गुंतता हृदय हे…देहभूल
16,काळे निवास, …
अहोsss त्या फोनच्या जवळ बसूनही तुम्हाला आवाज कसा येत नाही हो?
किती वेळ वाजतीये रिंग..सौं काळे कडाडल्या..
हो हो.. घेतो… थांब.. म्हणत श्रीयुत काळ्यांनी तो कॉल घेतला .
नमस्कार मी योग वधू वर सूचक मंडळातून साने बोलतोय..
एक स्थळं आहें तुमच्या लेकीसाठी…
हो हो साने, सांगा ना.. स्थळ इथलंच आहें पण मुलाला पायात थोडं व्यंग आहें.. इतकाच प्रॉब्लेम आहें.. बाकी स्थळ तोलामोलाचं आहें..
असू दे.. तुम्ही निदान दाखवण्याचा कार्यक्रम तरी ठरवा..
मी बोलतो हिच्याशी.
बर.. मग आज संध्याकाळीचं भेटूयात का?
हो हो चालेल या 6 वाजता .. म्हणत श्रीयुत काळ्यांनी फोन ठेवला.
इकडे सौं काळे किचन मधून त्यांचं बोलणं ऐकत होत्याच..
बर झालं बाई… स्थळ आलं ते.. आता आज आली की लगेच कार्यक्रम करूयात.. आधी कळवलं तर बया यायचीच
नाही…
तरी बरं.. हिच्या आवाडीनिवडीचा हवाय का? हे ही विचारून झालं.. पण तिथेही काहीच प्रगती नाही… कसं होणारं या मुलीचं?? 🙄🙄 काळे बाई काळजीनं बडबडत होत्या.. स्वगतच!! ऐकायला मिस्टर काळे नव्हतेच तिथे..
इकडे निषाद नाखे च्या ऑफिस मधे त्याच्या आईचा कॉल आला.. निषाद बाळा, आज लवकर ये.. संध्याकाळी जायचंय बाहेर..
आई अजून किती नकार ऐकायचेत? तो वैतागला होता..
अरे, सान्यांनी आधीच कल्पना दिली त्यांना पण तरीही मुलीकडचे “या ” म्हणालेत… म्हणजे नक्की योग जुळून येणार बघ..
बरं.. बघुयात.. म्हणत त्याने कॉल कट केला..
नाखे परिवार म्हणजे निषाद, त्याची आई आणि त्याचा मामा असे मुलीला पहायला आले.. त्याला वडील नव्हते..
आणि कुणी भावंड ही.. एकुलता एक..
नेहा ही एकुलती एक होती..
ती ऑफिस मधून घरी आली तसं आईनं तिला जवळ बसवलं.. मायेनं तोंडावरून हात फिरवला..
तिने लगेच तो मागे सारला.. आणि वैतागून म्हणाली
आजचा ‘कांदेपोहे ‘कार्यक्रम शेवटचा… आधीच सांगून ठेवतीये…
आई ही समजुतीच्या स्वरात ‘हो’ म्हणाली…
पण त्या माऊलीला मात्र तिचं लग्न नं जुळण्याचं कोडं कळतं नव्हतं….
आज तिला पहायला निषाद आला होता …. हा तिच्याच एका मामाच्या ऑफिस मधे कामाला होता… खाऊन पिऊन सुखवस्तू कुटुंबातला…
थोड्याच वेळात त्यांना बोलायला एकांत मिळाला आणि त्यांचं लग्न जमलं…. अनेक मुलींनी नाकारलेला निषाद आणि अनेक मुलांना नकार दिलेली नेहा ..
यांच कसं जुळलं हेच कळतं नव्हत.
