शोध (एक रहस्य कथा )- शेवटचा भाग
आधीच्या भागाची लिंक- शोध (एक रहस्य कथा )- भाग ५
तिला हवी ती माहिती मिळाली होती . सगळे संदर्भ जुळत होते . तिने लगेच इन्स्पेक्टर देव ला कळवून टाकले.
साधारण चार ची वेळ असेल . तिचा फोन वाजला …
” हॅलो ….हॅलो …”
” मी स्मिता !…मी …” फोन कट झाला .
आभा ला उत्साहाचं उधाण आलं ..तिने अनेक वेळा तो नंबर डायल केला , पण रेंजच नव्हती …
आभा ला आठवले .. स्मिता नि दूर बारा किलोमीटर वर तासगावला प्लॉट्स घेतले होते .तिथे नाममात्र एक खोली बांधली होती ….. तिने पुन्हा इन्स्पेक्टर देव ला फोन केला …..ते आता सगळे सूत्र हलवणार होते ..
****
आभा ला भेटायला इं . देव आले होते .
” I salute you madam . Really .. जे काम आमच्या डिपार्टमेंट नि करायला हवं होतं ,ते तुम्ही केलंत .Hats off .. ,”
” सर आपलं जिवलग माणूस संकटात आहे म्हटल्यावर येतं बळ ..”
” तुमच्या मुळे एक नाही तर दोन दोन केस चा तपास शक्य होतोय . आम्ही आता नव्याने तोलानी आणि त्याच्या माणसांची चौकशी सुरू करत आहोत . ” इं. देव खुश होऊन म्हणाले .
त्यांची नजर मागे गेली . सबइंस्पेक्टर माने सतीश ला घेऊन आले होते .
” सर , तुम्ही याला कसं काय शोधलं ? ..”
” डिपार्टमेंट कडे फार ताकद आहे मॅडम ,फक्त प्रामाणिक इच्छा पाहिजे .ह्याला शोधणं काहीच अवघड नाही …मित्राकडे लपून बसला होता .”
” सतीश नि हात जोडले .. ,आभा ,मला माफ कर ..मला वाटले , आमच्या कडाक्याच्या भांडणा नंतर स्मिता नि चिडून आत्महत्या केली , आता माझ्यावर आळ येईल , म्हणून मी काही न सुचून तिच्यावरच बदफैली चा डाग लावण्यासाठी हे असं केलं ..मी असे कसे करू शकलो? मी स्वतःच्याच नजरेतून पडलोय ”
” तुझे वागणे अक्षम्य आहे सतीश . तू हे करायला नको होतं . ह्यासाठी स्मिता तुला माफ करेल की नाही मला माहित नाही . पण तू हे आत्ता तिला बोलू नकोस”
” मी कोणत्या तोंडाने तिला भेटू?”
” तुला तुझी चूक कळलीये . तिला योग्य वेळ पाहून खरं खरं सांगून टाक .
आणि आत्ता भांडणासाठी तिची माफी मागून तिचे स्वागत कर.
पोलीस जीप येत होती ….समोरच बसलेली होती …स्मिता !!
आभा भान हरपून धावत गेली …तिच्या गळ्यात पडली ..दोघींचाही बांध फुटला होता …
आपल्या जिवलग मैत्रिणीसाठी आभानी जमीन आकाश एक केलं होतं .
सतीश पुढे गेला .
” मला माफ कर स्मिता , मी चुकीचं वागलो ..जे करू नये ते केलं. ”
” काय .. काय केलंस सतीश ? ” स्मिता नि न समजून विचारलं .
लगेच आभा म्हणाली,
” जाऊ दे स्मिता , तो भांडणा बद्दल बोलतोय . तू आहेस , हेच खूप ..पण तुझ्या मागे ते कोण लोक होते ?”
स्मिता पुन्हा घाबरली ते आठवून ..
” तोलानी ला अटक केलीय स्मिताजी , तुम्ही मनातली भीती काढून टाका ..
तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहात .तुमची ओळख आम्ही लपलेलीच ठेऊ ”
इं. देव म्हणाले . त्यांनी स्मिता ला बसायला खुर्ची दिली , आणि पाणी मागवले .
आभा त्यांना म्हणाली , ” सर जे झाले ते झाले , माझ्या मैत्रणीचा संसार वाचवायचाय . सतिशची भानगड प्लिज तिला …..”
” मी समजलो ..काळजी नसावी ..पण तोलानिने भरपूर पैसे चारले असणार इं .रावला . केस बंदच करायची होती त्याला . म्हणून तुमचं म्हणणं ऐकूनच घेत नव्हता तो . तुम्ही सगळं खणून काढलत . तोलानी तिघांना घेऊन पुलावर गेला होता . दोघे एका बाजुला उभे राहिले जे तुम्ही बघितलंत , आणि एकानी रंजनाची बॉडी पुलाखाली फेकली ,
स्मिता समजून. भयंकर आहे सगळं . ”
स्मिता सतीश ला बिलगली होती …दोघांनाही पश्चाताप होत होता ..
” स्मिता तू आई कडून निघाल्यावर नेमके काय झाले ?” आभा ने विचारले.
स्मिता सांगू लागली …
” मी आई कडे असतांनाच सतीश चा फोन आला ..पुन्हा त्याने सकाळचा राग माझ्यावर काढला आणि मी चिडले … तिथून निघाले ..अचानक पावसाची सर आली ,आणि मी तिथे मोठ्ठ बांधकाम चालू आहे तिथे आश्रयाला गेले . मोठे मोठे मिक्सर चालू होते ,खूप आवाज होता . मी सहज खिडकीतून आत डोकावले तर आत प्रसिध्द बिल्डर तोलानि आणि जय सारडा होते . त्यांना सारे शहर ओळखते . त्यांच्यात बरीच बाचाबाची झाली असणार ..की तोलानिने बंदूक काढली आणि सरळ गोळ्या झाडल्या . मला चक्कर आल्यासारखं झालं ,आणि तिथल्या अवजारांचा आवाज झाला …..मी तिथून पळत सुटले , माझ्या मागे त्यांची माणसे लागली ,अन मी एका
ऑटोरिक्षात घुसले …आत एक स्कुल टीचर होती ,तिने मला धीर दिला .
मागून पाठलाग होतोय असं वाटून मी बाहेर उडी घेतली ,जाता जाता तुझं कार्ड त्या देवमाणसाकडे टाकलं …त्यात माझी पर्स तिच्या कडेच राहिली .
मी तर सुटले ,पण त्याचं काय झालं ? ”
” अ s s काही न ..न …नाही ..ते पण ..वाचले . ”
आभा ने सगळ्यांना खुणावले गप्प राहण्या साठी .
स्मिता च्या सुखाकरता काही गोष्टी ती गुलदस्त्यातच ठेवणार होती ..
तिने फक्त आपल्या जिवलग मैत्रणीला शोधले इतकच नाही तर तिचा संसार पण वाचवला होता .
( समाप्त )
Image by Gerd Altmann from Pixabay
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
Pingback: शोध (एक रहस्य कथा )- भाग ५ – LekhakOnline – Excellent Marathi Articles
छान कथा 👌👌👍👍
धन्यवाद
Nice plot
Thank you
सहीच एकदम
धन्यवाद
गोड शेवट. कथा short n sweet. छान.
अतिशय उत्कठवर्धक कथा
धन्यवाद
मस्त कथा
धन्यवाद
मस्त कथा एकदम
धन्य
थँक्स
मस्त फुलवलं आहे कथानक
थँक्स
Khup Chan vahini