जाण
दोन दिवसांपूर्वी झालेल्या लग्नाची धावपळ आणि गडबड थोडी शांत होऊन सगळ्यांचा शीण जरासा उतरला होता . घरातील सगळे जेवायला बसलो होते .
” वाह ! नवीन सूनबाईंच्या हाताला खूपच चव आहे हो ! नाहीतर इतकी वर्षतर… “
आजीबाईंनी पावती दिली आणि टोमणाही मारला , तसं संजना ने बावरून नितीनरावांकडे बघितलं . त्यांनी डोळ्यानेच दुर्लक्ष कर असं सुचवलं .
ती ताट घेऊन सासूबाईंच्या म्हणजे अनघाच्या खोलीत गेली .
” अग , इथे का आणलस ? मी आले असते न बाहेर ! …चल मी येते , आपण तिकडेच जेवू .” लॅपटॉप बंद करत अनघा म्हणाली .
लग्नानंतर मागे राहिलेले जवळचे नातलग , नवरा नवरी यांचे मजेत उखाणे घेत , घास भरवत जेवण झाले .
संजना च्या हातच्या भाजीची सगळ्यांनी खूप तारीफ केली . जेवतांना आत्याबाईंनी पण अनघा ला काहीतरी डिवचलं , पण संजनाला ऐकायला आलं नाही .
जेवणं झाली . नितीन राव जातीने स्वयंपाक घरात मावशीबाई कडून आवरून घेत होते .
अनघाला जर्मनी च्या मॅगझीन मध्ये क्वांटम फिजिक्स वर एक मोठा अभ्यासपूर्ण लेख लिहून द्यायचा होता . शिवाय येत्या आठवड्यात सिंगापूर ला कॉन्फरन्स ला जायचं असल्याने त्याची तयारीही करायची होती .
” तू जा अनघा , मी आहे न .” म्हणत नितीन रावांनी आपल्या कर्तृत्ववान पत्नीला पाठिंबा दिला होता.
” आमच्या मुली म्हणजे तुझ्या बहिणीपण नोकऱ्या करतातच न रे बाबा ? पण कालच घरात नवीन सून आलेली असतांना असे दरवाजे बंद करून नाही बसत त्या !! ” आजी सगळ्यांदेखत असं बोलल्या …तरी नितीन राव शांतच होते .
संजना ला आठवलं . लग्न पक्कं होतांना नितीनराव खास संजनाकडे आले होते . आपल्या घराबद्दल , नातेवाईकांबद्दल बोलले . म्हणाले , ” तुझी सासू अत्यंत कुशाग्र बुद्धीची आणि तितकीच प्रेमळ स्त्री आहे . भाभा संशोधन संस्थेत एक ज्येष्ठ वैज्ञानिक आहे , अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत , …तिला स्वयंपाक करण्याची विशेष आवड नाहीये ..हे मला लग्नाआधीच तिने सांगितले होते …आणि मला काहीच हरकत नव्हती. म्हणून आम्ही अनेक वर्षांपासून आनंदाने यशोदा मावशींच्या हातचं खातो . तुला स्वयंपाक आणि नवीन पदार्थ करण्याची खूप आवड आहे , पण तुझ्या सासुकडून फारशी अपेक्षा ठेवू नकोस ..तेव्हढं सांभाळून घेशील प्लिज .”
संजना जाम इंप्रेस झाली होती …काय जबरदस्त बाई असेल माझी सासू ! आणि त्यांना प्रेमाने साथ देणारे सासरेही ! असं म्हणत तिने आनंदाने राहुलला होकार दिला होता .
तिची रेस्टॉरंट उभारण्याची इच्छा तिने राहुलजवळ बोलून दाखवली . तेव्हा त्याने काळजी व्यक्त केली की आईने कधीच घरी स्वयंपाक केला नाही , आता माझी बायको तरी काहीबाही करून घालेल असं वाटतं आत्या आणि आजीला . तू नोकरी जरूर कर , पण व्यवसाय ….
असं आढेवेढे घेणारं बोलला होता तो .
लग्न होऊन महिना झाल्यावर एक दिवस अनघा किचन मध्ये आली . संजना ऑफिस ला जण्यासाठी डबे भरून घेत होती .
” संजू , अग , काल ची कोफ्ता करी काय अप्रतिम झाली होती ग ! तू तर खरं छान रेस्टॉरंट सुरू करायला हवं . असे बोटं चाटत जेवतील न लोकं ..रांगा लागतील बाहेर ! ” अनघा म्हणाली , तशा आजीबाई बोलल्याच !
” सगळ्यांनाच नाही जमत हो उत्तम स्वयंपाक !! रॉकेट सायन्स एव्हढं सोपं नाही ते ! “
संजना उत्तर देणार होती , अनघा ने तिला गप्प केलं .
” संजू , काम कुठलंही असो , जीव ओतून करावं यश मिळतंच ! तिथे नो कॉम्प्रेमाईझ !
‘मिनर्व्हा’ जवळ आपला प्लॉट आहे , काही वर्षांपूर्वी घेतला होता ….तिथे सुरू कर तुझं रेस्टॉरंट ! मी रिटायर झाले की पूर्णवेळ तुझ्या मदतीला येईन .
संजना ने अत्यानंदाने आपल्या मनातलं ओळखणाऱ्या सासूला मिठी मारली . दारा आडून हळूच हसून बघणारा राहुल तिला दिसला
आणि ती खूप सुखावली .
© अपर्णा देशपांडे
Image by PublicDomainArchive from Pixabay
Latest posts by Aparna Deshpande (see all)
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
Chhan, mastach
अतिशय गोड
थँक्स
धन्यवाद
Awadla…ek bai eka bai la samjun ghete pan dusri nahi. Asa hota pan.
Wah chhanach
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद
मस्तच
धन्यवाद
वाह वाह!!!👌👌
सही
धन्यवाद
अतिशय गोड
अशी सासू सगळ्यांनाच मिळो,😀
खरंच
sundar
अशी सासू हवी ,पाठीशी उभी रहाणारी .मस्तच कथा
असं घर नेहमी आनंदात असते.
मस्तच…