प्यार को प्यार मिला (शेवटचा भाग)
शुभम संध्याकाळी आला तेव्हा तिच्या वडिलांना सुद्धा शुध्द आली होती . त्यांनी त्या गृहस्थांचा नंबर घेऊन त्यांचे फोनवर आभार मानले आणि भेटण्याचे निश्चित केले. शुभमला तर मिताचे बाबा सारखेच thanku म्हणत होते.
दुसऱ्या दिवशी त्यांना discharge मिळणार होता. तिच्या बाबांनी त्यांच्या ऑफिसला फोन करून सगळी परिस्थिती आधीच सांगितली होती , त्यामुळे कंपनीचे चार पाच जण त्यांना भेटायला आले होते. त्यांनीच उद्याच्या गाडीची व्यवस्थाहि केली.
दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलच्या सगळ्या formalities पूर्ण करून ते एका मोठ्या गाडीतूनच मुंबईला जायला निघाले. प्रवासाचा त्रास नको म्हणून त्यांना झोपेचे औषध दिले होते.
घरी पोचल्यावर दोघंही आपापल्या खोल्यांमध्ये सेटल झाले. ओमकार आणि त्याचा मित्र त्यांच्या घरी परतले आणि शुभमाही मिताचा निरोप घेऊन घरी गेला.
सकाळीच मिताचा फोन पाहून शुभमला दाट संशय आला की मिताला नक्कीच काकुंचे कळले असणार. त्याने फोन घेतला नाही , पण सकाळचे सगळे पटकन आवरून तो मिताच्या घरी जायला निघाला , कारण डॉक्टर म्हणाले होते , तिला जपायला हवे , कुठलाही मानसिक आघात होता कामा नये.
तो मिताच्या रूम मध्ये आला तेव्हा ती खूप अस्वस्थ दिसली.
“मिता काय झालं , अशी का दिसत आहेस?”
“शुभम मी निधीला फोन केलेला , तिने उचलला आणि ती रडायलाच लागली रे , काय झालं आहे ? ती मला भेटायला आली नाही की साधा फोनही नाही ? सांग की प्लीज”
आता जास्तवेळ लपविण्यात काहीच अर्थ नव्हता
“मिता , हे बघ मी जे काही सांगत आहे ते शांतपणे ऐकून घे , आणि त्याचा मुळीच त्रास करून घेऊ नकोस स्वतःला , प्लीज माझ्यासाठी , अगदी मान्य आहे , तुला त्रास होणार आहे , पण मला तू हवी आहेस मिता , प्लीज माझ्यासाठी ….. माझ्या तुझ्यावरच्या प्रेमासाठी”
आणि मिता एकदम स्तब्ध झाली , आज प्रथमच शुभमने त्याचे प्रेम व्यक्त केले होते , एरवीची वेळ असती तर ती आनंदाने नाचली असती , पण तिने फक्त एक घट्ट मिठी मारली त्याला आणि “love you” इतकेच म्हंटले
“तुझी शपथ , नाही करून घेणार त्रास , पण प्लीज सांग , निधी का अशी वागत आहे?”
“मिता …. निधीची आई …”
“बोल की पुढे , काय झालं काकूंना? बरं नाहीये का ? अरे आपण बेस्ट डॉक्टर करू त्यांच्यासाठी , तू नको घाबरूस”
“निधीची आई गेली , मिता …. काकू गेल्या आपल्याला सोडून”
“चल, काहीतरी बोलू नकोस , चार दिवसांपूर्वी त्यांच्या हातची भाजी पोळी खाल्ली आहे निधीच्या डब्यातली , उगाच काय !”
“मिता … हे सत्य आहे , मान्य कर”
आणि तिने “निधी”….. करत रडायला सुरुवात केली
शुभमने तिला जवळ घेतलं आणि तो तिच्या डोक्याला थोपटत तिला सावरू लागला
“मिता … तू रड मोकळी हो , पण प्लीज खूप त्रास आणि विचार नको करूस , तू आत्ता एका मोठ्या अपघातातून बाहेर आली आहेस , प्लीज , मी समजू शकतो हे दु:ख खूप मोठं आहे , पण शांत हो राणी”
तिने खूप घट्ट मिठी मारली होती शुभमला आणि रडत होती
“love you मिता ,नको रडूस , शांत हो, मी कायम तुझ्या सोबत आहे बाळा“
आणि मिताच्या बेडरूमच्या दारातून हे सगळं मागून निधी बघत होती. तिला कळून चुकले की शुभमचे मितावर किती प्रेम आहे. पण त्यामुळे ती शुभमवर प्रेम करणे सोडून देणार होती का?
