Locked Down संसार – १

मनवा आता पुर्णपणे कंटाळून गेली होती. आज पुन्हा लॉकडाऊन वाढल्याची बातमी पाहून तीचा संताप होत होता. गेले २१ दिवस कसे काढले होते ते तिचे तिलाच माहीत होते. तेवढ्यात तिच्या फोनवर मेसेज आला. तिच्या अपेक्षेप्रमाणे शशांकचाच मेसेज होता.

शशांक – हाय जान

मनवा – हाय

शशांक – परत लॉकडाऊन वाढला यार. मला एवढा राग येतोय ना.

मनवा – हो ना. मला आता प्रचंड राग आला आहे. आतापर्यंत मी इथून बाहेर पडायला हवी होते पण या कोरोनामुळे अडकून पडले.

शशांक – हो ना. पण एक लक्षात ठेव फक्त अजून काही दिवस. मला एक सांग तो काही त्रास नाही देत ना तुला?

मनवा – नाही रे. तो काय त्रास देणार आहे मला? यू नो व्हॉट? फॉर अ चेंज खुप चांगले वागण्याचा प्रयत्न करतोय.

शशांक – इज इट? बरं चल मी बोलतो नंतर.

शशांक अॉनलाईन तर दिसत आहे पण माझ्याशी का बोलत नाही? हा विचार तिला आता छळत होता. अन हे गेल्या बर्‍याच दिवसात ती अनुभवत होती. त्याला विचारले तर तो काही नाही अॉफिसचे काम आहे असे सांगत असे. पण असे काय काम असणार होते? कारण ती देखील त्याच्याच अॉफिसमधे होती. फक्त तो प्रोजेक्ट्स मधे तर ही कॉस्ट कंट्रोलला. पण आता काही विशेष वर्कलोड नाही हे तीला नक्की माहीत होते.

चिन्मयने कॉफी केली. एक मग स्वतः घेतला आणि दुसरा मग मनवा समोर आणुन ठेवला. विचारात गढलेल्या मनवाची तिच्या मनपसंद कॉफीच्या सुगंधाने तंद्री तुटली. समोर वाफाळलेल्या कॉफीचा मग पाहून ती खुश झाली. टेरेसमधे उभ्या चिन्मयकडे तिने पाहिले आणि स्मित हास्य केले आणि थॅंक्स म्हटले. त्याने देखील तीला स्मितहास्य करुन प्रतिसाद दिला. आणि तो वळून टेरेसवरून खाली पाहू लागला.

पाठमोर्‍या चिन्मयकडे ती पाहत राहिली. बघता बघता ती ८ वर्षे मागे गेली. कॉलेजमध्ये चिन्मयशी झालेली तिची ओळख, आगदी सहजपणे त्याच्या ग्रुपमध्ये सामील झालेली मनवा, काही काळातच एकमेकांना एकमेकांबद्दल वाढणारी ओढ, त्यानंतर प्रेम, ती तीन सोनेरी वर्षे, घरच्यांना मान्य नसताना केलेले लग्न, नोकरीसाठी दोघांनी गाठलेली मुंबई, दोघांनीही केलेले अपार कष्ट, आपल्या मेहनतीने काही वर्षांतच एका मल्टीनॅशनल कंपनीमधे कॉस्ट आणि अकाऊंटस हेड झालेला चिन्मय.

आपल्या कामाने आपली ओळख निर्माण करणारी आणि सफलतेच्या एक एक पाहिर्‍या चढून सिनिअर मॅनेजर म्हणून कार्यरत असणारी मनवा. दोघांनी मिळुन घेतलेल्या मोठ्या घराचे हफ्ते, गाड्या आणि लॅविश लाईफस्टाईल साठी वागणारा पैसा यामुळेच त्या दोघांची होणारी ओढाताण, त्याचसाठी दोघांनी घेतलेल्या अॉफिसच्या वाढत्या जबाबदाऱ्या, त्यामुळे सारखे होणारे दाघांचे ट्रॅव्हलींग, त्यामुळे होणारा दुरावा, दोघांनाही असणारी मानसीक आणि शारीरिक ओढ परंतु या ना त्या कारणाने दोघांचीही होणारी निराशा. एकुणच यामुळेच घराची शांती हळूहळू भंग पावली.

त्यातूनच पुढे मनवाची अॉफिसमधील शशांकशी झालेली ओळख. एक मित्र या नात्याने त्याने तिचा संपादन केलेला विश्वास. याच मित्रत्वाच्या नात्याने मनवाने त्याच्याजवळ शेअर केलेल्या पर्सनल गोष्टी. पण त्याच गोष्टींमुळे शशांकच्या मनात तिच्याबद्दल निर्माण झालेले आकर्षण. काहीही करुन तिला आपलेसे करण्याची धडपड, तिच्या मनात चिन्मयबद्दल राग निर्माण करणे, सतत तिच्याशी संपर्क ठेवणे, ती घरी असताना देखील कॉल करणे, मनवाला चिन्मय विरुद्ध भडकवणे हे शशांक व्यवस्थित करत होता. त्याला तिच्याकडून जे हवे ते मिळत नव्हते म्हणून तो सतत त्या दोघांमधे दुरावा निर्माण करत होता.

