .  पप्पू जाम घाबरला होता . तिने त्याची समजूत घातली ,आणि त्याला घेऊन मोझे चौकात गेली .तिथूनच तो पूल सुरू होत होता . तिथे वाकड्या तिकड्या अक्षरात 24 × 7 लिहिलेले पंक्चर ची टपरी होती . पप्पूच्या ओळखीचा होता तो  कालु  पंक्चर वाला .

आभानी चौकशी केली की बुधवारी रात्री दोन वाजता तो ,म्हणजे कालू जागा होता का ..

” म्हणजे सुसाईड च्या दिवशी का मॅडम ? ”

” हो ,हो तेव्हाच …तू कुठे होतास ?”

” आपण इथेच होतो ना मॅडम . त्या दिवशी ….”

” एक चकाचक पांढरी मोठ्ठी कार …” आभा ने वाक्य पूर्ण करत म्हटलं.

” हा s s ती …मागे मोठ्ठे अजगराचे चित्र आहे ,ती ? ”

आभा नि काही अजगर वगैरे पहिला नव्हता ..पण हा हा म्हणाली .

” ती तर तोलाणी शेठ ची गाडीए ..त्याचं कांय मॅडम ? ”

” नाही नाही ,असंच ..नक्की तोलानीचीच ? ”

” शंभर टक्के !!! आपण नेहेमीच हवा भरतो न , सर वीस रुपया देतात ”

” त्यात दोन माणसं होते का ? ”

” दोन नाही मॅडम , मागे दोन अन समोर  ड्रायव्हर च्या बाजूला एक . असे तीन लोक होते.”

म्हणजे दोन जण पुलाच्या एक बाजूला उभे होते , जे आपल्याला दिसले आणि दुसऱ्या बाजूने एकाने बॉडी पलीकडच्या बाजूने ..बघणाऱ्याला ही आत्महत्या वाटावी म्हणून त्यांनी सोबत च्या बॅग सकट ..

..तिच्या अंगावर पुन्हा काटा आला .

क्रमश:

पुढील भागाची लिंक-  शोध (एक रहस्य कथा )- भाग ५

Image by Gerd Altmann from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

11 thoughts on “शोध (एक रहस्य कथा )- भाग ५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!