दोन्ही आयांना सुखद धक्काच होता…
निषाद आणि नेहा यांचं एका अजब शर्तीवर लग्न ठरलं…
“लग्नानंतर शरीरसंबंध ठेवायचे नाहीत.. ”
निषाद दिसायला अगदीच सामान्य, सावळा आणि काहीसा स्थूल, पण पैसा जोडून होता… नाव ठेवायला जागा अशी नव्हतीच ..पण पायात व्यंग आणि पुरुषत्वात ही.. अर्थात पुरुषत्वाबाबतीतली… ही गोष्ट घरच्यांपासून लपवून ठेवली होती.. पण नेहा नी मात्र तिचा प्रॉब्लेम मोकळे पणानी सांगितला आणि त्यानं ही मन मोकळं केल… मग काय कायमचे बेस्ट फ्रेंड्स बनून राहायचं ठरवलं… आणि जमलं लग्न…
नेहा दिसायला उजवी, नाकी डोळी नीटसं, मादक सौष्ठव
पण तिला ही स्त्री सुलभ भावनांबद्दल आकस .. तिच्या लहानपणी तिने शेजारच्या काकांना त्यांच्या पत्नी सोबत “त्या “अवस्थेत पाहिलं आणि पुरुष केवळ स्वतः च्या सुखासाठी स्त्री ला त्रास देतो हे त्या बालमनावर कोरले गेले… आणि पुढे कॉलेज मध्ये मैत्रिणीनी दाखवलेली ब्लु फिल्म नी तर ही मनातली किळस पराकोटीला पोचली.. त्याचाच परिणाम म्हणून ती पुरुष द्वेष्टा झाली.. पण
मुळात संसार करण्याची हौस असली तरी पत्नीधर्म नको ह्या मतावर ठाम होती.. आणि निषाद ही आपल्या सारखा ह्या गोष्टींचा तिरस्कार करतो हे कळल्यावर ती लगेच लग्नाला तयार झाली…..
यथावकाश लग्न पार पडलं.. हनिमून साठी जोडपं मनाली ला ही जाऊन आलं.. आणि मग एक दिवस निषाद ला बदली ची नोटीस मिळाली..
त्याची बदली नाशिक ला झाली..
पुण्यातच वाढलेली ती दोघं आता नाशिक ला जाऊन राहणार होती.. आधीच नवं नातं त्यात ही बदली..
पण एका अर्थी नेहा साठी उत्तम संधी होती सासू पासून दूर राहायची… आणि नवा संसार मांडायची…
सुरवात तरी उत्तम झाली… चार दिवसात सगळं घर लावून झालं… फ्लॅट तळ मजल्या वर होता, आतमध्ये बरंच सुबक लाकडी फर्निचर होतं, मोठ्ठ स्वैपाक घर आणि तितकीच मोठी बेडरूम…
यात ही त्या जुन्या लाकडी पलंगाशेजारी मोठी खिडकी होती.. तिथून दिसणारा चंद्र आणि बाहेरच्या झाडांच्या पडणाऱ्या सावल्या अधिकच गूढ वातावरण तयार करायच्या…
काहीसं गूढ काहीसं प्रणय उत्कट.. पण ही दोघ मात्र रात्र झाली की एकमेकांकडे पाठ करून निवांत झोपून जायची…
त्या घराला ला वेगळा प्रवेश होता… जो समोर बाग होती, आणि त्यात एक लोखंडी स्टॅन्ड वाला झोपाळा ही होता… संध्याकाळी सगळं आवरून ती दोघं निवांत गप्पा मारत बसायची असेच काही दिवस गेले .. बघता बघता त्यांना इथे येऊन आता एक महिना होत आला होता..
आज पौर्णिमा होती… ऑफिस चं काम संपवून त्यानं गाडी काढली आणि हायवे नी सुसाट निघाला.. वाटेत जरा पेंग येतीये असं वाटून एके ठिकाणी टपरीवर वर थांबला ,
चहा घेतला .. थोड्याच अंतरावर एका कार मधून एक जोडपं उतरलं.. चहा हातात घेऊन ते गुलुगुलु करताना दिसलं.. मग ते जोडपं जवळच्या झाडामागे गेल..
