कधी रे येशील तू जिवलगा- 3
आधीच्या भागाची लिंक- कधी रे येशील तू जिवलगा- भाग २
सृजन आज हॉस्टेल ला नं जाता घरी आला.. आई नं तो अचानक आलेला बघून विचारलं… काय रे सगळं ठीक ना? तब्येत बरी आहे ना बाळा?..
हो… त्यानं थंड प्रतिसाद दिला…
आई जवळ आली.. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली… काय झालय मन्या… आई ला नाही सांगणार..
इतका वेळ मनात दाबून ठेवलेला हुंदका आता मात्र अनावर झाला…
आणि तो ओक्सबोक्शी रडू लागला..
आई.. अगं काल रात्री मला सखी नं थेट लग्नासाठी विचारलं..
त्याला पुढे बोलवेना… आई ला त्याची घालमेल कळत होती… त्याला सखी आवडते हे त्यानं कबूलही केलं होतं.. पण त्याला तिला होकार कसा द्यायचा हेच उमगत नव्हतं..
आई काहीही नं बोलता त्याला थोपटत होती… शांत करत होती… आपण उद्या बोलूयात म्हणत ती त्याच्या साठी चहा करायला आत गेली..
तिनं ही पदराने डोळे टिपले..
सखी सारखी गोड़ मुलगी तिला ही सून म्हणून पसंत होती.. पण… हा पण जीवघेणा होता… केवळ स्वतः च्या मुलाच्या सुखाचा विचार करून ती एका मुलीच्या आयुष्याची माती
नक्कीच करणार नव्हती..
तीने त्याला चहा आणि खायला दिलं… त्याची औषधं दिली आणि ती त्याच्या बाबांना फोन करायला आत गेली.. सृजन ही फार काही नं बोलता त्याच्या समोरच्या फाईल कडे पाहात राहिला..
काय होता असा भूतकाळ जो त्या मायलेकाला कुरतडत होता…?
तब्बल 10 वर्षांपूर्वीची गोष्ट.. एक दिवस अचानक श्रेया च्या पोटात दुखायला लागलं… तिला तातडीनं ऍडमिट केलं.. खूप तपासण्या करून ही डॉक्टरांना काही कळेना… मग शाम आणि स्नेहा ह्या दाम्पत्यांनी थेट अमेरिका गाठली.. गाठीशी असलेला सगळा पैसा पणाला लावला… आणि एक धक्कादायक सत्य समोर आलं..
श्रेयाच्या शरीरात पुरुषतत्व आहे… आणि तिला गर्भाशय ही नाहीये… आता.. म्हणजे ती नपुसंक आहे का.. अशी शंका येऊन ती दोघे ही हादरली… पण नाही ते ही सत्य नव्हतं.. आता तिला ट्रान्सजेन्डर(लिंग प्रत्यारोपण) करावं लागणार होतं..
वयाची 10 वर्ष ती स्त्री म्हणून जगली पण आता तिचं रूपांतर शरीरानं पुरुषात होणार होतं.. आणि अस नं केल्यास तिच्या वाढी साठी ते अपायकारक ठरणार होतं..
अखेर त्यांनी निर्णय घेतला आणि श्रेयाचा सृजन म्हणून पुनर्जन्म झाला…
काही वेळा केवळ वैज्ञानिक गोष्टी घडतात तेव्हा त्या पेशंट च्या आणि नातेवाईक यांच्या मनोवैज्ञानिक पातळीवर किती उलथापालथ होते.. आणि झालेली गोष्ट पचवणं अजून अवघड होऊन बसत…
सृजन च्या ही मनात आता नेमकी हीच खळबळ चालू होती .. मला आवडलेली सखी ही विरुद्ध लिंगाची म्हणून आवडलीये कि मनानी मी अजून स्त्री आहे? आणि ती मला लेस्बियन म्हणून आवडतीये.. भले आज 10 वर्ष तो पुरुष म्हणून जगत होता… पण पुरुष सुलभ भावना.. त्यांचं काय?.. त्या नक्की त्याच्या मनात… तनात.. उमटल्या होत्या का?..
एकीकडे त्याला एक मुलगी आवडलीये हे ऐकून… आनंद मानायचा कि दुःख.. हेच त्याच्या जन्मदात्यांना ही कळलं नव्हतं…
सखीनं ठरवलं… काही दिवस कोकणात जाऊन यायचं… घरी गेलो कि काही दिवस ह्या ताणातून आपण मोकळे होऊ.. पण मग तिनं.. घरी न जाता.. तिच्या आजोळी गुहागर ला जायचं ठरवलं.. आई ला.. मामा ला कळवलं आणि त्याच संध्याकाळी ती गेली सुद्धा..
इकडे सृजन ही सैरभैर झालाय हे पाहून त्याच्या बाबांनी गुहागरची तिकीट ऑनलाईन बुक केली आणि त्याला मेल केली… अशा वेळी त्याला त्याचा बाबा खूप आवडायचा… त्याला न सांगता कळायचं.. कि कोकण ट्रिप सृजन ला या ताणातून हलकं करेल..
गुहागरला एका 3 स्टार हॉटेल मधे त्याची पुढच्या आठवड्या साठी सोय केलेली होती… ड्राइवर आला आणि त्यानं फोन करून संध्याकाळीच निघून येतोय.. अस हॉटेल ला कळवलं..
आता नियतीनं पुन्हा दोघांना समोर आणण्याचं दान टाकलं होतं..
काय होईल..? हे प्रवासी एकत्र भेटतील? कि आपल्याच कोषात राहून परततील?..
क्रमशः
पुढील भागाची लिंक-
Image by Gerd Altmann from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
boy of 20 years age , and his marriage .. accepted by him and his mom .. when he is in sy ..within such a short time .. is not digestabe …
खरंतर आई वडिलांनी ह्या मुलाचं पुरुष असणं accept केलंय ते ही वयाच्या 10 व्या वर्षी… तो ट्रान्सजेन्डर तेव्हाच झालाय… आणि म्हणूनच त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रेयसी बद्दल हरकत नाहीये..
Pingback: कधी रे येशील तू जिवलगा- 4 – LekhakOnline – Excellent Marathi Articles