इकडे चिन्मय त्याच्या अॉफिसच्या कामामुळे व्यस्त राहत होता. मनवाने त्याला समजून घ्यावे ही त्याची अपेक्षा होती. परंतु कलुषित झालेल्या तिच्या मनात प्रेमाची समीकरणं बदलत चालली होती. दोघांचे वाद होत होते. आरोप प्रत्यारोप होत होते.

इकडे शशांक मनवाला काही करुन आपलेसे करण्याचा प्रयत्न करत होता. मानवाच्या सौंदर्याची त्याच्यावर एवढी जादू झाली होती की त्याला आता दिवस रात्र मनवाच दिसत होती. गोर्‍या दुधाळ रंगाची, गोल चेहर्‍याची, सिल्की केस, रेखीव भुवया, गोबरे गाल, त्या गालावर पडणारी खळी, योग्य त्या ठिकाणचे उभार समोरच्याला खिळवून ठेवत असत. शशांक तिच्याकडे आकर्षित झाला नसता तरच नवल. त्यामुळे चिन्मय टूरवर असताना बर्‍याच वेळा तो मानवाच्या घरी येवून गेला होता. तिथे बर्‍याचदा तिच्याशी केलेले फ्लर्ट, सूचक बोलणे आणि एके दिवशी ती आवडत असल्याचे तिला सांगणे आणि त्यामुळेच मनवा हळवी झाली.

चिन्मय आपली काळजी करत नाही, पुर्वीसारखे आपल्यावर प्रेम करत नाही हे तिलाही वाटू लागले आणि शशांकबद्दल एक आकर्षण वाटू लागले. यामुळेच आता शशांक सातत्याने आपण तिची किती काळजी करतोय हे दाखवण्यासाठी आणखीनच लघट करु लागला. हात हातात घेणे, खांद्यावर थोपटणे, डोक्यावरुन हात फिरवता फिरवता हलकेच तिला आपल्या खांद्यावर झुकवणे, जवळ ओढूण घेणे हे ही होवू लागले. अशातच एकदा मनवा आणि चिन्मय मधे आगदी साध्या कारणाने भांडण झाले. त्याच्या दुसर्‍याच दिवशी चिन्मय टूर गेला आणि हे मनवाने सांगताच शशांकने तिच्याच घरी तळ ठोकला. पण मनवा त्याला जवळ येवू देत नसल्याने त्याची चीडचीड झाली.

मग त्याने तिला मिळवण्यासाठी लग्नाची मागणी घातली. हळवी मनवा बहकली आणि हलकेच त्याच्या कुशीत शिरली. तिला काही कळायच्या आतच शशांकने तिच्यावरती केलेला चुंबनांचा वर्षाव तीला रोमांचीत करत होता. कित्येक दिवसांनी ती हे अनुभवत होती. मनवा आता आपल्या जाळ्यात अडकली आहे असे वाटून शशांक आता तिला बेडवर खेचू लागला. त्याच्या मजबूत विळख्यात मनवा हरवली होती. बेडवर तिच्याकडे पाहत झुकणारा शशांक तीला चिन्मयसारखा वाटत होता. पण समोरच्याच्या टेबलवरील त्या दोघांची फोटोफ्रेम पाहून ती एकदम बावरली आणि उठून बसली.

शशांकने भरपूर प्रयत्न करुनही ती वश झाली नाही. मी डिव्होर्स फाईल करेन आणि तो मिळाला की आपण रीतसर लग्न करु. मग मी तुझीच आहे. हे तीने त्याला सांगितले. शशांक चिडला पण मनवा बधली नाही. शशांक तिच्या घरून निघून गेला. एकदा डिव्होर्स फाईल झाला की तो पुन्हा प्रयत्न करायचा विचार करत होता. अन एकदा ती तयार झाली की मग डिव्होर्स होईपर्यंत तिच्या शरीराची मजा घेवू आणि पुढचे पुढे पाहू. असा तो विचार करत होता.

Image by Bing N. from Pixabay 

Abhijit Inamdar

Abhijit Inamdar

लेखक परिचय : नाव- अभिजित अशोक इनामदार. सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी इंजिनिअरिंग केले असून एमबीए इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये केले आहे. नोकरीनिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरून झाल्यानंतर सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा आहे. काही नाट्यप्रयोग तर काही म्युझिकल शोज चे अँकरिंग केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते.

One thought on “Locked Down संसार – १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!