नाही म्हटलं तरी ह्याच्या पुरुष भावना चाळवल्या गेल्या..
तो ही त्या अंधाराचा फायदा घेत त्यांना पाहायला झाडाजवळ पोचला…
ते जोडपं प्रणयात इतकं गुंग झालं होत की त्यांना पाहून तो अधिकच उत्तेजित झाला..
जरी तो पुरुषसुख द्यायला सक्षम नसला तरी मनातल्या भावना उसळून येतच असत…पण केवळ नेहा समोर तो या भावना दाबून टाकत असे… त्यानं सिगारेट शिलगावली
सिगरेट संपेपर्यंत तो त्यांनाच पाहत होता.. एके क्षणी त्यांची आणि याची नजरानजर झाली आणि त्यानं उरलेली सिगरेट तशीच फेकली.. बाईक वर येऊन बसला… घरापाशी पोचताच गाडीवरून खाली उतरला…. नेहमीप्रमाणे तो मागच्या दारानी बागेतून आत आला.. पण नेमकी लॅच ची किल्ली सापडेना..
…आज मनात फक्त एकाच विचारानी रुंजी घातली होती प्रणयसुख…
जे आजवर कधीच अनुभवलं नव्हतं ते प्रणयसुख..
त्यानं बेल वाजवली आणि तिची झोपमोड झाली…बारा वाजून गेले होते … तिनं गाऊन नीट केला आणि उठून बसली.. दोन मिनिट तशीच बसून राहिली मग खाली पाय टेकवत अंधारात चाचपडत स्लीपर चढवली आणि दार उघडायला बेडरूम बाहेर आली.. सवयीनं मधल्या पॅसेज चा दिवा लावला आणि मेन डोअर च्या आयहोल मधून बाहेर पाहिलं…
दार उघडलं आणि निषाद आत आला…
सॉरी गं… लॅच ची किल्ली घरीच विसरलो आणि तुला उठवाव लागलं.. Very sorry…
तिने फक्त ह्म्म्म म्हटलं आणि दारं लावून घेतलं…
तो सोफ्यावर बसला…
ती ही सोफ्यावर बसली… बाजूच्या तांब्याच्या जार मधून ग्लासात पाणी ओतलं.. आणि त्याला देत म्हणाली..
काय रे दमलास का?.. अर्थात या वाक्यानं तो अधिकच सुखावला..
हो गं.. आज खूप काम आणि प्रवास ही .. दिवसभर कॉल सेंटर झालाय कानाचा…
ऐक ना.. अजून एक त्रास देऊ? खरंतर मनात वेगळंचं विचारावंसं वाटत होतं.. पण त्यानं मनातला विचार झटकून टाकला
मग तिनेच विचारलं..
बोल काय वाढून आणू? पोळी भाजी चालेल की दहिभात कालवायचा?
कसली मनकवडी आहेस बायको… luv u.♥️..
पुरे माझं कौतुक.. सांग लवकर.. तिनं जांभया देत विचारलं..
दहिभात… मी आलोच फ्रेश होऊन…
निषाद आला आणि डायनींग टेबल पाशी बसला. मस्त दहीभात, तळलेली मिरची आणि ताक असं वाढून तयार होतं … ती मात्र बसल्या बसल्या पेंगुळली होती.. तो आला आणि जेवायला बसला… मधेच तिच्या चेहेऱ्या वरून हात फिरवला, कपाळावर आलेली बट कानामागे टाकली आणि म्हणाला… “जा आत जाऊन झोप… इथे अवघडशील…”
“ह्म्म्म.. जेव तू..” म्हणून ती तिथेच बसून राहिली…
मग त्याचं जेवण होताच तो बाकीचं आवरून तिच्या जवळ आला.. तिला तशीच धरून नेत तो बेडरूम मधे गेला…
ती पुन्हा गाढ झोपेत… तो मात्र अस्वस्थ ..
