गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग १

एअरपोर्ट च्या बाहेर येऊन तिने कॅब बुक केली
सामान नीट पुढच्या सीट वर ठेवलं आणि ती मागे बसली..
Otp घेऊन ड्राइव्हर नीं गाडी सुरु केली…

गाना सुनोगे मॅडमजी..?
कॅब मधल्या ड्राइव्हर नी तिला  विचारलं आणि ती हं म्हणाली…

आधी उडत्या चालीचं एक गाणं लागलं… पंजाबी..
भैया ये नहीं कुछ और लगाओ..
तिने एक पेन ड्राईव्ह दिला..
ये लगाओ pls… त्यानं ही लावला आणि गाणं सुरु झालं..

दों दिवाने शेहर में..
रात में या दोपहर में… आबोदाना..
आबोदाना ढूंढते हैं
एक आशियाना ढूंढते हैं..

ती हि गाणं गुणगुणु लागली आपल्याच तंद्रीत..
कॅब आता तो ज्या हॉटेल मधे उतरला होता त्याच्या आधीच्या चौकात आली..
एकदा वाटलं.. कळवावं त्याला… नको उगाचच सरप्राईज न ऑल..
कुठेतरी डिनर मीटिंग ला गेला तर?
पण मग सीट वर ठेवलेल्या “त्या ” गिफ्ट कडे पाहून तिनं विचार बदलला…
सध्या त्याच्या बंगळूर वाऱ्या वाढल्या होत्या… कंपनी जरी त्याचीच होती तरी राहण्याचा खर्च होतंच होता भरमसाठ..
सगळे फॉरेन क्लायंट.. मग तो तामझाम सांभाळायला ह्याला 5 स्टार हॉटेल बुक करावं लागे…
आणि मग खर्च हि वाढे…
आता तिची गाडी एका सिग्नल ला थांबली..
शेजारीच एक आलिशान गाडी येऊन थांबली..
बाहेरच्या हवेत गारवा आला होता नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे.. काळोख ही दाटला होता..
तिनं काच खाली केली…
आणि सहज लक्ष शेजारच्या गाडी कडें गेलं…
काय सुरेख गाडी होती…
आणि त्यात बसलेला तो तरुण तर अधिकच राजस, उमदा होता…
हि आपली.. आपल्याच नादात गाणं गुणगुणत राहिली… त्यानं हि काच खाली केली… गाडीजवळ आलेल्या भिकाऱ्याला खाऊ द्यायला…
इतक्यात रस्त्यावरचे दिवे गेले आणि काळोख गडद झाला.. आणि नेमकी त्याचं वेळी वीज चमकली..
आणि त्यानं तिला पाहिलं.
पेहेली नजर में..
क्या जादू कर दिया
तेरा बन बैठा हैं
मेरा जिया…
तिच्या नकळत तिचा फोटो काढून घेतला त्यानं…
त्या चमकलेल्या विजेसारखीची शुभ्र गोरी.. चमकदार डोळ्यांची.. मोकळ्या कुरळ्या केसांची अल्लड लड लांब निमुळत्या बोटांनी मागे सारणारी… अस्मानी सौंदर्य…

सिग्नल सुटला आणि त्यांचे रस्ते वेगळे झाले..
तो ही त्याच्या बंगल्यात पोचला आणि तो फोटो वेगवेगळ्या अँप वर टाकून तिला शोधू लागला..
****

