दिवाळी २०२० स्पेशल- २०

खरंखुरं प्रेम..                                

लेखिका- मानसी गांगल

आज ते प्रथमच भेटणार होते एकमेकांना… त्यांची फोन फ्रेंडशिप होती..

भेटले फेबु वर.. पण मगं कायप्पा कधी video कॉल आणि सतत सुरु असलेले ऑडिओ कॉल्स…

उसंतच नव्हती.. आणि होती ही..

जरा हटके प्रेम.. तिला तिचं आयुष्य.

त्याला त्याचं..

कॉमन काहीच नव्हतं त्यांच्यात तरी ही गट्टी..

घट्ट बंध.. आणि नात्याची उबदार वीण…

तिचं अन त्याचं मन जडलं होतं एकमेकांवर पण कधीच सांगत नव्हते ते..

कारण हे प्रेम तसं प्रॅक्टिकल होतं .

नाही ना आपण जबाबदारी घेऊ शकत एकमेकांची.. मग LBW (लांबून बरं वाटतंय 😉)

पण असं तरी किती दिवस चालणार .?

शेवटी मनाची ओढ तनापर्यंत येऊन थांबली…

भेटावं एकदातरी..असं दोघांनाही वाटून गेलं .

मग दिवस ठरला.. वेळ… ही काय बरं ठरवावी…

दोघांना संगीताची आवड… मग सकाळ नको नी संध्याकाळ ही ..

आयुष्याच्या माध्यान्ही ला भेटलोय तर एकमेकांसमोर ही कलत्या उन्हांमध्ये येऊ .. वेगळीच कल्पना…

त्यात ही हे भन्नाट की ती त्याला पिक अप करेल..

समाज मनाच्या सगळ्या रूढी, परंपरांना छेद देत…

ते दुपारी 2 ला भेटणार होते.. ते ही एका देवळाबाहेरच्या पारावर..

सगळे जीव दोन वितांची खळगी भरण्यात गुंतलेले असतील.. तेव्हा त्या शांततेतं तिथं पारावर कुणीच येतं नाहीं.. म्हणून…

लंच डेट, डिनर डेट इतकंच काय ब्रंच डेट पण नाहीं…

दुपारची अशी वेळ … जेव्हा घरून आणलेली थंड पाण्याची बाटली  घेऊन भेटायचं… बास्स इतकंच…

फोनाफोनी झाली… आणि तो वाट पाहात हॉल मधे येऊन बसला..

आता ती आली की निघायचं…

आज त्यानं राजस्थानी कलमकारी प्रिंट चा विटकरी लाल रंगाचा शर्ट घातला होता… आणि बेज रंगाची कॉटन ट्राऊजर..

सुरेख पफ काढत मागे वळवलेले केस..

आणि खुरटी दाढी.. गोर्या गालांवर ती दाढीतल्या केसांची रंगपंचमी  त्याला अगदीच उमदा दिसायला मदत करत होती.

किती ही शांत राहण्याचा प्रयत्न केला तरी तिला प्रत्यक्ष समोर भेटणं हा वेगळाच फील होता..

तिनं आल्याची वर्दी मिस कॉल नी दिली…

त्यानं पुन्हा कॉल केला… ये  ना घरी…. मी तयार आहे..

तिनं नम्रपणे नकार दिला… चल…लवकर इतकाच मेसेज आला

तो ही घर बंद करून खाली आला.

ती तिच्या कार मधून उतरली…

तिनं टिपिकल लाल रंगाची काळ्या काठाची इरकल नेसली होती…

त्यावर मॅचिंग लाल खडे असणारी चांदीची डिझायनर नथ, गळ्यात साज आणि कानात नथीला मॅचिंग टॉप्स.. तिच्या सावळ्या तनुवर हे खूपच शोभून दिसत होतं..

अगदी सामान्य चेहेऱ्याची तरी गोडवा.. एक ओठांवर मिश्किल हसू

नजरेत एक आकर्षण..

आणि स्लिव्हलेस ब्लाउज घातल्यामुळे अधिकच उठून दिसणारा नेत्रसुख बांधा…

तर अशी ही जोडगोळी निघाली..

तासभर प्रवास करून मग येणार होतं ते ठिकाण..

आता गाडीत बसल्यावर तिची सीटबेल्ट लावायची लकब, गाडी सफाईदार पणे, चार बोटांनी स्टेअरिंग वळवत, डाव्या हातानी प्ले लिस्ट मधून नेमकं त्याच्या आवडतं गाणं लावणं.. नजरेच्या कोनातून तो सुखावलाय हे पाहणं.. आणि मग पुन्हा एकदा बोटांनी ताल धरत, मिश्किल हसत गाणं गुणगुणण.. हे सगळंच गोड होतं..