इतकी ‘गोड’ बायको आहे आणि आपण मात्र असे कमकुवत… हा विचार मनात येताच.. तिचा भूतकाळ आठवला.. तिला नको असलेले हे संबंध आणि म्हणूनच तिने केलेली आपली ‘निवड’हे ही आठवलं..
पण आज का कुणास ठाऊक राहून राहून
मगाचच जोडपं, त्यांची प्रणय क्रीडा आठवत होती… इतक्या ओपन हायवे वर ही, त्यांचं असं एकमेकांना जवळ घेणं पाहून तो ही क्षणभर मनानं ‘हिरवा’ झाला…
असू दे!!… पति पत्नी संबंध नसले तरी काय फरक पडतोय.. निदान तिला जवळ तर घेऊच शकतो ना??
असा विचार करत तो पाठमोरं कुशीवर निजलेल्या तिला मागून मिठी मारत निजायचा प्रयत्न करू लागला..
पण झोप लागेना.. काही वेळ असाच गेला, अचानक तिला जाग आली, त्याची ही अस्वस्थता आता तिला जाणवली पण ती तशीच पडून राहिली.. . तो खिडकीपाशी जाऊन बसला…
तिथून येणारा मंद चंद्र प्रकाश आता झिरपत होता… त्यानं मागे वळून पाहिलं ती आता खिडकी कडे वळली होती..
तिच्या पर्शिअन निळ्या गाऊन वर तो दुधाळ प्रकाश.. त्यात तिचं मादक सौन्दर्य त्याला भुलवू लागलं.. त्यानं अलगद तिच्या जवळ सरकत तिचं डोकं मांडीवर घेतलं.. तिला ही हा स्पर्श आवडून गेला… आता त्यानं अलवार बोटांनी तिच्या गाऊन ची लेस ओढली आणि ती निरगाठ अलगद सुटली त्यातून दिसणारे तिचे मादक सौष्ठव त्याला अजूनच अधीर करु लागले.. ती जागी असूनही तिने विरोध नाही केला,
आता तो तिच्या सर्वांगाला ते स्पर्शडंख जाणवू लागले .. तो तिच्या प्रत्येक वलयांकित अवयवाला डोळ्याने आणि स्पर्शाने अनुभवु लागला.. एका क्षणी ती ही उत्तेजित होऊन उठली आणि त्याच्या मिठीत शिरली … आणि ती दोघं पुन्हा एकमेकांच्या कुशीत निजली…. थोड्या वेळात पुन्हा विलग होऊन पाठमोरं निजली..
आता बाहेरच्या पौर्णिमेच्या चंद्राची धवल शलाका त्यांच्या खिडकीतून आत येत होती आणि अचानक त्या दोघांनी
एकमेकांन कडे वळून पाहिलं…त्या चंद्राचा इतका लख्ख निळसर दुधाळ प्रकाश!!… वाऱ्याची झुळूक आणि तिच्या लयीत डुलणारी झाडं.. सगळंच मोहक… यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता असा प्रणय आज त्यांच्या नात्यानं अनुभवायला सुरुवात केली..
त्यानं तिला जवळ घेतलं आणि तिने त्याच्या अधरांना तिच्या अधरमिठीत कैद केलं…. आज तिचं हे रूप वेगळंच होत… तिच्या लेखी प्रणय हा नाकारलेला विषय होता आणि आज तोच ती इतक्या उत्साहाने जगत होती.. . तिनं अधर, कानाची पाळी, मान, पाठ, त्याची रुंद गव्हाळ छाती, मजबूत खांदे आणि पिळदार दंड.. या पलीकडे जाऊन त्याच्या स्पर्शसुखाची इच्छापूर्ती करायचा यत्न सुरु केला…
आज त्याला जवळ घेताना त्याची इतक्या वर्षांची इच्छा पूर्ण करत होती ती… आज तिच्या मनातल्या सगळ्या किंतु परंतु ला तिलांजली देऊन फक्त त्याच्या सुखाचा विचार करत होती ती . जणु तीव्र काम इच्छेन ती पछाडली होती
अनपेक्षित असलं तरी,तिचं असं हक्क गाजवण त्याला आवडत होतं.. दोघांचेही आवगांचे वारू शांत झाले आणि ती बाजूला झाली… दोघं ही एका विचित्र ग्लानीत होती. मग ती तशीच विवस्त्र निजली..
