कधी रे येशील तू जिवलगा- 6

आधीच्या भागाची लिंक- कधी रे येशील तू जिवलगा- ५

अभिने घर पाहून ठेवलं होतं सखीच…. आज त्यानं गुलाब ही पाठवले .. मग टेडी.. आणि मग एक ग्रीटिंग कार्ड…
नाव  … your.. Admirer… ♥️

सखी ला खात्रीच पटली… हा सुज्या असणार.. ती ही आनंदली.. पण… पण ते ट्रान्सजेन्डर.. विषयी अजून माहिती काढायला हवी.. असा विचार करून गप्प राहिली.. एव्हाना निशू परतली…ह्यासगळ्यात 2 आठवडे उलटले आणि आल्यावर तिला सृजन कडून सगळं कळलं… अगदी हे सुद्धा कि सखी सध्या त्याच्याशी बोलत नाहीये..
अभि मात्र आस लावून बसला होता.. योग्य संधीची… आणि ती त्याला आयतीच मिळाली ..
सृजन आणि तो मॉल मधे गेले होते… समोर सखी अन निशू…  सुज्या त्यांच्यापाशी गेला आणि निशूनी त्यांच्यात पॅचअप व्हावं म्हणून एक पार्टी ठरवली अगदी छोटेखानी.. तिनं सृजन ला ही सांगितलं कि तुझ्या भावा  ला घेऊन ये… इकडे अभि खुश… सखी भेटणार म्हणून आणि तिकडे सखी.. रममाण… तिला सुज्या भेटणार म्हणून..

सुज्या आणि अभि आता संध्याकाळची वाट पाहात होते..
एवढतात बेल वाजली… शेजारच्या काकू घाईत आत आल्या आणि सुज्या ला घेऊन गेल्या..  त्यांचे सासरे घरीच पडले होते आणि तातडीनं त्यांना हॉस्पिटल मधे न्यायचं होतं… अभि घरातच झोपला होता म्हणून त्याला न उठवता सुज्या एकटाच गेला… आणि त्यानं निशूला उशीरा येतो असं कळवून टाकलं..
अभिला लोकेशन पाठवून टाकलं आणि मी थेट येतो असा  मेसेज ही टाकला..

अभि मस्त तयार होऊन निघाला .. आणि जाताना शॅम्पेन आणि चॉकलेट्स  घेऊन गेला… अमेरिकेत राहून हे त्याच्या साठी नेहमीचंच होतं.. पण सखी ला मात्र खूप अप्रूप वाटलं..
तो सतत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता.. तिला इंप्रेस करता यावं म्हणून मग त्यानं त्याच्या शोध निबंधाविषयी बोलायला सुरुवात केली निहालशी आणि सखीच्या कानावर गप्पांमधला एक शब्द कानावर पडला .. ट्रान्सजेन्डर… तिनं कान टवकारले.. त्यानं खूपच सोप्या भाषेत सांगायला सुरुवात केली तशी निशू आणि सखी ही येऊन बसल्या.. मुळात ट्रान्सजेन्डर म्हणजे काय?  त्या बाबतची शस्त्रक्रिया.. त्यासाठी सध्या अमेरिकेत काय चालू आहे.. आणि अशा किती केसेस वर त्यानं काम केलय…. इत्यादी…
तिनं ही काही जुजबी माहिती विचारली…  एकंदरीत तिच्यावर त्याची छाप पडली होती.. अभि ही देखणाच होता..
निघताना ती याला सोडायला खाली आली आणि त्यानी सहज विचारलं…  टेडी गिफ्ट्स आणि गुलाब आवडले का?.. हो.. तर… म्हणत ती हसली.. तिच्या डोक्यात अजून ही हे सुज्यानीच पाठवले असणार आणि अभि त्याच्या बरोबर राहतोय म्हणजे त्याला माहिती असणार हा विचार..
पुन्हा दोघ विलग झाली.. आणि तिनं सुज्या ला कॉल लावला … पण हॉस्पिटल च्या गडबडीत त्याच्या फोनची बॅटरी च संपली… सतत स्विच ऑफ ऐकून ती निघून गेली… गप्पा इतक्या रंगल्या होत्या कि सखीचा नंबर अभि न मागून घेतला.. आणि पोचल्या वर मेसेज केला.. आजची पार्टी छान झाली.. आणि तुझ्यासारखी एक गोड़ मैत्रीण मिळाली …. गूड नाईट…
तिनं ही थँक यु… गुड नाईट चा रिप्लाय केला.. आता उद्याच सुज्याशी बोलायचं अस ठरवत ती बाकीच्या आवरा आवरी साठी किचन मध्ये आली..  निशू आणि ती आवरत असतानाच पुन्हा मेसेज… काय  ग अजून जागी आहेस का.. गप्पा मारायला वेळ आहे का?
तिला ही अभि ची कंपनी आवडली होती…
हो बोल ना…  आवरतोय…
मग येऊ का  मदतीला?
हो ये कि…
मग एक कप कॉफी मिळेल?
नक्कीच…
आलोच..
चल रे उगाच नको खेचू ..
बघ .. खरंच आलो तर..
येच .. बघूया..
आणि डोअर बेल वाजली… आत्ता कोण असेल ग?  म्हणत सखी दार उघडते.. आणि समोर.. अभि !…
अभि !!!! अगं निशू हा खरंच आलाय…… काय रे.. घरी गेलाच नाहीस का?
नाही.. पार्किंग मधेच होतो.. म्हटलं गप्पा माराव्यात नव्या नव्या सखीशी… सखी ही भुलली ह्या दिलखुलास स्वभावाला.. तस ही आकर्षण हे सगळ्यात परमोच्च क्षणी असत.. या वयात.. त्यात अभि सारखा हुशार देखणा मित्र  सतत आपल्याला attention देतोय आणि नेमका ह्याच वेळी आपल्या मनातला हिरो जरा साइड ट्रॅक वर गेला कि… काहीही घडू शकत.

