कधी_रे_येशील_तू_जिवलगा.. 1

“सृजन..  ! अरे थांब ना ..  बोलशील कि नाही..? 
सखी ची आर्त हाक.. पण तो त्याच्याच तंद्रीत..
ही मैत्री म्हणावी कि अजून काही?  हे काळ ठरवणार होता..
सखी..  सोनेरी कुरळ्या केसांची, केतकी रंगाची आणि निळसर डोळ्यांची… परी च जणू.. पण… सृजन काही ह्या सौंदर्याला भुलला नव्हता… तिला काही गर्व ही नव्हता तिच्या रूपाचा… पण सृजन इतका आवडला होता कि निदान त्यानं पाहावं.. बोलावं.. असं खूप वाटत होतं…पण छे ह्याच काहीतरी वेगळंच चालू होतं..
सखी तिच्या विचारातून बाहेर आली.. आणि सृजन तो पर्यंत निघून गेला होता..  तिला त्यांची पहिली भेट आठवली..

निशू… अगं लक्ष कुठाय?  सखी न निशू अगदी घट्ट मैत्रिणी… कधीच्या हाका मारतीये… आणि तू?..  निशू नी एका मुलाकडे बोट दाखवलं.. आणि म्हणाली…अगं तो बघ… तो ग.. ब्लू टी शर्ट वाला ग… कसला हँडसम आहे… सखी तिला बाजूला करून एकटक पाहतच राहिली.. इतकी सुंदर बार्बी सारखी सखी.. एका क्षणात त्याच्यावर भाळली.. आहाहा.. काय मस्त स्पोर्ट्स बिल्ट.. खरंच किती हॉट आहे हा…
निशू… कोण ग हा?  सांग ना… नाव काय?.. 
अग मला काय माहित?  पण थांब लगेच माहिती काढते..
इतक्यात तो ब्लु टी शर्ट तिच्यासमोर आला… पण अरे.. हे काय.. ह्यांन साधं बघितलं ही नाही…
सखी पार हिरमुसली… खरंतर तो तिच्या मागे उभ्या असलेल्या त्याच्या मित्राला निहाल ला भेटायला आला होता.. ती जणु मधे नाहीच आहे.. अशा थाटात तो निहाल ला भेटला… आणि दोघ कॅन्टीनच्या दिशेने गेले..
निशू आता इरेला पेटली… तिनं लगेच तिच्या नेटवर्क ला कामाला लावलं .. आणि माहिती मिळाली..

घ्या मॅडम…. तुमच्या ब्लु टी शर्ट च नाव…  सृजन..
सृजन दामले..  वय 20.. sybcom..आणि हो
राहतो कॉलेज च्या boys हॉस्टेल मधे बर का..
अजून  काही?  आणि निशू नी सखी कडे बघून डोळा मारला !.. हम्म्म्म… नाही अजून माहिती मी काढते.. सखी तिला टाळी देत म्हणाली ..
अगं पण आख्ख कॉलेजच्या मुलांचं माझ्याकडे लक्ष आहे आणि ह्यांन साधं पाहिलं पण नाही यार.. !
उगी उगी बाळा… पडेल.. हो.. तो तुझ्याच प्रेमात पडेल… निशू आशीर्वाद द्यायच्या पोझ मधे म्हणाली…
सखी सुद्धा निशूच्या घरातच पीजी  म्हणून राहत होती..  मुळची ती कोकणातली.. पण शिक्षणासाठी म्हणून ती  मुंबईला आली होती..
आणि सृजन पक्का मुंबईकर… पण मनानी मात्र कोकणात रमणारा .. निसर्ग त्याचा वीक पॉईंट..
यथावकाश निशू निहाल सखी आणि सृजन ह्यांची एकाच वर्गात असल्यानी ओळख झाली आणि आता तर निहाल नी निशूला पटवायला सखी ची मदत मागितली… झालं.. निशू आणि निहाल ह्यांचं प्रकरण मार्गी लागलं… पण सृजन अजूनही तितका मोकळा नव्हता झाला…
तो हातचं राखून वागायचा..

