दिवाळी २०२० स्पेशल- १६

रुम नंबर १०१                               लेखक- अभिजीत इनामदार

सीटी हॉस्पिटलच्या स्पेशल वॉर्ड मधील रुम नंबर १०१ मधे आज काही वेगळाच नूर होता. ती तब्बल पंधरा दिवसांनी आज सकाळी शुद्धीवर आली. डॉक्टर तपासत असताना तीने हळुच डोळे उघडायचा प्रयत्न केला पण जमेना म्हणून परत परत प्रयत्न करत होती. डॉक्टर तीला शांत हो असे सतत सांगत होते. पण तिचे प्रयत्न चालुच होते. शेवटी डॉक्टरांनी झोपेचे इन्जेक्शन दिले तीला आणि काही मिनीटात ती गाढ झोपली.

दरवाज्याच्या बाहेर अर्णव हे सगळे बघुन खूप अस्वस्थ होत होता. डॉक्टर बाहेर आल्यावर त्यांच्याशी बोलत तो त्यांच्या केबीन मध्ये गेला.

अर्णव – डॉक्टर अजून किती दिवस हे असे चालणार आज जवळ जवळ महिना झाला ती ह्या अवस्थेत आहे. मला आता खूप काळजी वाटत आहे.

डॉक्टर- अर्णव अरे मी पण माझ्या परीने खूप प्रयत्न करत आहे. मला कळत आहे तुझी स्थिती. तीला लागलेला मार आणि बसलेला मानसिक धक्का खूप मोठा आहे. मी शर्थीचे प्रयत्न करत आहे मला ती शुद्धीत येईल ह्याची खात्री आहे पण ती पहिल्या सारखी कधी होईल हे मी आत्ताच नाही सांगू शकत. मी तूला खोट्या आशा नाही दाखवणार. माझे कालच न्युरोसर्जन गोखले यांच्याशी बोलणे झाले आहे. ते म्हणत आहेत एक तर ती सगळा भुतकाळ विसरेल किंवा तीला ह्या घटनेतून बाहेर पडायला खूप जास्त वेळ लागेल. काही मिरॅकल झाले तरच ती पटकन बरी होवू शकते.

अर्णव – म्हणजे डॉक्टर मला माझी हुशार, हसरी, अवखळ, प्रेमळ अनुरा कधीच मिळणार नाही का? डॉक्टर सांगा ना प्लिज.

अर्णव अक्षरशः ढसाढसा रडायला लागला. डॉक्टर देवाकडे प्रार्थना करत होते कि त्यांच्या प्रयत्नाला यश दे देवा.

तो हॉस्पिटल मधुन घरी येउन हातात वाइनचा ग्लास घेऊन गॅलरीतल्या झोपाळ्यवर बसला आणि प्रत्येक सिप बरोबर तो भुतकाळात ओढला जात होता.

हाय अर्णव सर. मी अनुरा कुलकर्णी तुमची नवीन प्रोजेक्ट टीम मेट. आजच जॉईन झाले आहे. ह्या आवाजाने कामात व्यस्त असलेला अर्णव एकदम चेअर वरून उठला आणि तीच्या कडे पाहु लागला. तिच्याकडे पाहताना बोलताना उघडलेले तोंड तसेच उघडे राहिले. अनुराला हसु आवरत नव्हते पण ती तसे न दाखवता परत हॅलो सर म्हणाली. अर्णवला कळले आपण मुर्खपणा केला आहे. त्याने जीभ चाऊन तीला हॅलो म्हणाला.

वेलकम टु अवर टिम मीस अनुरा. अनुरा दिसायला एकदम क्लासिक होती. गोल चेहरा, बॉबकट केस, रेखीव भुवया, पातळ गुलाबी ओठ, सरळ नाक, सडपातळ बांधा. तीने हॅलो करण्यासाठी पुढे केलेल्या हाताची लांबसडक बोटे असलेला, गुलाबी मऊशार तळवा त्याने हातात घेतला आणि तीला ग्रीट केले. ती पाहताच बाला कलीजा खलास झाला अशी काहीशी त्याची अवस्था झाली.