आता अभि चा परतायचा दिवस ठरला.. आणि मधल्या काळात सखी आणि सृजन यांच्या गाठीभेटी होऊच शकल्या नाहीत.. सतत अभि मात्र सखी भोवती राहत होता.. पण सृजन ला त्यानं सखी बद्दलच्या भावना नाही सांगितल्या..

अभि ने सुज्या ला ही अमेरिकेत यायला तयार केलं आणि आता महिनाभर तो सखी पासून दूर जाणार होता…

निघताना सखी आवर्जून एअरपोर्ट ला भेटायला गेली.. सुज्या चे आई बाबा असल्या मुळे तिनं लांबूनच बाय केलं दोघांना.. पण जसं त्यांनी बोर्ड केलं.. एक मेसेज..
अभि चा… thank you soo much dear…
An airport has witnessed a most lovely kisses and hugs… but let me add.. and lovely tears too!!!
किती छान लिहितो  हा…
सुज्या ला का नाही सुचतं  . नकळत तिच्या मनात आता सुज्या आणि अभि ची तुलना होऊ लागली..

आणि हाच क्षण खूप जपायचा असतो…
तिकडे पोचल्यावर आधी अभि नी मेसेज केला.. पोचलो ग… मग सुज्या…  नंतर पुन्हा सुज्या ऑफलाईन पण अभ्या कायम ऑनलाइन…
असेच काही दिवस गेले .. सखी अभि मैत्री अजून दृढ होतं गेली…. एकी कडे ट्रान्सजेन्डर ते पुरुष हा प्रवास सृजन पर करत होता… बॉडी बिल्डिंग… जिम.. आहार आणि पुरुष  मानसिकता ह्या सगळ्याच गोष्टी आत्मसात करत होता… फक्त सखी साठी… आणि तिच्या साठी ही तयारी तिला दूर ठेवत करत होता .. सखी मनानं  अभि कडे झुकत चालली होती…

आणि एक दिवस नील चा फोन आला … सखी मी नील.. आपण गुहागर ला भेटलो  होतो.. मी मुंबईत आलोय.. आणि तुझ्याच बिल्डिंग खाली तुला पिक अप करयला आलोय .. माझ्या मुंबईच्या हॉटेल च ओपनिंग आहे.. आणि तुझे सगळे नातेवाईक तुझी वाट बघतायत… कसं वाटलं सरप्राईज?

अभि कडे झुकणार मन…. नीलचा  घरच्यांमुळे समोर आलेला पर्याय… आणि मनात खोलवर रुतलेला सृजन..

आता नेमकं काय घडेल?… सखी अभि ला निवडेल कि..?? अजून कुणाला??

क्रमश:

पुढील भागाची लिंक- कधी रे येशील तू जिवलगा-  7

Image by Gerd Altmann from Pixabay 

5 thoughts on “कधी रे येशील तू जिवलगा- 6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!