गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग २

भाग १ ची लिंक- गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग १

भाग २

समर नीं एअरपोर्टचा रस्ता निवडला आणि नेमका तिथे एक टँकर च्या ऑइल गळती मुळे तो बंद करण्यात आला..
समर पुन्हा वळला .. आणि पुन्हा मागच्या चौकात आला.. पुन्हा एकदा फोन वाजला ..
शशी… यार एअरपोर्ट रोड बंद आहें… पोचायला वेळ लागेल  ..
अरे सॅम.. तेच सांगायला फोन केलाय.. तू चुकून जुन्या फार्म हाऊस ला जाशील… तिकडे नाही… एअरपोर्ट च्या विरुद्ध दिशेला अंदाजे 20 km ये… डाव्या हाताला हॉटेल swan inn आहें त्याच लेन च्या डेड एन्ड ला…शशी बोलत असताना मागे कुणाचा तरी फोन वाजला… शशी नीं मागे वळून एक शिवी दिली आणि तो पुन्हा बोलू  लागला..
अरे चिडू नको…ओके… कळला रस्ता… तरी live लोकेशन टाक… मी पोचतोय..
आणि सुरुवात करु नका… मी येतोय.. समर नीं वाऱ्याच्या आवाजात ओरडून सांगितलं..
हो रे बाबा.. तुझ्यावर नाही चिडलो… बाकीचे पण पोचतायत.. ये लवकर.. असं म्हणत शशी नीं कॉल कट केला..

******
सखी…
ड्राइव्हर नीं रस्ता दुसराच पकडला असला तरी आधी सुनसान वाटणाऱ्या रस्त्यावर अचानक एका चौकात बऱ्याच गाड्या येताना दिसू लागल्या.. त्यातच सखीच्या कॅब ला ओव्हरटेक करून गेलेल्या  एका टेम्पो चा अपघात झाला आणि मग एका पाठोपाठ एक गाड्या त्यावर आदळू लागल्या… एकच गोंधळ उडाला.. सखी ही सावरली आणि तिने मोबाइल चेक केला… तिच्या मित्राचे.. निशांत चिटणीस  चे बरेच missed calls आणि मेसेजस आलेले दिसलें..
तिने आता त्याला आयुष्यातूनच वजा करायचं ठरवलं होतं…
असंख्य गाड्या, कर्ण कर्कश्य हॉर्न आणि एकमेकांनवर आदळालेल्या गाडयांतून उतरून भांडणारी लोकं.. तिने दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण कुणीतरी इतक्यात मागून 2 व्हिलर वर  जोरात पुढे आला आणि या अनपेक्षित कृती मुळे धडपडला..
बाजूला माळरान होतं… तिने पर्स खांद्याला लावली  आणि त्याच्या मदती साठी ती खाली उतरली…
ड्राइव्हर नका उतरू म्हणून चरफडत होता… कारण त्याच्या दृष्टीने सावज निसटलं होतं..

इतक्यात ती ज्या कॅब मधे बसली होती त्या केबवरच मागची गाडी आदळली आणि नियतीनं तिला पुढच्या खेळासाठी वाचवलं ..

समर चं होता तो.. धडपडलेला 2 व्हिलर वाला .
ती जवळ गेली आणि पाहिलं तर त्याच्या काना मागून रक्त येतं होतं..
हेल्मेट मुळेच बचावला..

तिने ही थंडीचे दिवस होते म्हणून  लांब हाताचा लाल पंजाबी ड्रेस आणि त्यावर वूलन जॅकेट घातलं होतं ..अलगद त्याच्या हेल्मेट चा बेल्ट काढला.. आणि डोक्याची जखम पाहिली… गंभीर इजा नव्हती पण तो मात्र डोकं धरून बसला होता आणि तेवढ्यात त्याची शुद्ध हरपली.. आणि त्याचा फोन वाजला… तिने मगाशी हेल्मेट काढलं तेव्हाच ब्लूटूथ ही बाजूला काढले होते… मग बाजूला पडलेला फोन उचलला आणि अटेंड केला ..
शशी चाच कॉल..
अरे सॅम कुठे आहेस?
हॅलो… मी सखी… तुमच्या मित्राचा हायवेला अपघात झालाय.. मला तुमचा नंबर सांगा मी live लोकेशन पाठवते… मी या शहरात नवीन आहें.. Pls लवकर या..
शशी ने तिला नंबर सांगितला आणि तिने लोकेशन पाठवले…
समर ला तिने आधार देऊन बसवायचा प्रयत्न केला पण गाडी पायावर होती…
तिने हेल्प हेल्प करून .. इतक्यात एक दोन जण त्याच्या गाडीजवळ आले त्याच्या पायवतिने गाडी  बाजूला केली..
तिने तिच्या बॅगेतून पाण्याची बाटली आणली… तोंडावर पाणी मारलं…तो जरा शुद्धीवर आला आणि उठायचा प्रयत्न करु लागला… पण पाय चांगलाच दुखावला होता.

क्रमश:

पुढील भागाची लिंक- गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग ३

Image by efes from Pixabay 

6 thoughts on “गुंतता हृदय हे…जब्त-ए-इश्क- भाग २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!