सकाळी निषाद ला जाग आली आणि नेहाला या अवस्थेत बघून तो जागीच थिजला..
कालच्या स्पर्शखुणा आज स्पष्ट दिसत होत्या दोघांच्याही शरीरावर, काही ठिकाणी अर्धवट रक्त येऊन साकळलं होतं.. तर काही ठिकाणी नख लागलाच्या खुणा… तिला जाग आली तेव्हा तो तिच्या पायाशी बसलेला तिनं पाहिला…
मला माफ कर… नेहा..मी असं ओरबाडून सुख मिळवायला नको होतं..
तिनं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्या कडे पाहिलं.. म्हणजे?
काल आपण एकत्र आलो?? तिने किंचाळून विचारलं
पण कसं शक्य आहे? ती अजूनही धक्क्यातून सावरली नव्हती..
मला ही कळत नाहीये.. पण बघ जरा या खुणांकडे..
तुला काहीच आठवत नाहीये का? खरतर मला ही नीटसं आठवत नाहीये… पण मग हे काय आहे? त्यानं चाचरत विचारलं..
तिने अंगावरचं पांघरूण बाजूला केलं आणि आरशात स्वतः ला न्याहाळलं..
एका क्षणी ती ही हादरली.. आणि मटकन खालीच बसली..
बरीच वर्ष स्वतः ला प्रणया पासून दूर ठेवलेले हे दोन जीव आज इतके जवळ आले होते..
आपण दोघे ही हीच गोष्ट टाळत होतो आणि केवळ ह्याच गोष्टीला… शरीर सुख नाकारण्या च्या आधारावर तर आपलं लग्न टिकून होतं.. आपण बेस्ट फ्रेंड्स होतो आणि समाजासाठी नवरा बायको.. आता त्यामुळेच ह्या नात्याला तडा गेला..प्रचंड शल्य भावनेनी दोघे ही ग्रासले…
इथे आल्या पासून ही पहिलीच विचित्र गोष्टी घडली होती…
मुळातच त्या दोघांनी एकमेकांना टाळायला सुरुवात केली.. कसा काय घडू शकतं???
नेहा स्वतः शीच बडबडत होती..
मी लहानपणी एक वाईट प्रसंगातून गेल्यामुळे पुरुषस्पर्श नाकारत होती आणि निषादमधे तर पुरुषत्वाचा अभाव होता… जो कधीच पुरुष सुख देऊ शकणार नव्हता… मग असं कसं झालं?
ह्या एकाच विचारानी त्या दोघांना पछाडलं… त्यांनी एकमेकांना टाळायला सुरुवात केली…..
नेहमीप्रमाणे चौकशी करायला निषादच्या आई चा फोन आला.. पण दोघे ही जुजबी बोलले.. आणि तिने निषादला सुट्टी घेऊन परत यायला सांगितलं आणि त्याप्रमाणे ती दोघे ही तातडीने परत आली..
पुण्यात आल्याक्षणी सासूला भेटून नेहा तिच्या माहेरी आली… मग संध्याकाळी तब्येतीचा बहाणा करून तिथेच राहिली…
रात्रीची जेवणं झाली.. आणि नेहा नि सासूला फोन करून चार दिवसांनीं येते असा निरोप दिला… आता तब्ब्ल 15 दिवस होतं आले…
निषाद ही जरा पुन्हा मित्रांत रुळला.. नेहा समोर नसल्यामुळे आपोआपच जरा स्थिरावला..