त्याच प्रोजेक्टवर काम करणाऱ्या साहीरला अनुरा आवडत होती. त्याने तीला तशी हिंटही दिली होती पण अनुरा त्याला भाव देत नव्हती. एके दिवशी अनुरा, अर्णव आणि साहीर रात्री उशिरापर्यंत काम करत होते. अर्णव कामात आहे हे पाहून साहीर कॉफी घ्यायला गेलेल्या अनुराजवळ उभा राहिला. तीला तो तिच्यावर त्याचे खुप प्रेम आहे हे सांगू लागला. अनुराने तो तीला आवडत नाही म्हणून सांगितले. हा नकार साहीरला सहन झाला नाही. त्याने तीचा बाहेर जाण्याचा रस्ता आडवला. तीला धक्का देवू लागताच तीने त्याला एक लगावून दिली. तेवढ्यात अर्णव तिथे आला आणि घाबरलेल्या अनुराने त्याला घट्ट मिठी मारली. काही तरी अघटीत घडले आहे हे अर्णवला समजले.

अनुराने सगळे अर्णवला सांगितले असता साहीरने त्या दोघांची माफी मागितली आणि तक्रार न करण्याची गळ घातली. माझे करिअर खराब होईल म्हणून माफ करा ही त्याची गयावया त्या दोघांनी मान्य केली. पण साहीरने मी तुमच्या दोघांच्या मधे यायला नको होते असे म्हणणे आणि त्या दिवशी अनुराने अर्णवला मारलेल्या घट्ट मिठीने त्या दोघांना एकमेकांबाबत असणारे प्रेम जाणवले. आता ते दोघे दिवसेंदिवस एकमेकांच्या जवळ येवू लागले. सगळ्या अॉफिसला हे माहिती होते आणि कोणाची काही हरकतही नव्हती… फक्त एक माणूस सोडून तो म्हणजे साहीर.

अनुरा आणि अर्णव हे आपापल्या कामात माहीर होते त्यामुळे त्यांचा प्रोजेक्ट लवकर कंप्लीट झाला. प्रोजेक्ट सक्सेस पार्टी लोणावळ्याला ठेवली होती. संपूर्ण टीम होती. डान्स, ड्रिंक्स, वेगवेगळ्या प्रकारच्या डीश या मधे रात्र रंगत होती. कोपर्‍यात बसलेल्या अनुराला साहीलन एक ड्रिंक अॉफर केले. तीने नकार दिला असता तू अजून मला  माफ केले नाहीस असे समजू का म्हणताच अनुराने तो ग्लास घेतला.

दोन सीपमधेच तीला चक्कर येवू लागली. ती उठून बाहेर गेली असता साहीर तिच्या पाठी गेला. त्याच्या डोक्यावर आता नशेचा अम्मल होता. त्याला अनुराहा आता आपलेसे करायचे होते. त्यासाठी काहीही करायची त्याची तयारी होती. तो तीला त्याच्या रुमकडे घेऊन गेला. आता तीला काहीही कळत नव्हते. पण साहीर आपल्याला त्याच्या रुमकडे का घेवून जातोय हे तीला कळत नव्हते. त्याच्या डोळ्यात दीसणारी वासना पाहून त्याचा हेतू चांगला नाही हे मात्र तीला या अवस्थेतही नक्कीच जाणवले. ते जाणवताच ती ओरडली. अर्णवला काहीतरी शंका आली म्हणून तो बाहेर गेला.

त्याला अनुराचा आवाज आला. त्याने पाहिले असता तीचा आवाज साहीरच्या रुम मधून आल्याचे जाणवले. तो धावला, साहीरच्या रुमचा दरवाजा बंद होता. आत साहीर अनुराला आपली करण्यासाठी बळजबरी करायचा प्रयत्न करत होता. अर्णवने रुम सर्व्हिस वाल्यांच्या मदतीने मास्टर की ने दार उघडले. आतली परिस्थिती पाहताच अर्णव साहीरवर तुटून पडला. त्यांच्या धक्काबुक्की मधे अनुराला धक्का लागला आणि तीचे डोके बेडच्या कडेवर आपटले आणि ती बेशुद्ध पडली.