निधीलाही मैत्रिणीकडून मिताच्या अपघाताबद्दल कळलेच शेवटी , आणि आई जाऊन दोनच दिवस झालेले असले तरी मैत्रिणीच्या प्रेमाखातर ती तिला बघायला तिथे आली होती. ती खरंतर मागे फिरणार होती ते दृश्य बघून , पण तेवढ्यात मिताने तिला पाहिलंच
“निधी …. ए ये ना गं आत, प्लीज मला तुला खूप घट्ट भेटायचं आहे, मी नाही येऊ शकत उठून , प्लीज ये गं जवळ”
आणि निधी धावतच मिताजवळ आली , शुभमने दोघींच्या भेटण्याला वाट मोकळी करून दिली आणि जे काही दोघी हमसाहमशी रडू लागल्या ते जवळजवळ दहा मिनिटे चालू होते.
शुभमने मागून दोघींना जवळ घेऊन
“बास , मुलीनो बास आता , खूप त्रास झाला आहे दोघीनाही , आता शांत व्हा बघू”
त्या एकमेकींपासून दूर झाल्या आणि डोळे पुसत शांत होऊन एकमेकींना धीर देऊ लागल्या केवळ डोळ्यातून.
“निधी …हि खरं तर आत्ता सांगायची वेळ नाही , पण तू मगाशी पाहिलंसच म्हणून केवळ बोलतो आहे गैरसमज नको करून घेउस कुठलाही …. आज मी मिता जवळ माझं प्रेम व्यक्त केलं , मला माहित आहे आणि जाणवायला हि लागलं होतं की तुम्ही दोघीही माझ्यात गुंतत होतात , पण मलाच कळत नव्हतं , मी केवळ मैत्रीपोटी तुमच्या इतक्या जवळ आहे , की माझं कोणावर प्रेम आहे ?
“शुभम तूं आहेसच इतका गोड की कोणीही प्रेमात पडेल तुझ्या” मिता त्याचाकडे प्रेमाने बघत बोलली
“निधी , पण असं अजिबात नाही की मला तुझी काळजी नाही , तुझ्यावर प्रेम नाही …. आहे , नक्की आहे , पण तू माझी सखी आहेस आणि आपलं नातं कृष्ण राधिके सारखं आहे , निर्मळ असं”
“शुभम किती रे छान उपमा दिलीस , सगळं मळभ दूर झालं बघ मनावर आलेलं”
“हो निधी , मला मिता बद्दल जे वाटत होतं त्याचा साक्षात्कार तिच्या अपघात बद्दल कळलं ना तेव्हा झाला . मी इतका हादरलो , की मी काहीतरी गमावून बसलो आहे की काय असे भीतीदायक विचार मनात आले , तिला जर काही झाले असते , तर मी काय केलं असतं , माहित नाही”
“शुभम….. मी ही ऐकले ह्या बावळट बद्दल तेव्हा किती घाबरले , बाबा सोडतच नव्हते आत्ता , पण नाहीच राहवलं रे , हिला कधी एकदा बघते स्व:ताच्या डोळ्यांनी असे वाटले आणि मला काही चैन पडणार होते का हिला भेटल्याशिवाय ?”
“निधी …. तू माझा प्राण आहेस गं, अशी न सांगता कुठेही नाही जाणार , पण काकू …..”
परत दोघी रडायला लागल्या , आणि परत शुभमने दोघींना जवळ घेत थोपटत समजावले.
किती सुदंर दृश्य होते … कृष्ण, राधा आणि रुक्मिणीच जणू…..
Image by Bianca 2019log from Pixab
- शर्वरी…(कथा संग्रह) - September 12, 2022
- निसरडी वाट- 1 - September 17, 2021
- फिरुनी नवी जन्मेन मी ….२ - July 27, 2021
Pingback: प्यार को प्यार मिला (भाग ७ ) – LekhakOnline – Excellent Marathi Articles