आज तो ट्रेक ला जाणार होता.. भंडारदऱ्या ला..
नेमकं नेहा नि ही त्याचं ट्रेक ला नाव नोंदवलं आणि ती ही येऊन पोचली..पुन्हा एकदा समोरासमोर..
अरे देवा… कॅन्सल करावं का? मी का करू मला जायचंय काजवा महोत्सव बघायला.. इकडे त्याला ही वाटलं.. पब्लिक आहें बरोबर.. आणि आता कुणी ही माघार घेणं बरं दिसणार नाही so जाऊयात..
दोघे ही जुजबी बोलत होते..
पोचेपर्यंत संध्याकाळ झाली..
सगळ्यांनी टेन्ट बांधले… पाणी, शेकोटी साठी लाकूडफाटा, जेवणाची तयारी अशी लगबग चालू होती..
आता जरा त्यांच्यातला दुरावा ही निवळला..
कॅम्प फायर भोवती नाच गाणी मजेत चालू होतं..
पण हळू हळू थंडी वाढू लागली..
साधारण अकराच्या सुमारास.. लीडर नि सगळ्यांना गोळा केलं.. आणि टॉर्च च्या उजेडात दरी च्या बाजूला नेलं.. असंख्य काजवे मुक्तपणे तिथल्या झुडूपा तून, झाडांवरून उडत होते… कधी कधी आख्ख झाडचं लखलखायचं
हे सगळं टिपत, डोळयांत साठवत ती दोघं एकत्र परत आली… येताना त्यानं काजवे रिकाम्या पाण्याच्या बाटलीत भरून आणले.. आता टेन्ट मधे ती दोघंच होती आज पुन्हा
अमावस्या होती.. टिपुर चांदणं पडलं होतं.. गार वाऱ्याची झुळूक, तिने त्या बाटलीच झाकण उघडलं.. आणि काहीच क्षणांत तो टेन्ट त्या उडत्या प्रकाशकणांनी उजळला..
त्यानं तिचा हात हातात घेतला आणि मनापासून sorry म्हटलं… झालेल्या मागच्या घटनेबद्दल आणि.. आणि अचानक तिच्या अंगात वीज लहरून जावी तसा कुठल्याशा अनामिक शक्तीने ताबा घेतला…
ती पुन्हा एकदा त्याला आपल्या बाहुपाशात आवळू लागली
पुन्हा तोच आवेग, तीच ओढ आणि तसंच स्पर्शाने त्याला मुग्ध करणं… त्यालाही ही ‘देहभूल ‘ पडली..
त्याच्या ही नकळत तो अनावृत्त होतं तिच्या मिठीत विरघळायला लागला..
आणि पुन्हा एकदा त्यांच्यातल्या नात्याने ती स्पर्शमर्यादा ओलांडली…
बाकी तिथं कुणीच नव्हतं.. त्या टेन्ट मधे एकमेकांना कवेत घेतलेल्या त्या 2 अनावृत्त काया..
रात्रीचे 2 वाजून गेले आणि हळूहळू बाकीची मंडळी परतायला लागली…
ह्यांच्या टेन्ट मधला काजव्यांचा प्रकाश पाहून बाकीच्यांनी त्यांना अजिबात डिस्टर्ब केलं नाही.. आणि ती दोघं मात्र शांत पहुडलेली होती… गात्र नं गात्र शांत, तृप्त… पहाटेच त्या दोघांना जाग आली.. आणि पुन्हा एकमेकांना असं पाहूनं त्यांची बोबडीच वळली..
त्यांनी झटकन आवरूनं घेतलं आणि बाहेर शेकोटी पाशी आले…ती त्याच्याकडें पाहत होती… आणि अचानक तिला एखादा झटका बसावा तशी ती किंचाळली.. आणि बेशुद्ध पडली नि त्यानं तिच्या शरीरातून एक पाठमोरी स्त्री बाहेर पडताना पाहिली… तीच निळी सॅटिनची नाईटी, लांब केस आणि तिने केस एका बाजूला घेत मानेला एक झटका दिला आणी क्षणात तिची मान गरर्रक्कन वळली..
