कधी रे येशील तू जिवलगा- 4

आधीच्या भागाची लिंक- कधी रे येशील तू जिवलगा- 3

सखी मामाच्या घरी.. आणि सृजन ठरलेल्या हॉटेल मधे पोचले… हॉटेल विसावा…
नाव वाचताच त्याचं उद्विग्न मन जरा शांत झालं.. हम्म आता इथे मिळेल निवांत विसावा.. म्हणतं तो रूम मधे आला.. फ्रेश होऊन त्यानं चहा मागवला… आणि तो बाल्कनीतून समोरचा निसर्ग न्याहाळू लागला..

पुन्हा एकदा तेच विचार.. तीच गुडघ्यावर बसून प्रपोज करणारी सखी.. आणि आपण झिडकारलंय हे कळल्यावर हमसून हमसून रडणारी… माझी सखी…  किती गोड़ दिसत होती.. खरंतर मीच तिला विचारलं असतं.. पण..  साला हा ‘पण ‘ का नाही माझी पाठ सोडत आहे.. जर तिला खरं कळलं.. तरी ती मला स्वीकारेल? .. कि कायमची दुरावेल..  नकोय मला ती लांब जायला… निदान रोज  बघतोय तरी.. भेटतोय.. ज्या काही पुसट स्पर्शाची देवाण घेवाण आहे ती ही संपेल..

स्पर्श… मला तिचा स्पर्श हवाहवासा वाटतो.. पण म्हणजे नेमक काय होतं मला?..  आता ह्याच्या बद्दल कुणाशी बोलू..  आणि तो या  विचारचक्रात असतानाच त्याच्या मोबाईल वर मेसेज टोन वाजला… अभि..  अभ्या नी काय काम काढलंय.. हा तर U Sला आहे आणि आता काय काम? म्हणत त्याने मेसेज वाचला…  आणि लगेच त्याने अभि ला फोन लावला ..
अभि..  सुज्या लेका.. विसरलास का..?
सुज्या.  नाही रे.. पण आज कशी आठवण आली..?

अभि.. खूप महत्वाचं काम आहे…  माझा एक रिसर्च पेपर आलाय आणि तो तुला पाठवलाय… वाच नक्की आणि तुझं मत कळव.. आजच… प्लीज… कारण उद्या फायनल सबमिशन आहे..

ओक्के… म्हणत सुज्यानी मेल उघडला…
विषय… ट्रान्सजेन्डर री हॅब इन सोसायटी…
पुनर्वसन… ते ही माझ्या सारख्यांच..

तो आता अधाशासारखं वाचू लागला… अमेरिकेत म्हणे जसं लेस्बियन.. होमो ला कायदेशीर मान्यता मिळाली तशीच तजवीज आता ट्रान्सजेन्डर साठी करण्यात येणार आहे..  त्यांना कायद्यानी लग्न आणि दत्तक मूल घेण्याचा अधिकार मिळणार आहे..

ही खूपच आनंदाची बाब होती..  पण तरीही.. सखी ला माझं जे अस्तित्व आहे ते मान्य होईल?. मला तिच्या पासून लपवून तिला मिळवायचं नाहीये… त्याची ही विचार शृंखला गुंफत गेली..आणि इतक्यात सखी चा कॉल आला.. एक मिस कॉल ही झाला.. मग पुन्हा कॉल..

Hii..  काय रे?  इतका वेळ… फोन  उचलायला? सखी नेहमीच्याच उत्साहात…
ही इतकी नॉर्मल कशी झाली?  इतक्या लवकर?..
” अरे बोलणार आहेस ना माझ्याशी?
सॉरी यार.. मीच समजून नाही घेतलं.. उगाच 100 प्रश्न विचारत बसले… पण आपली मैत्री मात्र अबाधित ठेव बाबा… रुसू नकोस..  ऐक ना… मी  मामा कडे आलीये so मी नाहीये मुंबईत… आले कि कॉल करते…  बाय.. आणि हो.. सॉरी परत एकदा… प्लीज माफ केलंस ना..
ह्याच उत्तर… हम्म्म्म..
सखी ला ह्या अशा वागण्याची सवय होती.. त्यामुळे तिनं ही विषय नं ताणता फोन कट केला..

सखी मुंबईत नाहीये पण मग आहे कुठे?
जाऊदे मी आता विचारत नाही.. नंतर बोलीन तिच्याशी.. पण आधी अभ्याशी बोलूयात..
त्यानं पुन्हा कॉल केला.. पण बोलणं जुजबीच झालं.. निवांत बोलतो म्हणत अभ्यानी कॉल बंद केला..

आता स्वारी भटकायला बाहेर पडली…  संधिप्रकाश…
आणि सुरेख रंगांनी नटलेलं आकाश.. तो किनाऱ्यावर पोचला… सूर्यास्त.. अहाहा… असा हा तेजाचा गोळा सागराच्या पोटात लुप्त होतो… आणि मग तिमिर साम्राज्य… अशा वेळी मन का कातर होतं… सखी… सखी.. आणि तिचेच विचार मनाभोवती पिंगा घालत होते.. किती तरी वेळ तो तसाच बसून  राहिला.. त्या अथांग सागराकडे पाहात…

इथे त्याला कॉल करूनही ही अस्वस्थच होती… var var कितीही आनंदी नॉर्मल आहोत अस भासवत राहिली तरी आतून पार खचली होती…  आत्ता तो समोर यावा.. अन म्हणावं त्यानं…  हो सखी मी तुझाच आहे.. कायमचा… पण छे.. त्यानं तर स्वतः हून हे ही नाही सांगितलं कि तो मुंबई बाहेर आहे… कुठे गेलाय कुणास ठाऊक…