ट्विस्ट तिथे आला जेव्हा तिनं एका उडत्या चालीच्या गाण्यावर तर्जनी आणि करांगुली ओठांत धरत खणखणीत शिट्टी वाजवली…आणि त्यानं चमकून पाहिलं..

आणि तिनं त्याच्याकडे पाहताच डावा डोळा मारला..

गाडी चालवताना ही अधेमधे येणाऱ्या प्रत्येकाला तिनं काका मामा बनवून टाकलं…

आणि चुकलंच एखादं बेणं तर मान बाहेर काढून… चांगभलं… अशी आरोळी 😜 ही दिली…

एकंदर ती आणि तो प्रत्यक्ष आयुष्यात किती वेगळे आहेत याचा पदोपदी प्रत्यय येतं होता…

मग ते ठरल्या जागी पोचले..  पार उंच होता.. आणि तो सहज चढून बसू शकत होता… तो तिला अलगद कमरेतून उचलून ही बसवू शकत होता पण त्याला आता ती काय करते? याची उत्सुकता लागून राहिली होती..

तिनं त्याच्याकडे पाहिलं .. आणि चक्क त्याला गुडघा टेकवून बस म्हणाली मग निवांत पणे पायातली उंच टाचेची चप्पल काढून टाकली आणि एका हातानं त्याचा खांदा दाबत ती त्याच्या गुडघ्यावर पाय देऊन चढून बसली पारावर… मग मागे सरकत ती साडी सावरत चक्क मांडी घालून बसली.. तो उठून बाजूला बसला.. तसं अलगद त्याच्या मांडीवरून हात फिरवत धूळ पुसली ..

त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल चं आकर्षण वाढू लागलं..

तिनं तिच्या खांद्याला लावलेल्या शबनम मधून … एक  पाण्याची बाटली काढली.. आणि त्याला देत म्हणाली…

आधी हे थंड घे आणि मग निवांत गप्पा मारू चालेल नं…?

त्यानं ही मागे सरकत झाडाच्या बुंध्याला टेकत… पाणी घेतल आणि बाटली पुन्हा तिला दिली..

बोल… तो त्याच्या करारी आणि सेक्सी आवाजात म्हणाला..

मी काय रेडिओ मिरची आहे?  तु बोल म्हणल्यावर लगेच बोलायला… तिनं नकटं नाक उडवलं..

बरं… मी बोलतो…

ह्म्म्म good बॉय म्हणत ती स्वतःच्या उपड्या तळव्यावर हनुवटी टेकत म्हणाली…

ऐक…  मी तुला स्टॉक करु लागलो ते तुझ्या एका कथेमुळे, त्यातली ती नायिका किती बिन्धास रंगवली होतीस तु ..

बेस्ट combo..

आजची आधुनिक आणि पारंपरिक या दोन्ही विचारांची सांगड घालणारी..

मग तुझे फोटो पाहीले…

अचानक तुझी फ्रेंड request आली ती ही क्षणांत स्वीकारली आणि मग नं चुकता तुझं लिखाण वाचू लागलो..

कविता माझा प्रांत… कथा तुझा.. मग नंतर जेव्हा पहिल्यांदा आवाज ऐकला .. हसणं ऐकलं तेव्हा त्या आवाजाच्या, हसण्याच्या प्रेमात पडलो…

तुझ्या मोकळेपणानें मारलेल्या गप्पा आणि त्यात ही अय्या,  इश्श्य, अगोबाई ह्या शब्दांची पेरणी.. आवडून गेली…

कधी कधी तुझा रुसवा, अबोला ही आंनदाने जगलो…

पण माझ्यापोटी तुझा सात्विक संताप उफाळून येणं ही आवडू लागलं..

कधीतरी तु पझेसिव्ह होण ही… जाम आवडतं होतं…

तर ही अशी तु मला भावलेली.. आणि आज प्रत्यक्षात पाहिलं आणि माझी विकेटच पडलीये… 😜😘

तिनं शांतपणे मगाचच्या शबनम मधून लायटर आणि सिगारेट काढली… ती त्याला ऑफर केली आणि त्याचा नकार येताच… खुणेनं मी ओढू नं? असं विचारत .. शिलगावली…

आश्चर्य नक्कीच वाटलं पण तो काहीच बोलला नाहीं ..

तिनं दूरवर शून्यात नजर लावली… आणि मगं त्याच्याकडे पाहत म्हणाली… मी wine टेस्टर आहे… आणि आवडतो माझा जॉब मला…

जगातल्या उत्तमोत्तम प्रतीची दारू चाखायला आवडते मला..

जितक्या श्रद्धेनं एखाद्या देवळात जाऊन मी हात जोडीन तितक्याच शिद्दत नी पब मधे थिरकायला आवडतं मला..