आणि बघता बघता ती तरंगत हवेत विरून गेली..
काहीं कळायच्या आत तोही फटकन बेशुद्ध पडला .
त्यांच्या आवाजाने जाग येऊन बाकीचे त्यांच्या भोवती जमले .. पण काहीही केल्या ते दोघे ही शुद्धीवर येत नव्हते . शेवटी गावाकऱ्यांना बोलवून त्यांना जवळच्या दवाखान्यात ऍडमिट केलं .
काही वेळानी दोघं ही जागे झाले आणि आपापल्या घरी आले…
ती मुद्दाम तिच्या माहेरीच थांबली.. सासू भेटायला आली तसं तिने त्यांना बेडरूम मधे नेलं…
सगळं लपवलेलं
सगळे घरी येतात काही दिवस असेच शांत जातात पण दोघांनाही बसलेला जबर धक्का पाहता त्यांना मानसोपचार तज्ञाला दाखवतात…
नवस सायास चालूच असतात.. अशातच एक आध्यत्मिक व्यक्ति निषाद च्या आईच्या संपर्कात येते.. दोघं ही त्यांना भेटतात…त्यांना वारंवार या देहभुली चे येणारे अनुभव सांगतात .. आणि कशी प्रत्येक वेळी ती वेगळी शक्ती
त्या दोघांनाही कह्यात घेते हे ही सांगतात.. ती व्यक्ति मग तोडगा सांगते… यासाठी त्यांना त्रंबकेश्वर ला जाऊन पूजा करायचा सल्ला देते.. चला हा ही उपाय करून पाहूया म्हणून पुन्हा दोघेही नाशिकला येतात…
त्याच जुन्या वास्तू समोरून जाताना अचानक त्याला काहीतरी आठवत.. एका क्षणांत त्याला ती ‘पहिली रात्र’ आठवते, आणि मग त्याला आधी दिसलेलं ते हाय वे वरचं जोडपं ही..
तो ताबडतोब त्या व्यक्तीला ती गोष्ट कळवतो.. मग
त्याला हे ही आठवत की कसा नकळत त्याचा मोबाइल कॅमेरा चालू झाला होता आणि त्याच्या ही नकळत त्याला कपल चा फोटो क्लिक झाला होता..
त्याला व्यक्तीला तो फोटो शोधून पाठवतो..तो फोटो ती व्यक्ती पाहते …
निषाद पुन्हा एकदा सांगतो.. की त्यानं ह्याचं बाईला कॅम्प फायर च्या रात्रीं पाहिली होती…
तो हे सगळं नेहा लाही सांगतो तिला ही धक्का बसतो मग दोघे ही त्याचं spot ला( जिथे त्यानं कपल पाहिलेलं असतं )परत जातात. चौकशी करतात आणि कळत की त्या दिवशी निषाद नि त्यांना पहिल्यानंतर ते कपल घाईनं निघालं आणि एका भीषण अपघातात बळी पडलं…
आणि त्यांच्या देहवासने साठी त्यांनी निषाद आणि नेहा ला निवडलं…
… निषाद आणि नेहा मनापासून त्या आत्म्याची माफी मागतात आणि गोदावरी च्या काठावर ती पूजा करून परत येत असतात… अचानक जोराचा वारा वाहू लागतो.. ते धुळीच्या माऱ्यापासून वाचायला मागे वळून पाहतात तर तेच जोडपं नदी पल्याड उभं दिसतं.. नि पाहता पाहता… एका धुळीच्या वावटळीत विरून जातं…
निषाद आणि नेहा शांत मनानं परत येतात ..
©मनस्वी
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
sundar kathabij
Thank you sir 😊
Durdaiva na – prem kahani adhuri rahte ani vastavat fakta tadjod urate….
👍👌