महिन्याभरापूर्वी घडलेला प्रसंग अर्णवच्या डोळ्यापुढून जसाच्या तसा सरकला. त्याला काय करावे ते कळत नव्हते. साहीर आता पोलीसांच्या ताब्यात होता. रात्री उशिरा अर्णवचा फोन वाजला. फोन हॉस्पिटल मधून होता. एवढ्या रात्री फोन म्हणजे काय कारण असेल? अनुराचं काही… बरं वाईट…? विचारांनीच त्याचा घसा सुकला. हात पाय थरथरु लागले. फोनवर त्याला ताबडतोब हॉस्पिटल मधे यायला सांगितले होते. कारण विचारले तर काहीच सांगितले नव्हते.

घाई घाईत तो हॉस्पिटल मध्ये पोहचला. स्पेशल रुम वॉर्डकडे धावला. आत पाहिले असता आत मधे शुद्धीवर आलेल्या आणि त्याच्याकडे पाहणार्‍या अनुराला पाहून त्याला खुप बरे वाटले. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. अर्णव आणि अनुरा दोघांचेही डोळे पाणावले. त्याने सरळ जावून तीला मिठीत घेतले.

काही वेळ गेल्यावर अर्णव म्हणाला कुलकर्णी आता बरे वाटते आहे का?

अनुराने हलकेच हो म्हटले. तसे अर्णव म्हणाला, कुलकर्णी, आपण कधी बोललो नाही आधी. आपल्या भावना आपण नजरेने, आपल्या कृतीने आपण दाखवत होतोच. पण आज बोलण्याची वेळ आली आहे.

अनुराने हलकेच कशा बद्दल म्हणतोयस असे विचारले.

अर्णव म्हणाला, कुलकर्णी पुढच्या महिन्यात आमच्या गावच्या ग्रामदेवतेचा पालखी सोहळा होणार आहे. यावर्षी पालखीचा मान इनामदारांकडे आहे.

त्याचे आता इथे या वेळी काय? असे अनुराने विचारले

अर्णव पुढे म्हणाला अगं ती खुप मोठी गोष्ट आहे. अन तूला माहिती आहे का? की इनामदारांकडे अशी पद्धत आहे की पालखी पुजेचा मान नवीन लग्न झालेल्या जोडप्याला मिळतो.

अनुरा अजूनच कन्फ्युज झाली. तीच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह पाहून अर्णव हसला आणि म्हणाला

या वर्षीच्या पुजेला बसण्याची माझी खुप इच्छा आहे. तुला आवडेल माझ्यासोबत पुजेला बसायला?

अनुराला जरा हे कळायला थोडा वेळ लागला पण समजल्यावर ती म्हणाली… म्हणजे… म्हणजे तू मला?

अर्णव मधेच म्हणाला येस्स कुलकर्णी आय एम प्रपोजींग यू टू बी इनामदार. वील यू?

हसत हसत मानेनेच होकार देत अनुरा अर्णवच्या कुशीत शिरली.

आता एक कुलकर्णी लवकरच इनामदार होणार होती. अव्यक्त भावना आज व्यक्त झाल्या होत्या आणि साश्रू नयनांनी अर्णव आणि अनुरा आज एकमेकांच्या मिठीत सुखावले होते.

सीटी हॉस्पिटलच्या स्पेशल वॉर्ड मधील रुम नंबर १०१ मधे आज काही वेगळाच नूर होता. बर्‍याच दिवसांपासूनचे टेन्शन आता कमी झाले होते. अनुरा आणि अर्णव आता मनमोकळेपणाने प्रेमवर्षावात न्हाऊन निघत होते.

Abhijit Inamdar

Abhijit Inamdar

लेखक परिचय : नाव- अभिजित अशोक इनामदार. सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी इंजिनिअरिंग केले असून एमबीए इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये केले आहे. नोकरीनिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरून झाल्यानंतर सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा आहे. काही नाट्यप्रयोग तर काही म्युझिकल शोज चे अँकरिंग केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते.

2 thoughts on “दिवाळी २०२० स्पेशल- १६

  • November 25, 2020 at 4:15 am
    Permalink

    छान, सुरेख

    Reply
    • April 3, 2021 at 3:30 pm
      Permalink

      धन्यवाद सर

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!