माणसं वाचायला आवडतात पण त्यांना जज करायला किंवा त्यांना पुरतं जाणून घ्यायला नाहीं आवडतं ..

एकदा माणूस कळला की इंटरेस्ट संपतो माझा ..

स्मोकिंग मी आनंदासाठी करते,

आणि वेगवेगळे रंगीबेरंगी कपडे घालायला आवडतात मला… आता साडी तर पुढच्या क्षणी शॉर्ट्स वर चेंज व्हायला आवडतं मला…

मुळात बंधन आवडतं नाहीं मला माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर

आणि तुझ्या बाबतीत म्हणशील तर..

मी तुझ्या कविता वाचून प्रेमात पडले तुझ्या…

मग तुझ्या आवाजतली जादू माझ्या कानातून मनात मेंदूत उतरली… मग तुझा फोटो पाहीला..  चिकणा आहेस hott आहेस  😜

अशी दिलखुलास दाद ही दिली होती ..

आणि आज तुला पाहिलं.. तुझ्या सोबत… बिन कुछ कहें..इथवर आले ..

प्रेमात पडलीये असलं काहीतरी घिसापीटा डायलॉग नाही मारणार…

कारण आता मी सतत प्रेमात जगतीये तुझ्या..

भास आभास या खेळातला सवंगडी आहेस तु…

एकटेपणा जाणवतो… पण आता नाही… असतोस तु आता बाजूला त्या हर एक एकट्या क्षणातही…

कधी अलगद नीज आली तर टेकलेल्या मानेमागे तुझ्या तळव्याचा स्पर्श जाणवतो… पुन्हा जाग येते आणि मी अनुभवते तुला…

कधी कामामुळे किंवा तिऱ्हाईत व्यक्तिमुळे चिडचिड झाली तर.. पाण्याची बाटली समोर धरणारा तु दिसतोस .

आनंदाच्या प्रत्येका क्षणांत शेजारी बसून टाळी देणारा  . दिलखुलास हसणारा तु दिसतोस ..

अगदि आत्ता लेटेस्ट मी एका ठिकाणी मी कुणाची तरी वाट पाहत होते.. रात्रीची वेळ .. आणि अचानक ब्लॅकआऊट….

सगळीकडे तिमिर राज्य…

इतरवेळी मी घाबरून गेले असते कारण मला फोबिया आहे अंधाराचा… पण त्या क्षणी तु घट्ट जवळ घेतल्याचा भास झाला.. आणि क्षणांत लाईट आले….

तुला पुन्हा एकदा अनुभवलं..

तु आजकाल माझ्या कामातही सोबत करतोस

जशी  टेस्टबड्स ना स्पर्शून जशी wine अलगद गळ्यातून पोटापर्यंत जात एक उष्ण प्रवास करते… तिचं अस्तित्व राखून असते… तसा तु आहेस… झाकोळला नं जाणारा..

आणि उगाचच नं झळाळणारा… या माध्यान्हीच्या उन्हा सारखा.. ऊबदार पण तप्त नाही…ज्याच्या स्पर्शानं नकळत ग्लानी यावी असा.. आणि तरीही भान असावं असा…

तिचं बोलणं संपलं आणि तो पारावरून खाली उतरला…

तिच्याशी नं बोलताच उठून तरातरा चालत गेला..

आणि आला परत…  तिच्यासाठी जाईचा गजरा आणला..तिनं त्याला परत दिला…

नाहीं आवडला? त्याला प्रश्न पडला..

अहो… माळायचा असतो तो… स्वतःच्या हातांनी… असा ओटीत घालायचा नसतो 😜🤣

ती ही डोळे मिचकावत म्हणाली..

तिला गजरा माळला आणि अलगद कानाशी पुटपुटला  .

मला असा गजरा रोज माळायचाय आणि रात्री त्या कळ्या माझ्या अंगभर फुलवायच्या आहेत…. माझी बायको होशील?

तिनं मागे वळून पाहिलं आणि त्याच्या कानाशी येऊन म्हणाली… नुसतं गजरा नाहीं माझी सिगरेट आणि wine याचाही सुगंध दरवळेल… तो चालेल का? 😜

हॊ… आवडेल😍

म्हणत तिच्या हातात हात गुंफले…….

खरंतर किती सोप्प वाटतंय ना…

पण खरंच कधीतरी आपल्या आवडत्या व्यक्तीला असं खरंखुरं भेटा… जसे आहात तसें…

5 thoughts on “दिवाळी २०२० स्पेशल- २०

  • November 30, 2020 at 11:03 am
    Permalink

    Thank you 😊😊

    Reply
  • December 17, 2020 at 8:48 am
    Permalink

    Off beat story but Amazingly scripted.. Loved your writing Manasi !!

    Reply
    • January 19, 2021 at 10:04 am
      Permalink

      Thank u soo much 😍

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!