इकडे ती ही तिच्या मित्राला भेटायला हॉटेलवर  पोचली..
इतक्यात तो मित्र तिला लॉबीत येताना दिसला..
सावळा उंच आणि गुळगुळीत चेहऱ्याचा.. कायम एक बेरकी भाव चेहेऱ्यावर जपणारा.. आणि समोरच्या ला नजरेनं धाकात ठेवायला आवडणारा…
खरतरं खूप लहान वयात तो यशस्वी उद्योजक झाला आणि ती  होती त्याची खास मैत्रीण आणि बिझनेसं पार्टनर..
इतक्यात रिसेप्शन वरच्या एका ललनेनं त्याला लाडिक हाक मारली..
मिस्टर चिटणीस… Can i bother you?
Sure young lady म्हणत तो ही समोर आला.. तिने त्याच्या मैत्रिणी कडें बोटं दाखवलं जी लॉबीत पाठमोरी बसली होती..  आणि म्हणाली.. She is looking for you sir?
ओह्ह let me see म्हणत  तो रुबाबात पुढे गेला आणि तिचा पाहून त्याचा चेहराच पडला..

ती मात्र अत्यंत आनंदात होती आज इतक्या दिवसांनी त्याला भेटणार होती आणि ते ही त्याच्या bday ला..
तिने त्याच्या साठी आणलेलं गिफ्ट दिलं आणि पर्स मधून एक छोटा बॉक्स काढला…
Happiest bday dear म्हणत ती चक्क गुडघ्यावर बसली आणि तिने तो बॉक्स उघडून त्याच्या समोर धरला..

ती काही बोलणार इतक्यात तो तिच्या वर खेकसला..
What rubbish… प्लीज उठ… हे काय चाललंय?
इतक्यात एक मुलगी त्याच्या मागे येऊन थांबली आणि म्हणाली.. हाय हनी.. मी तयार आहे निघायचं ना..
ओह्ह येस स्वीटहार्ट म्हणत तो निघूनही गेला..

त्याचा तो अवतार, ते वागणं बघून ती जागीच थिजली.. मग  अपमानित झाल्यामुळे  रागानं थरथरत बाहेर आली…
लॉबीत नुकतीच एक कॅब रिकामी झालेली दिसली.
तिने दारं उघडून तिची हॅन्डबॅग आणि पर्स त्या कॅबच्या मागच्या सीटवर भिरकावली आणि जोरात दारं लावून ती आत बसली..
एअरपोर्ट.. चलो..
ओके मॅडम.. म्हणत कॅब सुरु झाली..
ह्या ड्राइव्हर नीं आरसा तिच्यावर adjust केला..

ती मात्र रागानत पुटपुटत होती आणि एकीकडे अखंड रडत होती..
*****

तिला हे शहर नवं होतं.. आणि आजचा मूड इतका खराब होता की रस्त्याकडे साफ दुर्लक्ष होतं.. गाडीने केव्हाच एअरपोर्ट च वळण नं घेता रस्ता बदलला…
वेग वाढला तसें तिला आठवणींचे उमाळे अधिकच दाटून येऊ लागले..
****
समर…
आपला हा हिरो जों मगाशी तिला फोटो वरून शोधत होता त्याचा फोन वाजला..
हाय शशी.. समर नीं फोन अटेंड केला आणि स्पीकर ला टाकला.. एकीकडे लॅपटॉप वर शोध चालू होता तिचा …
अरे हाय काय? परत विसरलासं?
अरे काय विसरलो?
Its my Bday… आणि तू माझ्या फार्म हाऊस ला येणार होतास ना… आम्ही वाट बघतोय.. आहेस कुठे..?
ओह्ह shit!!.
सॉरी..
पार विसरलो… आलोच..
पोचतोय 20 मिनिटात..
समर नीं आईचा निरोप घेतला… हेल्मेट अडकवलं… आहे त्याचं डेनिम वर एक मजेंडा टी शर्ट आणि त्यावर ब्लॅक लेदर जॅकेट अडकवलं .. स्पोर्ट्स बाईक काढली आणि सुसाट निघाला…
..

काय घडेल तिच्या बरोबर?
समर तिला भेटेल? की या वेळी ही रस्ते वेगळे असतील?
क्रमश :
©®मनस्वी

Image by efes from Pixabay 

6 thoughts on “गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग १

Leave a Reply to Manasi@1 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!