एके दिवशी त्यांनी सैंदन व्हॅलीचा प्लॅन केला.. कोजागिरी ची रम्य रात्र… काजव्यांच्या ताटव्यानी नटलेली… चमचमणारी झाडं.. आणि चंद्राचा लख्ख प्रकाश… बस्स अजून काय पाहिजे… !
त्यानी रात्री टेन्ट मधे मुक्काम करायचा आणि पहाटे त्या दरीत उतरायचं असा बेत आखला…
निशू आणि निहाल.. रोमँटिक मूड मधे असल्यानं… टेन्ट मधे गेले… आणि सृजन आणि सखी त्यांना एकांत मिळावा म्हणून टेन्ट पासून थोडं लांब चालत आले..
सखी मुळातच बोलघेवडी.. आणि त्यात सृजन बरोबर…आज तिच्या उत्साहाला उधाण आलं होतं..
तिनं विचारलं… काय रे तूझ्या घरी कोण कोण असत?
सृजन.. गप्प..
Sakhi: ओह्ह साहेब.. बोला कि..
सृजन : कोणी नाही..
सखी : काय? अरे पण.. निहाल म्हणाला.. आई असते.. बाबा आहेत पण कामानिमित्त परदेशीं असतात..
सृजन : माहिती काढलीयेस ना? मग आता चौकश्या कशाला? तो चिडला आणि तरा तरा पुढे गेला…
ती मागून हाका मारत पळत आली…तो थांबला.. काय आहे?  परत असल्या पर्सनल चौकश्या नको करूस… नाहीतर आपली मैत्री संपली..
ती त्याचा हा रुद्र अवतार पाहून बिचकली… सॉरी सॉरी म्हणत पून्हा चालू लागली..
एका कड्यापाशी येऊन थांबली दोघ.. आसमंत त्या दुधाळ प्रकाशाने भरून गेलेला… हवेतला गारवा धुंद पसरलेला.. आणि इतक्यात सखी नं त्याचा हात धरला..
इतक्या दिवसांचं मनात साचलेलं आज त्याला सांगायचंच असं तिचं पक्क ठरलं होतं..

ती एक पाय दुमडून खाली बसली.. आणि त्याला म्हणाली… सृजन.. i love u…will u marry me?
सृजन पाहतच राहिला… काय झालं नेमकं आत्ता…
हिनं प्रपोज केलय मला? 
तो तसाच ब्लँक उभा राहिला.. तिनं त्याच्या जवळ येत.. त्याला बिलगत पुन्हा विचारलं.. सांग ना… लग्न करशील माझ्याशी?..  माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.. अगदी पहिल्यांदा तुला पाहिलं.. आणि प्रेमातच पडले.. मी नाही तुझ्याशिवाय कुणाचा विचार करू शकत… आणि सृजन काही बोलणार इतक्यात तिनं त्याच्या गालवर ओठ टेकले..
सृजन नी तिला बाजूला केलं . आणि तो तिला म्हणाला
सखी.. मी..
मी तुला त्या नजरेनी नाही पाहिलं…  आणि हा  काय पोरकट पणा आहे…
आता ब्लँक व्हायची वेळ सखी वर आली.. तिनं पाठमोऱ्या त्याला जाताना पाहिलं.. आणि तिला रडू आवरलं नाही… एका क्षणात त्या सुंदर कोजागिरीच्या चंद्राला जणू ग्रहण लागलं..

सृजन..  ! अरे थांब ना ..  बोलशील कि नाही..? …
सखी ची आर्त हाक.. पण तो त्याच्याच तंद्रीत पुढे चालत होता…

क्रमश :
©मानसी

Image by Gerd Altmann from Pixabay 

3 thoughts on “कधी_रे_येशील_तू_जिवलगा.. 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!