आजी नी सखीला बोलावलं आणि तयार व्हायला सांगितलं… त्यांना एका नातेवाईकां कडे जायचं होतं..
योगायोग असा कि ते नातेवाईक म्हणजे हॉटेल विसावा चे मालक.. विशाल पेंडसे होते.. आता त्यांनी हा व्यवसाय त्यांच्या मुलाला नील ला द्यायचं ठरवलं होतं.. आणि त्याचं संदर्भात एक छोटीशी पार्टी ठरवली होती.. हॉटेलच्या टेरेस वर…
सखी छान दिसत होती.. गुलाबी रंगाचा पंजाबी आणि लाल ओढणी जाळीदार…  मोकळे सोनेरी केस.. हलका मेकअप..  मुळातच ती किती सुंदर होती.. आजी तिची दृष्ट काढत म्हणाली.. जातीच्या सौंदर्याला काहीही खुलून दिसतं..  चल.. निघूया ..?
आजी मामा मामी आणि सखी.. हॉटेल वर पोचले..
बऱ्यापैकी गर्दी होती .. नील सगळ्यांचं स्वागत करत होता..
सखी ला पाहून तर त्याची विकेटच पडली.. आणि पाहताच तो तिच्या प्रेमात पडला.. नील अत्यंत हुशार होता.. त्यामुळे त्यानं लगेचच हे वडिलांना सांगून टाकलं .. आणि आज कार्यक्रम संपला कि तिला मागणी घालायची हे मनोमन ठरवून ही टाकलं..

इकडे सृजन रूम वर आला.. आत येताच हाऊस कीपिंग वाला त्याला पार्टी साठी बोलवायला आला.. पण सृजन ते टाळलं.. आणि जेवण रूम वर मागवलं..

सखी सगळ्यांशी हसून बोलत होती.. मिसळत होती.. पण कुठेतरी ती तिचा एकटेपणा लपवायचा प्रयत्न करत होती… आपले एक गेस्ट जेवायला पार्टीत येणार नाहीयेत असा निरोप नील ला मिळाला आणि तो स्वतः सृजन ला बोलवायला खाली आला.. आता त्याचा आग्रह मोडायचा नाही म्हणून सृजन ही तयार झाला आणि वर आला.. एक टेरेस चा कोपरा त्यानं हेरला..आणि तो त्या दिशेनी निघाला..इतक्यात तिथे लाईट गेले आणि त्याचा कुणाला तरी धक्का लागला.. ती व्यक्ति धडपडली आणि त्यानं सावरलं… इतक्यात जनरेटर सुरु झाला आणि दिवे लागले…
त्या प्रकाशात ती व्यक्ती त्याच्या मिठीत होती…
अर्थात… आपली सखीचं होती… त्याला वाटलं भास झालाय.. आणि तिची गत ही तीच होती.. त्यामुळे काही क्षण असेच गेले आणि मग नील पुढे आला.. सखी ला अलगद बाजूला करत म्हणाला .. अगं लागलं नाही ना तुला कुठं?.. सॉरी सर… एन्जॉय द पार्टी… आजी आणि मामा समोर त्याला ओळख दाखवणं तिला अवघड होतं. . आणि हा कोण टिकोजीराव ज्यानं माझ्या सखीला माझ्या पासून लांब केलं.. म्हणत सुज्या चरफडला… आणि रागानी निघून गेला.. सखी हळूच सटकली… आणि सुज्या च्या रूम बाहेर आली.. तिनं नॉक केलं  आणि दार उघडताच ती पटकन आत शिरली…
तिनं दार लावून घेतलं.. आणि सुज्याला घट्ट मिठीच मारली… तिच्या या अनपेक्षित कृतीनं तो आधी बावचळला…पण सखी मिठीत होती.. आणि ह्या क्षणांनी मात्र जादू केली.. त्यानं ही मिठीत तिला घेत तिच्या मानेवर किस केलं.. रोमांचित झालेली ती दोघ त्या धुंदीत… त्या आवेगांनी वेढली गेली… त्यांचं पहिलं चुंबन… आणि अचानक तो बाजूला झाला… चेहरा लपवून बाजूला गेला.. सखी नं मागून येऊन मिठीत घ्यायचा यत्न केला पण त्यानं नाकारलं.. ती ही रडवेली झाली … ती जायला वळली आणि त्यानं हात धरून थांबवलं… सखी … कधी तरी तुला हे सांगणार होतो.. पण आज सांगतो… बस.. ती बसली.. तो तिच्या पायाशी बसला … त्यानं तिच्याकडे पाहिलं.. आणि म्हणाला… मी ट्रान्सजेन्डर मुळे पुरुष झालोय… मूळ मी स्त्री होतो… मग त्याचा सगळा भूतकाळ त्यानं तिच्या समोर मांडला.. आधी ती हे ऐकून चक्रावून गेली पण हळू हळू तिला परिस्थितीच भान आलं..
ती गप्प झाली.. आणि मग काहीही न बोलता तिथून निघून गेली…
आज सगळं सांगितल्यामुळे त्याला एक शांतता मिळाली होती पण तीच्या मनात मात्र प्रचंड खळबळ माजली होती..

काय निर्णय घेईल सखी?  समजून घेईल कि नाकारेल त्याला?
क्रमशः

पुढील भागाची लिंक- कधी रे येशील तू जिवलगा- ५

Image by Gerd Altmann from Pixabay 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!